जो वेळ या वाल्गुदवर्णनाते|
लागे, क्षमावे परि या कवीते|
कामे जशी येति तैं मूड जाई|
तैं दीस-दीशीं लिहवीत नाही ||
गुहायामपतत्ब्रूसः सपद्येवाचिरात् खलु |
तत्रैव हि गृहं तेषां वाल्गुदानां पुरातनम् ||१||
ब्रूसाघातध्वनिना ते सर्वे भयभीता: भृशं खलु |
उड्डयन्ति आक्रोशन्ति वारंवारं इतस्तत:||२||
तद् दृष्ट्वा चकितो ब्रूसः भयेन स्तिमितस्त्वहो |
पश्चात्पितृप्रयत्नेन गुहाया: उद्धृतः खलु ||३||
स्वप्नेष्वपि खलु त्रस्तः महद्भिर्वाल्गुदै: सदा |
भयभीतः सदा ब्रूसः प्राणिभिस्तु निषेवित: ||४||
निजचित्तभयं यावत् अकथत् भीतिमान् बटु: |
"भयं सर्वेषु सामान्यं" तातस्तमकथत्तदा ||५||
तया ऐकितां शांत जैं ब्रूस होई | अकस्मात निद्राप्रदेशात जाई |
पैं वाघळे येति पुनःपुनःचि ती | घोंघावती कायम आरपार ती ||६||
अथैकदा नाट्यगृहात साचे | घडे महन्नाट्य जे सत्य साचे |
मनावरी कोरिला तो प्रसंगू | वर्णू किती त्यास, मी काय सांगू ||७||
नाट्यात गूढे बहु, पाहतांना | तो ब्रूस पाही परि वाघळांना |
अंगावरी येति जणों बहूत | बाबा चला, येथुनिया निघूत ||८||
अस्वस्थचित्ते विनवीत राही | ऐकोनिया बाप बाहेर नेई |
पैं बाहिरी पिस्तुलधारि चोर | तो द्रव्य मागे, पुरता छचोर ||९||
दिले जरी द्रव्य मातापित्यांही | मारोनि टाके, न विवेक काही |
कलेवरे पाहुनि ब्रूस तो रडे | होती न पैं जोवरि नेत्र कोरडे ||१०||
तया मुहूर्तीं परि बाल्य त्याचे | आटोपले क्रूरपणेंचि साचे |
प्रवास येथोनि सूडाचिया तो | सवे जनें, पैं मनीं एकटा तो ||११||
(क्रमशः)
प्रतिक्रिया
11 Mar 2013 - 6:41 pm | प्रचेतस
झक्कास.
आता पुढचा भाग कधी?
11 Mar 2013 - 8:34 pm | आदूबाळ
लघु वाल्गुदभारतं वाल्गुव्यासविरचितम् इति प्रसिद्धम् |
11 Mar 2013 - 8:39 pm | प्रसाद गोडबोले
मजा येत आहे वाचायला !!
11 Mar 2013 - 10:34 pm | पैसा
वाघुळपंत मस्त चाललंय! ती स्मायली मधेच कुठून आली कपाळावर हात मारणारी?
11 Mar 2013 - 10:57 pm | प्रचेतस
'उड्डयन्ति आक्रोशन्ति वारंवारं इतस्तत:' या वाक्याला ती स्मायली अगदी समर्पक आहे.
11 Mar 2013 - 10:42 pm | आतिवास
दोन भाषा वापरण्याचं काही विशेष कारण आहे का?
कदाचित आधीच्या भागांत या प्रश्नाचं उत्तर असेल -पण मी अजून पहिले दोन भाग वाचलेले नाहीत, वाचते.
11 Mar 2013 - 11:18 pm | अत्रुप्त आत्मा
वृत्तराज........वाघुळशास्त्री...
एकदम अचूक.....निशाने पे तीर...
12 Mar 2013 - 12:01 am | कवितानागेश
या बॅटम्यानाचे वय काय रे? :P
12 Mar 2013 - 12:14 am | बॅटमॅन
सर्वांचे मनापासून आभार!!!
@आतिवासः काही खास कारण नाही. ५ श्लोकांनंतर संस्कृतची भट्टी काही जमेना, मग मराठीवर उतरलो झालं :)
@लीमाऊजेटः अवघे चतकोरशे वयमान ;)
12 Mar 2013 - 1:18 am | अभ्या..
बॅट्या तुझे हे वल्गुदाख्यान वाचून डोळ्यासमोर महाभारतकालीन कपड्यातलाच बॅट्मॅन उभा राहतोय रे. फुल्ल सोन्याचा मुकुट, उत्तरीय, कटीवस्त्र वगैरेवाला. ;)
12 Mar 2013 - 1:32 am | बॅटमॅन
सहीच रे अभ्या!!! नेटवर शोध घेताघेता हे सापडलं बघ. महाभारत काळातला नै पण सौदिंडियन अण्णा ब्याटम्यान ऊर्फ गॉथमपल्लिन ब्याटम्यानप्पा ;)
नंतर कधी जमल्यास तसा महाभारतकालीन किंवा मराठेशाही बॅटमॅन काढण्याची एक फर्माईश तुला आलरेडी करून ठेवतो ;)
12 Mar 2013 - 1:41 am | अभ्या..
अर्थात अर्थात. :) ह्यो पण भारी काढलाय रे अगदी
आपण त्याचे मराठीकरण करुच म्हणे. :) काय ?
12 Mar 2013 - 1:52 am | बॅटमॅन
:) हा रे नक्की. मराठी ब्याटम्यानाच्या संकल्पनेला समस्त वाल्गुदप्रेमी मिपाकरांकडून जोर्दार अनुमोदन!!!!!!!! वाट पाहतोय, मराठेशाही ब्याटम्यान झालाच पाहिजे :)
15 Mar 2013 - 9:17 pm | सस्नेह
बॅटमॅनला मराठी शब्दपण पायजे तसाच वजनदार !
15 Mar 2013 - 10:02 pm | बॅटमॅन
ब्रूसाजी वाघळे ;)
31 Mar 2013 - 4:10 pm | गंगाधर मुटे
मजा येत आहे वाचायला !!
31 Mar 2013 - 4:49 pm | राही
बहुच गम्युं. वांचता रहिये छिये. लखता रहे जो.
31 Mar 2013 - 9:30 pm | मंदार कात्रे
झक्कास
:)
31 Mar 2013 - 10:53 pm | एस
चांगलंय पण मराठी संस्थळावर संस्कृत कशासाठी हा परश्न म्यां पामरासि पडलां असे.. कृरामान.