रेघ

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
14 May 2013 - 3:18 pm

पिकासोपासून हुसेनपर्यंत कोणाचेही कुठलेही
चित्र ऊचलून पहावे
प्रत्येक चित्रात एक विविक्षित रेघ असते
खरं तर भव्य कॅनव्हासवर ती अगदीच
लहानशी असते
अहो ते पिकासो अन् हुसेनही जाऊ दे
मोरपीस पाहिलयं कधी निरखुन?
त्या सुंदर रंगसंगतीतही एक बारीक रेघ असते
पिसाच्या बरोब्बर मधोमध
बर्‍याचदा या रेघेचा संदर्भ चित्रकारालासुद्धा
समजलेलाच असतो असेही नाही
पण
त्या रेघेशिवाय चित्र मात्र अपूर्ण असते
माझ्या असण्यामध्ये तुझे अस्तित्व
त्या रेघेसारखे आहे
----
एकाकी तळ्याच्या
नितळ पाण्यात दिसण्यार्‍या
सूर्याच्या प्रतिबिंबासारखी आहेस तू
सूर्यचं पण तरी शितल,
पाण्यात आहे ना...
सुस्पष्ट, स्वच्छ, निव्वळ तेज
अन् याच तेजाने ऊजळून निघाल्यावर
लकाकणार्‍या तळ्यासारखा मी...
लकाकणारा कितीही दैदिप्यमान दिसला
तरी त्या प्रकाशाच्या स्त्रोतापासून दूर जाणे
त्याला परवडणारे नसते
------
आजकाल मी रात्रीचा एकटाच
भटकायला निघतो
आकाशातल्या तार्‍यांकडे टक लावून
जमिनीवर चालत असतांना जाणवते
सदा चकाकत राहण्यासाठी
स्वत:लाच जळत ठेवावे लागते यांना
हो कारण,
त्यांच्याकडे त्यांचा सूर्य नाहीये
----
मग जाणवल मी किती भाग्यवान
माझ्याकडे माझा सूर्य आहे
कधीही न मावळणारा
एकाकी तळ्याला दैदिप्यमान करणारा
माझ्या चित्रातली ती एक विविक्षित रेघ
त्याच्याच प्रकाशाची एक तिरीप तर आहे
------
पिकासोला, हुसेनला कळले कि नाही
ते माहित नाही
पण मला मात्र
माझ्या चित्रातल्या त्या विविक्षित रेघेचा
संदर्भ समजलाय..
हो बरीच वर्ष लागली खरी
पण समजला हे काय कमी आहे?

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१४/०५/२०१३)

करुणशांतरसकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

नेहेमीप्रमाणेच छान कविता.

प्यारे१'s picture

14 May 2013 - 3:55 pm | प्यारे१

हो बरीच वर्ष लागली खरी
पण समजला हे काय कमी आहे?

मस्तच!

अनिदेश's picture

14 May 2013 - 5:49 pm | अनिदेश

नेहमी प्रमाणेच जमली आहे :)

अभ्या..'s picture

14 May 2013 - 7:30 pm | अभ्या..

आज फर्स्ट टाइम मिकाची कविता आवडली नाही. :(
चित्रातली विवक्षीत रेघ ?????

स्पंदना's picture

15 May 2013 - 6:34 am | स्पंदना

भावार्थ समजला, काव्यार्थ.....

हम्म्.. पर्पज ऑफ लाइफ सारखं काहीतरी?

स्पा's picture

15 May 2013 - 11:36 am | स्पा

कमाल आहे

थोडी कळायला कठीण वाटली

पुन्हा पुन्हा वाचून पाहतो