===================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
===================================================================
सहलीचा आठवा दिवस उजाडला. आज कालच्यापेक्षा जास्त सुंदर गोष्टी बघायच्या आहेत असे गाइडने म्हटले होते त्यांमुळे उत्सुकता बरीच ताणली गेली होती. त्यामुळे जरा लवकरच उठून अंघोळ व न्याहारी आटपून तयार होतो न होतो तोच गाइड हजर. इटिनेररीप्रमाणे आज लिजीयांगाची उरलेली दोन उपनगरे पाहायची होती... शुहे आणि बैशा.
शुहे हे लिजीयांगच्या एका टोकाला असल्याने पायपीट वाचविण्यासाठी प्रथम चारचाकीने गावाला वळसा घालून मग शुहे मध्ये पायी प्रवेश केला. जोपर्यंत गाडीत होतो तोपर्यंत एका खेड्यापेक्षा काही खास वेगळे दिसत नव्हते. पण थोडेसे अंतर पायी गेल्यावर गावात शिरणाऱ्या पुलाजवळ आलो आणि शुहे आपले रूपरंग उघडे करू लागले.
.
.
आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसे शुहे आपल्या सौंदर्याचा एकेक पदर उलगडून दाखवू लागले.
हे शुहेमधले रस्ते
.
.
.
.
या वरच्या दोन रस्त्यांच्या बाजूला जे भोकाभोकाचे खांब आहेत ते पूर्वी व्यापारी आपले घोडे बांधून ठेवायला वापरत असत. आता लोखंडी घोडे रस्त्यांच्या बाजूला उभे आहेत !
.
.
गावातला एक पूल
ही आहेत काही रेस्तराँची प्रवेशद्वारे
.
हमरस्त्याच्या बाजूचे एक रेस्तराँ
काही खाजगी घरे
.
.
एक छोटा मॉल
भाजीबाजार
अजून काही शब्दांच्या पकडीत न येणारे...
........................
.
.
परतीच्या रस्त्यात चीनमधला पहिला चिखलाने भरलेला रस्ता बघितला. फक्त ५० एक मीटर लांबीचा ! शिवाय गाडीत असल्याने निर्धास्त होतो.
काय गंमत आहे नाही कां? चीनमध्ये रस्त्यात चिखल दिसणे ही फोटो काढ्ण्याइतकी विशेष गोष्ट वाटली ! कारण अख्ख्या जुन्या लिजीयांगमध्ये रीपरीपणार्या पावसात दोन दिवस हिंडलो पण बुटांना अजिबात चिखल लागला नव्हता.
तेथून पुढे बैशा या लिजीयांगच्या तिसर्या उपनगरात गेलो. हे उपनगर प्राचीन काळी लिजीयांग प्रांताची राजधानी होते. तेथला एका वाडा त्यातील उमरावाने बनवून घेतलेल्या काहीशे वर्षे जुन्या भित्तिचित्रांमुळे प्रसिद्ध आहे. वाड्याचे प्रवेशद्वार व आवार छान होते पण काही काळापूर्वी लागलेल्या आगीत चित्रांचे बरेच नुकसान झाले आहे. शिवाय फ्लॅशने नुकसान होऊ नये म्हणून चित्रांचे फोटो काढण्यास मनाई होती.
पुढे एक छोटे खेडेगाव लागले.
ते नाशींच्या बाटिकासारख्या दिसणार्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. त्या कलेचे काही नमुने
........................
.
जरा पुढे गेल्यावर पूर्वीच्या काळी राजेरजवाड्यांसाठी रेशमाचे भरतकाम करणार्या एका खानदानी कुटुंबाला भेट दिली. अनेक अप्रतिम रेशमी भरतकामाचे नमुने पाहायला मिळाले. सगळ्या कलाकृती काचेच्या फ्रेममध्ये असल्याने दिव्यांची प्रतिबिंबे फोटोत आली आहेत त्याबद्दल दिलगीर आहे.
........................
.
हे भिंतभर मोठे असलेले भरतकाम सगळ्या कुटुंबाने मिळून एकूण सहा महिने खपून बनवले आहे.
ही पुढची कलाकृती एकदम मन मोहून गेली. सर्वसाधारणपणे मी फिरताना खरेदी करत नाही. पण हे भरतकाम पाहून मोह आवरला नाही.
हे आवारातले ऑर्किड कॅमेर्याला फार आवडले.
येथे लिजीयांगची गावाची सफर संपली आणि लिजीयांग जवळच्या दोंगबा नावाच्या दरीत एक खास "Impression Lijiang" नावाचा शो बघायला निघालो. जागतिक कीर्तीच्या Zhang Yimou या चिनी दिग्दर्शकाने याचे आयोजन केले आहे. झांगने The Flowers of War, House of Flying Daggers, Raise the Red Lantern, इत्यादी आंतरराष्ट्रीय सन्मानाने गौरवलेले चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या कार्यक्रमात लिजीयांगच्या १० वेगवेगळ्या जमातींतील ५०० पुरुष-स्त्रिया काम करतात आणि लिजीयांगच्या समाजजीवनाचे दर्शन घडवितात. या शोचे प्रचंड उघडे थिएटर (open air theater) दोगबा दरीत अश्या तर्हेने बांधले आहे की खुद्द जेड ड्रॅगन पर्वत याच्या मागच्या पडद्याचे काम करतो. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय या थिएटरच्या भव्यतेची कल्पना करणे कठीण आहे.
ही आहेत त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...
.
.
.
.
.
.
पुढचे आकर्षण होते Yunshanping on Jade Snow Mountain म्हणजे जेड पर्वतावरील स्प्रूस वृक्षांच्या जंगलामधील गवताचे मैदान (meadow). साधारणपणे ४५ मिनिटाच्या चारचाकी प्रवासानंतर आपण जेड स्नो पर्वताच्या पायथ्याशी पोहोचतो. तेथून केबल कार आपल्याला ३२४० मीटर उंचीवरील जंगलात नेते. तेथे धुके आणि तुरळक पावसामध्ये उंच स्प्रूस वृक्षांच्या जंगलात फिरत फिरत
आपण एकदम एका विस्तीर्ण गवताळ मैदानावर पोहोचतो.
हिरव्यागार मैदानावर चिमुकल्या पांढर्या-पिवळ्या फुलांचे शिंतोडे उडवलेले दिसत होते.
परतण्याचा विचार करत होतो तोच धो धो पावूस सुरू झाला त्यामुळे चालत परतण्याचा विचार सोडून सरळ सरकारी इलेक्ट्रिक बस पकडून आमच्या चारचाकीपर्यंत आलो आणि परतीच्या मार्गाला लागलो. वाटेत याक मंडळींचे दर्शन झाले.
आज रात्री Lishui Jinsha Singing & Dancing Show बघितला. हा लिजीयांगमधील नाशी व इतर जमातींच्या जीवनावर आणि त्याच्या लोककथांवर आधारीत संगीत व नृत्याचा फारच बहारदार कार्यक्रम होता. ही आहेत त्यातली काही क्षणचित्रे.
.
.
.
.
.
.
.
.
या पृथ्वीवरच्या नंदनवनातले दोन दिवस कसे भुरकन उडून गेले ते कळलेच नाही. उद्या निघायचे आहे खुद्द पृथ्वीवरचा स्वर्ग बघायला, तो आता अजून किती मनोहर असेल याचा विचार करताना केव्हा झोप आली ते कळलेच नाही.
(क्रमशः)
===================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
===================================================================
प्रतिक्रिया
23 Dec 2012 - 4:39 am | रेवती
इए, एका दिवसात काढलेली चित्रे अनेक उत्तम माहितीपूर्ण चित्रांपैकी काही आहेत. शुहे हे गाव अगदी गोड आहे. मागील गावात वाहने यायला परवानगी नव्हती पण इथे लोखंडी घोडे बरेच दिसले. इतकी लहान गावे असूनही (भलेही पर्यटनस्थळ म्हणून का असेना)स्वच्छता चांगली ठेवलीये.
भरतकामाचे नमूने सुरेख आहेत. रस्त्याकडेचे रेस्तरां क्यूट. खेडेगावातील बाजार आपल्याकडे असतो तसाच आहे. शेवटचे शो चे फोटो भारी आलेत. पुढील ठिकाणी काय काय पहायला मिळणार याची उत्सुकता आहे.
23 Dec 2012 - 10:56 am | डॉ सुहास म्हात्रे
या सहलीत खूप काही प्रेक्षणीय होते. २४ दिवसांत ५००० वर चित्रे काढली. बरीच 'बघणीय' आहेत. आता त्यातली इथे टाकायला निवडताना जरा कठीणच जातेय. पण प्रेक्षणिय स्थळांचे शक्यतो कमीतकमी चित्रांत जास्तीत जास्त दर्शन घडवण्याचा प्रयत्न करत आहे.
23 Dec 2012 - 11:09 am | समयांत
तिथे कधी जायला मिळो न मिळो तुमच्या मार्फत हे बघायला मिळते आहे. मिपा ची लिमिट बहुदा तुम्हांला सर्व बघणीय उतरावयाला अडवेल. पण असो, हे बघून तुम्हांला मनापासून धन्यवाद करावेसे वाटते. :)
23 Dec 2012 - 8:47 am | ५० फक्त
भरतकाम जबरदस्त, आणि यावेळी पुन्हा चारचाकी दिसल्या, एक ओळखता आली व्हिड्ब्लु जेट्टा. जर्मन रुल्स देअर टु.
23 Dec 2012 - 11:50 am | डॉ सुहास म्हात्रे
फोटोमध्ये दिसताहेत त्यापेक्षा अनेक पटीने सरस अशा त्या भरतकामाच्या कला़कृती होत्या. अगदी जवळ जाउन आणि निरखून पाहिल्यावरच हे फोटो नाहीत आणि भरतकाम आहे हे कळते ! चीनभर रेशीम आणि त्यासंबंधीत वस्तूंचा व्यापार बघायला मिळतो. पण बैशाची ही कलाकुसर फारच वरच्या दर्जची होती. माझ्यातर्फे नक्कीच १०००% गुण. ते घराणे सम्राट आणि इतर उमरावांच्या मर्जीतले होते आणि आजच्या पिढीतल्या काही जणांनी ही कला खूप कष्टाने जपणूक केली आहे... विशेषतः त्या घरातील एका ३० एक वर्षाच्या सुनेने केलेली सगळीच भरतकामे नजर लागावी इतकी कौशल्यपूर्ण होती.
गाड्यांचे काय हो, पैसा खुळखुळत असला की जगभरच्या कंपन्या आमची गाडी घ्या, आमची गाडी घ्या असे म्हणत तुमचा दरवाजा ठोठाऊ लागतात ! सर्व देशांच्या गाड्या चीनभर धावताहेत. आणि त्या उडवायला देशभर पाश्च्यात्त देशांना लाजवील असे मोटरवेजचे प्रचंड जाळे उभारलेले आहे.
23 Dec 2012 - 11:22 pm | बॅटमॅन
ते भरतकाम आणि तो ओपन एअर थेटरचा शो येक नंबर एक्कासाहेब.
(फटू पाहून अनेकहस्ते कमलावराने | घेता किती घेशिल दो कराने || अशी स्थिती झालेला कमेंटविमूढ) बॅटमॅन.
24 Dec 2012 - 1:17 am | डॉ सुहास म्हात्रे
*** (फटू पाहून अनेकहस्ते कमलावराने | घेता किती घेशिल दो कराने || अशी स्थिती झालेला कमेंटविमूढ) बॅटमॅन. ***
बाबौ ! अशा अप्रतिम प्रतिसादाबद्दल म्या पामराने काय लिहावे ? अशा प्रतिसादांमुळेच पुढचे भाग लिहायला लिखाणकामाबद्दल मुलुखाचा आळस असणार्या मला जोम येतो.
24 Dec 2012 - 12:12 am | दीपा माने
सर्वच मनोहारी आहे. चीनने ऑलिम्पिकसाठी बनविलेले स्टेडियमही कलापुर्णच होते. तुमच्या फोटोतील उघडया थिएटरचा सीन पाहुन श्री.बाबासो.च्या 'जाणता राजा'चे सुध्दा एवढे मोठे भव्य स्टेज केले तर कसे दिसेल ह्याचे मनातच चित्र पाहिले. रेशिम चित्रातले त्रिमितीयता दाखवताना वापरलेल्या रेशमाच्या वापरातुन चेहरा आणि मानेमधील वेगळेपणाची झाक तर अप्रतिमच! तुमच्या लेखानाबरोबरच तुमची फोटोग्राफी देखणी आहे. असेच प्रवास वर्णन चालु ठेवा.
24 Dec 2012 - 12:29 am | संजय क्षीरसागर
मान गये!
24 Dec 2012 - 11:49 am | नि३सोलपुरकर
वरिल भरतकाम,तुमचे लिखाणकाम सोबत "फोटो काम"(कमीतकमी चित्रांत जास्तीत जास्त दर्शन )....
उस्ताद मान गये आपकी पारखी नजर ओर ...........
24 Dec 2012 - 1:20 pm | चेतन माने
ह्या भागात तर निसर्गाच्या सौंदर्याचा कहर झाला आहे. स्वच्छता, रेखीवपणा आणखी वरून निसर्गाला कुठेही धक्का न पोहोचवता जपलेली खेडी आणि नगर खरच अप्रतिम आहे. मागे असं वाचनात आलं कि खेड्यांनी का आधुनिक होऊ नये? खेड्यांनी आधुनिक व्हा न पण असं व्हा!! पण आपल्याकडे slab ची घर आणि बंगले बांधण्यातच सगळ्यांना धन्यता वाटते आहे!!! जुनी कौलारू मंदिरे जीर्नोद्धाराच्या नावाखाली संगमरवरी दगडांनी बांधली जात आहेत (कोकणात) आन उरल्या-सुरल्या पारंपारिक गोष्टी सुद्धा गायब होत आहेत. म्हणे आधुनिकीकरण! असो तुमच्या पुढील भागाच्या प्रतीक्षेत असच आम्हाला अजून सुंदर-सुंदर दाखवा चीन मधून :)
24 Dec 2012 - 2:55 pm | बायडी
सगळे लेख वाचून शेवटी प्रतिसाद द्यावा असा विचार केला होता पण आता म्हटलं बास झालं एवढ्या सुंदर आणि अप्रतिम फोटोंची आणि लिखाणाची वाहवा तर केलीच पाहिजे...
सगळे भाग एकसो बढकर एक आहेत. धन्यवाद आम्हालाही ड्रॅगनच्या देशाची सफर घडवल्याबद्द्ल..
24 Dec 2012 - 3:06 pm | मृत्युन्जय
फटु आंणि लेख दोन्ही आवडले.
24 Dec 2012 - 3:23 pm | स्मिता.
या भागातले सगळेच फोटो अगदी सुरेख आहेत. शुहे तर खूपच सुंदर आहे. भरतकामाच्या फोटोंबद्दल तर काय बोलावं?
शेवटचं वाक्य वाचून आता पुढच्या भागाची उत्सुकता वाटतेय.
24 Dec 2012 - 4:05 pm | रणजित चितळे
व त्याहून सुंदर फोटो.
24 Dec 2012 - 4:14 pm | ह भ प
बस्स.. बाकी शब्दच नाहीत..
24 Dec 2012 - 4:51 pm | सूड
भरतकामाचे नमुने प्रचंड आवडले.