ते -२

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
24 Sep 2012 - 10:55 pm

भाग १ http://www.misalpav.com/content/%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A7

पीसी उघडला. DVD तले फोटो ओपन केले .. सुरुवातीला . समुद्राचे.. टेकड्यांचे, शेतांचे, फोटो होते. सुंदरच साईट आहे ..
सातव्या फोटोत ती गढी दिसली आणि मी हादरलोच .. पुढचे सगळे फोटो मी अधाश्यासारखे पहिले ..
माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .. हो तीच ती गढी..जळलेली. भेसूर. विद्रूप..

गेल्या २५ वर्षांपासून जे अगम्य कोडं स्वतःशी बाळगून होतो .. ते आज अनपेक्षित पणे माझ्या समोर आलेल होतं

***********************************

अचानक स्वतःवरचा ताबा सुटतोय की काय अस वाटायला लागलं, गरगरायला लागलं , पीसी बंद केला . ऑफिस मध्ये बसणे शक्यच नव्हते , कसाबसा हातातल्या कामाचा मेल केला आणि रिप्लाय ची वाट न बघताच निघालो .. बाईक ला किक मारली आणि सुटलो.. घरी येईपर्यंत डोक चांगलंच दुखायला लागलेलं होत बऱ्याच महिन्यांनी हा त्रास झाल्यासारखा वाटतोय , लहानपणापासून हा डोकेदुखीचा झटका मध्ये मध्ये येतो , डॉक्टरी इलाज मनाच्या समाधानाकरता , औषध घेतली किंवा नाही घेतली काही फरक पडत नाही , ४ दिवस डोकं दुखत राहतच.. आणि त्याच दरम्यान ती ... ती भयानक स्वप्न पडायला सुरुवात होते .
ठरावीक साचा. ठराविक गती, ठराविक दृश्य, आणि ठराविक पात्र .. जसा आपण एखादा चित्रपट वारंवार पाहतो , आपल्याला पुढे काय होणार हे माहितच असतं पण इथे पुढे काय होणार हे माहीत असूनही प्रत्येक वेळी अनुभव मात्र तितकाच ताजा, भयाण , रक्त गोठविणारा आणि खरा .. लहानपणापासूनच मला विचित्र स्वप्न पडायची . तेंव्हा फक्त मी रडत ओरडत उठायचो . हळू हळू मोठा झाल्यावर.. काही काही तुकडे लक्षात राहायला लागले . कधी ताऱ्यांनी खच्चून बहरलेले आभाळ दिसायचं , किंवा एक जुनाट प्रयोगशाळा . एका उंच उंच इमारतीत प्रचंड उपकरणे .. नंतर नंतर या स्वप्नांची जागा.. भयानक स्वप्नांनी घेतली.. विचित्र.. अंधाऱ्या जागा .. कोणीतरी सतत पाठलाग करताय अस जाणवायचं .. गुलाबी सर प्रकाशाच्या छोट्या छोट्या खोल्या. मोठे मोठे काचेचे संच. त्यात कसली कसली उकळणारी भयानक द्रव्य. आणि भयानक आकार असलेले प्राणी, विचित्र आकाराच्या चमकणाऱ्या नक्ष्या , भिंतींवर वाढलेलं विचित्र शेवाळ . . एका खोलीत. तर ओळीने उलटी टांगून ठेवलेली मानवी शरीर दिसलेली होती ..नंतर नंतर आजूबाजूचा प्रदेश दिसायला लागला. एक उंच टेकडी .. त्यामागे उधाण आलेला समुद्र . एक जुनाट उंच इमारत .. आजूबाजूची भयाण वाढलेली विचित्र आकाराची झाड .. केशरी रंगाच भेसूर चंद्रबिंब .. स्वप्नांची मालिका सुरु झाली कि संपता संपायची नाही... कधीतरी मग परत नॉर्मल आयुष्य सुरु व्हायचं .. मी तर हल्ली त्याकडे दुर्लक्षच करायला शिकलो होतो . मी नुसता एक प्रेक्षक म्हणून ते बघत बसायचो .. पण ते दबा धरून बसलेले विकृत अमानवीय आकार दिसले , त्या गढीभर वावरत असलेल्या सावल्या दिसल्या कि जिवाचा थरकाप उडायचा.. रात्र रात्र जागून काढायचो.
घरी येऊन बराच वेळ झालाय .. साधा दिवा देखील लावलेला नाही खोली अंधारात बुडून गेलीय.. फोन वाजायला लागला .. "शिरीष "! हा बोल रे ... कुठेस तू? मी घरी आलोय .. हो लवकर आलो. न्यूज तुला कळली तर .. ठीक ये तू .. जेवण आज घरीच करतो मी काहीतरी . बाहेरून नको मला थोडं बर वाटत नाहीये . शिरीष ला ऑफिस मधून सर्व प्रकार कळलेला होता , आता येईलच तो . मी शिरीष आणि अन्ना म्हणजेच मुरली आम्ही तीघ मुंबईत इथे खोली घेऊन राहतो . माझे आई बाबा कोल्हापूरला असतात . मुरली केरळातून इकडे आलाय , पण तो सतत टूर वरच असतो . आणि शिरीष . माझा सर्वात जवळचा मित्र .. आई- बापाविना वाढलेला पोर .. काकाने छळ करायला सुरुवात केली म्हणून पट्ट्या दहावी झाल्यानंतर पळून मुंबईला आला , पडेल ते काम केलं.. पण शिक्षण मात्र उत्तम घेतलं. पुस्तकाबाहेरच शिक्षण जास्त घेतलेलं असल्याने असेल कदाचित पण तो माझ्यासारखा भित्रट नाही .. मी प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी दहादा विचार करणारा तोपर्यंत ती गोष्ट करून तो परत येणारा .. एका वेळी २ -२ साईट सुद्धा तो सहज सांभाळतो. कशा काय देवच जाणे.. पण तो माझ्याबरोबर येणारे हेच माझा धीर वाढवणार आहे . हा प्रवास नक्कीच साधा नसणार .. नक्की माझ्या भूतकाळाच कोड उलगडणार होत.. माझं अंतर्मन मला सतत याची आठवण करून देत होतं.
११ वाजता शिरीष आला ..जेवता जेवता नेहमी प्रमाणे तो काय काय गप्पा मारत. साईट च्या लोकांना शिव्या घालत बडबडायला लागला, पण माझं कशातच लक्ष नव्हत त्यालाही ते जाणवलं असावं.. त्याने विचारल "काय झालाय बे पश्या .. असा गप्प का आज.. " तनयाला बघायला मिळणार नाही म्हणून पिचलास का रे लेका.. भेंडी तुझ्या जागी असतो तर १० वेळा विचारून मोकळा झालो असतो बघ.. साले तुम्ही गांडू ते गांडूच .. लेका हातची पोरगी जाईल.. विचारून मोकळा हो .. ती पण साली फिदा है रे तुझ्यावर,
" गप्पे शिर्या ... काहीतरी बडबडून नकोस.. माझं डोकच सटकलं.. चायला इथे विषय काय ..तू बडबडतो काय आहेस.. तुझं फाटक तोंड जरा बंद कर ., आणि मी काय सांगतो ते ऐक . प्रकरण विचित्र आहे खूप.. तुला आज कळलच असेल. आरेकरांच्या साईट बद्दल .. लोचा आहे लेका .. "साईट च नाव ऐकल्यावर शिरीष .. जरा सावरून बसला" . मी त्याला सुरुवातीला YZ आणि माझ्यात काय बोलणं झालं ते सांगितलं .. त्यानंतर मग हळू हळू त्याला माझ्या स्वप्नांबद्दल आणि त्या गढी बद्दल सांगितलं. हे ऐकून तो पण जरासा सावरून बसला.. २ सिगरेट प्यायल्यावर त्याने तोंड उघडलं.. "अस खरच झालंय का बे.. ".. हो शिरीष .. अरे गेली २५ वर्ष हा त्रास सहन करतोय मी .. तो प्रदेश मला आता मी तिथेच राहतो कि काय.. अस वाटण्या इतका परिचित झालाय . अरे यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मला माहितेय ,, पण तिथे नक्की काहीतरी घडतेय.. आणि त्याचा संबंध माझ्याशी आहे .. मी त्याला ते फोटो दाखवले. .आणि त्याच्या आसपास काय असू शकेल तेही सांगितले .. तो पक्का चक्रावून गेलेला होतां.. अचानक तो परत नॉर्मल मूड वर आला पशा आपल्याला जायचं आहे हे नक्की.. काम तो करनाही पडेगा.. पण यावेळी काहीतरी adventurous घडणार हे नक्की .. कधी निघायचं ते बोल.. मी असताना तू काहीच टेन्शन घेऊ नकोस.. इथेच चर्चा थांबवून.. मी झोपायला गेलो . शिरीष उगाच खिडकीत उभा राहून धूर सोडत बसला ..
दुसरा दिवसही तसाच गेला .. तिसऱ्या दिवशी. आम्ही YZ ची कार घेऊन निघालो , सकाळी १० च्या दरम्यान निघालो.. अंतर जवळ जवळ ३५० - ४०० किलोमीटर होत. आम्ही जवळ आमचे कपडे . laptop , क्यामेरा , काही रीडिंग मशीन , पेपर , खायचे सुखे पदार्थ . . सोबत शिरीष चा लाडका लांब असा एक स्विस नाईफ . दोन आर्मी टॉर्च अस बरंच काय काय घेतलेलं होत.... दुपारी जेवणाचा एक ब्रेक वगळता आम्ही कुठेच थांबलो नाही . साधारण ४ पर्यंत पोचू असा अंदाज होता .. पाऊस मध्ये मध्ये लागत होता.. पण मधेच YZ च्या गाडीने विचका केला.. पुढचा एक टायर पंक्चर झाला . तो बदलण्यात वेळ गेला. काही अंतर गेल्यावर पुन्हा अचानक आचके देत त्याची जुनाट इंडिका बंद पडली .. आता शिरीष ला सुद्धा काय करावे ते कळत नव्हते.. चांगलंच अंधारून आलेलं होत तालुक्याचं ठिकाण जवळ जवळ १५ - २० किलोमीटर वर होत .. आणि तिथून अजून २० किलोमीटर वर मुक्काम पोस्ट "पोळ" .. बरंच वेळ त्याने काहीतरी खटपट केली आणि गाडी सुरु झाली ..
तालुक्याला पोचेपर्यंत ८ वाजून गेलेले होते ..सर्वकडे अंधार पसरलेला होता. बाजारात तुरळक गर्दी होती . दुकानात दिवटी पेटलेली होती, त्याच्या मिणमिणत्या प्रकाशात हळू हळू दिवसभराचे व्यवहार बंद व्हायला आलेले होते .. आम्हाला प्रचंड भूक लागलेली होती .. आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि अचानक प्रचंड गलका झाला.. बरीच लोक सामानासकट पळायला लागली. आम्ही जरा बावरलोच . . एक माणूस बाजूला उभ राहून आमच्याकडे पाहत होता, आम्ही त्याच्याकडे बघतच तोच म्हणाला .. 'पावण्यांनु, घाबरतां कित्यां ?ही शेवटच्या गाडीसाटी गडबड चल्लीहां.' " तो बोलल्याप्रमाणेच ५ मिनिटात कुठूनशी एक चिखलाने भरलेली बस चिखलातून कशीबशी आली.. त्याच्या मागोमाग दुसरी अजून एक बस आली. बहुतेक ह्या आधीच्या असाव्यात.. उशीर झाल्याने एकाचवेळी आल्या असाव्यात. सर्व गलका त्या बस मध्ये स्थिरावल्यावर पंधरा मिनिटात दोन्ही बस पेकाट मोडलेल्या म्हाताऱ्यागत खुडखुडत अंधार्या रस्त्यात दिसेनाश्या झाल्या..
आता अचानक तो नाका सुमसान वाटायला लागला. एक खानावळ उघडी होती.. आम्ही जाऊन त्यात बसलो .. आणि बाहेर पावसाने जोर धरला .. जे काय समोर आलं त्यावर तुटून पडलो. आता अजून गाव गाठायचं आहे हे डोक्यात होतंच.. एका पानवाल्याला बाहेर पत्ता विचारला.. तो म्हणाला साहेब उद्या सकाळीच जा.. आता रस्ता तुम्हाला सापडणार नाही .. मधेच कुठे चकवा लागला तर शोधत बसाल.. रस्ता अतिशय वाईट आहे .. त्यात आता पाऊस लागलाय. आम्हाला तशीही घाई नव्हतीच .. उगा हिंदी चित्रपटातल्या हिरो सारख.. अंधारातून मिरवत जाण्याची अजिबात हौस नवती.. शिवाय दोघेही तसे दमलेलो होतो .. शिवाय त्या गावात आम्हाला ओळखणार कोणीही नव्हत, त्यामुळे इतक्या रात्री तिकडे जाऊन तसाही आमचा काहीच उपयोग नव्हता.. ११ वाजले तसे उरलेली दुकानही बंद झाली.. आम्ही हॉटेल वगरे काही आहे का याची चौकशी केली .पण काहीच सोय झाली नाही .. शेवटी बस स्थानक नामक प्रकार तिकडे दिसला .. जेमतेम २ चार बाकडी होती. YZ ला शिव्या घालत भिकार्यागत तिकडेच आडवे झालो.
"साला पश्या पै न पै वसूल करणारे मी .. साला साईट वर जातो.. काय ऐश असते . एक से एक हॉटेल मध्ये राहिलेलो आहे मी.. आणि हे काय .. मच्छर जीव घेतील साले" शिरीष पक्का कावलेला होता.. पण पर्याय नव्हता.. अशी गैरसोय होणार याची आधीच कल्पना मिळालेली होती.. आणि त्याची भरपाई YZ देणार होता. शिवाय माझी चिंता वेगळीच होती..
कधीतरी डोळा लागला.. तेवढ्यात एक माणूस प्रचंड वेगाने धावत जाताना दिसला .. मला कळेनाच हा असा का पळतोय .. मी शिरीष ला हाक मारायला बाजूला पाहिलं..
आणि आणि देवा रे .. बाजूला कोणीच नव्हत.. आजूबाजूला रान माजलेलं होतं. तोंडात माती गेलीये .. समोर तीच ती भयाण गढी . शिरीष कुठे गेला? ते बस स्थानक ? ते गाव ? काहीच कळेनासं झालेलं .. मी त्या माणसामागे पळतोय.. आता मला मला पर्यायच नाहीये .. कोणीतरी वाईट पाठलागावर सुटलेलं आहे .. मी एका टेकाडावर चढलोय ... मी काय करतोय मला कळत नाहीये.. तो माणूस आता समोरच बसकण मारून रडतोय .. भयानक पाऊस सुद्धा पडतोय.. त्याला जाऊन विचारू का.. मदतीसाठी त्याला हाक मारावीच लागेल.. पण तोच कुठल्यातरी संकटात सापडलेला आहे.. परमेश्वरा कुठे अडकलोय मी.. मी तसाच चालत पुढे गेलो. तो तसाच बसून होता.. माझं समोर लक्ष गेलं.. भयानक समुद्र लाटांच तांडव करत गर्जत होता . मी त्याला हलवलं.. " अहो प्लीज मला मदत करा .. माझा मित्र दिसेनासा झालाय .. मी कुठेय मला माहिती नाही.. मला प्लीज वाचवा.. ".. पण त्याला मी काय बोलतोय ते ऐकू येत नाहीये.. तो चालू लागलाय टोकाला .. अहो थांबा.. मी मागे धावतोय . विजांचा कडकडाट काही थांबत नाहीये .. अरे हा कुठे जातोय ? समोर काहीच नाहीये .. मी ओरडून माझा आवाज त्याच्या पर्यंत पोचत नाहीये.. अचानक वीज चमकली आणि त्याच वेळी त्याने मागे पहिले ... माझ्या तोंडातून किंकाळीच बाहेर पडली .. त्या समोरच्या माणसाचा चेहरा.. तो चेहरा माझाच होता..
तो मीच होतो??? ... दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःला समोरच्या उधाणलेल्या समुद्रात झोकून दिलं... मी हादरून बघण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हतो

क्रमश :

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मी_आहे_ना's picture

24 Sep 2012 - 11:25 pm | मी_आहे_ना

रात्री उशिरा भाग दिसला, पहिली ओळ वाचावी म्हणलं आणि अधाश्यासारखा वाचून झाला हा भाग...स्पावड्या...उत्कंठा वाढलीये, येऊदे पुढचा भाग लवकर

प्रास's picture

24 Sep 2012 - 11:30 pm | प्रास

आत्ता पर्यंत सगळं अपेक्षित मार्गाने सुरू आहे.
चालू द्या स्पाशेठ!
बाय द वे, अडीच फुटी स्वीस नैफ? काय सांगता काय? म्हंजे स्वीस तलवार कै च्या कैच लांबलचक असणार नै?

किसन शिंदे's picture

24 Sep 2012 - 11:40 pm | किसन शिंदे

काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाहिये.

सूड's picture

25 Sep 2012 - 12:06 am | सूड

भाग आवडला.

' शेवटची एसटी "येतीया".'>> कोकणातल्या माणसाच्या तोंडी ही घाटवळणाची भाषा थोडी खटकली.

स्पा's picture

25 Sep 2012 - 10:28 am | स्पा

प्रास , सूड धन्यवाद.. बदल केले आहेत

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2012 - 1:14 am | प्रभाकर पेठकर

पुनर्जन्माचा आभास आहे. भितीदायक आहेच पण त्या भितीच्या वर्णनाचा अतिरेक झाला तर भिती उरणार नाही आणि कथेचा कणा मोडेल अशी वेगळीच भिती वाटते आहे. सगळंच भितीदायक.

+१००, जत्रेतल्या हाँटेड हाउस मध्ये किंवा रामसेच्या पिक्चरला गेल्यासारखं वाटतंय, पुढं काय असेल याची उत्सुकता कमी झाली आहे, अर्थात ती तशी असावीच अशी सक्ती नाही पण, एक्झॅक्ट सांगु का हल्ली सचिन तेंडुलकर खेळतात ना, कोणताही बॉल स्टंपात घुसेल याची खात्री देत तसं वाटतंय, मा. स्पाजी तुम्ही तुमच्या लेखनाचा पातळी फार उंचावलेली आहे आता ती सोडुन खाली उतरणे शोभत नाही तुम्हाला.

अवांतर - काही वाक्यातुन प्रत्यक्ष अनुभव मात्र जाणवला, आवश्यक व उपयुक्त प्रगतीसाठी अनंत शुभेच्छा.

लिखाणात ओढून ताणून भीती दाखवण्याचा प्रयत्न होत नाहीये ना, याची काळजी घेतल्या जाईल
प्रतिक्रियेबद्दल हाभार :)

५० फक्त's picture

25 Sep 2012 - 11:23 am | ५० फक्त

ओढुन ताणुन नाही हो, पण भितीमध्ये तोच तोच पण जाणवतोय, लिहिलेलं डोळ्यासमोर येउन त्याची भिती वाटणं वेगळं अन वाचल्या वाचल्या मणक्याच्या खालच्या टोकाला बर्फ लावल्यासारखं वाट्णं वेगळं, ते तुमचं हर्षद बोरकरचं प्रकरण होतं ना ते तसं होतं बर्फवालं.

वाचकांच्या सुचनांची योग्य ती दखल घेण्याचं दाक्षिण्य पाहुन भारावलो रे स्पांडू.
लगे रहो बेटा.. आम्ही वाचतोय. :)

अवांतर : माताय सकाळ पासुन तिसर्‍यांदा हा धागा उघडुन प्रतिसाद द्यायला पहातोय. दर वेळी मिपा गंडत.
सगळच गुढ अगम्य भितीदायक. ;)

औत्कंठ्य आणि औत्सुक्य जाम वाढले आहे. हे डिझाईनदेखील उत्तम जमलंय बरं का स्पांडुरंगा :)

शिल्पा ब's picture

25 Sep 2012 - 1:47 am | शिल्पा ब

तु आधी ही कथा अजुन कुठे प्रकाशित केली होतीस का? हा भाग वाचल्यासारखा वाटतोय. खास करुन शेवट.

नाही ग.. याआधी कुठेही हि कथा पूर्वप्रकाशित झालेली नाही
कुठलीही कथा मी आधी मिपावर प्रकाशित करतो..
कदाचित तू वाचलेल्या कथेचा प्लॉट सेम असेल..

झिणझिण्या आल्या वाचताना. जरा जपुन लिही बर स्पाउ. आम्ही पुढचे भाग वाचायला शिल्लक राहिलो पाहिजे ना?

sagarpdy's picture

25 Sep 2012 - 10:09 am | sagarpdy

वाचतोय.

सुहास..'s picture

25 Sep 2012 - 11:13 am | सुहास..

मायला ! मस्त झोडतोयस रे !! एकदम तडाक-फडाक !!!

( फुकटाचा सल्ला : कोणी ही काही ही म्हणो , तुझी नैसर्गिक शैली सोडु नकोस :) )

सौरभ उप्स's picture

25 Sep 2012 - 11:17 am | सौरभ उप्स

मस्त रे, उत्कंठा वाढलीये जाम पुढे काय होणार याची...
थरारक कथा लिहिताना एक गोष्ट महत्वाची असते कि वाक्यरचना, शब्दांकन आणि सिक्वेन्स असा असावा कि वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर अख्ख चलचित्र उमटत राहील पाहिजे प्रत्येक ओळ वाचताना आणि ती कमाल तुला चांगलीच जमायला लागली आहे...
कीप इट अप...

"" मी त्या माणसामागे पळतोय.. आता मला मला पर्यायच नाहीये .. कोणीतरी वाईट पाठलागावर सुटलेलं आहे .. मी एका टेकाडावर चढलोय "" हा प्रकार काही कळला नाही राव, तू त्याच्या मागावर लागलायस अस म्हणतोस एका क्षणी आणि लगेच दुसर्या क्षणी तुझ्या मागावर कोणीतरी लागलंय असही म्हणतोयस नक्की काय?

प्रचेतस's picture

25 Sep 2012 - 11:37 am | प्रचेतस

यालाच गूढकथा असे म्हणतात.

मृत्युन्जय's picture

25 Sep 2012 - 12:49 pm | मृत्युन्जय

शक्यता अशी आहे की एकाचक्षणी तो स्वतःला त्या माणसाच्या नजरेतुनही पहात आहे आणि स्वतःच्या नजरेतुनही. त्या दोघांमध्ये काही गूढ कनेक्शन आहे की ज्यामुळे तो आणि पश्या म्हणजे एका अत्म्याने जोडले गेलेले २ जीव आहेत.

हे म्हणजे आपला एक गेस फक्त

सौरभ उप्स's picture

25 Sep 2012 - 12:11 pm | सौरभ उप्स

खी खी खी... खर्रे?

पैसा's picture

25 Sep 2012 - 1:58 pm | पैसा

रात्री वाचलं नाही ते!

मोहनराव's picture

25 Sep 2012 - 2:35 pm | मोहनराव

मस्त चालु आहे भयकथा..
पण गाडीत झोपायचा सोडून बस स्थानकवर का झोपायला गेले बर, मच्छरांशी दोस्ती करायला?

पियुशा's picture

25 Sep 2012 - 4:07 pm | पियुशा

छान वाचतेय , पु,भा.प्र :)

सानिकास्वप्निल's picture

26 Sep 2012 - 12:42 am | सानिकास्वप्निल

भिती वाटली :(
उत्कंठा वाढलीये... पुढचा भाग लवकर येऊ द्या

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2012 - 1:55 am | श्रीरंग_जोशी

दोन्ही भागांत मिळून भन्नाट वातावरणनिर्मिती झालेली आहे.
आता पुढे काय होणार याची जबरदस्त उत्कंठा वाटत आहे.

ज्ञानराम's picture

26 Sep 2012 - 9:42 am | ज्ञानराम

एकदम थरारक... वाचतेय.. पुढचा भाग लवकर टाका..

अन्या दातार's picture

26 Sep 2012 - 10:00 am | अन्या दातार

झक्कास जमून आली आहे.

>>खायचे सुखे पदार्थ
कॉलिंग सूड! कॉलिंग सूड!

गप्प बसायचे ठरविले आहे. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Sep 2012 - 12:35 pm | परिकथेतील राजकुमार

रंगत वाढत चालली आहे...

वपाडाव's picture

27 Sep 2012 - 2:04 pm | वपाडाव

हेच म्हणतो मी पण...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Sep 2012 - 11:46 pm | निनाद मुक्काम प...

येऊ दे पुढचा भाग

मन१'s picture

29 Sep 2012 - 10:04 am | मन१

वाचतोय.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Sep 2012 - 10:10 pm | अत्रुप्त आत्मा

स्पांडोबा... रोक्सिंग ऑन..........! जबर्‍याट फटकेबाजी चालू हाय रे पांडोबा...! हान कना कना...! :-)

शैलेन्द्र's picture

30 Sep 2012 - 10:35 pm | शैलेन्द्र

त्या गाडीत मांजर नेलीत का? नसतील तर घ्या बसवुन..

स्पांडु बेटा, लौकर येउंदेत पुढचा भाग...

सस्नेह's picture

25 Oct 2012 - 2:52 pm | सस्नेह

'ते-३' कुठे अडकले आहे ?

शैलेन्द्र's picture

25 Oct 2012 - 11:11 pm | शैलेन्द्र

त्या निळसर पिवळसर ज्योतीवर सध्या चहाच आधन ठेवलेल असतयं, संगणक उघडला की समुद्र, टेकड्या वगैरे सगळ पार्श्वभुमीवर असत, मेन छायाचित्र वेगळ्याच गोष्टीचे असते. गढीच्याऐवजी टॉवर दीसतो..

चालायचच..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Oct 2012 - 11:53 pm | निनाद मुक्काम प...

स्पा ला त्याच्या ऑफिस मध्ये त्याचा बॉस बहुदा प्रचंड काम देत असावा ,म्हणून
त्याला पुढील भाग लिहायला वेळ मिळत नसावा.
त्या बॉस ला स्पा च्या कथा वाचायला दिल्या तर तोच स्पा ला पुढचा भाग कधी टाकतोय म्हणून मागे लागेल.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत

जडभरत's picture

2 Jul 2015 - 5:40 pm | जडभरत

स्पा राजे, आपण जाम खुश तुमच्या लिखाणावर!
काय सुंदर वातावरण निर्मिती केलेली आहे.
जबर्‍याच! एखादी स्कॉच कशी हळूहळू चढते तशी तुमची कथा आता पकड घेऊ लागली आहे.

पाटील हो's picture

3 Jul 2015 - 10:38 am | पाटील हो

पुढचा भाग लवकर टाका.

काव्यान्जलि's picture

3 Jul 2015 - 12:52 pm | काव्यान्जलि

पूर्वी मायबोली वर (माझ्या माहिती प्रमाणे मिपा वर पण ) "ते" ची मालिका प्रकाशित झाली होती. पण ती अर्धवटच होती.
माझ्या माहिती प्रमाणे ७-८ भाग प्रकाशित झाले होते त्याचे. ती आणि हि मालिका मला बरीच सारखी वाटत आहे.
ती पण तुम्हीच लिहिली होती का?

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2015 - 1:26 pm | अत्रुप्त आत्मा

असेल बहुतेक! हो ना रे पांडु!? ;-)

प्रसन्न अपटे'च्या भय कथांचा फ्यान:- आत्मु अ भयंकर. ;-)

काव्यान्जलि's picture

3 Jul 2015 - 2:04 pm | काव्यान्जलि

तसं असेल तर या वेळेस अर्धवट सोडू नका.. :)