रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन)

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
12 Jul 2013 - 3:27 pm

दाय विल बी डन!

Jejus

जिझस
_____________________________

जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे. जे आहे ते स्वीकारलं की मनाला तक्रारीला जागाच उरत नाही. स्वीकृतीला मन राजी होत नाही. ती तुमची हार आहे असा बिनतोड युक्तिवाद करून ते उपलब्ध उपभोगू देत नाही.

लगाम मनाकडे असल्यानं आपण आहे ते नाकारतो (किंवा अत्यंत नाईलाजानं स्वीकारतो). त्यामुळे जे प्रत्यक्षात आहे ते व्यर्थ होतं आणि मनात आहे ते उपलब्धच नाही तर उपभोगणार कसं?

स्वच्छंद होणं म्हणजे समोर आहे ते बेशर्त मान्य करून आयदर त्याच्याशी डील करणं किंवा मग डायरेक्ट उपभोगायला लागणं.

________________________________________

बिफोर वी गो,

दुसर्‍या लेखात मी एक साधी गोष्ट सांगितली होती : 'बेशर्त स्वीकृती' हा मनाकडून सर्व सूत्र स्वत:कडे घेण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.

याचं साधं कारण असं की मन तक्रारखोर आहे. त्याला जे मिळालंय ते नकोय आणि जे सध्या समोर नाही ते हवंय. लोकांना वाटतं स्वीकृती हार आहे, त्यानं महत्त्वाकांक्षेला शह बसेल. पण वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे. जे आहे त्याचा स्वीकार आपल्याला वर्तमानात आणतो, समोर आहे त्याच्याशी आपण डील करतो आणि असलेल्याशी समर्थपणे डील करता आलं की आपला कॉन्फिडन्स वाढून प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होतात. मग बहुतेकदा आहे तेच उत्तम वाटतं आणि ते सर्वोत्तम करण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा मग आहे ते योग्यपद्धतीनं डील करून काही तरी नवं शोधतो.

आहे ते नाकारणं, त्याच्याशी वैर घेणं, आपल्याला द्विधा करतं. जे करतोय त्याच्याकडे दुर्लक्ष होतं कारण जे करायचंय ते मनात चालू असतं. मनातल्या गोष्टीशी डील करता येत नाही कारण ती प्रत्यक्षात नसते आणि समोर आहे त्यात आपल्याला रस नसतो कारण मन ते बदलायला सांगत असतं!

______________________________________

ओशोंनी मनाचा हा पैलू अत्यंत अनोख्या शब्दात मांडला आहे "मन का स्वभाव ही कुछ ऐसा है, उसे जो मिल गया वह व्यर्थ हो गया!" (आष्टावक्र महागीता)

अस्विकार हा मनाचा महत्तम पैलू आहे, मग सांप्रत गोष्ट काम असो की नातं. नवविवाहितांना माझं म्हणणं चटकन लक्षात येईल. शोधताना प्रत्येकानं बेस्ट पार्टनर चूज केलेला असतो (अर्थात, प्राप्त परिस्थितीत यथासांग विचार करून). पण काही दिवसात चॉइस चुकलाय असं वाटायला लागतं (मजा म्हणजे दोघांनाही!). आता नव्या पर्यायाचा शोध सुरू होतो (त्यात सुद्धा कोण आधी शोधतोय याची शर्यत!). मग वर लिहिलंय ती परिस्थिती उद्भवते "मनातल्या गोष्टीशी डील करता येत नाही कारण ती प्रत्यक्षात नसते आणि प्रत्यक्षात असलेल्यात आपल्याला रस नसतो कारण मन त्याच्याशी राजी नसतं!"

सगळ्या प्रकारात एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की लगाम मनाकडे आहे!

आपल्याला वाटतं पहिली निवड केली तेव्हा निर्णय आपला होता पण तसं असतं तर आपण आपल्याकडनं नातं सावरलं असतं. तिला काहीही वाटू दे, आपण तिला समजावून घेतलं असतं आणि समजावून सांगितलं असतं की सेपरेशन कशाला? आपण आपल्याकडून सर्व प्रयत्न केले असते. आपल्या सुखात तिचं सुख आहे आणि तिच्या सुखात आपलं आहे याची जाण ठेवून वागलो असतो. पण निर्णय मनाचा होता आणि मनाला रंग बदलायला किती वेळ लागतोय? जरा मनाविरुद्ध झालं की संपलं! नवा पर्याय शोधायला तयार. आणि मजा म्हणजे मनंच दुसरा पर्याय निवडणार आहे!

मन निर्णय तो काय घेणार? काय आहे त्याच्याकडे निर्णय घ्यायला? फक्त स्मृती (त्या देखील बहुतेक नकोशा वाटणार्‍या)! आणि त्यातून काय साधायचा प्रयत्न करेल ते? तर त्या स्मृती पुसून टाकू शकेल अशी कुणी तरी फॅंटास्टिक व्यक्ती! बरं समजा मिळाली अशी कोणी तर किती वेळ लागेल हा भ्रम निस्तरायला? फक्त तिनं मनाच्या कल्पनेपेक्षा जरासं वेगळं वागणं, दॅट्स ऑल! मग पुन्हा बदलाबदली सुरू!

थोडक्यात जोपर्यंत अस्विकार आहे तोपर्यंत लगाम मनाकडे आहे. 'दाय विल बी डन' म्हणजे आहे त्याची बेशर्त स्वीकृती. हा स्वीकार तुम्ही समजून उमजून केलेला आहे, नाईलाजानं नाही. ज्या क्षणी तुम्ही आहे ते स्वीकारता, त्या क्षणी लगाम तुमच्या हातात येतो. भ्रमराला रुणूझुण करायला संधीच राहत नाही.
______________________________

तुम्हाला वाटेल मी माझ्यामनाचे श्लोक लिहितोय, पण तुमचे प्रतिसाद मनाची नेमकी हीच अवस्था दाखवतात :

>केवळ अन केवळ ओब्लिगेशनच कामातलि मजा कमि करतं जात, म्हणूनच आवडत्या कंपनित लागलेल्या जॉबचा पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही.

= प्रत्येक दिवस नवा आहे पण मन स्मृतीतनं सक्रिय होतं आणि आपण त्याच्याशी अलाईन होतो. त्यात आपल्याला लहानपणापासून शिकवण आहे ‘नव्याचे नऊ दिवस’. मग आपल्याला वाटतं "पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही."

>ठिक आहे मग या प्रक्रियेचा सारांश काय ? तो हाच की ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं.
= आता ही मनाची शर्त पूर्ण करणं असंभव आहे कारण तुमच्या मर्जीवर कंपनी कशी चालणार? (आणि वैवाहिक नातं असेल तर विलफुल एंटर-एग्झिट अजूनच अवघड!). पण एक साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. प्रसंगाकडे स्मृतीतनं पाहिल्यामुळे त्यातलं नवेपण हरवतंय. प्रत्येक एंट्री फ्रेशच आहे आणि इग्झिटची गरज वाटतेय कारण आहे त्यात रस नाहीये!

>म्हणजे काय तर आपण एखाद्या कामात निपुण होत गेलो पण पुरेस चॅलेंज वाढत गेलं नाही तरी कामाचा कंटाळा येतो. ह्या उलट निपुणता निर्माण झालि नाही पण चॅलेंज वाढत गेलं तर कामाचे फ्रस्ट्रेशन येत. तेव्हां हि गोश्ट काम करताना फार व्यवस्थित सांभाळावी लागते. अन्यथा बट्याभोळ होतो.

= आहे त्यात रस नसेल तर कसे होणार तुम्ही निपुण? आणि आहे ते काम कौशल्यानं केल्यावर चॅलिंज निर्माण होतो. ते वन डे सारखं आहे, तुम्ही आल्याआल्या बाउंड्री किंवा सिक्स ठोकू शकत नाही आणि एकदा सेटल झाल्यावर आहे तोच गेम तुम्हाला नवे चॅलेंजिस देतो.

फ्रस्ट्रेशनच खरं कारण नैपुण्य नाही आणि नैपुण्य नाही कारण आहे त्याकडे दुर्लक्ष, अशा चक्रात व्यक्ती सापडते. मग मन सांगता कंटाळा आला, घ्या आता नवा जॉब (वैवाहिक नात्यात तर आणखीच मजा, बदला पार्टनर! (किंवा बघा पर्यायी व्यवस्था!)

__________________________________

मन शब्दांशी कसा खेळ करतं हे पाहण्यासारखं आहे :

माझा मुद्दा साधा आहे :

बेशर्त स्वीकारात भ्रम कुठे आहे? प्राप्त परिस्थिती स्वीकारण्याचा निर्णय तुम्ही घेतला, पुन्हा त्यावर वैचारिक उहापोह नाही असं मनाला बजावलं. आपण कामाला लागलो, विषय संपला!

>शब्द...शब्द..शब्द...शब्द..इथे कांहीच समजत नाही, कांहीच सिद्ध होत नाही.
= त्या प्रतिसादात शब्दांचीमाळ विंडोबाहेर गेलीये! स्वीकारा किंवा स्वीकारू नका निर्णय तुमचा आहे. सगळं लेखन साध्या मराठीत आहे, त्यात न समजण्यासारखं काय आहे?

उत्तम संदर्भ मन किती चुकीच्या पद्धतीनं देतं याचं उदाहरण :

>गुरुदेव म्हणाले:
हू आर यू?
यू आर आय इन द यू इन द आय इन द यू? ( संदर्भ : असा मी असामी )
= प्रश्न 'हू आर यू'? नाहीये. 'आर यू गोइंग टू अ‍ॅक्सेप्ट ऑर नॉट' असा आहे!

याहीपेक्षा कहर पुढे आहे:

>काय ते ठरलं का शेवटी?
स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं की 'सब स्वीकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं?

= मन सांगतंय स्वीकार म्हणजे हार आहे ('सब स्वीकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं?).

स्वीकार स्वेच्छा आहे, जे आहे ते लक्षपूर्वक आणि जवाबदारीनं निभावणं आहे. मनाला वाटतं स्वच्छंद म्हणजे बेदरकारी! (स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं )

>की आधी स्वेच्छेनी जगायचं आणि लोकांनी फटके दिले की मग मुकाट्यानी सगळं स्विकारुन जगायचं?

= हा (प्रतिसादकाच्या) मनाचा पूर्वानुभव आहे!

पूर्ण स्वीकार तुम्हाला समर्थ करतो. 'स्वीकारू की नको' अशी मनाची द्विधा स्थितीच तुम्हाला कमजोर करते आणि मग परिस्थिती वरचढ होते.

>की आधी सगळं स्विकारुन जगायचं आणि वैताग आला की स्वेच्छेनी जगायचे?
= त्याच द्विधा स्थितीचा पुनर्प्रत्यय!

>की स्वेच्छेनी जगतोय असं दाखवायचं आणि खरं तर सगळं स्विकारुनच जगायचं?
= मन पुन्हा तेच सांगतंय स्वीकार ही हार आहे!

>की सगळं स्विकारुन मुकाट्यानी जगतोय असं दाखवत हळूच स्वेच्छा पुढे सरकवत रहायची?

= परिस्थितीनं पुरती वाट लावली की 'आत एक आणि बाहेर एक' अशी अवस्था कशी होते त्याचं यथार्थ वर्णन!

>त्यापेक्षा सोप्पे म्हणजे स्वतः स्वेच्छेनी जगायचं आणि आजूबाजूच्या लोकांना सांगायचं आहे त्याचा स्वीकार करुन जगा! कसे?

= इग्झॅक्टली हेच तर मनाला वाटतंय! म्हणून तर स्वीकृती स्वत:ला करायचीये हे लक्षात येत नाहीये.

>काय ते ठरलं की मला कळवा बरं का सगळ्या चर्चापटूंनी.
= काय कळवणार ते? कुठे बेशर्त स्वीकार केलाय त्यांनी? त्यांचाही लगाम मनाकडेच तर आहे.

माझ्या लेखनाचा उपयोग करून घ्यायचा असेल तर असले व्यर्थ प्रतिसाद आणि त्याहीपेक्षा व्यर्थ म्हणजे इतर पोस्टवर माझ्या प्रतिसादांवर भंपक उपप्रतिसाद देऊन पर्सनल टार्गेटींग (याविषयी प्रशासनचं धोरण काय आहे कल्पना नाही), यातनं काही होणार नाही.

एखाद्या प्रसन्न सकाळी उठता क्षणी निर्णय घ्या 'दाय विल बी डन! आणि मग त्या मूडमध्ये फक्त एक दिवस जगून बघा. तुमच्या जीवनाचा सारा रंग बदलेल. त्या अनुभवातनं मग प्रतिसाद द्या. तुम्हाला कळेल लेखन म्हणजे नुसते शब्द नव्हते त्यात अर्थ होता. यू विल एन्जॉय.

__________________________
बिफोर आय क्लोज,

'दाय विल बी डन!' याचा अर्थ (जिझसला जरी) आकाशातला कुणी तरी परिस्थिती निर्माण करतो आणि आपण त्याला हो म्हणतो असा (त्या वेळी) वाटत असला तरी असा कुणी आकाशस्थ मानण्याची गरज नाही. कारण मग मन पुन्हा 'तो कोण?' 'एकदा त्याची मर्जी स्वीकारल्यावर तो माझी काळजी घेणार का?' असले प्रश्न निर्माण करेल.

तर तसा कुणीही नाही. आपण परिस्थितीचा उहापोह करत नाही, फक्त तिचा बेशर्त स्वीकार करतो.

काही भक्तिपंथी म्हणतील 'अरे ये सब केमीकल लोचे है भाई...आमचे संत फार सोपा सिद्धांत सांगतात : ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. '

तर तसा अनंतही कुणी नाही आणि समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं, असू द्यावं लागत नाही.

धर्मप्रकटन

प्रतिक्रिया

अग्निकोल्हा's picture

19 Jul 2013 - 10:57 pm | अग्निकोल्हा

सगळे तुटून पडलेत... बेशर्त मंजूर आहे....मी शांतपणे प्रतिसाद देतोय!

थापा बास. म्हणे सगळे तुटून पडलेत... बेशर्त मंजूर आहे....मी शांतपणे प्रतिसाद देतोय! मंजुर आहे तर मुळात प्रतिसाद देताच कशाला ? खर तर गवी सारखे अपवादात्मक प्रतिसादक जे सागळ्यांच्या विरोधात जाउन तुम्हाला तुमच्या विचारांचा अनुभव आहे वगैरे वगैरे छाति ठोकपणे सांगायचा यत्न करतात ते सोडलं तर तुम्हाला काहिच मंजुर नाही. सगळ सशर्त आहे. मुळात बेशर्त हा शब्द अस्तित्वात नाही इथुन आपलि सुरुवात आहे.

निवांत पोपट's picture

19 Jul 2013 - 11:16 pm | निवांत पोपट

करेक्षन आवश्यक : त्यांच्या विचारांचा त्याना अनुभव आहे असे छातीठोकपणे सांगणे किंवा त्याविषयी सर्वाना खात्री देणे असे माझे उद्देश नव्हते आणि नाहीत. (समजा जरी) त्याना स्वत: ला अनुभूति आली असेल तरी तीच तशीच अनुभूति इतर वाचकाना आलेली नसू शकत असल्याने त्याना थेट लक्षात येईलच असे नव्हे. तेव्हा उलट आपली अनुभूति इतरांवर लादू नये हा अर्थ होता.

अनेकाना मी संक्षीना साक्षात्कार होताना पाहिला आहे असा गैरसमज होऊ शकतो म्हणून खुलासा. वाद भरकटत होता म्हणून मत मांडले. असो.

अग्निकोल्हा's picture

20 Jul 2013 - 12:24 am | अग्निकोल्हा

अनेकाना मी संक्षीना साक्षात्कार होताना पाहिला आहे असा गैरसमज होऊ शकतो म्हणून खुलासा.

नेमकं ओळखलत. मी याच गैरसमजाचा बळी आहे. कारण तिथे वाचकांना क्रिटिसाइज केल्याची व सरांना वैयक्तिक क्लिनचिट दिल्यासारखि संदिग्ध वाक्यरचना घडली होती, पण या प्रतिसादामुळे जिवात जीव आला.

तेव्हा उलट आपली अनुभूति इतरांवर लादू नये हा अर्थ होता.

संजय सरांना हे मान्यच होणं शक्य नाही.

शिल्पा ब's picture

20 Jul 2013 - 12:29 am | शिल्पा ब

संजय सर हे " सर जडेजा" सारखंच वाचायचं का?

बॅटमॅन's picture

20 Jul 2013 - 12:48 am | बॅटमॅन

सर जडेजांचा अपमाण???

रुणुझुणुचे सर्व भाग प्रिंटौट काढून रोज पाठ म्हणा बघू!!! (प्रतिसादांसकट ;) )

रामपुरी's picture

20 Jul 2013 - 1:04 am | रामपुरी

ज्या एकुलत्या एक गड्याला आपल्या संघात असल्याचे समजून ब्याटींग चालली होती त्याने पण गैरसमज दूर केला. आता काय करणार? रन काढायला पण पलिकडे कोणी नाही. चला आता ब्याट, बॉल, ष्टंपा वगैरे घेऊन घरला जायला हरकत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

20 Jul 2013 - 1:32 am | प्रभाकर पेठकर

ज्या एकुलत्या एक गड्याला....

अहो! काय...काय... 'गडी' कोणाला म्हणता? तुम्हाला खेळाडू म्हणायचे आहे का?

रामपुरी's picture

20 Jul 2013 - 2:19 am | रामपुरी

अहो घरगडी मधला 'गडी' नव्हे खेळगडी मधला 'गडी'. असं कुणाला किरकोळीत काढायला आम्ही अजून 'आध्यात्मिक' पोचलेलो नाही. :)

प्रभाकर पेठकर's picture

20 Jul 2013 - 3:01 am | प्रभाकर पेठकर

हा:....हा:...हा:... कल्पना आहे मला. उगीच जरा गंमत केली.

करेक्षन आवश्यक : त्यांच्या विचारांचा त्याना अनुभव आहे असे छातीठोकपणे सांगणे किंवा त्याविषयी सर्वाना खात्री देणे असे माझे उद्देश नव्हते आणि नाहीत. (समजा जरी) त्याना स्वत: ला अनुभूति आली असेल तरी तीच तशीच अनुभूति इतर वाचकाना आलेली नसू शकत असल्याने त्याना थेट लक्षात येईलच असे नव्हे. तेव्हा उलट आपली अनुभूति इतरांवर लादू नये हा अर्थ होता.

अनेकाना मी संक्षीना साक्षात्कार होताना पाहिला आहे असा गैरसमज होऊ शकतो म्हणून खुलासा. वाद भरकटत होता म्हणून मत मांडले. असो.

निराकार गाढव's picture

20 Jul 2013 - 10:58 am | निराकार गाढव

ऑ?

आय टेक सपोर्ट ऑन ओन्ली दिज टू फॅक्ट्स इन योर कमेंट:

>या पार्श्वभूमीवर परिस्थिती बिनशर्त स्वीकारणे हाच तिच्याशी डील करण्याचा / कंट्रोल करण्याचा मार्ग आहे असा विचार या लेखात मला दिसला. हा विचार नक्कीच वेगळा आहे. कितपत नवा आहे किंवा क्रांतिकारी आहे यावर काही म्हणणं नाही, पण एक चांगला विचार आहेच.

>आता यावर वाद न घालता त्याचा अंगिकार करुन पहावासा वाटला तर पहावा किंवा सोडून द्यावा हे स्वाभाविक असताना त्यावर बरीच उलटसुलट चर्चा होतेय, आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय त्याच्या गाभ्याला पूर्णपणे सोडून होतेय.

तुझ्या करेक्शन विषयी :

>(समजा जरी) त्याना स्वत: ला अनुभूति आली असेल तरी तीच तशीच अनुभूति इतर वाचकाना आलेली नसू शकत असल्याने त्याना थेट लक्षात येईलच असे नव्हे. तेव्हा उलट आपली अनुभूति इतरांवर लादू नये हा अर्थ होता.

= ऑफकोर्स. आणि अशी लादून घेणार आहे कोण? धिस इज अ‍ॅन ओपन फोरम. पण प्रयोग करून पाहिला नाही तर अनुभूति कशी येणार?

बाळ सप्रे's picture

20 Jul 2013 - 10:08 am | बाळ सप्रे

उदाहरण योग्य वाटत नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे "शांतपणे" एखादी गोष्ट करणे म्हणजे "बेशर्त स्वीकृती" का?
नाही..

सगळे तुटुन पडलेत हा सत्याचा एक भाग तुम्ही बेशर्त स्वीकार करताय,
पण मूळ कारण जे सगळ्यांना वाट्तय ते कोण स्वीकारणार.. तिथे मात्र तक्रारखोर मनाच ऐकताय !!

बेशर्त स्वीकृती ठीकाय पण काय स्वीकारायच त्याचा "स्कोप" कोण ठरवणार??
It is open to interpretation ..
म्हणजे शेवटी शब्दांचाच खेळ होणार..

आणखी योग्य उदाहरण असेल तर आवडेल वाचायला..

>.. तिथे मात्र तक्रारखोर मनाच ऐकताय

`मन कसं जुन्या धारणा कायम ठेवतं आणि नव्याच्या विरोधात तुटून पडतं' याचं उत्तम उदाहरण म्हणजे वरचे सर्व प्रतिसाद आहेत.

मी अहंकारी आहे म्हणजे नक्की काय? याची प्रतिसादकांना अपेक्षित प्रातिनिधिक व्याख्या दुवा दिलेल्या प्रतिसादात सदस्येनं केली आहे आणि त्याला समर्पक उत्तर दिलंय. त्यावर कुणीही प्रतिवाद केलेला नाही. तस्मात तो दावा फोल आहे.

निवांत पोपट's picture

20 Jul 2013 - 12:37 pm | निवांत पोपट

<<

मी अहंकारी आहे म्हणजे नक्की काय? याची प्रतिसादकांना अपेक्षित प्रातिनिधिक व्याख्या दुवा दिलेल्या प्रतिसादात सदस्येनं केली आहे

>>

'अहंकार' शब्दाच्या व्याख्येवरून ही व्याख्या आठवली !

पुण्याचे वटवाघूळ's picture

20 Jul 2013 - 1:00 pm | पुण्याचे वटवाघूळ

त्यावर कुणीही प्रतिवाद केलेला नाही. तस्मात तो दावा फोल आहे.

मुद्द्यावर कोणीही प्रतिवाद न करणे याचा एक अर्थ असाही होतो की एखादा मनुष्य उगीचच काहीबाही बरळू लागला तर प्रत्येक वेळी कुठे त्याच्या तोंडी लागा तेव्हा उत्तम म्हणजे काहीच बोलायचे नाही.पण इतर कुणीही प्रतिवाद केला नाही याचा अर्थ आपणच बरोबर असा अर्थ घेणे म्हणजे अहंमन्य पणाचा कळस आहे.आणि इतके सगळे होऊनही स्वतःचीच टिमकी वाजविणे म्हणजे गिरा तो भी टांग उपर चे सर्वात मासलेवाईक उदाहरण झाले.

तरीही या लेखातून अनलिमिटेड मनोरंजन केल्याबद्दल संजयरावांचे आभार

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2013 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/thanksgiving/cooked-turkey-dances.gif

बाळ सप्रे's picture

20 Jul 2013 - 9:01 pm | बाळ सप्रे

योग्य उदाहरण देण्याला बगल दिलीय तुम्ही... तिथपर्यंत सगळे शाब्दिकच !!

निवांत पोपट's picture

19 Jul 2013 - 11:27 pm | निवांत पोपट

मुळात बेशर्त हा शब्द अस्तित्वात नाही इथुन आपलि सुरुवात आहे.

अगदी बरोबर! 'स्वीकृती' हीच तर 'दडलेली' किंवा 'दडवलेली' शर्त आहे.

शिल्पा ब's picture

20 Jul 2013 - 12:21 am | शिल्पा ब

स्वत:लाच काय ते ब्रह्मज्ञान आहे बाकी सगळे येडे आहेत अन हे मान्य नसलेले तर अजुनच मदतीची आवश्यकता असलेले आहेत,
असे वि
चार असणार्‍या ., लो
कांचं मला अ.
तिश य कौतु, क वाट
तं. नाही तर मिपा व र !
मनोरंजन कसं होणार ? ., पु
ढील भागाच्या प्र तिक्षेत.

लंबूटांग's picture

20 Jul 2013 - 1:53 am | लंबूटांग

ते पिवळ्या रंगात हायलाईट करायला विसरलात वाटतं.

शिल्पा ब's picture

20 Jul 2013 - 1:02 pm | शिल्पा ब

आम्ही सामान्य माणसं..चुका व्हायच्याच !

मन वगैरे कळेल का नाही देव जाने पण संक्षी कडून खालील गोष्टी नक्की शिकण्यासारख्या आहेत

१. प्रचंड चिकाटी

२. टायपिंग चा बिलकुल कंटाळा नाही

३. प्रश्नाला उत्तर न देण्याची कला किंवा बगल देण्याची कला ( हे जर मला जमल तर आयुष्य किती सुखाचं होईल राव. बरेचदा वाटत कि माझ्या नवर्याने संक्षी कडे ट्रेनिंग घेतलाय कि काय :P )

४. सगळ्यात महत्वाचं म्हंजे भरपूर प्रतिसाद मिळवण्याची कला

रामपुरी's picture

20 Jul 2013 - 1:06 am | रामपुरी

"भरपूर प्रतिसाद मिळवण्याची कला"???
तुम्हाला "भरपूर मार खाण्याची कला" असं लिहायचं होतं काय?

अग्निकोल्हा's picture

20 Jul 2013 - 1:20 am | अग्निकोल्हा

आम्हालाही हेच वाटायच पण... नंतर उमजु लागलं

प्रचंड चिकाटी = हेकटपणाच्या आडुन पोसलेला पोरकटपणा
टायपिंग चा बिलकुल कंटाळा नाही = ३१जुलौची अट नसेल तरच अन्यथा स्वारि दिसणारही नाही.
प्रश्नाला उत्तर न देण्याची कला किंवा बगल देण्याची कला = थोडक्यात इतरांना कस्पटासमान समजणे
सगळ्यात महत्वाचं म्हंजे भरपूर प्रतिसाद मिळवण्याची कला = भरपूर विरोधि प्रतिसाद मिळवण्याची कला.

बॅटमॅन's picture

20 Jul 2013 - 1:35 am | बॅटमॅन

अगदी अगदी.

वेळ हा भ्रम असला तरी ३१ जुलै मात्र त्याला अपवाद असतो.

अन अध्यात्म , कविता अन वैद्यक- सगळ्यातलं स्वतःलाच कळतं असा गैरसमज - मुद्देसूद प्रतिवाद झाला की पलायन हे तर ठरलेलंच आहे.

त्या कुठल्यातरी पिच्चरमध्ये नाना पाटेकर आरशात स्वतःचीच आरती करत असतो त्याची आठवण येते बहुतेक धागे अन त्यावरचे प्रतिसाद पाहिले की.
(संपादित)

जे.जे.'s picture

20 Jul 2013 - 1:44 am | जे.जे.

पिच्चर ब्लफमास्टर - ज्यात नानाचा अट्टिट्युड असतो - पडलो तरी नाक वर.

बॅटमॅन's picture

20 Jul 2013 - 1:51 am | बॅटमॅन

आह राईट, धन्यवाद!

कवितानागेश's picture

20 Jul 2013 - 1:40 am | कवितानागेश

म्या(as per dhamu's suggestion) काय सांगतेय कधीपासून,
'संक्षी कसे आहेत याच्याशी आपल्याला काय करायचंय??
भलेही ते त्यांचे विचार मांडण्याच्या नादात स्वतःबद्दल ४ गोष्टी चुकून सांगून जात असतील. ;)
पण आपण नाई त्या फार मनावर घ्यायच्या. अश्यानी मन फार जड जड होउन जातं. मग लगाम कसा धरणार आपण मनाचा? हो की नै? आपण तर शहाणे आहोत ना? आपणच जे आहे त्याचा स्वीकार करुन टाकायचा सरळ. कारण जे काही 'आहे' ते इतकं 'सघन' आणि 'स्थिर' आहे की कशानीही बदलणार नाहीये!!!'
जय हिंद.

प्रभाकर पेठकर's picture

20 Jul 2013 - 1:45 am | प्रभाकर पेठकर

'कानून' प्रजा के लिए होते है। प्रजा के लिए नही।

इथे कानून ऐवजी 'उपदेश' असे वाचले तरी चालेल.

प्रभाकर पेठकर's picture

20 Jul 2013 - 9:08 pm | प्रभाकर पेठकर

....प्रजा के लिए नही।

अरेरे! उद्विग्नावस्थेत प्रतिसाद देण्यात घाईच झाली. 'ते 'राजा के लिए नही।' असे वाचावे.

पुण्याचे वटवाघूळ's picture

20 Jul 2013 - 9:36 am | पुण्याचे वटवाघूळ

मन वगैरे कळेल का नाही देव जाने पण संक्षी कडून खालील गोष्टी नक्की शिकण्यासारख्या आहेत

१. प्रचंड चिकाटी

२. टायपिंग चा बिलकुल कंटाळा नाही

३. प्रश्नाला उत्तर न देण्याची कला किंवा बगल देण्याची कला ( हे जर मला जमल तर आयुष्य किती सुखाचं होईल राव. बरेचदा वाटत कि माझ्या नवर्याने संक्षी कडे ट्रेनिंग घेतलाय कि काय smiley )

४. सगळ्यात महत्वाचं म्हंजे भरपूर प्रतिसाद मिळवण्याची कला

बाकी कोणी याला काहीही म्हणोत माझे तरी स्पष्ट मत आहे की हा शुध्द मूर्खपणा आहे.

स्पा's picture

20 Jul 2013 - 9:52 am | स्पा

अरेरे.........

वाईट वाटले .
इथे सगळेच दुष्ट आहेत

क्लिंटन's picture

20 Jul 2013 - 10:14 am | क्लिंटन

इथे सगळेच दुष्ट आहेत हे "बेशर्त" का स्विकारत नाहीस? नाही तुझी स्वाक्षरी तेच सांगत आहे ना?

स्पा's picture

20 Jul 2013 - 10:33 am | स्पा

मी तेच स्वीकारले आहे .
इथे उडालेली राळ पाहून मन उद्विग्न झाले आहे :(

नॉट अ‍ॅट ऑल!

आपलं म्हणणं योग्य असेल तर निश्चिंत राहणं सोपं आहे. कारण चर्चा लेखनावर न होता लोकांच्या मनात असलेल्या माझ्या प्रतिमेवर होतेयं. त्यांच्या धारणा प्रश्नांकित झाल्यामुळे ते व्यथित आहेत. त्यांनी काय लिहावं हे त्यांच्या हातात आहे इतकं लक्षात आलं की झालं. सो डोंट वरी.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2013 - 4:37 pm | अत्रुप्त आत्मा

नॉट अ‍ॅट ऑल! http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/setting-himself-on-fire.gif

http://www.sherv.net/cm/emoticons/cats/cat-fight-smiley-emoticon.gif

मोदक's picture

20 Jul 2013 - 2:03 pm | मोदक

तसे असेल तर तुम्ही आत्मशुद्धीसाठी मौनात का जात नाही..?

कवितानागेश's picture

20 Jul 2013 - 2:58 pm | कवितानागेश

हे काय सांगताय तुम्ही स्पावड्याला???
त्यासाठी मौनाची काय गरज?
एकदा का आपल्याला कळलं की आपण 'स्वतः' शुद्धच आहोत की झालं!
बोल रे तू स्पांडू... शाना मुग्गा!! :)

मी दुसर्‍या कोणालातरी दिलेल्या प्रतिसादाचा तुम्ही वारंवार प्रतिवाद का करत आहात..?

एखाद्या व्यक्तीचा इतकाही द्वेष करणे बरे नव्हे. तुमचीही "चित्तव्रुत्ती उद्विग्न आहे.."

इरसाल's picture

20 Jul 2013 - 10:48 am | इरसाल

https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTZc2nwSXkk05mFVuCijc6Q_5_wWMYNZSPtbwM3uokaVFdBTc7dbQ

निराकार गाढव's picture

20 Jul 2013 - 10:55 am | निराकार गाढव

.

निराकार गाढव's picture

20 Jul 2013 - 10:28 pm | निराकार गाढव

i love every comment extended with love...

ईश्वरसर्वसाक्षी's picture

20 Jan 2016 - 2:59 pm | ईश्वरसर्वसाक्षी

दोन्हि काना च्या पाळ्याना हात लाउन तौबा तौबा करतो..आणि पुन्ह्यांदा ह्या वाटेला जाणार नाहि रे बाबा...कयं कयं लिवलय वाचल पण कळल काहिच नाहि :(