देवाजवळ जाताना
'मी'पणा सोडावा म्हणतात
तसाच गेलोही. पण !
मला भेटला मुर्तिमंत अहंकार
मुर्तिजवळ असण्याचा.
मोठ्या कष्टाने मन सावरले
प्रकटणाय्रा 'मी'पणाला आवरले
मनोमन खात्री पटली
तीव्रतर खंतही वाटली
त्या गाभाय्रात देवच नव्हता !
होता फक्त एक --
अहंकार
आध्यात्मिकतेचा बुरखा पांघरलेला
देवालाही
आपल्या प्रदर्शनीय पुजेत डांबणारा
आपल्याच श्रेष्ठत्वात रमणारा
तो आणि त्याचा 'मी'!!!!!!!
काळा पहाड
प्रतिक्रिया
26 Jun 2008 - 8:58 pm | चतुरंग
विचारांचा वेगळेपणा दाखवणारी कविता! :)
चतुरंग
26 Jun 2008 - 9:23 pm | वरदा
देवालाही
आपल्या प्रदर्शनीय पुजेत डांबणारा
आपल्याच श्रेष्ठत्वात रमणारा
तो आणि त्याचा 'मी'!!!!!!!
ह्या ओळी खूपच आवडल्या!
28 Jun 2008 - 8:39 am | विसोबा खेचर
है स्साला!
लै भारी कविता...
सिद्धीविनायकाच्या दर्शनाची जाहीरातबाजी करत जाणारे बच्चन कुटुंबिय आठवले! :)
तात्या.