बीटलमेनिया - ४ -> 'Yellow Submarine'

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
15 May 2012 - 9:42 pm

१९६६ साली आपल्या लोकप्रियतेच्या शिखरावर असणा-या 'बीटल्स' संबंधी सर्वात मोठी 'कॉन्ट्रोव्हर्सी' निर्माण झाली. त्यांचा म्होरक्या जॉन लेनन याने एका मुलाखतीत सहज उद्गार काढले की आज 'बीटल्स' येशू ख्रिस्तापेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. त्यानंतर सुमारे आठवडाभर काहीच प्रतिक्रिया नव्हत्या. हेच उद्गार पुन्हा एकदा एका टीन एजर मुलांसाठीच्या डेटबुक नावाच्या मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर छापले आणि अमेरिकाभर गदारोळ सुरु झाला. काही लोकांनी हा जणू ख्रिश्चानिटीवरच हल्ला असल्याप्रमाणे 'बीटल्स' विरोधी सूर आळवणे सुरू केले. त्यांच्या विरोधात चर्चने मोहिम उघडली. त्यांनी तरुणांना चिथावणी देऊन बीटल्सच्या रेकॉर्ड्सची जाहिर तोडफोड केली. टेक्साससारख्या राज्यात बीटल्सच्या रेकॉर्ड्स पायाने तुडवून त्यांचे तुकडे तुकडे करणार्‍या टीन एजर मुलांची दृश्ये सतत टीव्हीवर दाखवली जाऊ लागली. रेडिओ स्टेशनने बीटल्सवर जणु अघोषित बंदी घातली. जॉनचं म्हणण सरळ होतं की हा माझ्या विधानाचा विपर्यास आहे. हेच जर मी टेलिव्हिजनबद्दल म्हणालो असतो तर कुणालाही त्यात काही वावगं वाटलं नसतं.

याच सुमारास त्यांचं एक गाणं आलं, "Yellow Submarine".

हे गाणं खास 'रिंगो स्टार'साठी तयार केलेलं होतं. त्यावेळी 'पॉल' आणि 'जॉन', लहान मुलांसाठी एखाद गाणं करण्यावर विचार करत होते आणि ते त्यांना 'रिंगो'साठी बनवायचं होतं. 'रिंगो' च्या आवाजाचा विचार करून त्यांनी हे गायकी ढंगात बनवायचं टाळलं. एक म्हातारा दर्यावर्दी आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांना त्याच्या प्रवासाच्या, साहसाच्या कथा सांगतोय अशी थीम घेऊन हे गाणं बनवलंय. या गाण्यात 'बीटल्स'नी अनेक प्रयोग केलेत. बॅकग्राउंडचे विविध आवाज त्याचेच द्योतक आहेत. खरं तर रिंगो हा काही गायक नव्हेच पण त्याच्या आवाजाला साजेसं आणि त्याला पेलवेल असं गाणं देण्याचा जॉन नि पॉलने इथे चांगला प्रयत्न केल्याचं कळतं. माफक आणि रिंगोला साजेशा अशा चुकांसह रिंगोने ते गायलंयही अगदी एखाद्या खुशालचेंडूसारखंच!

हे गाणं इंग्लंड मध्ये १ल्या क्रमांकावर १३ आठवडे राहिलं. पण ख्रिश्च्यानिटीविरोधी रिमार्क्समुळे अमेरिकेत ते कधीच १ल्या क्रमांकावर येऊ शकलं नाही.

'रिंगो'च्या खास गायनाच्या ष्टाईलसाठी हे गाणं जरूर ऐका......

'Yellow Submarine' हे गीत -

In the town where I was born
Lived a man who sailed to sea
And he told us of his life
In the land of submarines

So we sailed on to the sun
Till we found a sea of green
And we lived beneath the waves
In our yellow submarine

We all live in a yellow submarine
Yellow submarine, yellow submarine
We all live in a yellow submarine
Yellow submarine, yellow submarine

And our friends are all aboard
Many more of them live next door
And the band begins to play

We all live in a yellow submarine
Yellow submarine, yellow submarine
We all live in a yellow submarine
Yellow submarine, yellow submarine

{Full speed ahead Mr. Boatswain, full speed ahead
Full speed ahead it is, Sgt.
Cut the cable, drop the cable
Aye, aye, Sir, aye, aye
Captain, captain}

As we live a life of ease
Every one of us has all we need
(One of us, has all we need)
Sky of blue and sea of green
(Sky of blue, sea of green)
In our yellow submarine
(In our yellow, submarine, aha)

We all live in a yellow submarine
A yellow submarine, yellow submarine
We all live in a yellow submarine
A yellow submarine, yellow submarine

We all live in a yellow submarine
Yellow submarine, yellow submarine
We all live in a yellow submarine
Yellow submarine, yellow submarine

बीटलमेनिया - १
बीटलमेनिया - २
बीटलमेनिया - ३

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

15 May 2012 - 10:16 pm | प्रचेतस

मस्त गाणे आणि मस्त माहिती प्रासभाउ.

बीटल्स चं सर्वात पहिल्यांदा ऐकलेलं गा णं आहे हे माझं बहुधा.

माझ्याकडे जुन्या एल्पी आहेत. ये एकदा. माळ्यावरुन काढायला
उंच माणसाची गरज आहे.. आणि त्याचा प्लेयय र जड आहे
तो काढायला मजबूत माणसाची.

दोन्हीसाठी तूच योग्य

शिवाय त्या गाण्यांचा शौकीनही.

मस्त गाणं आणलंस. धन्यु.

मुक्त विहारि's picture

15 May 2012 - 11:12 pm | मुक्त विहारि

नेहमीप्रमाणेच सुंदर..

मिहिर's picture

15 May 2012 - 11:19 pm | मिहिर

हा लेख आणि एकूणच लेखमाला खूप आवडली.

पैसा's picture

16 May 2012 - 2:17 pm | पैसा

छान ओळख! गाण्याचे सगळे शब्द देतोयस हे फार छान!

महासंग्राम's picture

6 Oct 2016 - 2:22 pm | महासंग्राम

वाह... बिटल्स म्हणजे अगदी जिव कि प्राणच आमचा खूप सुंदर लेख ...

अवांतर : जॉन लेननच एक वाक्य आठवलं "Life is what happens to you while you're busy making other plans."