तिला माहीत होते तिला जावेच लागेल
ति थांबली नाही अन् मीही अडवू शकलो नाही
तू गेल्यानंतर इथे फार काही बदलले नाही
मीही तसाचं, तो शिकाराही तसाचं, अन् हा किनाराही तसाचं
----
अजूनही शिकारा पाण्यावर तसाचं डुलतोय
शिकार्याची वल्हे तशीचं पाण्यावर लपलपतायत
तश्याचं छोटुल्या लाटा पसरवतायत
पाण्यावर झुलणार्या तार्यांचे ते शेपूट
ते अजूनही तसेच मोहक आहे
-----
पण तो चंद्र,
तो बिचारा नभाच्या त्या मागच्या कोपर्यातून
ठिकर्या ठिकर्या होऊन
पाण्यावर वाहत वाहत किनार्याला लागतोय
------
जातांना
तेवढे चांद्रकण घेऊन गेली असतीस...
~~~(समाप्त)~~~
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(३१/१२/२०१२)
विखुरलेला चंद्र - १
विखुरलेला चंद्र - २
विखुरलेला चंद्र - ३
प्रतिक्रिया
31 Dec 2012 - 7:54 pm | स्पंदना
आजच चारीही काव्ये वाचली.
फार छान लिहिलेत. काव्य असुनही डोळ्यासमोर चित्र उभ राहिल.
7 Jan 2013 - 5:54 pm | वपाडाव
मस्तच...
1 Jan 2013 - 11:52 pm | अत्रुप्त आत्मा
छा...............न,एंडींग. :-)
2 Jan 2013 - 12:01 am | पैसा
आह!
3 Jan 2013 - 4:37 pm | कवितानागेश
उत्क्रुष्ट काव्यचित्र.
असेच लिहित रहा. :)
3 Jan 2013 - 4:45 pm | सूड
झ का स !!
3 Jan 2013 - 4:50 pm | गवि
सुंदर.. क्लोजिंगही सुंदर जमले आहे. अशा फॉर्मॅटला क्लोज करणं खूप अवघड असतं...
4 Jan 2013 - 9:52 am | इन्दुसुता
सैरभैर झाले परत एकदा...
30 Jan 2013 - 11:22 am | फिझा
बस्स्स!!!
30 Jan 2013 - 11:49 am | अक्षया
अप्रतिम. उत्क्रुष्ट काव्यचित्र असेच म्हणेन..
30 Jan 2013 - 11:58 am | फिझा
नको असा अन्त ......