निखळ आनंद देणारं स्वच्छ पाणी ,
गालांवर हसू आणणारा साखरेचा गोडवा ,
आल्हाददायक रंगांची उधळण करणारी गंधित चहा पूड ,
आणि या सगळ्यांना सामावणारे पांढरेशुभ्र दूध ......
..........असंच बनतं सगळं ....
......... आधी दीर्घ श्वास आणि मग…. एक कप चहा !!
पावसात भिजताना झालेली नजरानजर .
उसाचा ट्रक मधे आल्यावर झालेली हुरहूर ,
इंद्रधनुष्य सामावलेले तुझे डोळे ,
आणि पांढऱ्याशुभ्र ढगात हरवलेले आकाश .....
अशी झाली ती पहिली भेट .....
...भिजलेली टपरी आणि तिथे .... एक कप चहा ...!!
सागर किनाऱ्यावर वाट पाहतानाचा तू ,
हसून हसून दमल्यावर पिलेले गोड शहाळे ,
गुलाबाच्या फुलाने वाढलेली रंगत ,
आणि तुझ्या अंगणातला पारिजातकाचा सडा ....
असंच घडलं सगळं ......
थरथरणारी बशी आणि तरीही .....एक कप चहा ...!!
मनाचा वेध घेणारे तुझे पाणीदार डोळे ,
जीवनातला गोडवा वाढवणारं तुझं प्रेम ,
लाखों रंगांची उधळण करणारं तुझं एक हास्य ,
तुला लपवता न आलेला मोगऱ्याचा गजरा ....
असंच जमलं आपलं .....
नि:शब्द झालेलो आपण आणि घरच्यांनी प्यायलेला ....... एक कप चहा ...!!!!
प्रतिक्रिया
18 Feb 2013 - 8:13 am | मिसळलेला काव्यप्रेमी
हम्म, छानच झालीये.
18 Feb 2013 - 10:44 am | स्पंदना
छान लिहिता तुम्ही फिझाताई!
18 Feb 2013 - 10:45 am | सुहास..
मस्त !
18 Feb 2013 - 1:44 pm | श्रिया
चांगली आहे.
18 Feb 2013 - 5:13 pm | अत्रुप्त आत्मा
लै झ्याक!!! :-)
1 Apr 2013 - 3:21 pm | आगाऊ म्हादया......
व्वा !!! आवडली...पण पार्ट ३ खूपच आवडली.