कोणालाही न पटणार्या, पण लिहीलेल्या लेखांची ही स्टोरी. न पटता (किंवा पटण्याची शक्यता नसताना) ते कशाला लिहीले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. ते पटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा प्रतिसादतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायचं नाही.... फक्त लिहायचं.
लेखनाचा उद्देश ठाऊक नाही पण लिहायचं,... वेड्यासारखं लिहायचं.
आजूबाजूच्या मिपाकरांना जुमानतंय कोण?
शब्दाशब्दातून 'मी'पण त्यात लॉजिक कुठले बोंबलायला ?
आपलंच मिपा म्हटल्यावर झक मारत वाचणारच आणि लोकं चुका काढतायत म्हटल्यावर आपलंच खरं न करून सांगतोय कुणाला?
अरे एक सांगायच राहिलं, अतार्किक लिहायच....फार मजा येते.
अचानक बादरायण संबंध प्रकटलेले दिसतात. का आणि कसे जोडलेत कसं कळणार?
(मिपाकरांची) वाचायची ताकद संपली पण (माझी) लिहायची आहे ना? (वाचा!) ...पण कळणार काहीच नाही.
तरी काहीतरी अर्थपूर्ण लिहीलं...(मला भास होतायत वगैरे निष्कर्ष काढू नका माझंच खरं म्हटलंयना?)
चला आता शब्दांशी खेळू . डोक्याचा भुगा झाला तरी हरकत नाही... ‘सगळं ’ सोप्पं व्ह्यायला हवं.
त्या तर्कशास्त्र्याला उत्तर देतो. ‘कसं देणार’ काय विचारताय? मगाशी सांगीतलं ना ‘का आणि कसे जोडलेत माहिती नाही’ तरी आपल्याकडे आयडीया आहे ना!.... त्याच त्याच शब्दांना फिरवून उत्तरं द्यायची!
आह..! झाला माहौल तयार! (एखाद्या सहमत प्रतिसादाने का होईना)...‘कोणी तरी सहमत झालं’ हे महत्त्वाचं.
प्रतिसादक वाचत राहिले. कधी वरून खाली कधी खालून वर. (मायला बरोबर कोण? मीच ना?) मग स्पष्टीकरण काय मागताय?
माझे. मी. मी. माझे..... मी काय कोणाला हार जात नाय, नीट वाचा... माझे. मी. मी. माझे... आय एम फेकिंग कॉन्ट्राडिक्टरी वाक्ये फ्रॉम बोथ साइडस. आता पुन्हा ‘कश्याला लिहीतोय’ विचारू नका... न पटणार्या `अतार्किक लेखांची' स्टोरी आहे ही (एकदा सांगीतलय ना)
आता माझे मी पण डोक्यात गेले. सगळीकडे मी... लेखालेखांत, काऊ चिऊत . कधी मरून रोबमधेदेखील . कधी तर थेट वैयक्तिकही व्हायला लागले.
लेखांच्या सोबतीनं आता विडंबन आलं. इतकं इतकं लिहीतोय मिपाकरांसाठी. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर जिलब्या पाडल्यासारखं. (पब्लिक मला डायर्या भेट देतंय ,... देऊ दे).
येड्यावाणी न भेटलेल्या-अस्तित्वहीन गोष्टींची भेसळ चाललीये पण अजूनही अतार्किकच. लेखांना अर्थ नाही. त्या लेखांना वैचारिक बैठक नाही.. कधी देशील उत्तर? या प्रश्नाला उत्तरही टोलवा टोलवीनेच. सरळ सरळ नाही.... (अजून illogicalच चाललय सगळं, आलं ना लक्षात?)
मला तुमचे विचार ऐकून घ्यायचे नाहीत नाही, सरळ उत्तर नाही, ओपन फोरम कश्याला म्हणतात मला माहिती नाही. अगम्य अश्या तर्कशास्त्रातून मानायचे आपण जगातले सर्वज्ञ आहोत. पण आपण प्रश्नांना सरळ उत्तर द्यायचं नाही. आपण फक्त आपलंच खरं करायचं. वन वे...अतार्किक लिहून.
काही लेखांत .. किंवा कुठेसं म्हटलंय तसं दोन प्रतिसादांच्या टंकनाने का होईना पण लोकांच्या डोक्यात जाण्याचं मिपासारखं सोपं साधन आहे, हे जाणून हर्षवायू झाल्यासारखं होतं. (तरी मी जिलब्या पाडणार!)
नुसतेच शब्द, त्यांचे नेहेमी मी, नेहेमी मी, आणि नेहेमी मीच लावलेले अर्थ. कळतयं ना तुम्हाला? मीच लावतोय अर्थ पण तुम्हाला मधे ओढतोय.... (नायतर पब्लिक फाट्यावर मारेल)
डोक्यात जाणार्या इतर कोणत्याच गोष्टी मिपाकरांसाठी करता येत नाहीत. (....तसं झालं तर पारच भुगा करता येईल सगळ्यांच्या डोक्याचा )
स्वतःचे लेखन दिवसातून कितीही वेळा वाचतो तेंव्हा चुका दिसायला लागतात ..नाही नाही... असाही दिवस येईल कधी तरी . (अजून तरी लेखन वाचल्यावर मीच बरोबर दिसतोय)
तुमचं माझं नातं ते काय मग? निव्वळ लेख?... नाही नाही... निदान तुम्ही तरी असं म्हणू नका.
‘लेखनाच्या प्रतिक्रियांकडे’ बघतो, मिपाकरांना कसलाच बोध होत नाही. मग ज्ञान पाजळण्याचा हा विलक्षण सोस तरी का लावून घ्यायचा जिवाला? कोणाला पटलेच कदाचित, तर काय होईल त्याने? स्वप्नपूर्ती? अपेक्षाभंग?.... छे, छे, तुम्हाला पटावेच अशी अपेक्षा तरी कशाला? (शब्दांचे खेळ काय कमी मजा आणतायत?) याच विचारात मग्न असताना कुणीतरी एफेम लावला.....
गोली मार भेजे में, भेजा शोर करता है
भेजेकी सुनेगा तो मरेगा कल्लू ...
....अचानक उत्तर मिळूनही गेलं. . मी सर्वज्ञ अशी पाटीच गळ्यात अडकवून घेतली!
आता एकदम झ्याक झालं.. सर्वज्ञ असणे, सर्व सोप्पे होणे अनुभवतोच आहे प्रत्येक क्षणी. हे ‘नसलेल्याच असलेल्याशी जोडलेले बादरायण संबंध’.... अशी भेजा फ्राय सोबत मिळणे हे माझं परमभाग्यच!
तेव्हा तुमचं माझं नातं. माझंच खर असणारं.... तुम्हाला भेजा कशाला हवा? माझी अक्कल काही कमी नाही.
डोळे मिटलेला म्हणजे झोपलेला असा नाही. झोपलेल्याला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही. आपलं नातं परस्पर संमत नव्हे, तर तुम्हाला कधीच न बरोबर ठरू देणारं ....निर्बुद्ध भेजा फ्रायचं.
आता तुम्ही लेख उघडलेत काय आणि नाहीत काय, वाचलेत काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही... माझ्या बाजूनं प्रतिसाद पक्के आहेत ! त्याला विषयाचं बंधन नाही....माझी प्रतिभा हेच त्यांचं लिमिट आणि मीच त्याची पॉवर.
प्रतिक्रिया
21 Jan 2013 - 3:07 am | स्पंदना
कायकु? कायकु?
21 Jan 2013 - 4:10 am | जेनी...
संजय क्षीरसागर काका वाक्या वाक्यात ( जेवढी वाचली तेवढ्या )जाणवले .
लंबू टांग जी तुमचा हेतु साद्ध्य झाला एकदम .
बाकी लिवलय चान पण अर्ध्यापेक्षापण कमी वाचलं ..
बोर झालवो आता ते अक्षर , निरक्षर , अवाक्षर :-/
नविन कैतरी येवुद्याना :(
21 Jan 2013 - 8:00 am | अत्रुप्त आत्मा
@बोर झालवो आता ते अक्षर , निरक्षर , अवाक्षर >>> =)) येस येस... आय अॅम सहमत टू बालिका :-)
21 Jan 2013 - 8:15 am | पैसा
धाग्याच्या विषयाबद्दल आता अवाक्षर बोलणार नाही. हा लंब्या जेव्हा येतो तेव्हा डोकं वापरून काहीतरी भारीपैकी लिहून जातो! त्याचं यापूर्वीचं बहुचर्चित आणि पंखधारी विडंबन "जरा थांबा" अजून लक्षात आहे!
21 Jan 2013 - 11:45 am | प्रीत-मोहर
अगदी अगदी!!!! मस्त विडंबन. जरा थांबा ची आठवण झालीच.
जाता जाता तायडे ते परत आल होत ग बोर्डावर एकदा पंख लागल्यानंतर :)
21 Jan 2013 - 10:20 am | मनीषा
भारी ...
अवांतर : अक्षरं वाचून वाचून विचारांचा इतका कल्लोळ (खरं म्हणजे गोंधळ) झाला, कि आता अवाक्षर सूचत नाहीये..
मनात आले, मी निरक्षरच असते तर ...
21 Jan 2013 - 6:30 pm | लंबूटांग
मस्तच
21 Jan 2013 - 9:35 pm | जेनी...
मनिषा .... सुपर्ब अवांतर .... अव्वल प्रतिसाद .
21 Jan 2013 - 11:52 am | मोदक
प्रणाम स्वीकारा हो.. :-))
"मीं" पणाचा कट्टर विरोधक - मोदक.
21 Jan 2013 - 12:09 pm | निवेदिता-ताई
मस्तच
21 Jan 2013 - 12:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
"मी" ला लेख आवडला. :)
21 Jan 2013 - 12:26 pm | मूकवाचक
=))
21 Jan 2013 - 1:51 pm | सस्नेह
सगळी 'अक्षरं' आता डोक्यावर 'डॅन्स' करू लागली आहेत्...
अक्षरे आसमानपर...
21 Jan 2013 - 6:33 pm | अग्निकोल्हा
........................................
21 Jan 2013 - 6:39 pm | प्रभाकर पेठकर
'मी' 'साक्षर' का झालो ह्या विचाराने आता वेड लागायची वेळ आली आहे.
21 Jan 2013 - 7:01 pm | कवितानागेश
लंबूटांग पेटलाय! :D
21 Jan 2013 - 7:53 pm | तिमा
एका टांगेतच त्यांनी अनेक -- सागर ओलांडले! वामनावतारच म्हणायचा की वो !
22 Jan 2013 - 4:54 pm | क्श्मा कुल्कर्नि
=)) बीपी कंट्रोल करण्यासाठी.