रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन)

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
12 Jul 2013 - 3:27 pm

दाय विल बी डन!

Jejus

जिझस
_____________________________

जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे. जे आहे ते स्वीकारलं की मनाला तक्रारीला जागाच उरत नाही. स्वीकृतीला मन राजी होत नाही. ती तुमची हार आहे असा बिनतोड युक्तिवाद करून ते उपलब्ध उपभोगू देत नाही.

लगाम मनाकडे असल्यानं आपण आहे ते नाकारतो (किंवा अत्यंत नाईलाजानं स्वीकारतो). त्यामुळे जे प्रत्यक्षात आहे ते व्यर्थ होतं आणि मनात आहे ते उपलब्धच नाही तर उपभोगणार कसं?

स्वच्छंद होणं म्हणजे समोर आहे ते बेशर्त मान्य करून आयदर त्याच्याशी डील करणं किंवा मग डायरेक्ट उपभोगायला लागणं.

________________________________________

बिफोर वी गो,

दुसर्‍या लेखात मी एक साधी गोष्ट सांगितली होती : 'बेशर्त स्वीकृती' हा मनाकडून सर्व सूत्र स्वत:कडे घेण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.

याचं साधं कारण असं की मन तक्रारखोर आहे. त्याला जे मिळालंय ते नकोय आणि जे सध्या समोर नाही ते हवंय. लोकांना वाटतं स्वीकृती हार आहे, त्यानं महत्त्वाकांक्षेला शह बसेल. पण वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे. जे आहे त्याचा स्वीकार आपल्याला वर्तमानात आणतो, समोर आहे त्याच्याशी आपण डील करतो आणि असलेल्याशी समर्थपणे डील करता आलं की आपला कॉन्फिडन्स वाढून प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होतात. मग बहुतेकदा आहे तेच उत्तम वाटतं आणि ते सर्वोत्तम करण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा मग आहे ते योग्यपद्धतीनं डील करून काही तरी नवं शोधतो.

आहे ते नाकारणं, त्याच्याशी वैर घेणं, आपल्याला द्विधा करतं. जे करतोय त्याच्याकडे दुर्लक्ष होतं कारण जे करायचंय ते मनात चालू असतं. मनातल्या गोष्टीशी डील करता येत नाही कारण ती प्रत्यक्षात नसते आणि समोर आहे त्यात आपल्याला रस नसतो कारण मन ते बदलायला सांगत असतं!

______________________________________

ओशोंनी मनाचा हा पैलू अत्यंत अनोख्या शब्दात मांडला आहे "मन का स्वभाव ही कुछ ऐसा है, उसे जो मिल गया वह व्यर्थ हो गया!" (आष्टावक्र महागीता)

अस्विकार हा मनाचा महत्तम पैलू आहे, मग सांप्रत गोष्ट काम असो की नातं. नवविवाहितांना माझं म्हणणं चटकन लक्षात येईल. शोधताना प्रत्येकानं बेस्ट पार्टनर चूज केलेला असतो (अर्थात, प्राप्त परिस्थितीत यथासांग विचार करून). पण काही दिवसात चॉइस चुकलाय असं वाटायला लागतं (मजा म्हणजे दोघांनाही!). आता नव्या पर्यायाचा शोध सुरू होतो (त्यात सुद्धा कोण आधी शोधतोय याची शर्यत!). मग वर लिहिलंय ती परिस्थिती उद्भवते "मनातल्या गोष्टीशी डील करता येत नाही कारण ती प्रत्यक्षात नसते आणि प्रत्यक्षात असलेल्यात आपल्याला रस नसतो कारण मन त्याच्याशी राजी नसतं!"

सगळ्या प्रकारात एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की लगाम मनाकडे आहे!

आपल्याला वाटतं पहिली निवड केली तेव्हा निर्णय आपला होता पण तसं असतं तर आपण आपल्याकडनं नातं सावरलं असतं. तिला काहीही वाटू दे, आपण तिला समजावून घेतलं असतं आणि समजावून सांगितलं असतं की सेपरेशन कशाला? आपण आपल्याकडून सर्व प्रयत्न केले असते. आपल्या सुखात तिचं सुख आहे आणि तिच्या सुखात आपलं आहे याची जाण ठेवून वागलो असतो. पण निर्णय मनाचा होता आणि मनाला रंग बदलायला किती वेळ लागतोय? जरा मनाविरुद्ध झालं की संपलं! नवा पर्याय शोधायला तयार. आणि मजा म्हणजे मनंच दुसरा पर्याय निवडणार आहे!

मन निर्णय तो काय घेणार? काय आहे त्याच्याकडे निर्णय घ्यायला? फक्त स्मृती (त्या देखील बहुतेक नकोशा वाटणार्‍या)! आणि त्यातून काय साधायचा प्रयत्न करेल ते? तर त्या स्मृती पुसून टाकू शकेल अशी कुणी तरी फॅंटास्टिक व्यक्ती! बरं समजा मिळाली अशी कोणी तर किती वेळ लागेल हा भ्रम निस्तरायला? फक्त तिनं मनाच्या कल्पनेपेक्षा जरासं वेगळं वागणं, दॅट्स ऑल! मग पुन्हा बदलाबदली सुरू!

थोडक्यात जोपर्यंत अस्विकार आहे तोपर्यंत लगाम मनाकडे आहे. 'दाय विल बी डन' म्हणजे आहे त्याची बेशर्त स्वीकृती. हा स्वीकार तुम्ही समजून उमजून केलेला आहे, नाईलाजानं नाही. ज्या क्षणी तुम्ही आहे ते स्वीकारता, त्या क्षणी लगाम तुमच्या हातात येतो. भ्रमराला रुणूझुण करायला संधीच राहत नाही.
______________________________

तुम्हाला वाटेल मी माझ्यामनाचे श्लोक लिहितोय, पण तुमचे प्रतिसाद मनाची नेमकी हीच अवस्था दाखवतात :

>केवळ अन केवळ ओब्लिगेशनच कामातलि मजा कमि करतं जात, म्हणूनच आवडत्या कंपनित लागलेल्या जॉबचा पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही.

= प्रत्येक दिवस नवा आहे पण मन स्मृतीतनं सक्रिय होतं आणि आपण त्याच्याशी अलाईन होतो. त्यात आपल्याला लहानपणापासून शिकवण आहे ‘नव्याचे नऊ दिवस’. मग आपल्याला वाटतं "पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही."

>ठिक आहे मग या प्रक्रियेचा सारांश काय ? तो हाच की ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं.
= आता ही मनाची शर्त पूर्ण करणं असंभव आहे कारण तुमच्या मर्जीवर कंपनी कशी चालणार? (आणि वैवाहिक नातं असेल तर विलफुल एंटर-एग्झिट अजूनच अवघड!). पण एक साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. प्रसंगाकडे स्मृतीतनं पाहिल्यामुळे त्यातलं नवेपण हरवतंय. प्रत्येक एंट्री फ्रेशच आहे आणि इग्झिटची गरज वाटतेय कारण आहे त्यात रस नाहीये!

>म्हणजे काय तर आपण एखाद्या कामात निपुण होत गेलो पण पुरेस चॅलेंज वाढत गेलं नाही तरी कामाचा कंटाळा येतो. ह्या उलट निपुणता निर्माण झालि नाही पण चॅलेंज वाढत गेलं तर कामाचे फ्रस्ट्रेशन येत. तेव्हां हि गोश्ट काम करताना फार व्यवस्थित सांभाळावी लागते. अन्यथा बट्याभोळ होतो.

= आहे त्यात रस नसेल तर कसे होणार तुम्ही निपुण? आणि आहे ते काम कौशल्यानं केल्यावर चॅलिंज निर्माण होतो. ते वन डे सारखं आहे, तुम्ही आल्याआल्या बाउंड्री किंवा सिक्स ठोकू शकत नाही आणि एकदा सेटल झाल्यावर आहे तोच गेम तुम्हाला नवे चॅलेंजिस देतो.

फ्रस्ट्रेशनच खरं कारण नैपुण्य नाही आणि नैपुण्य नाही कारण आहे त्याकडे दुर्लक्ष, अशा चक्रात व्यक्ती सापडते. मग मन सांगता कंटाळा आला, घ्या आता नवा जॉब (वैवाहिक नात्यात तर आणखीच मजा, बदला पार्टनर! (किंवा बघा पर्यायी व्यवस्था!)

__________________________________

मन शब्दांशी कसा खेळ करतं हे पाहण्यासारखं आहे :

माझा मुद्दा साधा आहे :

बेशर्त स्वीकारात भ्रम कुठे आहे? प्राप्त परिस्थिती स्वीकारण्याचा निर्णय तुम्ही घेतला, पुन्हा त्यावर वैचारिक उहापोह नाही असं मनाला बजावलं. आपण कामाला लागलो, विषय संपला!

>शब्द...शब्द..शब्द...शब्द..इथे कांहीच समजत नाही, कांहीच सिद्ध होत नाही.
= त्या प्रतिसादात शब्दांचीमाळ विंडोबाहेर गेलीये! स्वीकारा किंवा स्वीकारू नका निर्णय तुमचा आहे. सगळं लेखन साध्या मराठीत आहे, त्यात न समजण्यासारखं काय आहे?

उत्तम संदर्भ मन किती चुकीच्या पद्धतीनं देतं याचं उदाहरण :

>गुरुदेव म्हणाले:
हू आर यू?
यू आर आय इन द यू इन द आय इन द यू? ( संदर्भ : असा मी असामी )
= प्रश्न 'हू आर यू'? नाहीये. 'आर यू गोइंग टू अ‍ॅक्सेप्ट ऑर नॉट' असा आहे!

याहीपेक्षा कहर पुढे आहे:

>काय ते ठरलं का शेवटी?
स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं की 'सब स्वीकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं?

= मन सांगतंय स्वीकार म्हणजे हार आहे ('सब स्वीकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं?).

स्वीकार स्वेच्छा आहे, जे आहे ते लक्षपूर्वक आणि जवाबदारीनं निभावणं आहे. मनाला वाटतं स्वच्छंद म्हणजे बेदरकारी! (स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं )

>की आधी स्वेच्छेनी जगायचं आणि लोकांनी फटके दिले की मग मुकाट्यानी सगळं स्विकारुन जगायचं?

= हा (प्रतिसादकाच्या) मनाचा पूर्वानुभव आहे!

पूर्ण स्वीकार तुम्हाला समर्थ करतो. 'स्वीकारू की नको' अशी मनाची द्विधा स्थितीच तुम्हाला कमजोर करते आणि मग परिस्थिती वरचढ होते.

>की आधी सगळं स्विकारुन जगायचं आणि वैताग आला की स्वेच्छेनी जगायचे?
= त्याच द्विधा स्थितीचा पुनर्प्रत्यय!

>की स्वेच्छेनी जगतोय असं दाखवायचं आणि खरं तर सगळं स्विकारुनच जगायचं?
= मन पुन्हा तेच सांगतंय स्वीकार ही हार आहे!

>की सगळं स्विकारुन मुकाट्यानी जगतोय असं दाखवत हळूच स्वेच्छा पुढे सरकवत रहायची?

= परिस्थितीनं पुरती वाट लावली की 'आत एक आणि बाहेर एक' अशी अवस्था कशी होते त्याचं यथार्थ वर्णन!

>त्यापेक्षा सोप्पे म्हणजे स्वतः स्वेच्छेनी जगायचं आणि आजूबाजूच्या लोकांना सांगायचं आहे त्याचा स्वीकार करुन जगा! कसे?

= इग्झॅक्टली हेच तर मनाला वाटतंय! म्हणून तर स्वीकृती स्वत:ला करायचीये हे लक्षात येत नाहीये.

>काय ते ठरलं की मला कळवा बरं का सगळ्या चर्चापटूंनी.
= काय कळवणार ते? कुठे बेशर्त स्वीकार केलाय त्यांनी? त्यांचाही लगाम मनाकडेच तर आहे.

माझ्या लेखनाचा उपयोग करून घ्यायचा असेल तर असले व्यर्थ प्रतिसाद आणि त्याहीपेक्षा व्यर्थ म्हणजे इतर पोस्टवर माझ्या प्रतिसादांवर भंपक उपप्रतिसाद देऊन पर्सनल टार्गेटींग (याविषयी प्रशासनचं धोरण काय आहे कल्पना नाही), यातनं काही होणार नाही.

एखाद्या प्रसन्न सकाळी उठता क्षणी निर्णय घ्या 'दाय विल बी डन! आणि मग त्या मूडमध्ये फक्त एक दिवस जगून बघा. तुमच्या जीवनाचा सारा रंग बदलेल. त्या अनुभवातनं मग प्रतिसाद द्या. तुम्हाला कळेल लेखन म्हणजे नुसते शब्द नव्हते त्यात अर्थ होता. यू विल एन्जॉय.

__________________________
बिफोर आय क्लोज,

'दाय विल बी डन!' याचा अर्थ (जिझसला जरी) आकाशातला कुणी तरी परिस्थिती निर्माण करतो आणि आपण त्याला हो म्हणतो असा (त्या वेळी) वाटत असला तरी असा कुणी आकाशस्थ मानण्याची गरज नाही. कारण मग मन पुन्हा 'तो कोण?' 'एकदा त्याची मर्जी स्वीकारल्यावर तो माझी काळजी घेणार का?' असले प्रश्न निर्माण करेल.

तर तसा कुणीही नाही. आपण परिस्थितीचा उहापोह करत नाही, फक्त तिचा बेशर्त स्वीकार करतो.

काही भक्तिपंथी म्हणतील 'अरे ये सब केमीकल लोचे है भाई...आमचे संत फार सोपा सिद्धांत सांगतात : ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. '

तर तसा अनंतही कुणी नाही आणि समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं, असू द्यावं लागत नाही.

धर्मप्रकटन

प्रतिक्रिया

मनाचिया गुंती गुंतला तुम्ही
भ्रमरूपी भ्रमर डसलासी.
आम्ही कोणासंगे तुम्हास होइल माहीत
ठेवा नेहमी सहवास सज्जनांसंगे.

प्रसाद प्रसाद's picture

15 Jul 2013 - 4:02 pm | प्रसाद प्रसाद

लेखाप्रमाणेच अतिअतिअवांतर -
कोपऱ्यात उभी हिंदमाता आणि बेमटेरावांच नाव घेण्यात माझा नंबर पहिला – इति पु.ल. (असामी असामी)

छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे...ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव्!!!

सस्नेह's picture

16 Jul 2013 - 8:30 pm | सस्नेह

a a a

लेख नीट वाचला. समोरच्या परिस्थितीचा बेशर्त स्वीकार करणं ही पराभवसूचक गोष्ट समजली जाते. ती तशी न मानता उलट तो विजय मानला पाहिजे. इनफॅक्ट परिस्थितीचा (बिनशर्त) स्वीकार म्हणजे जणू नेहमीच "हतबल शरणागत स्वीकृती" असा एक निराशाजनक टोन त्या प्रकाराला आपोआप दिला जातो.

स्वतःकडे आणि आजुबाजूला पाहिलं तर परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार तर जाऊदेच, उलट परिस्थिती पूर्णपणे नाकारणे, डिनायल, डोळे मिटून दूध पिणे... अप्रिय वाटणार्‍या स्थितीला ती जणू नाहीच आहे असं समजून चालणे..असं एक आभासी-पॉझिटिव्ह टोक दिसतं- किंवा मग ती स्वीकारली आहे म्हणजे- चरफडत, नशिबाला बोल लावत, हतोत्साह होऊन "पत्करली" आहे.. प्राक्तन म्हणून झेलतो आहे असा दुसर्‍या टोकाचा ऋण अप्रोच दिसतो.

या पार्श्वभूमीवर परिस्थिती बिनशर्त स्वीकारणे हाच तिच्याशी डील करण्याचा / कंट्रोल करण्याचा मार्ग आहे असा विचार या लेखात मला दिसला. हा विचार नक्कीच वेगळा आहे. कितपत नवा आहे किंवा क्रांतिकारी आहे यावर काही म्हणणं नाही, पण एक चांगला विचार आहेच.

आता यावर वाद न घालता त्याचा अंगिकार करुन पहावासा वाटला तर पहावा किंवा सोडून द्यावा हे स्वाभाविक असताना त्यावर बरीच उलटसुलट चर्चा होतेय, आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय त्याच्या गाभ्याला पूर्णपणे सोडून होतेय.

लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही. पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात.

शेवटी "ठेविले अनंते" चे उत्तम उदाहरण दिले आहे. यातला अनंत (नको असल्यास) वजा करुन हाच मुद्दा महत्वाचा आहे. त्याला अन्य मार्गांनी फिरवून आणल्याने संभ्रम वाढू शकतो.

तेव्हा मी अशी विनंती करुन पाहतो की संक्षींनी त्यांचे विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा.

त्यांना (संक्षींना) स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.

कवितानागेश's picture

15 Jul 2013 - 3:52 pm | कवितानागेश

गविंशी सहमत.
विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा.. हे तर अगदीच योग्य आहे.
पण
स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.. असे अजिबात नाही.
वाचक विचारी आहेतच. अभ्यासू देखिल आहेत. आणि अनेक वाचक शहाणे आणि अनुभवीदेखिल आहेत. पण 'बाकी सगळे व्यर्थ, आणि मी सांगेन तेच बरोबर' हा टोन कुणीही कुठेही खपवून घेत नाही. शिवाय अनेकांसाथी अनेक संत, साधना सांगणारे गुरु हे त्यांच्या आईवडलांपेक्षाही जास्त जवळचे-पूजनीय असतात. त्याम्च्यावर विनाकारण टीका झाल्यास लोकांचा रोष ओढवणारच. लेखकानी त्यांचे स्वतःचे अनुभव योग्य शब्दात खुशाल मांडावेत. पण लोक कसे मूर्ख आहेत आणि मी कसा त्यांना शहाणं करायला आलोय, हा टोन बदलावा, अशी विनंती.

स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.. असे अजिबात नाही.
वाचक विचारी आहेतच. अभ्यासू देखिल आहेत. आणि अनेक वाचक शहाणे आणि अनुभवीदेखिल आहेत.

हं.

मी असं म्हणायला हवं होतं की (वाचक अनुभवी असले तरी) संक्षी यांना आलेली ती विशिष्ट अनुभूति किंवा त्यांच्या मनात घडलेल्या त्या नेमक्या विशिष्ट विचारप्रकियांचाच अनुभव वाचकांना आलेला नसू शकत असल्याने (त्यांना काही आपापली वेगळी अनुभूती आली असेल.) त्यांचा गोंधळ उडू शकतो.. (बरेच ज्यादा शब्द वापरुन आणि अनेक अनावश्यक तुलना करुन विचार मांडले की).

शिवाय मी एकटा शहाणा आणि तुम्ही सारे मूर्ख असा टोन असणं चुकीचंच, पण आपल्याला मनापासून पटलेला मुद्दा समोरच्याच्या मनातही उतरावा अशा तीव्र इच्छेने कधीकधी अहमहिकेने / आग्रहीपणे आपली भूमिका रेटली जाते, तसाही प्रकार कधीकधी होतो. माझं म्हणणं इतकंच आहे की विचार थोडक्यात मांडावा म्हणजे समोरच्याला स्पष्टपणे पटायला मदत होईल. यामुळे नंतर मेगाबायटी प्रतिसाद आणि क्वोटस देऊन खंडनमंडन करावं लागणार नाही.

त्याउपर नाही पटलं तर फार रेटण्यात अर्थ नाही हे धोरण ठेवल्यास बरेचसे अस्थानी वाद टळतील हे महत्वाचं.

कवितानागेश's picture

15 Jul 2013 - 4:21 pm | कवितानागेश

कधीकधी अहमहिकेने / आग्रहीपणे आपली भूमिका रेटली जाते, तसाही प्रकार कधीकधी होतो.------
नेहमी होतोय! :)

निराकार गाढव's picture

17 Jul 2013 - 11:31 pm | निराकार गाढव

आरपार पटलं बगा आपल्याला. उगाच समदे सायबांच्या नावानं बोम्ब ठोकतात.

पिलीयन रायडर's picture

15 Jul 2013 - 4:10 pm | पिलीयन रायडर

मला वाटातं की संक्षी नी "विचाराला" महत्व द्यावे... त्या विचारावे "त्यांच्या" आयुष्यात काय झालय त्याला नाही..
तो "माझा" विचार आहे.. "मला" अनुभुती आली आहे त्यामुळे "तोच योग्य आहे".. अशा गरज नसलेल्या गोष्टी लिहीणे टाळावे..
तसं झालं तर लोकही "विचारलाच" महत्व देतील.. "संक्षी" ना नाही...

आणि हो.. जे काही असेल ते सरळ लिहावे.. उगा शब्दांचे मनोरे रचु नयेत...

पिलीयन रायडर's picture

15 Jul 2013 - 4:11 pm | पिलीयन रायडर

आणि हो..

लोकांची अक्कल काढणे देखील थांबवावे..

पुण्याचे वटवाघूळ's picture

15 Jul 2013 - 9:48 pm | पुण्याचे वटवाघूळ

लोकांची अक्कल काढणे देखील थांबवावे..

काय राव तुम्ही. पेंटागॉनमध्ये बसलेले तेलसमृध्द देशावर हल्ला करणार नाहीत अशी अपेक्षाच कशी करता तुम्ही.किंवा कितीही उगाळला तरी कोळसा काळा नसेल अशी अपेक्षा कशी करता तुम्ही. इतरांच्या अकला काढणे हा स्थायीभाव असला तर तो काहीही झाले तरी जाणे नाही.

लोकांची अक्कल काढणे देखील थांबवावे..

विदा आहे का..?

पिलीयन रायडर's picture

16 Jul 2013 - 11:24 am | पिलीयन रायडर

हो.. आहे...
मागु नकोस.. मी देणार नाही..

सुधीर's picture

15 Jul 2013 - 7:19 pm | सुधीर

हा प्रतिसाद मला कळला आणि आवडला. कदाचित लेखकाच्या विचार मांडण्याच्या पद्धतीवर (मास्तरांच्या शिकवणीच्या पद्धतीवर) बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. संक्षीना कदाचित हेच सांगायचं असेल पण ते माझ्यासारख्या बर्‍याचजणांना समजण्यात अडचण येते.

अग्निकोल्हा's picture

15 Jul 2013 - 11:55 pm | अग्निकोल्हा

लेख नीट वाचला. समोरच्या परिस्थितीचा बेशर्त स्वीकार करणं ही पराभवसूचक गोष्ट समजली जाते. ती तशी न मानता उलट तो विजय मानला पाहिजे. इनफॅक्ट परिस्थितीचा (बिनशर्त) स्वीकार म्हणजे जणू नेहमीच "हतबल शरणागत स्वीकृती" असा एक निराशाजनक टोन त्या प्रकाराला आपोआप दिला जातो.

नाहि. "बेशर्त स्विकृति" नावाने विशद केलेलि प्रक्रिया ही एक दिशाभुल व अशक्यपाय गोष्ट आहे, हाच अन्वयार्थ मला अभिप्रेत आहे.

त्यांना (संक्षींना) स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.

थोडं चुकलात. वाचकांच्या अनुभुतिचा संक्षिना विचार करता येत नसल्याने त्यांचा हमखास गोंधळ उडतो व त्यात ते अक्षरशः विचित्रपणे वाहवत जातात हे वास्तव आहे.

या पार्श्वभूमीवर परिस्थिती बिनशर्त स्वीकारणे हाच तिच्याशी डील करण्याचा / कंट्रोल करण्याचा मार्ग आहे असा विचार या लेखात मला दिसला. हा विचार नक्कीच वेगळा आहे. कितपत नवा आहे किंवा क्रांतिकारी आहे यावर काही म्हणणं नाही, पण एक चांगला विचार आहेच.

"बेशर्त स्विकृति" नावाने विशद केलेलि प्रक्रिया ही एक दिशाभुल व अशक्यपाय गोष्ट आहे. बरेच चांगले विचार चक्क मी सुध्दा करतो/मांडु शकतो. म्हणजे ते वास्तववादी असतात दिशाभुल करणारे नसतिल असे न्हवे.

लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही.

इनोवेशनच्या नादात रुट कॉझ्कडे होत असलेले लेखकाचे अक्षम्य दुर्लक्ष. हेच मुलभूत कारण होय.

त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात.

नो कमेंट्स. वाचक सुज्ञ नाहित हि गोश्टच पटणे अशक्य. पण काहि वाचक संपुर्ण तैलानिक विचार पक्रियेला महत्व देउ इछ्चित नसल्यास संक्षि रॉक्स.

चिगो's picture

16 Jul 2013 - 10:50 am | चिगो

गवि, सुंदर विवेचन.. आवडलं. पण 'बिनशर्त सहमती = समाधान' हे असेल तर आणखी चांगलं होण्यासाठी प्रयत्न का करायचा? परिस्थितीचा स्विकार न करता 'डिनायल मोड' मध्ये जाणं जसं चुकीचं तसंच 'ठेवले अनंते'पण चुकीचं.. मला शोभेल असं उदाहरण द्यायचं झाल्यास -- एका 'पनिशमेंट पोस्टींग' मानल्या गेलेल्या जागी, जिथे भरपुर अनागोंदी कारभार आहे, कटकटी आहेत, ट्रांसफर झाल्यावर अशी केस होईल.
पहीला पर्याय - डिनायल : न जाण्यासाठी प्रयत्न करणे. जावंच लागल्यास, तिथे चीडचीड करत जगणे, आणि सटकायचा प्रयत्न करणे.
दुसरा पर्याय - बिनशर्त स्वीकृती : आहे ते चालू देणे. 'पार्ट आॅफ द गेम' होणे..
तिसरा पर्याय - स्वीकृती आणि प्रयत्न : जे आहे, त्याला शांतपणे विचार करुन, सुधारण्याचा प्रयत्न करणे..

मालक, 'बिनशर्त स्वीकृती' मानल्यास माझी स्वाक्षरीच बाद होते की..

निराकार गाढव's picture

18 Jul 2013 - 10:55 am | निराकार गाढव

लेख नीट वाचला.

...आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय...

लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही...पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात....

अग्दी ब्रोब्रर!

बाळ सप्रे's picture

15 Jul 2013 - 4:13 pm | बाळ सप्रे

यातला गुरुदेवांच्या "हु आर यु?" चा उल्लेख वाचुन गटण्याचे "आजच्या जगात विशुद्ध प्रेम कुठेच मिळत नाही" हे सांगणे आठवले.. जे खर्‍या नाटकात एका विनोदी पात्राच्या प्रसंगात असते..

मृत्युन्जय's picture

15 Jul 2013 - 4:29 pm | मृत्युन्जय

याचे ३ भाग आलेत?????

सस्नेह's picture

16 Jul 2013 - 8:33 pm | सस्नेह

आणि प्रत्येकाचा स्कोर शंभरावर आहे...
आहात कुठं ?

संजय क्षीरसागर's picture

15 Jul 2013 - 4:51 pm | संजय क्षीरसागर

>या पार्श्वभूमीवर परिस्थिती बिनशर्त स्वीकारणे हाच तिच्याशी डील करण्याचा / कंट्रोल करण्याचा मार्ग आहे असा विचार या लेखात मला दिसला. हा विचार नक्कीच वेगळा आहे. कितपत नवा आहे किंवा क्रांतिकारी आहे यावर काही म्हणणं नाही, पण एक चांगला विचार आहेच.

= दॅटस द पॉइंट. मला हेच नवल वाटतं. लोक डोक्यावरून गेलं, काही समजलं नाही वगैरे कसं म्हणतात?

>आता यावर वाद न घालता त्याचा अंगिकार करुन पहावासा वाटला तर पहावा किंवा सोडून द्यावा हे स्वाभाविक असताना त्यावर बरीच उलटसुलट चर्चा होतेय, आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय त्याच्या गाभ्याला पूर्णपणे सोडून होतेय.

= दॅटस द वेरी पॉइंट अगेन. विडंबनं काय, उलटसुलट प्रतिसाद, त्यावर उपप्रतिसाद काय फुल कल्ला चललायं.

>लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही. पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात.

= अशी विधानं दा़खवून दिली तर त्यावर नक्की चर्चा होऊ शकेल.

>शेवटी "ठेविले अनंते" चे उत्तम उदाहरण दिले आहे. यातला अनंत (नको असल्यास) वजा करुन हाच मुद्दा महत्वाचा आहे. त्याला अन्य मार्गांनी फिरवून आणल्याने संभ्रम वाढू शकतो.

= नाऊ जस्ट सी धीस :

अनंत हा पहिला गोंधळ आहे कारण ती मानवी कल्पना आहे. यू आर अगेन इन द रिल्म ऑफ माइंड.

`आणि समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं, असू द्यावं लागत नाही'

ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे कारण `असू द्यावे' ही पुन्हा मनाची मनधरणी आहे, तो प्रयास आहे. वास्तविकात समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं.

>तेव्हा मी अशी विनंती करुन पाहतो की संक्षींनी त्यांचे विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा.

इथे मजा आहे :

१) आता जोपर्यंत `ठेविले अनंतेपेक्षा' `बेशर्त स्वीकृती' वेगळी आहे सांगितलं जात नाही तोपर्यंत लेखाला अर्थच नाही. तो वेगळा विचार असू शकत नाही. इट विल वी रिपीटींग द ओल्ड.

२) प्रक्रियेचा अंगिकार न करता, तदनुषंगिक अनुभवावर चर्चा न होता वाचकांना विचार कसा पटणार?

३) एखादा वेगळा विचार मांडणं आणि तो प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळा आहे हे ठामपणे सांगणं यात (सदस्य आणतायंत त्या) अहंकाराचा संबंध कुठे येतो?

मला वाटतं तू यातनं मार्ग काढू शकशील. तू सुचव मी नक्की विचार करीन.

स्पा's picture

15 Jul 2013 - 5:07 pm | स्पा

१) आता जोपर्यंत `ठेविले अनंतेपेक्षा' `बेशर्त स्वीकृती' वेगळी आहे सांगितलं जात नाही तोपर्यंत लेखाला अर्थच नाही. तो वेगळा विचार असू शकत नाही. इट विल वी रिपीटींग द ओल्ड.

२) प्रक्रियेचा अंगिकार न करता, तदनुषंगिक अनुभवावर चर्चा न होता वाचकांना विचार कसा पटणार?

३) एखादा वेगळा विचार मांडणं आणि तो प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळा आहे हे ठामपणे सांगणं यात (सदस्य आणतायंत त्या) अहंकाराचा संबंध कुठे येतो?

फक्त हे थोड्याश्या सोप्या भाषेत मला सांगा ना
बाकी प्रतिसाद आवडलाच , आणि गाविंचा पण

अवांतर : चला आमच्या टीम मध्ये गवी आले :)

पैसा's picture

15 Jul 2013 - 5:56 pm | पैसा

तू आधी कुंपणावरून खाली उतर आणि आमच्या पिटात ये.

मोदक's picture

15 Jul 2013 - 6:48 pm | मोदक

आमच्या

पिटात ये.

म्हणजे तुम्ही विरोधी कंपूत आहात का..??

पैसा's picture

15 Jul 2013 - 11:29 pm | पैसा

पिटात प्रेक्षक बसतात टाळ्या आणि शिट्ट्या वाजवणारे.

पिशी अबोली's picture

15 Jul 2013 - 11:49 pm | पिशी अबोली

गोणपाट घेऊन यावे लागतात फक्त... बाकी गर्दीची बेशर्त स्वीकृती... ;)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jul 2013 - 6:54 pm | अत्रुप्त आत्मा

@तू आधी कुंपणावरून खाली उतर आणि आमच्या पिटात ये.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-055.gif बडवा....बडवा त्या पांडूला!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggling-smiley-emoticon.gif

निराकार गाढव's picture

18 Jul 2013 - 2:12 am | निराकार गाढव

मला वाटतं तू यातनं मार्ग काढू शकशील. तू सुचव मी नक्की विचार करीन.
बगा बगा आपले सायेब कित्ती मोठठया मनाचे आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2013 - 6:17 pm | प्रभाकर पेठकर

गविंचे हार्दीक अभिनंदन.

चित्रगुप्त's picture

15 Jul 2013 - 6:30 pm | चित्रगुप्त

मिपाकरांचे भाग्य थोर, हेच खरे.

रावणकाय फाष्ट बॉलरने टाकलेला एखादा चेंडू बॅट्समनच्या नाकाशी सलगी करून गेला, की "ही स्मेल्ट लेदर" असं कॉमेंट्रीत म्हंटात. तसे हे लेख मला चामड्याचा वास देतायत.

पण एक मात्र खरं - मी प्रतिसादांची गम्मत बघायला येतो ;)

बॅटमॅन's picture

15 Jul 2013 - 6:57 pm | बॅटमॅन

पण एक मात्र खरं - मी प्रतिसादांची गम्मत बघायला येतो

अरे बघ्ताय् काय्????????सामील् व्हा!!!!!!!!!!!!

च्यामारी.. आदुबाळ माझा डुआयडी असल्यासारखे लिहून गेला एकदम! ;-)

अरे सामील कसलं व्हा? काहीतरी बेसिक तरी झेपायला पाहिजे ना!

--
लटिके माझे लटिके तुझे। लटिके ओझे लटिक्याचे।।
- संत तुकाराम

शतकासाठी आमचा हा प्रतिसाद मदत करेल अशी अपेक्षा आहे.
सर आमच्यासाठी नेहमीच स्फूर्तिस्थान ठरलेले आहेत.

धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jul 2013 - 12:32 am | अत्रुप्त आत्मा

@सर आमच्यासाठी नेहमीच स्फूर्तिस्थान ठरलेले आहेत.
धन्यवाद.>>> =)) या प्यारे ला ,त्या पांडुबरोबर बांधायला न्यारे. ;-)

मोदक's picture

16 Jul 2013 - 12:19 am | मोदक

.

क्लिंटन's picture

16 Jul 2013 - 9:39 am | क्लिंटन

मागे मी कुठेतरी एक वाक्य वाचले होते. मला वाटते की ते वाक्य व्यवस्थित आचरणात आणले तर बर्‍याच गोष्टी सोप्या होतील. ते वाक्य आहे: "God, grant me the serenity to accept the things I cannot change, courage to change the things I can and wisdom to know the difference"

पण काय असते की "गॉड" कसा नाही हेच सिध्द करण्यात आपला सगळा वेळ जातो आणि मुख्य गाभ्याकडे मात्र दुर्लक्ष होते.

चौकटराजा's picture

16 Jul 2013 - 5:12 pm | चौकटराजा

हेच वाक्य आमच्या फॅक्टरीच्या एच आर डी च्या ट्रेनिंग सेंटरच्या दरवाज्यावर लावलेले आठवतेय ! ते एच आर डी चा मूलमंत्र म्हणून लावले असावे काय ?

[अतिभयंकर अवांतर वॉर्निंग]

आमच्या कुंपणीचे बोधवाक्यः Arbeit macht frei

[अतिभयंकर अवांतर समाप्त]

क्लिंटन's picture

16 Jul 2013 - 10:33 pm | क्लिंटन

हे वाक्य डेल कार्नेगींच्या "हाऊ टू स्टॉप वरिंग अ‍ॅन्ड स्टार्ट लिव्हिंग" या पुस्तकात दिले आहे.

ह्म्म.. मी ऐकलेले वाक्य होते.

Life is very simple, we make it complex and then we try to resolve it.

मदनबाण's picture

16 Jul 2013 - 5:17 pm | मदनबाण

मूळ :- Life is really simple, but we insist on making it complicated.
Confucius

मोदक's picture

16 Jul 2013 - 5:20 pm | मोदक

धन्यवाद बाणा.. चला या धाग्याचा काहीतरी उपयोग झाला.! ;-)

अर्धवटराव's picture

16 Jul 2013 - 11:30 pm | अर्धवटराव

>>पण काय असते की "गॉड" कसा नाही हेच सिध्द करण्यात आपला सगळा वेळ जातो आणि मुख्य गाभ्याकडे मात्र दुर्लक्ष होते.
-- "wisdom to know the difference" हि खरी मेख आहे :)

हे सर्व लेख वाचकांना 'आत्मपरिक्षण' करण्यास प्रवृत्त करतात, हा फायदा काय थोडा आहे?
... म्हणजे काहीतरी वाचायचे वा ऐकायचे, त्याने तात्पुरते भारून जायचे, त्यातच होणारा 'आत्मसाक्षात्कार' की अरे, हे तर सर्व मला अवगतच आहे, हे तर सर्व मी माझ्या जीवनात उतरवलेलेच आहे, म्हणजे मी किती थोर वगैरे आहे.... मग येणारी बेचैनी, की माझे हे थोरपण मी दुसर्‍यांना पटवून दिले नाहे, तर त्याला काय अर्थ?.... आणि अन्य सर्वजण अर्थातच या गोष्टीपासून वंचित आहेत... वाट चुकलेली कोकरे आहेत बिचारी... त्यांना सर्व नीट समजावून सांगितलेच पाहिजे...
आणि मग त्यासाठी लेखन प्रपंच, आणि जरा काही विपरित प्रतिसाद आला, तर होणारी चिडचिड ... कळत कसे नाही या मूर्खांना, एवढे सोपे करून तर सांगितले आहे मी... नीट न वाचताच प्रतिसाद ...
... सुजाण वाचक हे सर्व बघून आत्मपरिक्षण करू लागतो, की असे मी तर करत नाही ना?
हेच या लेखांचे यश.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jul 2013 - 2:48 pm | अत्रुप्त आत्मा

आपल्या लेखनातुन चित्र गुप्त झाली,तरी आशयात प्रगटत आहेत...! =))

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार) च्या प्रतिक्षेत...

एव्हाना भ्रमर जाऊन गुणुगुणू गुणुगुणू रे मच्छरा सुरू झालेलं असेल.

यशोधरा's picture

16 Jul 2013 - 5:33 pm | यशोधरा

आ भ्रमर, मुझे चाव का? :p

चौकटराजा's picture

16 Jul 2013 - 5:07 pm | चौकटराजा

हे सगळे प्रतिसाद वाचून तरीही संजयादित्याने आपला हट्ट सोडला नाही अशा अर्थाची अध्यात्म पंचविशी अशा ग्रंथाची निर्मिती झाली पाहिजे असे वाटू लागले आहे.
खरे तर मी " मनुष्य जीवनाची कुंडली" असा गंभीर चितंनाचा धागा बरेच दिवस मनात बाळगून आहे. कर्म व दैव म्हणजे प्रॅक्टीकली आहे तरी काय असा काहीसा विषय आहे. पण असा धागा काढला तर मी दमून जाईन का काय असे
भय वाटतेय. बाकी विक्रमादित्याला माझा सलाम. बाबौ काय टंकनाची चिकाटी आहे राव !

महान बोधीवृक्ष, त्याखाली ज्याला ज्ञानप्राप्ती झाली तो महान बुध्द, त्या बुध्दाला हिणवणारे बुध्दू आणि हे सारं वाचणारा म्या पामर! (इथूनपुढं 'म्या' च वापरावं लागणार. 'मी' वापरण्याइतका अभ्यास अन आवाकाच उरला नाय आपल्यात)

रुणझुणू मालिका वाचायला घेतली, त्यावर उतारा म्हणून मिथूनचे शिन्मे पाहिले...मिथूनच अगम्य वाटायला लागला साला.मग परत रुणझुणायला लागलो...हळूहळू मिथून उलगडायला लागला.

वाचवाचून प्रयत्न करायला घेतला. आधी मन बाहेर काढायचं, मग बाहेरुन आत बघायचं...मग परत मन आत घालून ठेवायचं...सालं ह्या काढण्याघालण्यात मूळ मुद्दा काय होता तेच हरवून गेलं. शेवटी भंजाळलो! सरळ उठून इजिप्शियन हाटेल गाठलं..तिथून एक जरा गोश्त कबाब घेऊन आलो, मस्तपैकी ओरिएंटल फ्लेक्सची तंबाखू भरली पायपात, व्हिस्कीचा एक पेग भरला अन पॅटिओत जाऊन बसलो वार्‍याला! हेऽऽ...असं धाव्व्या मिंटाला मन आतून बाहेर येऊन बसलं समोर. म्हणे, भर माझ्यासाठीही एक स्मॉल! अन मग आश्या गप्पा रंगल्या, आश्या गप्पा रंगल्या म्हाराजाऽऽ.....

व्वा! साला जंदगीच बदलून गेली. काय अनुभुती..काय अनुभुती! जियो!

चिगो's picture

18 Jul 2013 - 10:57 am | चिगो

धम्याभौला म्या पामर 'जालीय खातेपिते बाबा - प्रकांडपंडीत ग्यानी अध्यात्मिक गुरु' असा फ्लेक्स भरुन खिताब प्रदान करतो.. फ्लेक्स स्वत:च्या खर्चाने बनवून घ्यावा, ही धमुगुरुचरणी इनंती..;-)

आमच्या सारखे मित्र असल्याने धमुगुरु फ्लेक्साचा खर्च करत नाहीत.
आम्ही नुसते मांडून ठेवतो अन मार्च एंडाला वह्या जाळून टाकतो. :)
नुसती साईट सांगा. म्हणेल त्या स्साईजचे. म्हणेल तितके दिवस फ्लेक्स लावण्यात येईल. :)

पिलीयन रायडर's picture

18 Jul 2013 - 11:04 am | पिलीयन रायडर

क्या बात..!! क्या बात...!!
बरं वाटलं हो तुमचा प्रतिसाद वाचुन.. जीव अगदी थकुन गेला होता हा लेख वाचुन...

प्रसाद प्रसाद's picture

18 Jul 2013 - 11:39 am | प्रसाद प्रसाद

व्वा! साला जंदगीच बदलून गेली. काय अनुभुती..काय अनुभुती! जियो!

ध मु म्हणून तात्यानीच लिहील की काय असं वाटलं.....

काल बर्‍याच दिवसांनी थोडा निवांत वेळ मिळाला आणि हा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचले. वाचून खुप वाईट वाटलं.

मायबाप वाचकांना एव्हाना या धागाकर्त्याच्या स्वभावाचा अंदाज आला असेलच. त्यामुळे शक्य असेल तर लेखकाच्या अहंकडे दुर्लक्ष करुन त्याचं म्हणणं काय आहे हे समजून घ्यावं किंवा नसेल शक्य तर धाग्याकडे दुर्लक्ष करावं असं काहीसं व्हायला हवं होतं. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. धाग्याकर्त्याला कोपर्‍यात घेऊन त्याची खिल्ली उडवण्याची जणू शर्यतच लागली होती.

याला सन्माननिय अपवाद फक्त गविंचा.

अजून एक थोडा वेगळा अपवाद आहे, "मी नाही त्यातली..." टाईपच्या नवतत्वज्ञान्यांचा. ;)

असो. माझा हा प्रतिसाद वाचून काहींना माझ्याबद्दल "सौ चूहे खाके..." वगैरे वाटेल. खरं आहे ते. पण उशिरा का होईना पण शहाणपण आलं हे काय कमी आहे? :)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2013 - 12:19 pm | अत्रुप्त आत्मा

खिक्क...!

अर्धवटराव's picture

19 Jul 2013 - 2:05 am | अर्धवटराव

तुम्ही म्हणताय तसं झालय खरं... धाग्यात कोपर्‍यात घेऊन खिल्ली उडवण्याचा भरपूर प्रयत्न झालाय (त्याला स्वतः धागाकर्ता देखील अपवाद नाहि.)

प्रश्न केवळ धागाकर्त्याच्या अहंकाराकडे दुर्लक्ष करण्याचा नाहिए. आपलं काहि चुकतय, चुकु शकतं, हे कळायला/स्विकारायला जो एक बेसीक समजुतदारपणा लागतो त्याची धागाकर्त्यात वानवा आहे (त्यांच्या एकंदर लेखनशैलीवरुन तरी असच दिसतय). त्यामुळे होतं काय, कि कोणि कितीही तार्कीक मुद्दे मांडले, आणि त्याचा प्रतिवाद करणं धागाकर्त्याला शक्य झालं नाहि, तर धागाकर्ता प्रतिसादकांच्या ग्रहण क्षमतेवर घसरतो.

तत्वज्ञान, मन, जीवनातल्या अनेकानेक व्यवस्थांची गुंफण... हे विषय इतके मूलभूत आहेत कि प्रत्येक व्यक्तीची अगदी बेसीक असम्प्श्नस देखील वेगवेगळी असु शकतात, किंबहुना असतात. त्या असम्प्श्नस मधुन माणुस आपापले तत्वज्ञान विकसीत करतो (धागाकर्ता देखील हेच करतो). ज्यावेळी या मुलभूत धारणांचे वेगळेपण समोर येते त्यावेळी "अ‍ॅग्री टु डेसॅग्री" हाच संवादाचा गोड शेवट/पॉज असु शकतो. धागाकर्ता अशावेळी अत्यर्क आडमुठे धोरण स्विकारतो (पराभूत वगैरे शब्दांचा वापर हेच दर्शवतो).

आयुष्य एक पुस्तक आहे. त्यातली पाने पलटत जातात व माणुस शिकत जातो. त्यातनं माणसाची अनुभवसिद्ध गृहीतकं तयार होतात. धागाकर्ता त्याच्या अनुभवसिद्धतेला प्रमाण मानतो (ते योग्यच आहे) पण इतरांची गृहीतकं देखील अनुभवसिद्ध आहेत व आपल्याशी जुळत नसेल तरी ते आपल्या गृहीतकांएव्हढेच व्हॅलीड आहेत हे स्विकारायला धागाकर्ता तयार नाहि. त्याला इतरांच्या प्रतिसादांची शरणागती हवी असते. आपल्या व इतरांच्या अनुभवांच्या वेगळेपणाचे अ‍ॅनालिसीस करणे, तसं करायची इच्छा नसल्यास किमान दुसर्‍याच्या अनुभवांबद्दल आदर बाळगणे... अशा बर्‍याच सकारात्मक शक्यता असताना धागाकर्ता अकारण आपल्या अनुभवांव्यतिरीक्त इतर सर्व व्यर्थ आहे अशी टोकाची भुमीका घेतो.

जर कुणी तुमच्या दारावर येऊन "अबे मा***द, मी तुझ्याशी वाद घालायला आलो नाहि भें**द" अशी आरोळी देऊन संवाद साधायची करेल तर हा पाहुणा खरच संवाद साधायला आला आहे असं तुम्हाला वाटेल काय? त्यावर जर तुम्ही अरे ला कारे नि उत्तर दिलं तर पाहुण्याला कंप्लेण्ट करायचा अधिकार आहे काय?

असो. मी काहि भाईकाकांसारखा पोपटाच्या किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र सूराचा बारकाईने ष्टडी केलेला नाहि. उघड्या डोळ्यांनी जे दिसलं ते टंकलं.

अर्धवटराव

प्रभाकर पेठकर's picture

19 Jul 2013 - 3:30 am | प्रभाकर पेठकर

अगदी समतोल आणि समस्येच्या गाभ्याला स्पर्श करणारा परखड प्रतिसाद.

मुद्द्यांचा प्रतिवाद मुद्द्यांनी करणे म्हणजे 'विनाकारण एखाद्याला कोपर्‍यात घेऊन खिल्ली उडविणे नाही.' एकतर धागाकर्त्याच्या मुद्द्यांना नंदीबैलासारखी मान डोलवा नाहीतर, प्रतिवाद करू नका. नाद सोडून द्या. मग 'चर्चा' नांवाची गोष्टच हरवून जाते.

असो. आम्ही नाद सोडलाच आहे. इतर सदस्यांनी काय करावे त्यांचा प्रश्न आहे.

अत्यंत समर्पक आणि समतोल प्रतिसाद. _/\_

दुसर्‍या एका धाग्यावर टाकलेले एक विडंबन इथे द्यायची प्रकर्षानं ईच्छा झाली -

उगाचेची शब्द, नसत्या करामती
फाटकी संस्कृती.. ’वीट’लेली.

सर्व जन भ्रमी, मीच केवळ ज्ञानी
सतत हेची जनी, आळवावे..

एक पालुपद स्विकृती बिनशर्त
जगणे होई मस्त... मस्तवाल!

सांगोनी जे गेले संत-ज्ञानी काही
त्यांना काही नाही, अनुभव.

मीच घेतलाहे अनुभवाचा ठेका
हाच माझा हेका.. सांगतोय.

म्हणोन राघवा ऐक बोल माझे
ढोल अनुभवाचे.. बडवलेले.

संजय क्षीरसागर's picture

18 Jul 2013 - 6:56 pm | संजय क्षीरसागर

काल बर्‍याच दिवसांनी थोडा निवांत वेळ मिळाला आणि हा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचले. वाचून खुप वाईट वाटलं.

आभार!

मायबाप वाचकांना एव्हाना या धागाकर्त्याच्या स्वभावाचा अंदाज आला असेलच. त्यामुळे शक्य असेल तर लेखकाच्या अहंकडे दुर्लक्ष करुन त्याचं म्हणणं काय आहे हे समजून घ्यावं किंवा नसेल शक्य तर धाग्याकडे दुर्लक्ष करावं असं काहीसं व्हायला हवं होतं. पण दुर्दैवाने तसं झालं नाही.

सध्या याविषयी काही लिहीत नाही. पण प्रतिसादांमागे नक्की काय मानसिकता आहे याचा उलगडा वेळ झाला की केला जाईल.

याला सन्माननिय अपवाद फक्त गविंचा.

येस!

स्वतःकडे आणि आजुबाजूला पाहिलं तर परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार तर जाऊदेच, उलट परिस्थिती पूर्णपणे नाकारणे, डिनायल, डोळे मिटून दूध पिणे... अप्रिय वाटणार्‍या स्थितीला ती जणू नाहीच आहे असं समजून चालणे..असं एक आभासी-पॉझिटिव्ह टोक दिसतं- किंवा मग ती स्वीकारली आहे म्हणजे- चरफडत, नशिबाला बोल लावत, हतोत्साह होऊन "पत्करली" आहे.. प्राक्तन म्हणून झेलतो आहे असा दुसर्‍या टोकाचा ऋण अप्रोच दिसतो.

असा प्रामाणिकपणा फक्त गविच दाखवू शकतो.

सुरुवातीला `एक शब्द कळला नाही' असा स्टँड घेऊन पोस्टवर संभ्रम करण्याचा प्रयत्न झाला. पण गविच्या प्रतिसादानंतर रोख `अहंकाराकडे' किंवा `इतरांना कमी लेखणं' याकडे वळवला गेला.

साधी गोष्ट आहे, मी कुणाला कसा मूर्ख म्हणेन? तसे प्रतिसाद इथे प्रकाशितच होऊ शकणार नाहीत. ते संकेतस्थळाच्या धोरणाविरूद्ध आहे. ती गोष्ट खपवूनच घेतली जाणार नाही. सो द वेरी पॉसिबिलीटी इज रूल्ड आऊट.

>अजून एक थोडा वेगळा अपवाद आहे, "मी नाही त्यातली..." टाईपच्या नवतत्वज्ञान्यांचा.....

याविषयी माहिती अभावी लिहू शकत नाही.

पण एक नक्की, इतक्या कल्लोळात हा प्रतिसाद अनपेक्षितपणे सुखावून गेला!

पिलीयन रायडर's picture

19 Jul 2013 - 11:22 am | पिलीयन रायडर

तुम्ही १००-१५० मधले फक्त गविंचेच प्रतिसाद धरणार हो.. बर गविंनी पुढे हे ही लिहीलय..

लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही. पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात.

....
तेव्हा मी अशी विनंती करुन पाहतो की संक्षींनी त्यांचे विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा.

पण छे.. तुम्हाला सोयीस्कर तेवढं Quote करता येतं..अर्थात हे काही नवीन नाही म्हणा..
आता तुम्ही कुणाला मुर्ख (सरळ सरळ) म्हणला नाहीत.. म्हणु शकतही नाही.. पण आपण फक्त पेठकर काकांना दिलेले काही प्रतिसाद जरी पाहीले तरी पहा तुम्ही काय लिहीताय..

लेख शांतपणे न वाचताच प्रतिसाद देण्याची घाई केली आहे

माझ्याशी वादाचा, उपहासाचा मुद्दा

अशक्य

होता.

अशी उद्विग्नता प्रतिसादात येणार नाही. आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.

असे तुमचे बाकी २ लेख झाडुन काढले तर एक नवा लेख तयार होईल..
कसय ना संक्षी.. ह्या अशा लिहीण्यालाच "मुर्खात काढणे" म्हणतात.. पण इथे ही तुमच्या वर हा आरोप झाला की तुम्ही सोयीस्कर रीत्या "मी मुर्ख म्हणालोच नाही" अशा शब्दशः अर्थ काढुन नामानिराळे होऊ पाहताय..
अशा माणासा कडुन काय डोंबलाच अध्यात्म, जीवन जगण्याची कला आणि अजुन काय फलाणा फलाणा शिकायच?
तुम्हाला हे सगळं लिहीणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे.. पण तरी..

आता येऊन म्हणा मलाही...

"तुमची चित्तव्रुत्ती उद्विग्न आहे.."

मी वाट पाहतेच आहे...

"तुमची चित्तव्रुत्ती उद्विग्न आहे.."

सहमत!

पिलीयन रायडर's picture

19 Jul 2013 - 11:57 am | पिलीयन रायडर

आणि ती हिंसकही होत आहे..
पळ तु.. !!

क्लिंटन's picture

19 Jul 2013 - 8:46 pm | क्लिंटन

अत्यंत समर्पक आणि परखड प्रतिसाद.

पिंपातला उंदीर's picture

18 Jul 2013 - 8:06 pm | पिंपातला उंदीर

मतभेद असणे किंवा एखाद्याची मत न पटने हे समजू शकतो पण लोक तोळ धाडी प्रमाणे धागा कर्त्यावर तुटून का पडत आहेत. काही मतभेद असून पण उत्तम प्रतिवाद करणारे प्रतिसाद पण आेतच अर्थात

पुण्याचे वटवाघूळ's picture

18 Jul 2013 - 10:55 pm | पुण्याचे वटवाघूळ

मतभेद असणे किंवा एखाद्याची मत न पटने हे समजू शकतो पण लोक तोळ धाडी प्रमाणे धागा कर्त्यावर तुटून का पडत आहेत.

तुम्ही हे विचारत आहात याचाच अर्थ तुम्ही या लेखकाची मिपावरील वाटचाल नीट बघितलेली दिसत नाही असे वाटते.सतत इतरांना उपदेश करत राहायचे, इतरांच्या अकला काढायच्या, मी म्हणजे लई शाना आणि इतरांना काही कळत नाही अशा प्रकारचा अ‍ॅटिट्यूड कोणाला आवडेल?तेव्हा या लेखकाला कुठल्यातरी कारणावर मिपाकरांकडून धोपटले जाणे अगदी स्वाभाविक आहे.नेमके ते कारण संजयरावांनी स्वतःहून दिले मग इतर मिपाकरांनी त्याचा फायदा घेतला तर त्यात चूक काय? शेवटी काय करणार? इट्स ह्युमन टेन्डेन्सी. (इंग्रजी आम्हालाही येते बरे का).

पिलीयन रायडर's picture

19 Jul 2013 - 11:03 am | पिलीयन रायडर

लोक तोळ धाडी प्रमाणे धागा कर्त्यावर तुटून का पडत आहेत??

खरचं?? हा प्रश्न पडु शकतो??? तुम्ही वाचले आहेत का सरांचे प्रतिसाद??
इतके सगळेच्या सगळे त्यांच्या मागे पडलेत ह्यातच कोण चुक कोण बरोबर हे समजुन घ्याना.. आणि किती जण बोलत आहेत ह्यापेक्षा "कोण कोण" बोलत आहे हे ही पहा.

सस्नेह's picture

19 Jul 2013 - 2:23 pm | सस्नेह

लोक तोळ धाडी प्रमाणे धागा कर्त्यावर तुटून का पडत आहेत??

...का...'मी' सोडून इतरांना कामं नाहीत...

एक) `काही समजलं नाही' किंवा त्याही पुढे जाऊन `शब्द..शब्द..शब्द.. काही अर्थ नाही'

सुरुवातीला असा प्रयत्न झाला. पण गविचा प्रतिसाद आल्यावर तो मुद्दा बाद ठरला.

दोन) लेखक अहंकारी आहे, मीच सर्वश्रेष्ठ, मी शहाणा ...वगैरे

हा प्रतिवाद फार मजेदार आहे. ट्राय टू अंडरस्टँड :

>`जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे'

याचा अर्थ `मीच सर्वश्रेष्ठ' (त्यामुळे आम्हाला तुम्ही काय `शिकवतायं) असा पूर्वग्रह करुन लेखनाकडे बघायला सुरुवात केली की हा लेखच काय बाकी सर्व लेखन तसंच दिसतं.

असा पूर्वग्रह का होतो? तर आधी कुठे तरी एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर प्रतिवाद करता आलेला नसतो. उदा. `पैसा' या लेखातल्या `पैसा ही कल्पना आहे' या बेसिक विचाराचा प्रतिवाद न करता आल्यानं `पैसा हेच सर्वसाधन' मानणारं मन दुखावलेलं असतात.

किंवा नामसाधनेचा कच्चा दुवा (या लेखमालेतला पहिला लेख) दाखवल्यावर त्या मार्गावर आतापर्यंत आयुष्याची वाटचाल केलेलं मन व्यथित झालेले असतात.

`देव ही मानवी कल्पना आहे' (निरक्षर) या उघड गोष्टीवर आधी स्कोर सेटलींगचा आरोप होतो. पण इतकी खोल रुजलेली कल्पना यथासांग चर्चेनंतर (आज) सुद्धा नाकरता येत नाही (आणि काय वाट्टेल ते झालं तरी त्या साहसाला मन धजावत नाही) यामुळे भक्तीमार्गाच्या मूळ धारणांना धक्का बसलेला असतो.

स्री देहाचा गौरव आणि प्रणयतृप्ती सारख्या मुलभूत विषयावर (बोला स्त्री मुक्ती आंदोलन झिंदाबाद) मांडलेले विचार पटून सुद्धा मान्य करता आलेले नसतात.

वेगवेगळ्या प्रतिसादातून केलेली अध्यात्मिक वक्तव्य किंवा लेख ( बुद्ध, एकहार्ट, महाराज) प्रस्थापित अध्यात्मिक धारणांना स्विकारायला अवघड वाटलेली असतात.

....थोडक्यात, मनानं इतकी वर्ष जीवापाड जपलेल्या धारणा आज अचानक फोल कश्या ठरवायच्या हा प्रश्न असतो.

वास्तविकात, मी फक्त तथ्य मांडलेलं असतं, नवा विचार दिलेला असतो. पण त्याचा अर्थ मात्र, `स्वतःचं खरं करतो' किंवा `स्वतःला शहाणा समजतो' , `फार अहंकार आहे' असा काढला की व्यक्तिगत जीवनातल्या जुन्या धारणा, जुने मार्ग कायम ठेवायला मनाला सोपं होतं.

तिसरी गोष्ट, `लोकांना मूर्ख ठरवणं'

हा मुद्दा टिकू शकत नाही कारण वर म्हटल्याप्रमाणे :

>साधी गोष्ट आहे, मी कुणाला कसा मूर्ख म्हणेन? तसे प्रतिसाद इथे प्रकाशितच होऊ शकणार नाहीत. ते संकेतस्थळाच्या धोरणाविरूद्ध आहे. ती गोष्ट खपवूनच घेतली जाणार नाही. सो द वेरी पॉसिबिलीटी इज रूल्ड आऊट.

आता हा प्रतिसाद शांतपणे वाचला तर मन कसं जुन्या धारणा कायम ठेवतं आणि नव्याच्या विरोधात तुटून पडतं हे लेखावरच्या प्रतिसादांवरून लक्षात येऊ शकेल.... आणि बहुदा या सर्व प्रयासाची ती विधायक फलश्रुती असेल.

पिलीयन रायडर's picture

19 Jul 2013 - 12:27 pm | पिलीयन रायडर

याचा अर्थ `मीच सर्वश्रेष्ठ' (त्यामुळे आम्हाला तुम्ही काय `शिकवतायं) असा पूर्वग्रह करुन लेखनाकडे बघायला सुरुवात केली की हा लेखच काय बाकी सर्व लेखन तसंच दिसतं.

असा पूर्वग्रह का होतो? तर आधी कुठे तरी एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर प्रतिवाद करता आलेला नसतो

तुमचं हेच होतय काका...

तुम्ही अहंकारी आहात हा मुद्दा १. तुम्हाला विरोधासाठी विरोध करायचा म्हणुन किंवा २. मी सर्वश्रेष्ठ , मला कोण शिकवणार? ह्या अहंकारा मुळे आलला आडमुठेपणा ह्या मुळे नसुन तुमच्या "भाषेमुळे" आलेला आहे.

प्रतिवाद करायला तुम्हाला जमत नाहीये हे लक्षात घ्या..

नवा विचार मांडताना, तो फक्त एक "विचार" असतो.. केवळ आणि केवळ तोच "सत्य" नसतो.. त्यामुळे देव आहे ही थिसरी जशी चुक असु शकते तशीच "देव नाही" ही सुद्धा चुकीची थिअरी असु शकते.

त्याच प्रमाणे, जेव्हा जेव्हा तुम्ही हे सर्व वेगवेगळे "नवे (?) विचार" मांडले तेव्हा तेव्हा तुम्ही ते चुकीचे असु शकतात, किंवा दुसरीही थिअरी अस्तित्वात असु शकते हे मान्य करत नाही.. म्हणुन तुम्ही हेकेखोर आहात..

उदा- स्त्री देहा बद्दल तुम्ही स्त्रियांशी वाद घालायला लागलात, तेही "माझंच बरोबर" अशी भुमिका चेऊन तर कसं चालेल.. तुम्ही तिथे फक्त आणि फक्त "थिअरीच" मांडु शकता.. अनुभव घेऊच शकत नाही.. त्यामुळे स्त्री देहाची प्रणयत्रुप्ती हा तुमचा अधिकाराने बोलण्याचा प्रांत नाहीचे.. सो प्लिझ...

मन कसं जुन्या धारणा कायम ठेवतं आणि नव्याच्या विरोधात तुटून पडतं

आता तुम्हाला केलेला विरोध हा तुम्ही "प्रुथ्वी गोल आहे ह्या साहसी विधानाला केलेला विरोध" ह्या कॅटेगरीत टाकणार असाल तर तुमची मर्जी...!!

आता तुम्हाला केलेला विरोध हा तुम्ही "प्रुथ्वी गोल आहे ह्या साहसी विधानाला केलेला विरोध" ह्या कॅटेगरीत टाकणार असाल तर तुमची मर्जी...!!

मार्मिक अन नेमके! हे कळेल तो सुदिन, पण म्हणतात ना, त्यातली गत आहे ही.

हा टोन योग्य वाटतोय का ते पाहा :

>अशा माणासा कडुन काय डोंबलाच अध्यात्म, जीवन जगण्याची कला आणि अजुन काय फलाणा फलाणा शिकायच?
तुम्हाला हे सगळं लिहीणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे.. पण तरी..

पुढे तुम्ही म्हटलंय :

>प्रतिवाद करायला तुम्हाला जमत नाहीये हे लक्षात घ्या..

= `बेशर्त स्वीकृती' या लेखनाच्या बेसिक मुद्यावर चर्चा कुठे होते आहे? विधायक मुद्दे आणि प्रतिवाद झालायं कुठे? तुम्ही म्हटलंय तोच तर रोख सगळ्या प्रतिसादात आहे : `अशा माणासा कडुन काय डोंबलाच अध्यात्म,.....

>नवा विचार मांडताना, तो फक्त एक "विचार" असतो.. केवळ आणि केवळ तोच "सत्य" नसतो.. त्यामुळे देव आहे ही थिसरी जशी चुक असु शकते तशीच "देव नाही" ही सुद्धा चुकीची थिअरी असु शकते.

या विषयी अत्यंत सांगोपांग चर्चा १) निरक्षर आणि २) देवाला रिटायर का करा या दोन लेखांवर झालेली आहे. `देव ही कल्पना आहे' या मुद्याचा प्रतिवाद होऊ शकलेला नाही. तुम्ही अत्यंत शांतपणे ते लेख वाचले तर तुमचं मत बदलू शकेल.

>त्याच प्रमाणे, जेव्हा जेव्हा तुम्ही हे सर्व वेगवेगळे "नवे (?) विचार" मांडले तेव्हा तेव्हा तुम्ही ते चुकीचे असु शकतात, किंवा दुसरीही थिअरी अस्तित्वात असु शकते हे मान्य करत नाही.. म्हणुन तुम्ही हेकेखोर आहात..

= लेखाच्या गाभ्यावर चर्चा होत नाहीये हे कुणीही मान्य करेल. तशी चर्चा न होता मला हेकेखोर ठरवणं कितपत योग्य ठरतं?

>उदा- स्त्री देहा बद्दल तुम्ही स्त्रियांशी वाद घालायला लागलात, तेही "माझंच बरोबर" अशी भुमिका चेऊन तर कसं चालेल.. तुम्ही तिथे फक्त आणि फक्त "थिअरीच" मांडु शकता.. अनुभव घेऊच शकत नाही.. त्यामुळे स्त्री देहाची प्रणयत्रुप्ती हा तुमचा अधिकाराने बोलण्याचा प्रांत नाहीचे.. सो प्लिझ...

= नाजूक विषय आहे पण जहीर सय्यदच्या `बोला स्त्री मुक्ती आंदोलन झिंदाबाद' लेखावर; स्त्री देह आणि प्रणयतृप्ती या अत्यंत गहन विषयावर सांगोपांग चर्चा झाली आहे. त्यावरून मला कितपत अधिकार आहे याची कल्पना येऊ शकेल.

प्रणयतृप्ती हा केवळ स्त्री देहाचा विषय नाही. तो युगुलाच्या पारस्पारिक समन्वय आणि सहसंवेदनेचा अनुभव आहे.

>आता तुम्हाला केलेला विरोध हा तुम्ही "प्रुथ्वी गोल आहे ह्या साहसी विधानाला केलेला विरोध" ह्या कॅटेगरीत टाकणार असाल तर तुमची मर्जी...!!

तुमच्या सर्व प्रतिसादाला कोणत्याही कॅटेगरीत न टाकता मनःपूर्वक उत्तर दिलंय. आता...

`मन कसं जुन्या धारणा कायम ठेवतं आणि नव्याच्या विरोधात तुटून पडतं'

हे मंजूर करणं, न करणं तुमची मर्जी.

पिलीयन रायडर's picture

20 Jul 2013 - 6:55 pm | पिलीयन रायडर

संक्षी...
अजिबात लिहायचं नव्हतं, पण तुम्ही परत मी प्रतिवाद करत नाही म्हणजे मला तुमच्या शब्दांच्या कोलांट्या उड्या मान्य आहेत असा काढाल..

जो माणुस समोरच्याला सतत मुर्खात काढतो.....अशा माणासा कडुन काय डोंबलाच.......
असं वाचायचं होतं ते..
तुम्ही काय माझ्या भाषेवर आणि टोनवर आक्षेप घेणार? पेठकर काकांना दिलेल्या प्रतिसादात दोन्ही दिसले आहेतच.. नेहमीच दिसतात म्हणा..
जेव्हा तुम्ही स्वतःला "किमान चर्चा करण्याच्या लायकीचे" सिद्ध कराल तेव्हा कदाचित तुमच्याशी "बेशर्त स्वीकृती" ह्या विषयावर चर्चा होऊ शकेल. तुम्ही अर्थात सोयीस्कर प्रतिसाद पहात आहत. इथे तुमच्याशी चर्चेचा प्रयत्न लोकांनी केला होता. त्याची तुम्ही लोकांची चित्तदशा दाखवून वासलात लावलीत..
साधं पहा.. मी देव आहे की नाही हे केवळ उदाहरण म्हणुन दिलं होतं.. तुम्हाला एवढंही कळत नाही.. मला तुमच्या चित्तवृत्ती सोबत आकलन क्षमतेवर शंका येत आहे (आणि काही ठिकाणी विनोदबुद्धीवर सुद्धा). तुम्ही नीट वाचत नाही आहात. तुम्हाला केवळ उत्तर द्यायची घाई आहे. खरं तर ह्या नंतरच तुमचा सगळा प्रतिसाद चुकला आहे. पण तरी मी उत्तरं देते...

स्त्री देह आणि संबधित गोष्टींवर तुमचं मत एक तर तुम्ही माझ्या अंदाजा नुसार "स्वानुभवातुन" बनवलं आहे. जो की जेनेरीक मत मांडायला तोकडा आहे. शिवाय तुम्ही स्वतः तो देह अनुभवला नसल्याने तुम्ही "केवळ अंदाजच" बांधु शकता. त्यामुळे तुम्हाला अधिकार नाही हे च बरोबर आहे.
(यापुढे मला ह्या विषयावर तुमच्याशी बोलायचं नाही. कृपया प्रतिवादास उत्तर मिळणार नाही हे लक्षात घ्यावे.)

तुम्ही एकदा माझे सर्व प्रतिसाद शांतपणे वाचा.. आणि प्लिझ.. उद्विग्न होऊ नका..
आपलं चुकलय.. हे मान्य करायला त्रास होतोच.. आपण समजतो तेवढे आपण हुषार नाही, आपली मते काही फार जगावेगळी नाहीत..हे तुम्हाला एकदा फक्त "बेशर्त" स्वीकारायचं आहे!
(बिनशर्त हा साधा शब्द स्वीकारला तरी ह्याची सुरवात होईल)

प्रतिसादातून चित्तदशा व्यक्त होते हे तथ्य आहे, त्यात उपमर्द नाही. वरचा प्रतिसाद वाचलात तर तुमचं तुम्हाला कळेल.

अर्धवटराव's picture

19 Jul 2013 - 10:22 pm | अर्धवटराव

त्यांच्या मुद्यांचा कोणि प्रतिवाद केला नाहि, असा धादांत खोटा समज ज्या मनाने करुन घेतलाय (ते प्रतिवाद धागा उघडला तरी अगदी सहज वाचता येतील... पण त्याचंही आश्चर्य नाहि. जिथे मनच मनाला नाकारतय तिथे इतर काहि कसं दिसेल) मग इतर मुद्द्यांची काय कथा.

अर्धवटराव

अवतार's picture

19 Jul 2013 - 11:35 pm | अवतार

इथे लॉजिकल लिहून काही उपयोग नाही हे आतापर्यंत सर्वांच्याच लक्षात आले असावे.
स्त्रीहट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट यांच्या जोडीला आता आध्यात्मिक हट्ट हा शब्दप्रयोग देखील चपखल बसेल.
"मी आणि माझा शत्रुपक्ष" मधील नको नको म्हणत असतांनाही बळेच स्वत:चे घर दाखवण्याचा प्रसंग आठवला.

त्यांना बहुदा विस्मरण झालंय. ही लिंक : http://www.misalpav.com/node/23678?page=1

अर्धवटराव's picture

20 Jul 2013 - 3:15 am | अर्धवटराव

तुमच्या मुद्द्यांना कोणि प्रतिवाद दिले नाहित, हा तुमच्या दाव्याबद्दल चर्चा चालली आहे... आणि तुम्ही रिप्ल्याय देताय कि तुम्ही कोणाला उत्तरे दिलीत. प्रतिसाद देताना तुमचा असा गोंधळ होतो.
शिवाय, तुम्ही शेवटपर्यंत उतर दिले हे ही खोटं आहे.

http://www.misalpav.com/comment/452245#comment-452245
http://www.misalpav.com/comment/451692#comment-451692

असो. तुम्ही ते स्विकारणार नाहि हे ठाऊक आहे.

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

20 Jul 2013 - 3:04 pm | संजय क्षीरसागर

आणि पुढची विचारणा पाहा, त्याला माझं उत्तर पाहा म्हणजे शेवटपर्यंत उत्तरं कुणी दिली आहेत ते दिसेल.

अर्धवटराव's picture

21 Jul 2013 - 5:52 am | अर्धवटराव

एखाद्या प्रश्नावर, चर्चेच्या मुद्द्यावर शेवटपर्यंत उत्तर देणे आणि धाग्यावर शेवटचं उत्तर देणे या भिन्न गोष्टी आहेत बहुतेक. पण तुम्ही मुद्द्याला सोडुन उत्तर द्याल हि माझी अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.

अवांतरः त्याच धाग्यावर भक्तीमार्गाबद्दलचे तुमचे प्रतिसाद आणि इतरत्र त्याच विषयावरचे तुमचे प्रतीसाद यांत प्रचंड काँन्ट्रॅडीक्शन आहेत. आता त्याबद्दल देखील मुद्द्याला सोडुन एखादा प्रतिसाद तुमच्याकडुन अपेक्षीत आहे. बघुया, अपेक्षा कधि आणि कशी पूर्ण होते ते.

अर्धवटराव

कवितानागेश's picture

20 Jul 2013 - 9:01 pm | कवितानागेश

अर्धवट राव, आधी म्याला तुम्ही उत्तर द्या की धावताना तुम्ही सगळ्यात शेवटचा पाय कुठला टाकता?
ज्या दिवशी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येइल त्या दिवशी तुम्हाला सगळीच उत्तरं मिळतील आणि तुम्ही 'मुक्त' व्हाल!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jul 2013 - 12:02 am | अत्रुप्त आत्मा

@सगळ्यात शेवटचा पाय कुठला टाकता?>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hysterically-smiley-emoticon.gif

चिगो's picture

19 Jul 2013 - 12:57 pm | चिगो

 पण गविचा प्रतिसाद आल्यावर तो मुद्दा बाद ठरला.

ह्याचं क्रेडिट गविंना जातं, हे नम्रपणे सुचवू इच्छितो.. बाकी 'बेशर्त स्विकृती'चा प्रतिवाद गविंच्या प्रतिसादावर उत्तर देतांना केला होता.

कुणी निंदा कुणी वंदा, शेवटचा प्रतिसाद माझाच - हाच माझा धंदा!

आनंद भातखंडे's picture

19 Jul 2013 - 12:38 pm | आनंद भातखंडे

धागा काथ्याकूट या सदरात सरकवण्याची विनंती करतो. ;)
खरं तर लेख उमगला नाही. प्रतिक्रिया वाचून लक्षात घेण्याचा प्रयत्न केला पण आता सगळंच डोक्यावरून जायला लागलंय.
ते काय ते शरणागती म्हणत होते ती आता घेतली.

बाळ सप्रे's picture

19 Jul 2013 - 3:00 pm | बाळ सप्रे

संक्षी,
सगळ्या प्रति़क्रीया विसरुन परत पहिल्यापासून वाचायचा प्रयत्न केला. तात्विक पातळीवर विचार ठीक वाटला पण आचरणात आणण्याच्या दृष्टीने नक्की समजेना..
एखादे उदाहरण देउन स्पष्ट कराल का ??
की या परिस्थितीत असं वागणं म्हणजे तक्रारखोर मनाच ऐकणं आणि तसं वागणं म्हणजे "बेशर्त स्वीकृती"..

संजय क्षीरसागर's picture

19 Jul 2013 - 8:10 pm | संजय क्षीरसागर

आचरणात आणण्याच्या दृष्टीने नक्की समजेना..

जस्ट सी धीस. सगळे तुटून पडलेत... बेशर्त मंजूर आहे....मी शांतपणे प्रतिसाद देतोय!

(आता लोकांना `शांतपणा' दिसण्याऐवजी शेवटच्या वाक्यातल्या `मी' तेवढा फोकस होणार. तो अहंकार ठरणार. पण शेवटचं वाक्य मराठीत (कर्त्याशिवाय) तरी लिहीणार कसं? यावर परत धुमाकूळ होईल... झाला तर तोही मंजूर आहे!)