( मित्रं...)

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
6 Jul 2012 - 2:54 pm

नमस्कार मंडळी,

ही आमची प्रेरणा म्हणा किंवा मनातल्या एका कप्प्याला लागलेला धक्का. गविंचे आभार. :) समजून घ्याल अशी मिपाकरांकडून अपेक्षा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

मी लहानपणापासून राजीखुषीने, विशेषतः आईबापांच्या राजीखुषीने आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता मैत्री करत आलो आहे. मित्रांच्या खांद्यावर हात ठेवून मी लहानपणी हिंडायचो. आम्ही एकमेकाशी कानात गुलुगुलु बोलत असायचो.. पण असं जास्त वेळ करता यायचं नाही. बोलता बोलता मित्रं हळूहळू गुदगुल्या करायचे..मग मी त्यांच्या चड्ड्या खाली ओढुन पळायचो.

मित्रांना मी आईच्या हातचे जेवण घेऊन जायचो. डबा दिसला की जिथ्थे कुठे मित्रं असतील तिथुन ती पळत येऊन हर्षवायूने डबा खेचायची.

काहीच मित्र खरे मित्र व्हायचे, बाकी सर्व एकजात स्वार्थी आणि स्वार्थ साधणारे.. शिवाय काम झालं की 'तु कोण मी' कोण म्हणून चालते होणारे..इन जनरल स्वार्थी मित्रं नालायक.. त्यांच्याविषयी याहून जास्त लिहायची त्यांची लायकी नाही.

म्हणून मग कमीने/हरामखोर मित्रं..

पण मित्रांमधेही भरपूर दुर्गुण असतात.. कदाचित स्वार्थी मित्रांपेक्षा जास्त..

कितीही चांगला मित्र असला तरी तो तुम्हाला जळवतोच, काहीबाही बोलतोपण. त्यासाठी त्याला वाट्टेल तसं बोललं तरी तो लोचटासारखा पुन्हा तुम्हाला फोन करतोच.

त्यांच्या वाईट सवयी मोडताना त्यांना वधस्तंभाकडे नेत असल्यासारखी त्यांची धडपड असते. वीट येईपर्यंत उलटे उपदेश करत राहतात. त्यांना जवळजवळ फरपटतच सुधारणेकडे न्यावं लागतं. त्यांच्याशी कितीही मारामारी (शाब्दिक किंवा प्रत्यक्ष) झाली तरी ते आपल्यावर प्रेमाचे तुषारच आपल्या बेसावध मनावर उडवतात. मारामारीनंतर मात्र कधी कधी अबोला धरतात. अबोला सोडल्यानंतर मित्राला भेटण्याच सुख इतकं का असतं ते परमेश्वरालाच विचारावं लागेल.

आश्चर्य, दगेबाजी, टल्ली होऊन कॉलेज बुडवणे,नापासाचा शिक्का,पोरींचे लफडे, पैशांची तंगी इत्यादिंच्या कचाट्यात न सापडलेल्या लोकांनी एकदा खर्‍या मित्रांबरोबर रुम शेअर केली तर एखाददोन वर्षांत ते वरीलपैकी एका पीडेने बाधित झालेच पाहिजेत. आपण इमानदारीत कॉलेजला नेत असतानाही तेवढ्यात जीव खाऊन बंक मारण्याच्या ईच्छेचं कारण समजण्यासाठी मित्राचाच जन्मच घ्यावा लागेल.. ही वेडी खेच कमी पडली तर आपल्या या मित्रांना आसपास कुठेतरी एखादी झकास पोरगी, बार दिसावा..बस्स..मग पैसे संपो वा गाडी खराब होवो.. शिवाय आपल्याही खिशाला भोकं पडलीच पाहिजे..

शिवाय हे मित्रं तुमच्या वाढदिवसाच्या पार्टीला दणादणा खातात आणि ढसाढसा पितात. दिवसभरात पाचसहा वडापाव/चहाच्या टपर्‍या, २-४ खंबे, जेवण असं भदाडभर खाद्य खिशातून पैसे खर्च करुन त्यांना घालावं लागतं. इतर कोणाच्या जिवावर विसंबून रहाता येत नाही. त्याचा बकासुरी आहार पाहून दोन दिवसात तुम्हाला घरुन पुन्हा पैसे मागवावे लागतात. शिवाय या हरामखोर मित्रांना जना-मनाची जराही लाज नसते. पैसे संपेपर्यंत हे हाटेलात खाऊन पिऊन मस्त पडतात. ढसाढसा प्यायल्यावर हे जितकं ओकतात त्यावर काही न बोललेलेच बरे. नंतर आपण मित्राची रुम खराब केलीये आणि त्याच्या खिशाला मोठ्ठं भोक पाडलयं याचं त्यांना भान नसतं..

काही अबोल मित्रं असेच राहतात आणि आपण बोलल्याशिवाय बोलत नाहीत. त्यामुळे तुमच्याबद्दल कितीही वाटले तरी ते मनात कुढतात पण कधी बोलत नाहीत. हरवतात. एकटे पडून खंगतात, मग आपल्याला त्यांना जबरदस्ती भेटावे लागते.

मित्रं भेटायला आलेला दिसला तर प्यायल्यावरच या मित्रांना प्रेमाचं महाप्रचंड भरतं येऊन 'तु तो मेरा यार है यार' असं म्हणत ढसाढसा रडतात. मित्रं कसाही असला तरी मैत्रीच्या प्रेमापुढे आपण नतमस्तक होतोच, पण मित्राचा तुम्हाला दुखावण्याचा उद्देश नसतो. या अवस्थेत आपण काय करावं हे समजत नाहीच. मित्राचा तुमच्या पाठीवरचा हात तुमचे मन एका मिनिटात प्रेमाने चिंब करु शकतो.

मित्रं हे जीवाला जीव देणारे असतात. यासाठी एक साधा प्रयोग करुन खात्री करता येईल. स्वत:च्या मित्राला महत्वाचं बोलायचं आहे म्हणून फोनवा. तो नक्कीच तातडीने सगळी कामे सोडून तुम्ही जिथे असाल तिथे येईल. मग त्याला हसून गंमत केली म्हणून वेड्यात काढा. तुम्ही जितके खोटे बोलाल तितक्याच उस्फुर्तपणे तो तुम्हाला परत येऊन 'काय झालं' विचारेल. असं कितीदाही करुन पहा. तुम्ही थकाल पण मित्र मैत्रीत हार जाणार नाही.

'चांगला' हा शब्द मित्रांच्या बाबतीत तितकासा बरोबर नाही. चांगला या शब्दात औपचारीकतेचा भास होतो. उगाच कर्तव्य म्हणून मैत्री राखणं असा काहीसा गुण.. पण मित्रं तर आपल्यावर कुठल्याही स्वार्थाशिवाय प्रेम करतात.. एकदम निरपेक्ष.. फार त्रास होतो..सवय नसते आपल्याला आणि मग आणखीच त्रास.

हे सर्व सहन करता येईलही.. पण मित्रांचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे ती दुरावतात, त्यांच्या किंवा तुमच्या लग्नानंतर जास्तच. तेच्यायला मरण्याहुनही वाईट प्रकार... मुळात फार जास्त प्रेम लावायचं असेल तर मग नंतर दुरावण्याला काय अर्थ आहे? आणि आयुष्यातून जायचंच असेल तर का लावतात माया? बेअक्कल माणसं..

..तेव्हा अजून नि:स्वार्थ मैत्री केली नसेल तर करु नका इतकंच..

***************************************************************************************************
माझा हा लेख/विडंबन माझ्या सर्व आंतरजालीय्/प्रत्यक्ष मित्र-मैत्रीणींना समर्पित. कुणी कधी दुखावला असेल तर इथेच माफी मागून सर्वांनीच मैत्रीतले गैरसमज दूर करावेत अशी विनंती. कारण बर्‍याचदा कारण खुप छोटे असते आणि आपण रुसवा फुगवा धरुन बसतो. :)

विडंबनसमाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

मनराव's picture

6 Jul 2012 - 3:00 pm | मनराव

लै भारी.... झक्कास जमलाय...........

गवि's picture

6 Jul 2012 - 3:08 pm | गवि

मस्तच .. :)

ईतक झक्कास विडंबन नव्हत वाचले आधी !!

एक च नंबर !!

आमच्या बाबतीत मित्र जरा जास्त च दुखावतात, थोबाड नीट नाही आपले ;)

ममोचा मित्र

प्यारे१'s picture

6 Jul 2012 - 4:31 pm | प्यारे१

+१
वाश्याचा 'शत्रू'... ;)
- प्यारे

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Jul 2012 - 3:52 pm | बिपिन कार्यकर्ते

लै लै लैच्च भारी! =))

प्रास's picture

6 Jul 2012 - 4:17 pm | प्रास

अप्रतिम आणि अगदी हृद्य लिखाण.....

याला विडंबन तरी का म्हणावं? 'इन्स्पायर्ड' म्हणू फार तर...

कौशी's picture

6 Jul 2012 - 4:30 pm | कौशी

मस्त लिहिलय..आवडले

मस्तच !! प्रासभौंशी सहमत, याला विडंबन तरी का म्हणावं.

मुक्त विहारि's picture

6 Jul 2012 - 5:41 pm | मुक्त विहारि

छान जमले आहे..

शुचि's picture

6 Jul 2012 - 6:26 pm | शुचि

कालच कोणाला तरी बोलताना म्हणाले/लिहीले -

A FRIEND IS ONE WHO KNOWS ALL ABOUT YOU AND STILL RESPECTS YOU.
A true friend is a priceless gift. When we reveal our hopes, our dreams, and our deepest secrets to others, and they still like and respect us, such people are to be cherished.

आणि अगदी हळवी होऊन गेले. वरती सुहास म्हणतात तसे माझ्याकडूनदेखील मैत्रिणी खूपदा दुखावल्या जातात. सध्या "अबोला" चालू आहे. त्यात भरीस भर म्हणून "ती" मला जळवण्यासाठी दुसरीबरोबर टीम-अप करते आहे. चालायचच. :(

__________

याला विडंबन का म्हणायचे "सुडंबन" का म्हणू नये? खरच फार सुरेख जमले आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jul 2012 - 7:00 pm | परिकथेतील राजकुमार

माझ्याकडूनदेखील मैत्रिणी खूपदा दुखावल्या जातात.

जे दुखावले जातात ते मित्रच नसतात. आणि जे अगदी दुखावले गेलेच तरी बोलून दाखवत नाहीत ते तर नक्कीच मित्र नसतात.

मित्र आणि परिचीत ह्यातला फरक ओळखता आला की असा त्रास होत नाही.

माझा एक चांगला मित्र संदिप ह्याची गंमत सांगतो. संदिप दर गुरुवारी संध्याकाळी माझ्याकडे यायचा आणि मग आम्ही दोन दोन घोट मारायला जायचो. एके दिवशी याहू पूल खेळताना माझे आणि त्याचे जाम वाजले. पार अगदी 'भोकात जा' वैग्रे पर्यंत बोलाचाली झाली. पुढचे तीन गुरुवार हा नेहमी प्रमाणे यायचा, आम्ही एकाच टेबलावरती बसायचो, एकही अक्षर एकमेकांशी न बोलता दोम दोन घोट मारायचो आणि घरी परतायचो. नंतर वाद मिटले, बोलाचाली देखील चालू झाल्या. पण मधल्या काळात त्यानी मला किंवा मी त्याला टाळले नाही, किंवा राग देखील धरुन ठेवला नाही. वाद मिटेपर्यंत नेहमीचे व्यवहार चालूच.

नाही परा मित्र/मैत्रिणी सर्व प्रकारच्या शेप/साइझेस (आकारमान/वस्तुमान) मध्ये येतात. जोवर बरोबर होती, तिने मला श्रीमंत केले. यात ५०% तिचे देणे आहे ५०% माझी घेण्याची कुवत आहे.
आता ती काही कारणाने दुखावली आहे तर माझी ही स्ट्रॅटेजी आहे की - थांबा आणि पहा (वेट अँड वॉच) ..... पण हा कालावधी थोडा अवघड आहे कारण - तिच्यामधील माझी भावनिक गुंतवणूक.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jul 2012 - 7:28 pm | परिकथेतील राजकुमार

तिच्यामधील माझी भावनिक गुंतवणूक.

म्हणूनच कुठलीही गुंतवणूक करताना सावधानता बाळगा असे जुने जाणते लोक उगाच नाही सांगून गेले.

मन१'s picture

6 Jul 2012 - 7:26 pm | मन१

जमलय मायला मस्तच.

शिल्पा ब's picture

6 Jul 2012 - 11:02 pm | शिल्पा ब

भारी जमलंय.

पैसा's picture

6 Jul 2012 - 11:18 pm | पैसा

मस्त! एक नंबर!

अर्धवटराव's picture

7 Jul 2012 - 10:11 am | अर्धवटराव

आमचे काहि अत्यंत हलकट दिलतोड मित्र आठवले. काळाच्या ओघात (काय पण शब्द आहे..) कुठे गायब झाले साले कोण जाणे. आता भेटलेच तर पहिला प्रश्न करतील.. अबे जींदा है क्या..

अर्धवटराव

रेवती's picture

6 Jul 2012 - 11:53 pm | रेवती

सुडंबन जमले आहे.

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2012 - 12:02 am | श्रीरंग_जोशी

विडंबन खरपुस जमले आहे यात काही शंकाच नाही.

परंतु शीर्षक वाचून काही विशेष कुतूहल जागे झाले होते.
कारण मुळ धाग्यात ज्याप्रमाणे श्वान व मार्जार यांचा तुलनात्मक आढावा घेण्यात आला होता त्याचप्रमाणे ममो मित्रांबरोबरच मैत्रिणींबाबतही काही लिहितील असे वाटले होते.

कदाचित त्या गोड व खुसखुशीत आठवणी ममोंना स्वतःबरोबरच ठेवायच्या असाव्यात. चालायचेच!!

बाकी ममोंची फटकेबाजी नेहमीप्रमाणेच आनंददायी.
लगे रहो ममोभाय!!

५० फक्त's picture

7 Jul 2012 - 8:16 am | ५० फक्त

मस्त रे मस्त, एकदम भारी झालंय.

अमितसांगली's picture

7 Jul 2012 - 8:37 am | अमितसांगली

झकास....

नि३सोलपुरकर's picture

7 Jul 2012 - 11:03 am | नि३सोलपुरकर

म मो साहेब ,
मस्त.
कुठेतरी वाचलेले आठवतय ,"“If friendship is your weakest point ,then you are the strongest person in the world “

किसन शिंदे's picture

8 Jul 2012 - 1:19 pm | किसन शिंदे

मुळ धागा जितका चांगला तितकाच हा धागाही वाचनीय झालाय. :)

स्पंदना's picture

9 Jul 2012 - 11:21 am | स्पंदना

सु रे ख !!

च्यायची काही मित्र थोबाड दाखवत नाहीत तरी मित्रच रहातात.

आंजावरील मित्र म्हणायचेय का तुम्हाला?

अंऽहं! आंजावरुन आप्लया जगात उतरलेले.

चिगो's picture

9 Jul 2012 - 3:54 pm | चिगो

अत्यंत सुरेख जमलाय धागा.. अपर्णातैंच्या वाक्य चोरुन म्हणतो, च्यायची काही मित्र थोबाड दाखवत नाहीत तरी मित्रच रहातात. यहींच दोस्ती का मजा हैं |

मस्त लिहिलेस ममो. काही मित्र/ मैत्रिणी तर आपण राहतो त्या शहरात येऊनही थोबाड दाखवत नाहीत. काय म्हणायचे ह्याला? ;) आणि वरुन रागवायला काय झाले, असेही विचारतात!!! :D