सध्या जगभर गाजत असलेल्या सिरियन यादवी युद्धाची काही छायाचित्रे देत आहे.
सूचना :खालील काही छायाचित्रे डिस्टर्बिंग आहेत, जे भीषण चित्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
सिरियन सिव्हिल वॉर ची सद्यस्थिती
असद समर्थक - दमास्कस मध्ये
अमेरिकाविरोधी घोषणा देणारे नागरिक (संभाव्य अमेरिकन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर)
सिरियन फोर्सेस च्या सैनिकाच्या गळ्यातील असद यांचा ताईत
केमिकल हल्ल्यासंदर्भात आपली भूमिका मांडताना राष्ट्राध्यक्ष असद बशर
रासायनिक हल्ल्यातील बळी
या सारीन चा वापर झाला तसेच काही ठिकाणी थर्मोबारीक मिसाईल डागण्यात आल्या
संयुक्त राष्ट्रसंघाची टीम पाहणीसाठी सिरीयामध्ये
सिरियन निर्वासितांच्या छावण्या (कुर्दिस्तान,इराक)
होटेलमधील आत्मघाती हल्ल्यानंतरचे चित्र
शेलिंगनंतरचा एका रेबेलचा मृतदेह
सिरियन सैनिक रेबेल्स चा मदतगट अल नूस्राच्या सदस्याला मारल्यावर पाहणी करताना
निर्वासितांचे लोंढे कुर्दिस्तान (इराक) मध्ये जाताना
रेबेल फोर्सेस १५-१६ वर्षांच्या मुलांनाही भारती करून घेत आहेत
फ्री सिरियन आर्मी (रेबेल) चे सैनिक एका निवांत क्षणी
रमादान च्या महिन्यात निर्वासित छावणीत आसमा असद आणि बाजूला पुन्हा ताब्यात घेतलेल्या भागाची पाहणी करताना असद बशर
उध्वस्त सिरीया - खालीदिया प्रांत
इस्ततः विखुरलेले रेबेल्स चे मृतदेह
झतारी रेफ्युजी छावण्या , अराफाक - जोर्डन
शेलिंग दरम्यान पडलेला एक बॉम्ब
अश्याच एका बॉम्बहल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या लहान मुलाचे दफन करणारा सिरियन नागरिक
रेबेल फायटर
अंजेलिना जोली - सिरियन रेफ्युजी छावणीत
सिरियन रेबेल आणि त्यानी बनवलेले घरगुती मिसाईल
यशस्वीपणे उडवताना
रशियन लढाऊ हेलीकॉप्टर्स असद सरकारच्या मदतीसाठी सिरियात दाखल
इराकी ग्रुप
दमास्कस - अंडरग्राउंड बंकर्स मध्ये घेण्यात आलेली परीक्षा !
शेलिंग
बशर एका श्रद्धांजली कार्यक्रमात जात असताना
बनियस प्रांतात केले गेलेले हत्याकांड रेबेल फोर्सेस कडून
उत्तर भागात सिरियन आर्मीवर विजय मिळवल्यावर जल्लोष करताना रेबेल फोर्स चे सैनिक
रेबेल फोर्स चा सैनिक- राजधानी दमास्कस
हॉस्पीटल
…
आलेप्पो शहर ,आपल्या कुटुंबासाठी अन्न घेऊन पळताना एक नागरिक…रेबेल्स च्या भागात जाऊन दुकानातुल अन्न घेऊन पुन्हा सिरियन आर्मी च्या भागात स्नायपर्सच्या गोळ्या चुकवत जाताना…कुटुंबासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या माणसाला सलाम
तुर्की च्या काही भागातही कुर्दिश कट्टरवाद्यांनी हैदोस घातला आहे, सीमेचे रक्षण करताना तुर्की फोर्स च्या महिला
बॉम्बहल्ल्यात मृत्यू पावलेल्या आपल्या पत्नीजवळ बसून रडताना सिरियन नागरिक
रेबेल फोर्सेस महिला
अनोखा लग्न समारंभ
शेलिंग करणाऱ्या विमानाकडे पाहताना चिमुरडी
सिरियन रेबेल फोर्सेसला अमेरिकेकडून शस्त्रपुरवठा - रेबेल फोर्सेस मध्ये अल-कैदा चा उघड सहभाग आहे त्यामुळे अल-कैदा ला संपवण्यासाठी उतावीळ झालेली अमेरिका आणि सिरीयामध्ये अल कैदा ला थेट शस्त्रपुरवठा करणारी अमेरिका अशी विरोधाभासी चित्र दिसत आहेत.
साभार सीएनएन, एनबीसी,बीबीसी वृत्तसंस्था
प्रतिक्रिया
13 Sep 2013 - 6:56 pm | मुक्त विहारि
ह्रुदय द्रावक
13 Sep 2013 - 7:04 pm | सौंदाळा
सहमत.
बातम्यांमधे काहीच दाखवत नाहीत यामानाने. भीषण आहे परिस्थिती. रासायनिक शस्त्रे खरेच वापरली होती का पण? का उगाच कांगावा केला गेला?
13 Sep 2013 - 7:10 pm | जॅक डनियल्स
सगळ्या भावना आणि घटना टिपणारी छायाचित्रे आवडली. फोटो-स्टोरी हे करणे बेक्कार अवघड असत असणार, मला नेहमी, अश्या परिस्थितीत फोटोग्राफर कसा काय काम करतो ? असा प्रश्न पडतो. स्वतः पण (भिंतीवरच्या) फोटो चा भाग न बनता फोटोग्राफी करणे म्हणजे 'सलामी' काम आहे.
केमिकॅल अस्त्राने, काय झाले याचे फोटो खालच्या लिंक मध्ये आहेत,
सिरीया !
ती खूप भीतीदायक वाटतात कारण जी आपल्या मनात युद्धातल्या मृत्यू ची कल्पना असते, ती कल्पना मोडून काढतात.
13 Sep 2013 - 8:19 pm | विकास
फोटो-स्टोरी हे करणे बेक्कार अवघड असत असणार, मला नेहमी,
या संदर्भात टाईम मॅगझिन मधील हा फोटो एसे पहा. मी सगळा वाचत बसलो नाही (आणि ते फोटो पण बघायला गेलो नाही...)
13 Sep 2013 - 9:02 pm | जॅक डनियल्स
खूप भयानक, पण सत्य आहे.
फोटो एसे, हा प्रकारच भारी आहे, प्रत्येक फोटोची एक गोष्ट असते आणि प्रत्येक फोटो एक पुस्तक म्हणून पण वाचता येतो. टाईम ची फोटो एसे ची एक वेबसाईट आहे "लाईफ !
13 Sep 2013 - 7:29 pm | मी-सौरभ
.......
13 Sep 2013 - 7:35 pm | पिलीयन रायडर
लहान मुलांना मारुन जग जरी जिंकलं तरी काय उपयोग आहे??? काय असं मिळवणारेत हे लोक??
सुन्न झालय डोकं...
13 Sep 2013 - 7:39 pm | विकास
अस्वस्थ करणारी छायाचित्रे आहेत. तेच वरील जॅक डनियल्स यांच्या प्रतिसादातील बॉस्टन ग्लोबमधील दुव्याबद्दल...बरेच कंगोरे असलेला हा विषय आहे.
रासायनिक शस्त्रे वापरली गेली आहेत हे सत्य आहे... पण जे आजपर्यंत चालत आले आहे तेच आत्ता देखील होत आहे. लहान राष्ट्र आणि तिथला हुकूमशहा मोठ्या राष्ट्राच्या हातातले स्वतःचा स्वार्थ (आणि जीव देखील) टिकवण्यासाठी खेळणे होणार. मग दुसरे मोठे राष्ट्र त्यावर हल्ला करणार अथवा त्याहूनही अधिक म्हणजे परीस्थिती चिघळवत ठेवणार...
तेथे नागरीयुद्ध चालू आहे. आसाद वाईट आहे हे नक्कीच. पण त्याचे विरोधक देखील आले तर ते कट्टर इस्लामिस्ट आणि अलकायदाने प्रेरीत झालेलेच असणार आहेत.
अमेरीकेने रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याने आंतर्राष्ट्रीय कराराचा भंग झाला म्हणून सिरीयावर हल्ला करायचे योजले खरे. त्यातली मेख अशी की सिरीया ह्या करारात सामीलच नाही... त्या व्यतिरीक्त अमेरीकन जनता आणि राजकारणामुळे असेल पण अमेरीकन काँग्रेस देखील युद्धाच्या विरोधात आहे.
त्यात भरीस भर म्हणून रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांनी न्यू यॉर्क टाईम्स मधे अमेरीकेन जनतेला उद्देशून स्तंभलेखन (ऑपएड) लिहीले आहे. त्यात आपण (रशियन्स) कसे आंतराष्ट्रीय कायदा पाळतो आणि अमेरीका कशी पाळत नाही इथपासून ते देवाने सर्वांना समान तयार केले असे कधीकाळी साम्यवादी रशियाच्या गुप्तहेर संघटनेचा प्रमुख (पुतिन) बोलताना दिसतो!
आखातातले तेल जर समुद्राखालून युरोपात आणायचे असेल तर सिरीया हा योग्य पर्याय आहे. आणि तसे झाले तर रशियाच्या तेलाचे काय होणार हा प्रश्न आहे.
View Larger Map
13 Sep 2013 - 7:55 pm | इष्टुर फाकडा
एका सुंदर देशाची हि अवस्था बघवत नाहीये… सिरीयन प्रश्न आता खरच हाताबाहेर आहे. जॉन केरी वाल्या छायाचित्रा वरून ते अधोरेखित होतंय.
13 Sep 2013 - 8:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
मेंदू प्रगत झाला आणि जनावर व मानवात खूपच फरक पडला...
जनावरे अजूनही मेंदूचा उपयोग पोटाची भूक भागण्यासाठी गरज आहे तेवढीच हत्या करण्यासाठी करतात, माणूस मात्र मेंदूची सतत वाढत जाणारी आणि न भागणारी भूक (हाव) भागवायलाही हत्या करायला लागला.
13 Sep 2013 - 9:03 pm | जॅक डनियल्स
+११११
13 Sep 2013 - 8:21 pm | तिमा
कोणी जाणकार व्यक्तीने लेख लिहावा. फोटो भयानक आहेत. आसदला रासायनिक शस्त्रे पूर्वी अमेरिकेनेच दिली म्हणतात.
13 Sep 2013 - 8:58 pm | मालोजीराव
आणि रसायनांची लायसंस ब्रिटन नी दिलेली
13 Sep 2013 - 8:30 pm | प्यारे१
सत्ता नि राजकारणाबरोबरच अर्थकारणातल्या पटावर किती प्यादी फुकाफुकी मरणार आहेत कुणास ठाऊक.
13 Sep 2013 - 9:06 pm | प्रसाद गोडबोले
ह्या फोटोज ची ऑथेंटीसिटी काय ?
13 Sep 2013 - 10:32 pm | चिगो
अत्यंत वाईट.. सत्ता, अधिकार, पैसा आणि वर्चस्व ह्यापायी माणुसकी विसरतात लोक.. विश्वाच्या पटलावर एका धुलिकणाएवढी पृथ्वी, त्या पृथ्वीच्या इतिहास-भविष्याच्या तुलनेत एका नॅनोसेकंडएवढा माणसाचा आयुष्यकाल! किती महत्त्व देतात लोक आपल्या क्षुल्लक आयुष्याला आणि त्यातील महत्त्वाकांक्षांना, आणि किती क्रूर होतात त्यापायी ? देवा, माणुसकी दे रे माणसाला..
13 Sep 2013 - 10:50 pm | किसन शिंदे
पाहवतही नाही इतकं भीषण आहे हे सगळं.
13 Sep 2013 - 10:58 pm | पुष्करिणी
ही सुन्नी आणि अलेवाइट या इस्लामच्या दोन पंथांमधली मारामारी आहे. टर्की आणि कुर्दीश मारामारी सुद्धा सेम. १० लाख कुर्दीश नागरिक सद्दाम हुसेन नं नर्व्ह गॅस वापरून मारले होते. हे काम करणार्या सेनाधिकार्याला 'केमिकल अली' असच म्हणत.
सामान्य सिरीयन नागरिकांच जीवन अवघड आहे या परिस्थितीत पण अमेरिकेनं जिथं तिथं रेबल्स ना शस्त्र / ट्रेनिंग देणं आतातरी थांबवाव...जे काही करायचय ते मध्य आशियातल्या देशांनी कराव. इराणचा शाह, हुस्ने मुबारक, गद्दाफी यांना हटवून काय भलं झालं त्या त्या देशांच आणि जगाच?
13 Sep 2013 - 11:18 pm | निनाद मुक्काम प...
मागे मी मद्रास केफे वरील लेखात प्रतिसाद देतांना एक लिंक दिली होती ती वाचावी के जी बी चा माजी गुप्तहेर अमेरिकेत पळून गेल्यावर १९८४ साली त्याने अमेरिकन अधिकाऱ्यांना दिलेली माहिती इतक्या वर्षांनी तू नळीवर उपलब्ध आहे.
त्यात त्याने साफ म्हटले होते जगभरातील कोणतीही ग्रास रूट चळवळ हि उस्फूर्त नसते.
सिरीयामध्ये बंडखोरांना मदत करणारे ह्या विध्वंसाला तितकेच जबाबदार आहे.
अमेरिकेला फक्त ९-११ माहिती आहे ,
पण अमेरिकेने इराक व अफगाण मध्ये २४-७ जे आरंभले आहे हे सर्व जगाला ठाऊक आहे.
रिसेशन च्या फेर्यातून अमेरिका नुकतीच गेली आहे ,
त्यांच्या जनतेला अमेरिका युद्ध फक्त हॉलीवूड च्या सिनेमातच जिंकते हा साक्षात्कार झाला आहे.
रासायनिक व आण्विक शस्त्रे व त्यांचा प्रसार हा अरब राष्ट्रांनी केला नसून त्यांना हि शस्त्रे प्रगत राष्ट्रांनी दिली.
आता अमेरिकेत १००० जास्त अण्वस्त्रे लोणच्याच्या बरणीत ठेवली असून कधीकाळी जगावर एलियन चा हल्ला झाला तर तिला वाचविण्याची जबाबदारी एक जबाबदार महासत्ता म्हणून अमेरिकेला पार पाडावी लागणार म्हणून नाईलाजाने ते अण्वस्त्र स्वतः कडे ठेवून इराण ला ती बनवू देत नाही आहेत.
ओबामा ला नोबेल देण्याचा पश्चात्ताप तो देणाऱ्या संघटनेला होता होता वाचला
सिरीया मध्ये संयुक्त राष्ट्र संघांची शांती सेना पाठवायला हवी अजून इजिप्त शांत झाले नाही आहे. आणि
अमेरिका मात्र असाद ने काही हजार सिरियन मारले त्यासाठी सिरीयाशी युद्ध करून काही लाख सिरियन इराकी मारले तसे मारणार.
13 Sep 2013 - 11:28 pm | दशानन
गिरिश कुबेर यांचे राजहंसने प्रकाशित केलेले "युद्ध जिवांचे" हे पुस्तक जेव्हा वाचले तेव्हाच मी समजून चुकलो होतो की युद्धे ही लढण्यासाठी नसतात तर फक्त आणि माणसं ते ही जास्तीत जास्त कशी मारली जातील हे निश्चित करण्यासाठीच होते. रासायनिक / जैविक अस्त्राचा प्रयोग अगदी आदिम काळापासून केला गेला आहे, हे वाक्य जर मी हे पुस्तक वाचण्याआधी कोणी माझ्यासमोर व्यक्त केले असते तर मी त्याला वेड्यात काढले असते.. पण इंग्लडने अमेरिकेत प्रवेश करताना काय केले हे जेव्हा वाचले तेव्हा खरचं मला वाचताना पण विश्वास बसला नाही मी थोडा नेटवर शोध घेतल्यावर जे जे सापडले ते आपल्यासारख्या सामान्य माणसांना प्रचंड धक्कादायक असते.
मी नेहमी म्हणतो, आपण मानव म्हणजे सभ्य व शांततेचे पुरस्कर्ते आहोत हा जगातील सर्वात मोठा विनोद आहे, मानव म्हणजे जगातील सर्वात घातक व धोकादायक प्राणी आहे, जो फक्त आणि फक्त विनाश करु शकतो. फक्त हे तात्कालिन परिस्थितीवर अवलंबून असते की तो कसा वागणार आहे.. अफाट शक्ती जेव्हा हाती असते तेव्हा हिरोशिमा व नागासाकि या खूप छोट्या गोष्टी आहेत!
14 Sep 2013 - 7:13 am | नगरीनिरंजन
आपण जे भविष्य गृहीत धरले आहे त्याच्या नाशाची ही सुरुवात आहे. अजूनही बहुसंख्यांना वाटते की सीरियात जे यादवीयुद्ध गेली काही वर्षे चालू आहे त्यामागे दोन धार्मिक गटांमधली तेढ किंवा तत्सम कारणे आहेत. तशी ती आहेतच पण त्यांचा परिणाम शतगुणीत करणारी कारणे कोणत्याही मुख्य प्रवाहातील माध्यमात सांगितली जात नाहीत.

सुन्नी, शिया वा अलावाईत मुसलमान तिथे अनेक वर्षांपासून राहतात आणि भांडतातही पण त्यांची भांडणे इतक्या विकोपाला जाण्याचे कारण आहे अन्नपाण्याची टंचाई आणि आर्थिकदृष्ट्या कोसळत चाललेली व्यवस्था.
हवामान बदलाचा थेट परिणाम दिसणारी ही पहिली घटना असावी आणि असे प्रारब्ध आपले नाही असे समजणार्या लोकांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.
गेली काही वर्षे सीरियात अभूतपूर्व असा दुष्काळ आहे.
गव्हाचे व इतर अन्नधान्याचे उत्पन्न खूप कमी झाले आहे (http://www.pecad.fas.usda.gov/highlights/2008/05/Syria_may2008.htm)
या दुष्काळामागे हवामान बदल हे एक प्रमुख कारण आहे पण त्याबद्दल वाच्यता केली जात नाही. त्याचवेळी खनिज तेलाचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. सीरियासारख्या तेल निर्यातदार देशांचे तेल निर्यातीतून मिळणारे उत्पन्न घटत चालले आहे आणि त्याचवेळी लोकसंख्या विविध कारणांनी वाढतच आहे व त्यात इराकसारख्या देशांतून येणार्या विस्थापितांची भर पडत आहे.
(http://www.noaanews.noaa.gov/stories2011/20111027_drought.html)
तेलाच्या तुटवड्याचा धोका वेळीच लक्षात घेऊन अमेरिकेने आपला व आपल्या मित्रांचा तेल पुरवठा 'सुरक्षित' करण्यासाठी आधीच आखलेल्या धोरणाप्रमाणे या प्रदेशात आपला फास आवळायला सुरुवात केली आहे.
तिकडे रशियाला तेलातून जर पुरेसे उत्पन्न मिळाले नाही तर त्यांच्याही अर्थव्यवस्थेला धोका आहे. हवामान बदलाची झळ त्यांनाही बसू लागली आहेच.
या सगळ्या घटना म्हणजे आगामी जगव्यापी संघर्षाची नांदीच म्हटली पाहिजे.
14 Sep 2013 - 10:19 am | दादा कोंडके
घाबरवून सोडलत की हो. पण काही विचारजंत सुरक्षीत वातावरणात, गुबगुबीत खुर्च्यात बसून हे चाललय ते एव्हडं वाईट नाही, यापुर्वी याहून भयंकर रक्तपात झालाय, वातावरण बदल ही समस्या नाही आहे, उलट आकडे देउन अनधान्याचे उत्पादन खूप वाढलय, अगदी भारतसुद्धा परत सुजलाम-सुफलाम होइल अशी गोग्गोड स्वप्न दाखवतायत त्याचं काय?
14 Sep 2013 - 12:26 pm | मालोजीराव
'साहेब' म्हणत असतील तर असेल बुवा खरच ;)
15 Sep 2013 - 8:15 pm | नगरीनिरंजन
घाबरण्यासारखीच परिस्थिती आहे आणि जितक्या जास्त लोकांना याची जाणीव होईल, तितक्या चांगल्या पद्धतीने ती हाताळली जाईल असे वाटते.
परंतु ज्यांचे लघुकालीन हितसंबंध गुंतलेले आहेत, ते लोक बुद्धिभेद करून लोकांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
तरीही बहुतेक लोकांना अंतर्मनात एक जाणीव असते की जे चाललंय ते सस्टेनेबल नाहीय आणि भविष्यात कधीतरी आपल्याला किंवा आपल्या मुला-नातवंडांना गंभीर प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. अशा दु:खद जाणीवेला तोंड देण्याच्या पाच पायर्यांपैकी तुम्ही म्हणता त्या विचारजंतांसह बहुतेक जण पहिल्याच म्हणजे डिनायलच्या पायरीवर आहेत.
14 Sep 2013 - 7:23 am | अर्धवटराव
येणारा काळ आणखी काय दाखवणार आहे ठाऊक नाहि... पण जे काहि चाललय ते परिस्थिती सुधारण्यासाठी नव्हे तर आणखी बिकट करण्यासाठी होतय... आणि हो... भारत सध्या सुपात आहे... जात्याच्या दिशेने आपली प्रगती अपेक्षेपेक्षा जास्तच फास्ट आहे. येत्या ५० - १०० वर्षात आपण हा धोका ऑलमोस्ट टाळलेला तरी असु किंवा अगदी त्याच्या उंबरठ्यावर तरी असु.
14 Sep 2013 - 10:06 am | विजुभाऊ
फार भयंकर आहे हे.
शेलिंग पहाणारी लहान मुले / मुलाला पुरणारा बाप / कचर्यात पडलेली प्रेते.
कशासाठी भोगताहेत हे अत्याचार हे लोक. काय गुन्हा असेल त्यांचा.
14 Sep 2013 - 8:35 pm | अवतार
सध्या जरी हा संघर्ष महासत्तांमधील संघर्ष वाटत असला तरी फार काळ तटस्थ राहणे इतर राष्ट्रांना परवडणारे नाही. प्रचंड वेगाने संपत जाणारे नैसर्गिक वायू, तेल, खनिजे आणि पाण्याचे साठे यांवर हक्क मिळवण्यासाठी प्रत्येक देशाला आज ना उद्या आपापली बाजू निवडावीच लागणार आहे. जेव्हा प्रश्न सर्व्हायवलचा असतो तेव्हा धर्म, देश, संस्कृती, नैतिकता ही वरवरची पातळ आवरणे ओरबाडली जाऊन आतील पशूचे दर्शन होऊ लागते.
अमेरिका आणि इतर साम्राज्यवादी राष्ट्रे यांना दोष देतांना आपल्याच देशातील शेजारी राज्यांमध्ये याच प्रश्नांवरून संघर्ष वाढत चालला आहे हे देखील विसरून चालणार नाही. सध्या तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही एवढेच फार तर म्हणता येईल. "आधुनिक राष्ट्रवाद" या संकल्पनेलाच सुरुंग लागण्याची ही चिन्हे आहेत. राष्ट्र्वादाकडून टोळीवादाकडे उलटा प्रवास सुरु झालेला आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक देशाला आपापली बाजू निवडावी लागणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीलाही एक ना एक दिवस आपापली टोळी निवडावी लागणारच आहे.
14 Sep 2013 - 11:24 pm | मालोजीराव
15 Sep 2013 - 12:40 pm | चिगो
अवतारजी, पुन्हा एकदा जबरदस्त, नेटके विश्लेषण.. तुमच्या विचारपद्धतीचे फॅन आहोत आपण..
15 Sep 2013 - 3:23 pm | अवतार
पण ते तेवढे "जी" सोडून द्या बुवा! आपल्या मराठमोळ्या भाषेला हे असले काही मानवत नाही! आपल्या रांगड्या मराठी भाषेत हा "जी" म्हणजे दिल्लीमधील मराठी नेत्यांसारखा बापुडवाणा दिसतो.
17 Sep 2013 - 10:56 pm | चिगो
पण लहानपणापासूनच सभ्य आहे हो मी.. ;-) म्हणून.. :-D
15 Sep 2013 - 12:44 am | विजुभाऊ
अमेरीकेने जेथे जेथे पाय रोवलेत तेथे तेथे अक्षरशः वाट लावली आहे.
सर्वात मोठा दहशतवादी देश म्हणून नावलौकीक झालाच आहे.
पाकिस्तानात भर वस्तीत बाजारात अमेरीकन सैनीकानी एक खून केला. खुनी मात्र निवान्त देशाबाहेर गेले.
अर्थात पाकिस्तानात तेवढा दम नाहिय्ये. मात्र एका सार्वभौम देशात उद्दाम पणे अमेरीका हे करु शकते.
15 Sep 2013 - 12:45 am | विजुभाऊ
सद्दाम ला नक्की कशासाठी फाशी दिले गेले हे त्यानी जनतेला अजून सांगितलेले नाहिय्ये.
फक्त एकटा उत्तर कोरीया अमेरीकेला भीक घालत नाहिय्ये
15 Sep 2013 - 1:11 am | मोदक
इराण..?
15 Sep 2013 - 1:28 am | आशु जोग
जे जे समोर दिसतय ते खरे आहे का ? ही छायाचित्रे कुणी प्रसृत केली ? अमेरीकेने प्रसृत केली असतील तर ती का केली. त्यांना सिरीयावर हल्ला करायला नैतिक पाठबळ मिळावे म्हणून का !
एके काळी सद्दाम हुसेन अमेरीकेचा लाडका होता. नंतर पैशाच्या वाटणीवरून या चोरांमधे भांडणे झाली त्यात सद्दाम मारला गेला. कुत्रा मारण्यापूर्वी तो पिसाळलेला आहे हे जाहीर करावे लागते. म्हणजे जगाचे समर्थन आपोआप मिळते.
११ सप्टेंबर २००१ला अमेरीकेवर हल्ला झाला. त्याचा अमेरीकेने पद्धतशीर प्रचार केला. त्यावेळी सगळ्या जगाची सहानुभूती अमेरीकेला होती. त्याचा फायदा घेऊन अमेरीकेने अफगाणिस्तानात उभा आडवा हात मारून घेतला.
लेखामधील एका चित्रात बंडखोर महिलेचे चित्र आहे. हे चित्र खरे आहे याची खात्री कोण देणार ? ही महिला सिरीयनच आहे का ? अमेरीकन नाही कशावरून ? असली तरी बंडखोर आहे कशावरून ? (कृपया माझ्या एवढ्याच एका मुद्द्याला लोंबकाळून झोके घेऊ नयेत. पूर्ण म्हणणे ध्यानात घ्यावे)
अफगाण युद्धाच्या काळात तालिबान जिंकले तर काय होइल या अर्थाची चित्रे इंटरनेटवर पहायला मिळत.
लिबर्टीच्या पुतळ्याला बुरखा
जॉर्ज बुशला दाढी
आपल्या हल्ल्याचे समर्थन करण्याचा हा खटाटोप होता.
लादेन हाही कुकर्मा, दहशतवादी म्हणून जगासमोर आणला गेला. तुम्ही आम्ही काय प्रचार केला ते लक्षात ठेवतो. कोण सांगतय आणि त्याचा हेतू काय आहे हे लक्षात ठेवत नाही. एकेकाळी लादेन बुशचा बिझिनेस पार्टनर होता. बुशसाहेबांचे टेक्सासमधे १६०० एकरचे मोठे फार्म हाऊस आहे. तिथे बुश आणि लादेन यांच्या भेटी होत असत. नंतर लादेन वाइट आहे असा प्रचार होवू लागला. कारण तेव्हा या दोन चोरांमधे भांडण झाले होते.
अफगाणिस्तानात गॅस पाइपलाइनीकरता जागा मिळावी यासाठी अमेरीका तालिबानशी बोलणी करीत असे. त्यांच्यावर पैसा ओतत असे. त्यावेळी तालिबान अमेरीकेसाठी अजिबात वाइट नव्हते. तालिबान हेदेखील काही प्रमाणात अमेरीकेचेच पिल्लू आहे. रशियाची अफगाणिस्तानवरील पकड कमी करण्यासाठी अमेरीकेला या प्रदेशात कुणी बाहुले हवे होते.
प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती करण्याची अमेरीकेची जुनी पद्धत आहे.
अँजेलिना जोलीला आपला देश सोडून सिरीयन लोकांचे अश्रू पुसायला जायची आणि आपल्या सिरीया भेटीचे फोटो प्रसिद्ध काय गरज आहे ? हा या वातावरण निर्मितीचाच भाग आहे.
हिरोशिमा व नागासाकीवर अणुबाँब टाकणारी अमेरीका हीच सर्वात मोठी दहशतवादी आहे.
(फारच कणव असेल तर अँजेलिनाताईने जपानमधील अणुबाँबग्रस्त पिढ्यांचे अश्रू पुसावेत)
15 Sep 2013 - 2:27 am | आशु जोग
१. अनोखा लग्न समारंभ
२. शेलिंग करणाऱ्या विमानाकडे पाहताना चिमुरडी
या चित्रांबद्दलही तेच
ती छायाचित्रे अजूनही कुठल्याही समारंभाची असतील.
15 Sep 2013 - 3:31 am | मोदक
सिरीयातील यादवी बद्दल आपले मत काय..?
15 Sep 2013 - 7:35 am | आशु जोग
सिरीया म्हटलं की ही अभिनेत्री आठवते.
15 Sep 2013 - 10:58 am | मालोजीराव
+1 (703) 482-0623
+1 212-664-4971
+44 77 86 20 60 80
15 Sep 2013 - 8:30 pm | आशु जोग
तुम्ही तिथे केला होता का संपर्क ?
16 Sep 2013 - 11:26 am | मालोजीराव
16 Sep 2013 - 4:25 pm | आशु जोग
सद्दामवर हल्ला करण्यापूर्वीसुद्धा याच लोकांकडे वातावरणनिर्मितीचे काम दिले होते.
16 Sep 2013 - 5:04 pm | प्रसाद गोडबोले
माध्यमांवर विश्वास ठेवता येणार नाही . आणि पाश्विमात्य माध्यमांवर तर मुळीच नाही. मध्यपुर्वेतील त्यातही स्पेशली सीरीया आणि इराण मधील माध्यमांतील काही रेफरन्स द्यावा .( इराण कारण सीरीयातील राजकीय संघर्शाला जातीय रंग ही आहे इतर मध्यपुर्वेतील माध्यमांवर विश्वास ठेवणे अवघड आहे )
16 Sep 2013 - 8:39 pm | मालोजीराव
संध्यानंद चे दुवे वेळेत सापडले नाहीत म्हणून हे दुवे जोडावे लागले…एक डाव माफी द्या
अवांतर : जीवाची बाजी लावून हे फोटो काढताना आणि कव्हरेज घेताना संबंधित न्यूज मिडीयांचे १० पेक्षा जास्त पत्रकार सिरीयामध्ये मृत्युमुखी पडले आहेत.
16 Sep 2013 - 11:23 pm | आशु जोग
मिडीयांचे १० पेक्षा जास्त पत्रकार सिरीयामध्ये मृत्युमुखी पडले आहेत
आय हॅव अ स्मॉल क्वेश्चन " व्हाय अमेरीका पुटस हर दर्टी नोज ज्यात त्यात "
17 Sep 2013 - 12:32 am | मालोजीराव
>>आय हॅव अ स्मॉल क्वेश्चन " व्हाय अमेरीका पुटस हर दर्टी नोज ज्यात त्यात "
प्रचंड पैसा आणि त्याचा असलेला प्रचंड माज
अगणित शस्त्रास्त्रे आणि ती कुणा ना कुणावर वापरायची असलेली खुमखुमी
संपूर्ण जग आपल्याच छत्राखाली असावे ही इच्छा
जाईल तिथे आपटी खाल्ल्याने अजुनही चालु असलेला विजयाचा शोध
हीच कारणे असावीत...
17 Sep 2013 - 8:32 am | स्पंदना
नाही. त्यांची इकॉनॉमी युद्ध सुरु झाल की सुधारते म्हणुन.
17 Sep 2013 - 10:22 pm | बॅटमॅन
सहमत. कुठलासा पिच्चर पाहिला होता, आम्रिकेतले शस्त्रास्त्रांचे व्यापारी असल्या वेळी कसं आपापलं उखळ पांढरं करून घेतात त्याबद्दल. भौतेक निकोलस केज होता त्यात. जब्री होता पिच्चर, नाव कै आठवायला तयार नै. :(
17 Sep 2013 - 11:03 pm | चिगो
”लाॅर्ड ऑफ वाॅर".. निकोलस केजचा. लै भारी पिक्चर.. संग्रही असावा असा.
18 Sep 2013 - 1:07 pm | बॅटमॅन
रैट्ट!!!! तोच तो. काय पॉवरफुल दाखवलेत ते लोक, च्यायला...
18 Sep 2013 - 1:19 am | मालोजीराव
आपला ऑल टाइम फेवरेट मूवी आहे रे....आर्म्स ट्राफिकिंग... हे आर्म्स ट्राफिकर लोक एखाद्या देशाच्या सरकार पेक्षा ही ताकदवान असू शकतात
क्वात्रोची, अदनान खशोगी, डोनाल्ड रम्सफिल्ड मोठी उदाहरणे आहेत
17 Sep 2013 - 11:09 am | मृत्युन्जय
काही मुद्द्यांशी काही अंशी सहमत.
15 Sep 2013 - 7:01 am | निनाद मुक्काम प...
तू नळीवर श्रीलंकन यादवी ची क्लिप आहेत
शेवटच्या युद्धात लिट्टे च्या लोकांना व तमिळ निर्वासितांना
गोळ्या घालून ठार मारले , लहान मुले सुद्धा सोडली नाही.
जग आमच्या लोकांचे आमच्या खंडातील लोकांचे हालहवाल जाणून घेत नाहीत ,तर आम्ही जगात काय चालले आहे त्याबद्दल कशाला फुकाची हलहाल व्यक्त करू आजही श्रीलंकन सरकार सुपात आहे , त्यांच्यावर अमेरिकेने नाही हल्ल्यांची धमकी दिली . एरवी जागतिक पोलिस पाटीलकी बरी जमते त्यांना
अरे हो
श्रीलंके कडे तेल नाही आहे
लक्षातच नाही आले
15 Sep 2013 - 11:28 am | चित्रगुप्त
प्लेगने मेलेल्यांचे देह शत्रूच्या किल्ल्यत टाकत. काही दिवसातच किल्ल्यातील सर्व लोक प्लेगची लागण होऊन मरत.
15 Sep 2013 - 11:43 am | डॉ सुहास म्हात्रे
सर्वात जास्त जैवीक हत्यारांचा उपयोग युरोपियन अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियात गेले तेव्हा झाला... प्रथम नकळत आणि नंतर हेतूपुर्सर. तेथिल मूलनिवासी अन्य लोकांच्या संपर्कात नसल्याने त्यांच्यात अनेक युरोपियन रोगांची रोगप्रतिकारक शक्ती नव्हती. बंदूकीने अथवा तलवारीने जेवढे मूलनिवासी मेले त्यापेक्षा शतपटींनी देवी व प्लेग सारख्या रोगांच्या साथींनी मेले.
15 Sep 2013 - 2:57 pm | पुष्करिणी
इंका राजवट स्पॅनिश लोकांनी अशीच काबीज केली असं वाचलय
17 Sep 2013 - 1:55 am | एम्-जे
फारच भयानक :(. अगदी निराश वाटावे अशी परिस्थिती आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारण फार गुंतागुंतीच असतं. सौदी अरेबिया अमेरिकेचा दोस्त असला तरीही सिरियाविरूद्ध तटस्थ आहे म्हणे कारण काय तर अमेरिकेला मदत केली तर इस्त्राईलला मदत केल्यासारखे होते.
17 Sep 2013 - 8:33 am | स्पंदना
नको होता उघडायला हा धागा.
शेवटच वाक्य खर आहे. सीरीयातले दहशतवादी अमेरिकेने उभे केलेत अन ते अल-कायदाचे आहेत. सो अमेरिका इज प्र्मोटींग अल-कायदा.
17 Sep 2013 - 6:17 pm | ऋषिकेश
तरीच म्हटले एकतर्फी चित्रे कशी
शेवटी हे वाचून खुलासा झाला:
त्यामुळे सत्य बदलत नसले तरी संपूर्ण सत्याच्या जवळ पोचणे कठीण होते. इतकेच.
झालेले मृत्यू हे निंदनीय आणि दु:खकारक आहेत याच्याशी सहमत आहेच. पण त्यामागची अमेरिकन कारणे खरी वाटावीत अश्या हेतूने काहि ठराविक चित्रांना ठराविक मिडियातून पद्धतशीर प्रसिद्धी मिळते हेही तितकेच खरे.
17 Sep 2013 - 9:29 pm | मालोजीराव
चित्रे एकतर्फी कशी काय आहेत कृपया सविस्तर सांगाल का ?
असद बशर च्या सेनेनी केलेली हत्याकांड आणि रेबेल फोर्सेस नी केलेली हत्याकांड दोन्ही दाखवली गेली आहेत.
रशियानी असद ला केलेली मदत आणि अमेरिकेची रेबेल फोर्सेस ला जाहीर केलेली मदत दोन्ही दाखवले आहे
देश सोडून चाललेले लोक आणि राष्ट्रप्रेमापोटी कसेका होईना तग धरून बसलेले लोक दोन्ही दाखवलं आहे
देशाची लागलेली वाट एकीकडे तर अश्या परिस्थितीत परीक्षा देत असलेल्या मुलांचे आशादायी चित्र दोन्ही आहे कि
18 Sep 2013 - 9:23 am | मदनबाण
युद्ध / यादवी झाली की हिंसाचार हा होणारच !
काही वाचनिय दुवे :-
10 companies profiting the most from war
The 25 Biggest Defense Companies In America
Top 100 Contractors of the U.S. federal government
Arms sales: who are the world's 100 top arms producers?
18 Sep 2013 - 11:53 am | आशु जोग
अॅजेलिना जोलीचा सिरीया दौरासुद्धा अमेरीका सरकारने पुरस्कृत केला असला पाहीजे
सिरीयासारखी प्रकरणे समजून घेण्यापूर्वी अमेरीकेतील थिंक टँक हा प्रकार समजून घेतल पाहिजे. उद्या उद्भवणार्या प्रश्नांवर आजच उत्तरे शोधली जातात, जेणेकरून जगाच्या दोन पावले पुढे राहता येइल. हे करत असताना जमल्यास उद्याच्या जगाला आपल्याला हवे तसे वळण देण्याचा प्रयत्न केला जातो. उदा सिरीया विषय असेल तर त्या देशाचा भूगोल, इतिहास, संस्कृती, त्यांचे कच्चे दुवे, त्या देशाचा व्यापार, त्यांचे अवलंबित्त्व, जनतेचे जिव्हाळ्याचे विषय, वांशिक संघर्ष, दोन धर्मातील दुश्मनी वा धर्माच्या दोन पंथातील तेढ या सगळ्याचा अभ्यास केला जातो. युनिवर्सिटीमधे या विषयात पी एचडी करणारे विद्यार्थी असतील तर असे विद्यार्थी व अभ्यासक यांची मदत घेतली जाते. आपल्या 'लक्ष्याला' चहुबाजूने वेढले जाते. यात मेडीयाचाही रोल महत्त्वाचा असतो.
आजवर सिरीयाबद्दल कितीशी माहिती होती. अचानक आपल्या लोकांचे या बाबतीतले नॉलेज वाढू लागले. एवढेच नाही तर या नव्याने माहीत झालेल्या विषयात लोकांची मतेही बनवली गेली. वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, इंटरनेटवर या विषयातील माहिती कोणी ओतायला सुरुवात केली.
अफगाणिस्ताननंतर अमेरीकेने कोरीया, इराण, इराक, इजिप्त, लिबिया असे विषय हाती घेतले. इथे राजकीय उलथापालथी घडवल्या. आता सिरीयाच्या मागे अमेरीका लागली आहे. आपल्या स्वार्थामुळे अमेरीकेने आपल्या शत्रूंची संख्या वाढवली आहे.
18 Sep 2013 - 12:12 pm | आशु जोग
नॉर्थ कोरीया 'लक्ष्य' असताना एका जेमस बाँडच्या चित्रपटातही नॉर्थ कोरीया हा विषय आला होता.
18 Sep 2013 - 1:14 pm | अत्रुप्त आत्मा
डेंजरस...........!
5 Oct 2015 - 3:12 pm | रॉजरमूर
वर फोटोमध्ये उल्लेखिलेली सिरिअन रिबेल फोर्स किंवा सिरीअन रेबेल्स
हे "isis" चे लोक आहेत का ते वेगळे आहेत ?
की इसीस नंतर आली सिरियात ?
5 Oct 2015 - 6:48 pm | मालोजीराव
रेबेल वेगळे आणि ISIS वेगळे पण ISIS आल्यानंतर रेबेल फोर्सेस मधले बरेच गट ISIS मध्ये सामील झाले. जे गट ISIS मध्ये सामील झाले नाहीत आणि त्यांच्याविरुध्द लढणार आहेत अशांवर रशिया हल्ले करणार नाही.
5 Oct 2015 - 4:53 pm | तुडतुडी
खलिफा च्या अमलाखाली असणारं इस्लामी जग
देशाचं भलं होण्यासाठी नैच हटवलं गेलं त्यांना . सत्ता आणि पैशासाठी धर्मांध , इस्लामी मुलतत्वावाद्यांनी देशाला खड्ड्यात घालण्यासाठीच आणि इस्लाम ला वर आणण्यासाठी हटवलं त्यांना . आता देशवासियांना त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चात्ताप होतोय .
अरबांनी तेलातून मिळणाऱ्या भरमसाठ पैशांच्या जोरावर हि शस्त्रे खरेदी केली आहेत . अमेरिकेने जबरदस्तीने ती त्यांच्या हातात दिली नाहीयेत .
तसं असेल तर 'इसीस ' चा अर्थ काय होतो ?
तेल हे कधीतरी संपणारच आहे . ते काही दरवर्षी पावसासारखं आभाळातून पडत नाही . तेलाची निर्मिती व्हायला हजारो कदाचित लाखो वर्षही लागत असतील . पण तेल विहिरी सापडल्यामुळे माज्लेल्यांनी हा साधा विचार केला नाही .जगण्यासाठी इतर पर्याय शोधणे , प्रगतीसाठी प्रयत्न करणे सोडून केवळ सगळी शक्ती धर्माच्या अमलाखाली आणण्यासाठी खर्च केली . त्यासाठी हिंसक मार्ग अवलंबिले गेले . त्याचेच हे परिणाम आहेत .
भारतात UAE च्या मुत्सद्यांनी काय केले हे हि आपल्याला ठावूक असेलच . आपल्यात तरी दम आहे का UAE च्या मुत्साद्याला शिक्षा करायला .
5 Oct 2015 - 5:47 pm | तर्राट जोकर
अरबांनी तेलातून मिळणाऱ्या भरमसाठ पैशांच्या जोरावर हि शस्त्रे खरेदी केली आहेत . अमेरिकेने जबरदस्तीने ती त्यांच्या हातात दिली नाहीयेत
खरंच... नक्की? बघा बरं?
नै म्हणजे ते गडचिरोलीतल्या आदिवासी मागास भागात अत्याधुनिक शस्त्रे सापडतात ती विकत घ्यायला भरमसाठ पैसे कुठून मिळवत असतील ते नक्षलवादी तेचा विचार करयला पाहिजे.
5 Oct 2015 - 8:05 pm | विवेकपटाईत
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थे वर शस्त्र उत्पादक आणि विक्रेते यांची पकड आहे. तेच अमेरिका चालवितात, दुसर्या शब्दात जगात कुठेतरी युद्ध हे सुरु राहिलेच पाहिजे. द्वितीय युद्ध संपल्यानंतर कोरिया युद्ध, विएतनाम युद्ध, इराण इराक युद्ध, कुवैत, इराक, अफगाणिस्तान, आणि आता ... शिवाय अमेरिकी सरकारची खरीदारी हि मोठी आहे. मला आठवते, कुवैत मुक्ती साठी इराकवर जो हल्ला केला होता त्यात पहिल्या महिन्यात फक्त अब्जावधी डॉलरचे शस्त्र फक्त इराकचे इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करण्यासाठी वापरले. युद्ध नंतर त्यांचे कंत्राट पुन्हा युरोपियन देशांनाच मिळणार होते न. एवढेच नव्हे तर देशातही हजारो निर्दोष लोक मारल्या गेले तरी शस्त्र वापरण्यावर कठोर नियम बनविले नाही. गॅन विकत घ्या आणि थोडा शाळेकारी मुलांना. अमेरिकी सरकारला काही हि फरक पडत नाही. शस्त्र घ्या लढा आणि मरा.
5 Oct 2015 - 8:43 pm | तर्राट जोकर
त्रिवार सहमत.
जगात बरीच सत्ये एकमेकांत प्रकाशाच्या सात रंगासारखी एकत्र झालेली असतात. आपआपले चष्मे घेऊन बघणार्यांना ते ते रंग दिसतात.
6 Oct 2015 - 11:47 am | मालोजीराव
काळा भूभाग - आयसीस
लाल भूभाग - असद बशर सरकार
हिरवा भूभाग - बन्डखोर
पिवळा भूभाग - कुर्द पीपल्स प्रोटेक्शन युनिट
डॉटेड भागात युद्धजन्य परिस्थिती आहे
6 Oct 2015 - 5:45 pm | बॅटमॅन
तो पूर्वेकडे पूर्ण काळ्या भागातला एकच एक गुलाबी ठिपका दिसतोय तो कुठला भाग आहे? आयसिसने वेढलेल्या भागात कसे काय राहिले हे काय की.