'बीटल्स'च्या इतर गाण्याशी तुलना करता त्यांचं एक गाणं हे खरंच त्यांचच आहे का असा विचार येतो, ते म्हणजे 'Yesterday'. या गाण्याचं क्रेडीट 'पॉल मेकार्टनी' आणि 'जॉन लेनन' या दोघांना दिलेलं दिसलं तरी हे गाणं फक्त 'पॉल'चंच आहे. गीत, संगीत आणि गायन सबकुछ 'पॉल मेकार्टनी'.
हे ऐकताना बीटल्सचं ट्रेड मार्क गाणं न वाटल्यानेच अनेक वर्ष याचा अंतर्भाव बीटल्सच्या अल्बम्स मध्ये केला जात नव्हता. पण अमेरिकेत 'सिंगल' म्हणून प्रकाशित झाल्यावर थोड्याच काळात चार्टसमध्ये पहिल्या नंबर वर ते जाऊन पोहोचलं. त्यानंतरच ते इंग्लंडमध्ये प्रकाशित होऊ शकलं.
असं सांगतात की 'पॉल'ने याची धून झोपेत किंवा स्वप्नात बनवली. अनेक दिवस त्याला वाटत होतं की ही चाल त्याने दुस~या कुणाची ऐकली आहे. संगीत-चोरीचा आळ येऊ नये म्हणून त्याने अनेक ठिकाणी ही धून वाजवून ती कुणाची नाहीये ना याची खात्री करून घेतली नि त्यानंतरच त्यानुसार शब्द रचना करून गाणं बनवलं. गाणं 'पॉल'चंच असूनही ते बीटल्सचंच म्हणून मानलं गेलं कारण त्यावेळेस त्यांना गाण्याची सामायिक क्रेडिट्स द्यायची होती.
१९६५ सालच्या या गाण्यात 'पॉल'चा क्लास लगेच समजतोय, नाही?
'Yesterday' चे लिरिक्स -
Yesterday, all my troubles seemed so far away
Now it looks as though they're here to stay
Oh, I believe in yesterday.
Suddenly, I'm not half to man I used to be,
There's a shadow hanging over me.
Oh, yesterday came suddenly.
Why she had to go I don't know she wouldn't say.
I said something wrong, now I long for yesterday.
Yesterday, love was such an easy game to play.
Now I need a place to hide away.
Oh, I believe in yesterday.
Why she had to go I don't know she wouldn't say.
I said something wrong, now I long for yesterday.
प्रतिक्रिया
14 Apr 2012 - 1:26 pm | अन्या दातार
काय अप्रतिम अन तरल चाल आहे! शब्दही सुंदर.
प्रासभौ, उत्तम निवड गाण्याची :)
रच्याकने, अजुन गविंची टिप्पणी कशी काय नाही आली अजुन???
14 Apr 2012 - 1:49 pm | मुक्त विहारि
सलाम.....पहिला त्या बीटल्स ला
आणि
दुसरा....तुम्हाला.... हे असे काहीतरी आम्हाला ऐकवता आणि त्या हिमेश पासुन दूर ठेवता....
(कानाला कर्क-रोग झाला तरी चालेल पन कर्ण-रोग नको)
कर्ण रोग= बेसुर गाणी ऐकणे