नमस्कार मंडळी.
क्रिकेटचा वर्ल्डकप झाला आणि भारतात दिवाळी साजरी झाली, त्यानंतर सगळ्यांचा जीव लटकवुन ठेवलेले तेंडल्यांचे शतकांचे महाशतक झाले आणि पुन्हा एकदा लोकांनी दिवाळी केली. झालेच तर क्रिकेटचे भारतीय धंदेवाईक व्हर्शन 'आयपीएल' ही झाले.
मध्यंतरी बुद्धिबळ विश्वचषकही झाला आणि विश्वनाथन आनंदने तो जिंकुन कमाल केली.
सध्या फ्रेंच ओपन स्पर्धेचा धुमाकुळही चालु आहे आणि नदाल नेहमीसारखा क्ले कोर्टवर एकेक प्रतिस्पर्ध्यांना शब्दशः धूळ चारत आहे. कालच भुपती-सानिया मिर्झा जोडीने मिक्स डबल्सच्या विजेतेपदावर कब्जा केला, टेनिसमधुन अलमोस्ट आउट झालेली ग्लॅमगर्ल मारिय शेरपोव्हा ह्या वर्षी अगदी भन्नाट खेळत आहे.
ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे इंग्लिश प्रिमियर लीग, बुंडेसलीगा, स्पॅनिश लीग इत्यादीही पार पडल्या. 'मॅन्चेस्टर सिटी'ने त्यांच्या सपोर्टरचे प्राण कंठाशी आणुन का होईना पण ईपीएलवर कब्जा केला आणि बर्याच वर्षांनंतर इंग्लिश लीगला नवा विजेता मिळाला. तिकडे स्पेनमध्ये 'रियाल माद्रिद'ने अत्यंत आक्रमकपणे खेळत बलाढ्य बार्सिलोनाचे वर्चस्व संपुष्टात आणले. कोणाच्या ध्यानीमनी नसताना सर्व अंदाज चुकवत इंग्लिश लीगमध्ये ६ व्या नंबरावर असणार्या 'चेल्सी'ने चँपियन्स लीगला गवसणी घातली आणि ह्या क्लबचा मालक असलेल्या रोमन अब्राहिमोविचचे ओतलेले करोडो डॉलर्स सार्थकी लागले.
.
.
एकंदरीत बरेच काही घडले, घडत आहे.
अजुन काही दिवसांनी लंडनमध्ये 'ऑलंपिक्स-२०१२'चे रणशिंग फुंकले जाईल आणि ह्या खेळाच्या जागतीक कुंभमेळ्याला देशोदेशीचे भक्त लंडनमध्ये हजरी लावतील.
.
.
पण हे सर्व घडत असताना अजुनही काही घडत आहे, इन्फॅक्ट आज त्याची सुरवात होणार आहे.
UEFA European Football Championship ..... अर्थात युरो-२०१२ !!!
दर ४ वर्षांनी येणारा फूटबॉलचा विश्वचषक जेवढा प्रतिष्ठेचा असतो तेवढेच महत्व युरोपात ह्या स्पर्धेला आहे. जेवढी खुन्नस भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचला असते तेवढीच खुन्नस इथे जर्मनी-नेदरलँड ह्या सामन्याला असते, विश्वचषकाचे गेले ३ वेळेचे विजेते स्पेन, इटली आणि फ्रान्स इथे पुन्हा एकमेकांना भिडणार आहेत.
जगातत्या सगळ्यात बेस्ट फूटबॉल लीग्स जिथे खेळल्या जातात आणि त्यांच्या प्लेयर्सवर आख्ख्या जगातले पाठिराखे फिदा असतात ते जर्मनी, स्पेन, इंग्लंड, इटली त्याच सुपरस्टारना घेऊन इथे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
लोकप्रिय ब्राझिल, अर्जेंटिना वगैरे जरी ह्या स्पर्धेचा भाग नसले तरी ह्या त्यामुळे ह्या स्पर्धेच्या थरारात तसुभरही फरक पडत नाही.
युरो चषक विश्वचषक नसला तरी त्याचे महत्व विश्वचषकाहुन किंचितही कमी नाही.
आज ह्या स्पर्धेचा शुभारंभ होत आहे.
ह्यावेळेसचे यजमान देश आहेत 'युक्रेन' आणि 'पोलंड'. तुम्ही ह्या संघांचा खेळ पाहणार असाल तर उत्तम आहे, पण त्याहुन काही पाहण्यासारखे असेल तर ते म्हणजे ह्या दोन्ही संघांचे पाठीराखे.
अत्यंत आक्रमक, गोंधळी, दंगेखोर आणि आपल्या टिमसाठी पागल असे सपोटर्स आपण शोधायला गेलो तर त्या यादीमध्ये ह्या २ देशांच्या पाठीराख्यांचे नाव अग्रक्रमाने येईल. प्रतिस्पर्धी टिम्सना ह्यांच्या खेळाचे टेन्शन जरी म्हणावे एवढे नसले तरी ह्यांच्या होम-ग्राउंडवर ह्यांच्या 'क्रेझी' सपोटर्ससमोर कसे खेळायचे ह्याचे टेन्शन नक्कीच असणार.
असो, आज सुरवात होत आहे व त्यासाठी हे ४ शब्द ....
बाकी संघांची माहिती वगैरे देण्यात जास्त पॉइन्ट नाही कारण काही तुरळक अपवाद वगळता सर्वच बलाढ्य संघांचे प्लेयर्स जे विश्वचषकात खेळले तेच इथे खेळणार आहेत.
दावेदारही जवळपास तेच आहेत .... जग्गजेते आणि युरोचे गतविजेते असलेले स्पेन, गतविश्वचषकानंतर कात टाकलेला फ्रांन्स, नेहमीच लढावय्या म्हणुन ख्याती असलेली जर्मनी, अंमळ थकलेली परंतु आपल्या अफाट डिफेन्सने समोरच्याला दमवु शकणारी इटली, स्टारडम मिरवणारे आणि दुखापतीने ग्रासलेले इंग्लंड, विश्वचषकात अंतिम फेरीत धडक मारणारे नेदरलँड, अत्यंत धोकादायक परंतु शेवटच्या फेर्यात कचखाऊ म्हणुन ख्याती असलेले रोनाल्डोचे पोर्तुगाल, भल्याभल्यांना धूळ चारु शकणारा २००४ चा विजेता ग्रीस, विश्वचषकाला क्वालिफाय न झाल्याचे उट्टे काढण्यास अतुर असलेले क्रोएशिया.
असो, आता ह्या धाग्यावर गुणतक्ता देतो आणि आरंभीचे ४ शब्द संपवतो.
हा धागा काही संपुर्ण स्पर्धेचे कव्हरेज नाही, जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तसे काळानुरुप नवे धागे काढता येतील. केवळ ह्या स्पर्धेची पार्श्वभुमी देणे आणि गुणतक्त्याची स्थापना करणे एवढेच ह्या धाग्याचे कर्त्यव्य.
युरो चषक २०१२ !!!
स्पर्धेच्या रोजच्या सामन्यांच्या अद्ययावत निकाल, झालेले गोल्स, विजयी-पराभुत संघांच्या बदलत्या क्रमवारी आणि त्यानुसार पुढच्या फेरीसाठीच्या पात्रतेची शक्यता, मिळालेले एकुण गुण आदी बाबी ध्यानात घेऊन एक तक्ता बनवला आहे. ह्या तक्त्यावर नजर टाकली तर सर्व आवश्यक माहिती "एका नजरेत" मिळेल असा विश्वास आहे.
तक्ता बनवताना शक्य तितकी अधिक माहिती तक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे.
हा तक्ता शक्यतो "रोज अद्ययावत होईल" .... !!!
१. निळ्या रंगातल्या ओळीमध्ये स्थान असलेले संघ "पुढच्या फेरीसाठी पात्र" ह्या गटात मोडतात
गडद निळा त्या गटातला "क्रमांक-१" चा संघ आणि फिकट निळा "क्रमांक-२" चा संघ कोण आहे ते सांगतो.
२. पिवळ्या रंगाच्या ओळीत आलेले संघ "पहिल्या फेरीनंतर स्पर्धेतुन बाहेर फेकले ( पक्षी : नॉक आउट ) होतील.
आम्हाला अशी आशा आहे की हा तक्ता मिपाकरांना नक्कीच उपयोगाचा होईल.
टीप : सर्व प्रकारच्या सुचना, टिप्पण्या, सुचवण्या आणि सल्ले ह्यांचे स्वागत असेल.
हे सर्व तुमच्यासाठीच आहे त्यामुळे तुमचे मत नक्कीच महत्वाचे असेल आणि ते नक्की विचारात घेतले जाईल.
धन्यवाद !
गट - अ :
संघ : झेक रिपब्लिक, ग्रीस, पोलंड, रशिया
क्रमांक
राष्ट्रध्वज
राष्ट्र
खेळलेले सामने
विजय
अनिर्णीत
पराजय
केलेले गोल
स्विकारलेले गोल
गोल फरक
गुण
१
रशिया
१
१
०
०
४
१
३
३
२
ग्रीस
१
०
१
०
१
१
०
१
३
पोलंड
१
०
१
०
१
१
०
१
४
झेक रिपब्लिक
१
०
०
१
१
४
-३
०
=============================================================================
गट - ब :
संघ : डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड, पोर्तुगाल
क्रमांक
राष्ट्रध्वज
राष्ट्र
खेळलेले सामने
विजय
अनिर्णीत
पराजय
केलेले गोल
स्विकारलेले गोल
गोल फरक
गुण
१
डेन्मार्क
१
१
०
०
१
०
१
३
२
जर्मनी
१
१
०
०
१
०
१
३
३
नेदरलँड
१
०
०
१
०
१
-१
०
४
पोर्तुगाल
१
०
०
१
०
१
-१
०
=============================================================================
गट - क :
संघ : क्रोएशिया, आयर्लंड, इटली, स्पेन
क्रमांक
राष्ट्रध्वज
राष्ट्र
खेळलेले सामने
विजय
अनिर्णीत
पराजय
केलेले गोल
स्विकारलेले गोल
गोल फरक
गुण
१
क्रोएशिया
१
१
०
०
३
१
२
३
२
स्पेन
१
०
१
०
१
१
०
१
३
इटली
१
०
१
०
१
१
०
१
४
आयर्लँड
१
०
०
१
१
३
-२
०
=============================================================================
गट - ड :
संघ : इंग्लंड, फ्रान्स, स्विडन, युक्रेन
क्रमांक
राष्ट्रध्वज
राष्ट्र
खेळलेले सामने
विजय
अनिर्णीत
पराजय
केलेले गोल
स्विकारलेले गोल
गोल फरक
गुण
१
इंग्लंड
०
०
०
०
०
०
०
०
२
फ्रान्स
०
०
०
०
०
०
०
०
३
स्विडन
०
०
०
०
०
०
०
०
४
युक्रेन
०
०
०
०
०
०
०
०
=============================================================================
आणि हो, आज पहिला सामना यजमान पोलंड आणि ग्रीस ह्यांच्यामध्ये खेळवला जाईल व त्याला आता काही मिनिटातच सुरवात होईल, एंजॉय दी मॅच !
सर्व छायाचित्रे आंतरजालावरुन साभार ...
प्रतिक्रिया
8 Jun 2012 - 10:24 pm | जयंत कुलकर्णी
पोलंडचा गोल बघितला. मस्त मारला.
एकंदरीत ग्रीसचा खेळ पोलंडपेक्षा मंद वाटला......
Welccome between the Goal Posts.
8 Jun 2012 - 10:38 pm | जाई.
+1
ग्रीसच्या सोक्रायटिसला रेड कार्ड मिळालं
फर्स्ट हाफ मधे ग्रीसचा बचाव ढेपाळलेला वाटला
8 Jun 2012 - 10:29 pm | गणपा
लावतोच हजेरी सोमवार पासुन. ;)
8 Jun 2012 - 10:38 pm | jaypal
आहेत तो वर असेच विविधांगी (संपुर्ण) विष्लेषणात्मक लेख येउद्यात ही प्रेमळ विनंती.
8 Jun 2012 - 10:47 pm | कुंदन
लाथांळ्यांच्या खेळातले काही कळत नाही पण खरा खेळ हाच आहे.
साला क्रिकेट म्हणजे काय खेळ आहे, निसता टाईम पास.
8 Jun 2012 - 10:58 pm | सोत्रि
पोलंड १ - ग्रीस १
पोलिश कीपरला रेड कार्ड! मस्त निर्णय!
- (लाथामारू) सोकाजी
8 Jun 2012 - 11:15 pm | छोटा डॉन
च्यायला, तो आमचा आवडता किपर आहे.
आर्सनेलकडुन खेळतो ... वुझ्नियाक साझ्नेस्की.
एनी वेज, रेड कार्ड होते हे मान्य ! मॅच ड्रॉ होणार आहे.
- छोटा डॉन
9 Jun 2012 - 9:12 pm | कुंदन
घ्या , साला तिकडे पण फिक्सिंग हा प्रकार आहे का ?
मग आमच्या साहेबांना पण त्या खेळात रस निर्माण होणार तर.
9 Jun 2012 - 2:40 am | निनाद मुक्काम प...
कोणाच्या ध्यानीमनी नसताना सर्व अंदाज चुकवत इंग्लिश लीगमध्ये ६ व्या नंबरावर असणार्या 'चेल्सी'ने चँपियन्स लीगला गवसणी घातली
तुम्ही तर आम्हाला चेपू वर चेल्सी जिंकणार हे ठामपणे सांगितले होते.
हा अकस्मात पराभव आमच्या शहराच्या जिव्हारी लागला.
बायर्न म्युनिक च्या संघाला आमच्या हॉटेलात आम्ही काहीही कमी पडू दिली नव्हते. सार्या गेस्ट लोकांना फाट्यावर मारून त्यांचे लाड केले होते. पण
शेवटच्या क्षणी गाफिलपणे गफलत झाली.आणि सामना हातातून गेला.
दुसर्या दिवशी पोर चिमणी एवढी तोंड करून रूम मध्ये निमचीत पडून होती.
न्याहारी सुद्धा केली नाही. नशीब हॉटेलात तोडफोड केली नाही.
आता नव्या दमाने आम्ही सज्ज होत आहोत युरोपवर कब्जा करायला.
आमच्या शहरात ज्या मैदानावर बियर फेस्ट होतो. तेथे मोठ्या स्क्रीन लावून सामने पाहण्याची सोय आहे ( किमान ७०००० जणांचा समूह तरी असेल )
पण आमचे ह्यावेळी जाणे होणार नाही.
तुम्ही स्पर्धेबाबत माहिती पुरवत रहा
आम्ही रिसबूड गिरी करत सासरे बुआंवर इम्प्रेशन मारतो.
9 Jun 2012 - 10:54 am | जयंत कुलकर्णी
:-) बियर फेस्टिव्हलला एकदा येणार आहे......तेव्हा भेट होईलच...
9 Jun 2012 - 5:38 pm | निनाद मुक्काम प...
नक्की येथील पुरातन वस्तू संग्रहालय पाहण्यासारखे आहे.
तुमच्या नि माझ्या आवडीच्या इतिहासाच्या दुष्टीकोनातून मोलाचा ठेवा येथे पहावयास मिळेल..
9 Jun 2012 - 2:55 pm | स्वाती दिनेश
कालच्या शुभारंभाच्या दोन्ही सामन्यांपैकी ग्रीस वि पोलंड पूर्ण पाहिला .
रशिया वि झेक अगदीच एकतर्फी झाला, हाफ टाइम नंतर सोडून दिला.
आज डॉइशं मानशाफ्ट पोर्तुगालशी भिडणार आहे, ते सामन्याची तयारी करत आहेत तर आम्ही सामना बघायची,;) (म्हणजे फ्रिजमध्ये पुरेशी द्रव्यं, प्लेटांमध्ये पुरेसे खाद्य इ. इ... ;) )
स्वाती
9 Jun 2012 - 3:00 pm | पैसा
बुद्धिबळानंतर मिपावर फुटबॉलचा महोत्सव सुरू झाला! मजा येणारे!
9 Jun 2012 - 6:32 pm | ५० फक्त
लई भारी, धन्यवाद ओ डॉनराव.
9 Jun 2012 - 6:55 pm | नाना चेंगट
लै भारी !!!
9 Jun 2012 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मालक, आता फुटबॉलच्या म्याचा पाहणं आलं. टैम टेबल लावला असला तरी आजची म्याच कोणकोणात होणार आहे, तेवढं वेळात वेळ काढून सांगत चला. तसंच सामन्यागणिक कोण चांगला खेळतो. कोणकोणत्या क्लबकडून खेळतो. कोणाला किती पैसे मिळतात. खेळाडूंचे आत-बाहरे असलेली लफरं-बिफरं त्यामुळे खेळावर झालेला अधिक उणे परिणाम. जिंकण्याची संधी कोणाला आणि अंतिम बाजी कोण मारेल. काही छायाचित्र. हौशी प्रेक्षकांचे नमुने, वगैरे असं काही सांगितलं तर आम्ही याबी म्याचा इंजॉय करु. :)
आज आहे का म्याच ? आणि कोणत्या भारतीय प्रमाण वेळेला ?
-दिलीप बिरुटे
9 Jun 2012 - 9:42 pm | छोटा डॉन
आजची शाम, युरो क्लासिक्स के नाम !
आज एकुण २ महत्वाच्या आणि तगड्या मॅचेस आहेत, ह्या स्पर्धेत ज्याला ग्रुप ऑफ डेथ म्हणुन ओळखले जाते त्या 'ब' गटातले पहिले साखळी सामने आज होणार आहेत.
१. डेन्मार्क वि. नेदरलँड्स :
Metalist Stadium
सामन्याची वेळ - ९.३० ( भारतीय वेळेनुसार )
कागदावर संघ पहायला गेले तर ह्यात नेदरलँडचे पारडे नक्कीच जड आहे, त्यांनी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठुन त्यांच्या क्वालिटीची चूणुक दाखवली होती.
नेदरलॅंड संघात देशोदेशीचे क्लब गाजवणार्या अनेक 'स्टार' खेळाडुंचा भरणा आहे. इंग्लिश लीगमध्ये आर्सनेलचा तंबु एकहाती पेलणार्या गोलमशिन 'रॉबीन वॅन पार्सी' वर ह्यांच्या स्ट्राईकची मुख्य जबाबदारी असेल, ह्याशिवाय त्याच्या सोबतीला जर्नमीतल्या बुंडेसलीगामध्ये 'शाल्क' ह्या टिममधुन खेळुन गोलांचा अक्षरशः पाऊस पाडणारा 'क्लास-यार हुंटेलार' हा नवा हॉट प्रोस्पेक्ट आहे.
ह्यांच्या मध्यफळीतही अनेक नावाजलेले स्टार आहेत. इंटरमिलानच्या मध्यफळीचा कणा आणि प्ले-मेकर असलेला १० नंबर जर्सी घालणारा वेस्ली स्नायडर, चँपियन्स लीग फायनलला बायर्न म्युनिककडुन खेळणारा आणि पेनल्टी चुकवुन खलनायक ठरलेला परंतु भयंकर टॅलेंट असलेला 'आयन रॉबेन', इंग्लिश लीग चँपियन्स मॅन्चेस्टर सिटीचा डिफेन्सीव मिडफिल्डर 'निगेल डी जाँग'. ह्याशिवाय रफाएल वॅन डर वार्ट, डर्क क्युट, इब्राहिम अॅफॅले वगैरे अनेक नावाजलेले प्लेयर्स आहेत. स्पेननंतर सगळ्यात स्ट्राँग मिडफिल्ड ह्यांचीच आहे.
गोलपोस्टचे रक्षण करण्यास मागच्या वर्ल्डकपचा हिरो असलेल्या स्टॅक्लेनबर्गसोबत ह्यावर्षी अनेकांचे लक्ष वेधुन घेतलेला इंग्लिश क्बल न्यु-कॅसलचा गोली टिम क्रुल हा ही ह्या टिमचा स्टार आहे.
ह्याउलट डेन्मार्कची संपुर्ण मदार ही त्यांच स्टार स्ट्रायकर असलेल्या निकोलस बेंडनरवर असेल. ह्यांच्याकडे जास्त स्टार नसले तरी त्यांचा लयबद्ध आणि संथ खेळ अनेकदा समोरच्या संघासाठी डोकेदुखी ठरला आहे.
बाकी पारडे अलमोस्ट 'नेदरलँड'च्याच बाजुने झुकले आहे.
२. जर्मनी वि. पोर्तुगाल.
रात्री १२.१५ ( भारतीत वेळ
स्पेनच्या संघातले सोडले तर ह्या स्पर्धेतले सर्वात जास्त नावाजलेले खेळाडु आज ह्या सामन्यात खे़ळणार आहेत. दोघांकडेही स्टार प्लयर्सची अजिबात कमी नाही, उलट कुणाला आज बाहेर बसवावे हाच त्यांच्या कोचसमोर प्रश्न असेल.
जर्मन साईड ही बहुसंख्य बुंडेसलीगामध्येच खेळणार्या स्टार प्लेयर्सनी खचाखच भरली आहे.
आघाडीला सध्याच इंग्लिश क्बल'आर्सनेल' ला जॉईन झालेला 'ल्युकास पोडोल्स्की', बायर्नचा सुपरस्टार गोलमशिन 'मारियो गोमेझ', गेला आणि त्याआधीचे वर्ल्डकप गाजवणारा अजुभवी 'मिरोस्लाव क्लोज', गेल्य वर्ल्डकपमध्ये धुम करणारा 'थॉमस म्युलर' अशा स्ट्रायकरची फौज आहे ह्यांच्याकडे.
मधल्या फळीत स्पॅनिश चँपियन्स 'रियाल माद्रिद' कडुन खेळणारे मेसुत ओ़झिल आणि सॅमी खदिरा, बायर्न कडुन खेळणारे 'टोनी क्रुस' आणि अनेकांचा फेव्हरिट पण चँपियन्स लीगमध्ये पेनल्टी शूटआउटमध्ये संधी चुकवलेला 'बास्टियन श्वाईनस्टायगर', नव्या पिढीतला आनि हॉट प्रॉस्पेक्ट असणारा बोरुशिया डॉर्ट्मुंड ह्या जर्मन क्लबचा 'मॅट ह्युमेल' असे अनेक धडाकेबाज आहेत.
बचावफळीत बायर्न म्युनिकचा कॅप्टन 'फिलिप ल्हाम' आणि आर्सनेलचा कणा 'मॅटसॅकर' असे नावाजलेले डिफेंडर आहेत.
गोलरक्षणची जबाबदरी नेहमीप्रमाने बायर्नचा गोली 'मॅन्युएल न्युअर' पार पाडेल
ह्याउलट पोर्तुगालचा संघ ओळखला जातो तो जगातला सर्वात महागडा आणि रियाल माद्रिदचा सुपरस्टार 'क्रिस्तियानो रोनाल्डो'चा संघ म्हणुन. अर्थातच आक्रमण आणि प्ले-मेकरची भुमिका तो समर्थपणे पार पाडेल.
त्याच्याशिवाय आघाडीच्या फळीत ह्युगो अल्मेडा आणि हेल्डर पोस्टिगा हे पोर्तुगीज लीगचे स्ट्रार आणि अत्यंत अनुभवी असे स्ट्रायकर आहेत.
मधल्या फळीत मॅन्चेस्टर युनायटेडचा 'लुईझ नानी', चेल्सीचा 'राउल मरालेझ', इंटर मिलानचा 'जाओ मुटिन्हो' आणि अनुभवी रिकार्डो क्वासेर्मा असे प्लेयर्स आहेत.
स्पेननंतर सगळ्यात भारी डिफेन्स असेल तर तो आहे पोर्तुगालचा, त्यांच्याकडे रोलॅण्डो, ब्रुनो अल्वेस, माद्रिदचे 'पेपे, फबिओ कॉन्ट्राओ आणि रिकार्डो कार्व्हालो' असे भरोशाचे डिफेन्डर आहेत.
रोनाल्डोची सध्या भयंकर फॉर्मात आहे आणि त्याची जादु चालली तर जर्मनीला पराभवही पत्कारावा लागु शकतो, अदरवाईज जर्मनी जिंकण्यासाठी फेव्हरिट आहेत.
9 Jun 2012 - 11:05 pm | निनाद मुक्काम प...
आम्ही झेंडा बाल्कनीत लावला आहे.
आज स्वाती ताई म्हणाली तशी खच्चून तयारी केली आहे.
खानपान सेवेची पूर्व तयारी जोरात सुरु आहे.
आताच स्पेन ने भलेमोठे कर्ज युरोपियन मागितल्याची बातमी वाचली.
पोर्तुगाल सोबत आता ते सुद्धा ओमं भवती ......
पण हि स्पर्ध्धा सुरु झाली तिचा कैफ चढला कि कसली मंदी नी कसले काय
उडाव पैसा
आमच्या व्यवसायाला बरकत येते.
पब्लिक मजबूत प्रवास व उधळपट्टी करतो.
म्हणूनच ह्या उत्सवात ह्या खेळाविषयी फारसे स्वारस्य नसले तरी मी समरसून भाग घेतो.
गंधा हे पर धंदा हे ये
10 Jun 2012 - 3:36 am | निनाद मुक्काम प...
जिंकलो
आता फुल धुमशान
गोमेझ बाबा कि जय
10 Jun 2012 - 9:12 am | रमताराम
आता कसं लैनीवर आले. ते बाकीचे दोन टोणगे कुठे दिसत नाहीत. त्यांना काय पालखी पाठवायला लागेल काय. का भीम्याला पाठवू.
आणि आमच्या क्रिकेटच्या पेकाटात लाथ घालूनच सुरुवात? अहो तो बॉल दिलाय ना, त्याला मारा की किती लाथा मारायच्या ते. आणि क्रिकेट बद्दलच्या जळजळीला इनो पुरेसे आहे.
बाकी संघांची माहिती वगैरे देण्यात जास्त पॉइन्ट नाही कारण काही तुरळक अपवाद वगळता सर्वच बलाढ्य संघांचे प्लेयर्स जे विश्वचषकात खेळले तेच इथे खेळणार आहेत.
कामून बॉ. तवा ही म्हाईती दिल्याली हाय काय. असल्यास दुवा द्या नि दुवा घ्या. :) न्हाईतर आळशीपना केल्याबद्दल अण्णांकडे तक्रार दिउ तुमच्यावाली.
11 Jun 2012 - 11:38 am | सहज
काय डॉन्राव कसा चालल्लाय तुमचा एन्डलेस समर!!
11 Jun 2012 - 10:08 pm | सुनील
छान संकलन. वेगवेगळे धागे बनविण्यापेक्षा एकाच धाग्यात सगळं येऊदे.
फूटबॉलसाठी एक वेगळी कॅटेगरी बनवली होती ना पूर्वी? उडाली काय?
11 Jun 2012 - 10:40 pm | छोटा डॉन
सध्या इंग्लंड आणि फ्रान्स मॅच चालु आहे, २ कट्टर प्रतिस्पर्ध्यांची.
२ दोन्ही देश एकमेकांची उणीदुणी काढायचा एक चान्स सोडत नाहीत.
दुखापती आणि सस्पेन्शनमुळे इंग्लिश साईड दुबळी वाटत आहे ( अॅक्युअली ती स्ट्राँग कधी असते हा प्रश्नच आहे ). लँपार्ड दुखापतीने बाहेर असल्याने मध्यफळी कमजोर झाली आहे, स्टार स्ट्रायकर रुनी सस्पेन्शनमुळे २ मॅच बाहेर असल्याने अॅटॅक असुन नसल्यासारखा आहे.
आज इंग्लंड मॅन्चेस्टर युनायटेडचा सेकंड चॉईस स्ट्रायकर 'डॅनी वेलबॅक' ला आघाडीला उतरवुन खेळत आहे, त्याच्या मागे मॅन्चेस्टरचाच 'अॅश्ले यंग' खेळतो आहे. दोन्ही फ्लँकला जेम्स मिल्नर आणि आर्सनेलचा १८ वर्षाचा हाय पोटेंन्शियल स्टार अॅलेक्स ऑक्झालेड-चेंबरलेन खेळत आहे. नेहमी आघाडीला खेळणे पसंद करणारा कॅप्टन 'स्टिव्हन जेरार्ड' आह मध्यफळीत अंमळ मागे खेळत आहे.
बचावफळीत चेल्सीचे जॉन टेरी आणि अॅश्ले कोल, मॅन्चेस्टर सिटीचा लेस्कॉट असल्याने बचाव मजबुत म्हणात येईल असा आहे.
गोलवर 'जो हार्ट' आहे आणि त्याने आज काही अप्रतिम गोल वाचवुन तो चँपियन्स मॅन्चेस्टर सिटीचा फर्स्ट चॉईस गोली का आहे हे दाखवुन दिले आहे.
तिकडे फ्रान्स रियाल माद्रिदचा फुल्ल फॉर्मातला स्ट्रायकर 'करिम बेंझेमा'ला आघाडीला घेऊन खेळत आहे, त्याच्या सपोर्टला बार्यन म्युनिकचा 'फ्रँक रिबेरी', मॅन्चेस्टर सिटीचा 'समिर नास्री', चेल्सीचा 'फ्लॉरेंट मलुडा', ह्यावेळी न्यु कॅसल युनायटेडसाठी सर्प्राईझ पॅकेज ठरलेला 'योहान कबाये' अशी स्ट्राँग मध्यफळी आहे.
बचावफळीत हायली रेटेड 'आदील रामी', फिलिप मेक्सेस आणि सद्यघडीतला एक सर्वोत्तम लेफ्ट-बॅक पेट्रिस इव्हरा खेळत आहेत.
गोलरक्षणाची जबाबदारी लिऑनकडुन खेळणार्या कॅप्टन ह्युगो लॉरिसवर आहे.
गेल्या वर्ल्डकपमधल्या फियास्कोनंतर फ्रान्सने कात टा़कुन टिममध्ये कमालीची जान आणली आहे. गेल्या २१ सामन्यात त्यांनी 'अपराजीत' राहण्याचा रेकॉर्ड ठेवला आहे.
असो.
सध्या सामन्याचा मध्यंतर झाला आहे आणि स्कोर १-१ असा बरोबरीत आहे.
गेरार्डच्या फ्री किकवर लेस्कॉटने हेडरद्वारे ३० व्या मिनिटाला फ्रान्सला आघाडी मिळवुन दिली. नंतर ४० व्या मिनिटाला समीर नास्रीने एका अप्रतिम शॉटद्वारे फ्रान्सला १-१ अशा बरोबरीत आणुन ठेवले.
मॅचची लेटेस्ट कॉमेंट्री खालील लिंकवर पाहता येईल.
http://soccernet.espn.go.com/gamecast/_/id/334190?cc=4716&ref=espnfc
एंजॉय दी मॅच !!!
- छोटा डॉन
12 Jun 2012 - 6:46 pm | रंगोजी
एकुणात काय तर फ्रान्सने हातची म्याच घालवली म्हणावे लागेल. इंग्लंडकडून संपूर्ण सामन्यात एकच अचूक प्रयत्न (Shot at goal) झाला त्यावरूनच वर्चस्व कळून येते. इंग्लंडच्या बचावाला मानले पाहिजे. बेन्झिमाला पूर्णपणे जखडून ठेवले होते. कदाचित चेंडूवरील ताब्याच्या मानाने फ्रान्सचे आक्रमण कमी पडले म्हणता येईल. मलुदा आणि दोन्ही फुलबॅक्स काही विशेष करू शकले नाही. आणि युक्रेनला ३ गुण मिळाल्यामुळे ग्रुपमध्ये रंगत आली आहे.
कदाचित पुढच्या सामन्यात हातेम बेन अर्फा मधून खेळेल आणि नासरी उजव्या बाजूला चिकटून राहील किंवा नासरी मध्ये येऊन वॅल्ब्युएनाला उजवीकडे संधी मिळण्याची शक्यता आहे. अलू दियाराने चांगला पर्फोर्मंस दिला त्यामुळे एम'विला आला तर त्याच्याजागी खेळणार की कबायेच्या हाही प्रश्न आहे.
इंग्लंडला मात्र काही बदल करणे गरजेचे आहे. मिलनर अपेशी ठरला. बचावाला भेदण्यासाठी लागणारा वेग आणि चपळाई त्याच्याकडे नाही. मुख्यत: त्याचा संघात समावेश रिबरी, मालुदा, एव्हरा या त्रयीविरुद्ध बचावात मदत करण्यासाठी झाला होता पण पुढचे दोन्ही सामने जिंकणे आवश्यक असल्यामुळे जादा आक्रमक खेळाडू अपेक्षित आहे. थिओ वॉलकॉटने त्याची जागा घेतल्यास आश्चर्य नसावे. जेरार्ड जखडून न राहता थोडा पुढे खेळेल असे वाटते. यंगही विशेष काही करू शकला नाही पण रूनीच्या अनुपस्थितीत तोच खेळत राहिलसे वाटते.
-रंगोजी
20 Jun 2012 - 12:34 pm | प्रचेतस
उपांत्यपूर्व फेरीचे संघ निश्चित झाले.
२१ - झेक रिपब्लिक वि. पोर्तुगाल
२२ - जर्मनी वि. ग्रीस
२३ - स्पेन वि. फ्रान्स
२४ - इंग्लंड वि. इटली.
यातल्या स्पेन - फ्रान्स आणि इंग्लंड -इटली सामने बघायला खूपच मजा येणार.
डॉन्रांवाना विनंती की त्यांनी वेळात वेळ काढून सामन्यांचे विश्लेषण करावे.
20 Jun 2012 - 6:24 pm | नाना चेंगट
डॉन्रांवाना विनंती की त्यांनी वेळात वेळ काढून सामन्यांचे विश्लेषण करावे.
+१
20 Jun 2012 - 10:46 pm | निनाद मुक्काम प...
ग्रिस
22 Jun 2012 - 12:20 am | सोत्रि
पहिली क्वॉर्टर फायनल चालू झाली आहे...
कोणी आहे का ?
- ('क्वॉर्टर' घेऊन बसलेला) सोकाजी
1 Jul 2012 - 3:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मंडळी, आज भाप्रवे रात्री सव्वाबाराला (डोळ्याला झापडं यायची वेळ. डोळ्याला किती पाणी लावा डोळे मिटतातच. ) आज इटली आणि स्पेन यांच्यात युरो करंडक स्पर्धेचा फायनल म्याच होत आहे. सर्वांनाच अपेक्षा होती की जर्मली आणि स्पेन फायनल मधे पोहचतील (आज पेप्रात दिएगो मॅरोडोनाही असंच म्हणाला आहे) पण, इटलीच्या बालोटेल्लीच्या समोर जर्मनीला काही म्याच काही रेटला नाही. असो, आज आपण बॉ इटलीकडून आहोत. बालोटेल्ली विरुद्ध फर्नांडो टोरेस यांची अटीतटीची झुंज पाहण्यासाठी कसंही करुन फायनल म्याच पाहणार आहोत.
छोटा डॉन यांना कोण जिंकावं वाटतंय आणि कोण जिंकेल असे वाटतंय, यावर त्यांनी काही माहिती दिली तर फायनल म्याचची उत्सुकता वाढेल असे वाटते.
-दिलीप बालोटेल्ली :)
(इटली)
1 Jul 2012 - 8:07 pm | पैसा
डॉनरावांचं म्हणणं पाहिजे असेल तर तुम्हाला थोडी खव उचकपाचक करावी लागेल.
1 Jul 2012 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉन्राव तर अंमळ बीझी दिसत आहेत, बरंच आहे ते कामात आहे ते. मी ज्या इटलीला विजयासाठी शुभेच्छा देत आहे, तिथे इटली पराभूत व्हायला पाहिजे, अशी त्यांची इच्छा दिसत होती. आता इटली जिंकल्यावर छोडॉ यांच्या खरडवहीत पेडे नेऊन देतो. हाय काय अन नाय काय.
-दिलीप बिरुटे
1 Jul 2012 - 9:45 pm | प्रचेतस
आमच्या शुभेच्छा स्पेनला.
स्पेनचा भक्कम बचाव भेदणं इटलीला अंमळ जडच जाईल.
1 Jul 2012 - 11:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> स्पेनचा भक्कम बचाव भेदणं इटलीला अंमळ जडच जाईल.
बचाव बिचाव सर्व भेदून काढणार आहेत, इटलीचे खेळाडु.
त्यामुळे जवळ जवळ विजय इटलीचाच. फक्त औपचारिकपणा म्याच खेळुन काढण्यात बाकी आहे.
सव्वा बारा कधी वाजायचे राव. :(
-दिलीप बिरुटे
1 Jul 2012 - 11:38 pm | मोहनराव
इटलीचा खेळ जब्र्या होता जर्मनीविरुद्ध. चेंडुवरचा ताबा यांच्याकडुन काढुन घेणे अवघड जाईल स्पेनला.
आपण तर बुवा इटलीकडुनच!!
1 Jul 2012 - 11:59 pm | नावातकायआहे
अजुन १५ मि.....
आज इटलि जिंकणार...
२-१
2 Jul 2012 - 12:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण म्हणतोय इटली जिंकणार पण हे पेपरवाले आणि मिडियावाले स्पेनच्या बाजूनेच लिहिताहेत. स्पेन जेतेपद राखण्यास सज्ज. लिहा लेको लिहा, उद्या नै तुम्हाला पानभर बालोटेल्लीचा फोटो छापावा लागला तर आम्हाला नका बोलू.
चला, म्याच पाहण्यासाठी शेवटपर्यंत राहीले डोळे उघडे तर पुन्हा येईन. :)
-दिलीप बिरुटे
1 Jul 2012 - 11:53 pm | चतुरंग
गोलमुखात दोन गोल भडकावल्यानंतर इटली जाम जोरात आहे! ;)
त्यामुळे फाब्रिगास वि बोलाटेली सामना अटीतटीचा होईल असे वाटते.
आपला अंदाज २-१ इटलीच्या फेवरमधे! :)
-मारिओ रंगाटेली
2 Jul 2012 - 12:09 am | विलासराव
ही मॅच लाईव्ह कुठे पहाता येईल?
2 Jul 2012 - 1:19 am | गणपा
http://www.footyfire.com/
खाली Spain vs Italy वर क्लिक करा. तिथे लिंक मिळतील.
2 Jul 2012 - 12:17 am | चतुरंग
किकॉफ होईलच सेकंदात!
2 Jul 2012 - 12:32 am | नावातकायआहे
आयला...१-०
2 Jul 2012 - 12:32 am | मोहनराव
पहिला गोल स्पेनने केला आहे १३ व्या मिनीटाला...
2 Jul 2012 - 12:34 am | चतुरंग
आणि सिल्वाचा तेवढाच फँटास्टिक हेडर!!!
2 Jul 2012 - 12:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फँटास्टिक हेडर!
2 Jul 2012 - 12:59 am | नावातकायआहे
झोपाव आता.. २-०
2 Jul 2012 - 1:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झोपाव आता.. २-०
2 Jul 2012 - 1:12 am | नावातकायआहे
सेकंड हाफ थोडा बघावा का प्रा डॉ?
2 Jul 2012 - 1:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दहा मिनिटॆ पाहु
2 Jul 2012 - 1:57 am | नावातकायआहे
३-०. शुभ रात्री....
2 Jul 2012 - 1:59 am | मोहनराव
स्पेनपुढे नतमस्तक!!
2 Jul 2012 - 12:59 am | मोहनराव
२-० स्पेन जेतेपद राखणार वाटत.
2 Jul 2012 - 12:59 am | चतुरंग
इटलीचा बचाव पार चुरगाळून टाकला राव!
2 Jul 2012 - 1:03 am | मोहनराव
सध्या फाटलीये इटलीची!
2 Jul 2012 - 2:00 am | नावातकायआहे
.
2 Jul 2012 - 2:02 am | मोहनराव
४-० आता बोलती बंद!!
2 Jul 2012 - 2:16 am | चतुरंग
४-० पारच धुतला राव इटलीला!!! कॉन्सोलेशन म्हणून तरी एखादा गोल करायला हवा होता इटलीने. :(
स्पेनचे अभिनंदन!!!!
2 Jul 2012 - 8:34 am | प्रचेतस
हेच बोलतो.
स्पेनचे अभिनंदन.
2 Jul 2012 - 4:15 pm | विसुनाना
इटलीचा निराशाजनक खेळ.
टोरेस आणि माताला जबरदस्त चान्स मिळाला. आत आल्याबरोबर गोल !
2 Jul 2012 - 3:50 pm | छोटा डॉन
स्पेन हरावे म्हणुन देव पाण्यात घालुन बसलेल्या लोकांचे सांत्वन.
इटलीच्या विजयाकडे आशा लाऊन बसलेल्या लोकांचेही सांत्वन.
मजा आली काल मॅचमध्ये.
इटलीची दमदार मिडफिल्ड ( डी रोस्सी आणि पिएर्लो) आणि सुपर स्ट्रायकर मारियो बालोटेल्ली ने जर्मनी आणि इंग्लंडविरुद्ध दाखवलेली चमक पाहुन त्यांना आवरायला म्हणुन स्पेन सुरवातीला ४-६-० अशा चमत्कारिक डिफेंसिव्ह फॉर्मेशनने मैदानात उतरले. अशा फॉर्मेशनला भेदायचे असेल तर 'डिफेंसिव्ह' म्हणुन प्रसिद्ध असणार्या इटलीला अॅटॅकिंग गेम खेळणे भाग होते व त्याचा परिणाम असा झाला की त्यांची डिफेंसिव्ह मिडफिल्ड आणि डिफेंडर लाईनमध्ये चांगलेच गॅप्स तयार झाले.
स्पेनने मग त्यांच्या नॅचरल पासिंग गेमसोबत दमदार अॅटॅक आणि एक-से-एक थ्रु पासेस देऊन इटलीला चांगलेच दमवले.
स्पेनचा फुल बॅक 'यॉर्डी अल्बा'ने केलेला गोल म्हणजे इटली कशी मामा बनली ह्याचे उत्तम उदाहरण होते.
त्यात सुरवातीच्या काही मिनिटानंतर इटलीचा बॉल स्टॉपर आणि फुल बॅक 'येलिनी' जखमी होऊन मैदानाबाहेर गेला आणि त्यांच्या डिफेन्सिव्ह लाईनच्या डाव्या बाजुला मस्त भगदाड पडले आणि त्यातुन स्पॅनिश मिडफिल्डर्स धडाक्यात आत घुसले.
मध्यंतरातच २-० ने पुढे असल्याने आता स्पेन सामना जिंकणार ह्याची केवळ औपचारिकता बाकी राहिली होती. मध्यंतरानंतर इटलीने थोडिशी चमक दाखवुन काही चांगले चान्सेस तयार केले पण स्पॅनिश सॉलीड बॅकलाईनने त्यांचा एकही प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.
सामना संपायला काही वेळ बाकी असताना मैदानात आलेल्या 'टोरेस'ने केलेला गोल आणि त्यानंतर त्याने 'ज्युआन माटा'ला केलेले असिस्ट हे स्पेनच्या विजयातले 'आयसिंग ऑन केक' ठरले.
स्पेनच्या विजयाचा शिल्पकार होता 'झॅवी हर्नांडेझ', त्याने तयार केलेले एकेक चान्सेस, परफेक्ट पासिंग, फॅब्रेगास आणि जॉर्डी अल्बाबरोबरचे त्याचे पेअरिंग ह्यानेच सामना स्पेनच्या बाजुला फिरवला.
- छोटा डॉन
2 Jul 2012 - 4:44 pm | गणपा
जर्मनी बाहेर पडल्यावर आम्ही स्पेनचेच झेंडे घेउन उभे होतो. ;)
2 Jul 2012 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> जर्मनी बाहेर पडल्यावर आम्ही स्पेनचेच झेंडे घेउन उभे होतो
खो खो खो, खी खी खी, खु खु खु खो खौ खं खः :)
-दिलीप बिरुटे
2 Jul 2012 - 4:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इटली इतका पांचट खेळ करेल असं अजिबात वाटलं नव्हतं. ना पासेस ना आक्रमण. ना उत्तम बचाव. मला तर नाकच नै राहीलं या धाग्यावर काही लिहायला. ;) सर्व फुटबॉल रसिक स्पेन जिंकेल म्हणत होते आणि आम्ही लंगड्या घोड्यावर पैजा लावल्या, असंच म्हणावे लागेल. पण, खेळ म्हणलं की हारजित चालायचीच. :)
स्पेन हरावे म्हणुन देव पाण्यात घालुन बसलेल्या लोकांचे सांत्वन.
इटलीच्या विजयाकडे आशा लाऊन बसलेल्या लोकांचेही सांत्वन.
सालं आम्हाला इटली जिंकलं नै त्याचं कै नै वाटलं पण आम्हाला जर्मनी हरल्याचा आनंद आहे. लै लोक म्हणत होते जर्मनी जिंकेल वग्रै.
-दिलीप बिरुटे
2 Jul 2012 - 6:00 pm | रमताराम
डान्रावांच्या बुकीचं म्हणणं कधी चुकेल का? तुम्हीपण कोणाशी पंगा घेताय राव.
2 Jul 2012 - 6:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> डान्रारांच्या बुकीचं म्हणणं कधी चुकेल का ?
हाहाहा. बुकींच्या मतावर जाऊ नये हे मात्र खरं.
>>>>तुम्हीपण कोणाशी पंगा घेताय राव.
हो ना. मलाही टेन्शन आलंय. मी तर आत्ताच ठरवलंय पुढल्या वर्षी होणा-या विश्वचषकाच्या वेळी छोटा डॉन यांची जी टीम ती आपली टीम. एकदा का आम्ही त्यांच्या टीमचा झेंडा हाती घेतला की मग शेंडी तुटो वा पारंबी. मागे हटणार नाही. :)
-दिलीप बिरुटे
2 Jul 2012 - 6:15 pm | छोटा डॉन
छे छे छे, असे काही नसते हो.
एकदा आपण ठरवले ना की ही आपली टिम की मग काही झाले तरी तीच आपली टिम, जिंकणारी टिम आपली म्हणणे ह्याला काही अर्थ नाही. अगदी स्पर्धा सुरु व्हायच्या आधीपासुन सांगायचे की बाबारे आमची टिम अमुकतमुक आहे, मग ते स्पर्धा जिंकू अगर पहिल्याच राउंडात बाहेर पडो, टिम नाय बदलायची.
आम्ही वर्षानुवर्षे टिम बदलत नाही आणि पुढेही बदलण्याचा चान्स नाही.
४-५ वर्षापासुन इंटरनॅशनलमध्ये 'स्पेन' आणि तिकडे लीगमध्ये 'चेल्सी'ह्या आमच्या टिमा आहेत, त्यात काही झाले तरी बदल होत नसतो, पुढे अजुन निदान ३-४ वर्षे तरी होणारही नाही, कमिटमेंट वगैरे काही आहे की नाही ;)
- (फूटबॉलच्या बाबतीत एकनिष्ठ) छोटा डॉन
2 Jul 2012 - 6:21 pm | प्रभो
>>४-५ वर्षापासुन इंटरनॅशनलमध्ये 'स्पेन' आणि तिकडे लीगमध्ये 'चेल्सी'ह्या आमच्या टिमा आहेत, त्यात काही झाले तरी बदल होत नसतो, पुढे अजुन निदान ३-४
त्याआधी ??
ह्याचा अर्थ,२००३-२००४ पासून चेल्सी जिंकायला लागली म्हणून तिला तुम्ही सपोर्ट करायला लागलात्..बरोबर ना? ;)
3 Jul 2012 - 9:02 am | रमताराम
म्हणजे तीन-चार वर्षात खेळाडू बदलले की निकाल तुमच्या 'कन्ट्रोल' मधे राहणार नाहीत कदाचित असंच ना?
2 Jul 2012 - 8:39 pm | निनाद मुक्काम प...
स्पेन हरावे म्हणुन देव पाण्यात घालुन बसलेल्या लोकांचे सांत्वन.
इटलीच्या विजयाकडे आशा लाऊन बसलेल्या लोकांचेही सांत्वन.
इटली चा खेळ म्हणजे शेअर मार्केट सारखा आहे. कधी उसळी मारतो तर कधी
कोसळतो.
2 Jul 2012 - 10:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इटली चा खेळ म्हणजे शेअर मार्केट सारखा आहे. कधी उसळी मारतो तर कधी
कोसळतो.
च्यायला, त्या इटलीच्या. बाकी, त्यांच्या पंतप्रधानाचा (आदरानं बोलतोय) फोन नंबर द्या रे कोणी तरी.
आम्ही येडपट लोकं तुमच्या संघाच्या पाठीशी राहीलो, ही आमची चुक झाली, इतकच सांगायचं होतं.
-दिलीप बिरुटे