साधारण १९६८-६९ च्या सुमारास 'बीटल्स'पैकी 'जॉर्ज हॅरिसन' यानेही आपलं गीतकाराचं कसब दाखवायला सुरुवात केली आणि बीटल्स त्याची गाणीही गाऊ लागले.
आता बीटल्स केवळ परफॉर्मर्स राहिले नव्हते तर त्यांनी Apple Recordsच्या माध्यमातून बिझनेस मध्येही आपले पाय रोवायला सुरुवात केलेली होती. पण कलाकार लोकं या व्यापारी जगतात फारसे रमत नाहीत हे त्यांना लवकरच कळलं. रोज शाळेत जावं तसं Appleच्या ऑफिसात जायचं, अकाऊण्ट्स बघायचे, इथे सही-तिथे सही करत बसायचं, इंग्लंडच्या थंडीमध्ये हे काही त्यांच्यासाठी आनंदाचं काम नव्हतंच. विशेषत: जॉर्ज या दिनक्रमामुळे फारच पकला आणि तो एका निरभ्र उन्हाच्या दिवशी आपल्या मित्राकडे, 'एरिक क्लॅपटन'कडे ऑफिस बुडवून गेला. रुटीन गोष्टींनी थकलेल्या जॉर्जची सृजनशीलता तिथे उफाळून आली आणि एरिकची गिटार घेऊन त्याने तिथेच नवे गाणे लिहिले - "Here comes the Sun".
या गाण्यातील प्रमुख गायक स्वत: जॉर्ज आहे आणि रेकॉर्डिंगच्या वेळेला त्याला पॉल मॅकार्टनीने साथ केली आहे. रिंगो स्टार नेहमीप्रमाणेच ड्रम्सवर आहे आणि त्यानेच मध्ये एका ठिकाणी टाळ्यांनी छान इफेक्ट दिला आहे. असं म्हणतात की जॉन लेनन या काळात एका अपघातातून सावरत असल्यामुळे या गाण्याच्या ध्वनिमुद्रणात सहभागी झाला नव्हता.
या गाण्याच्या सुरूवातीपासूनच जॉर्ज एखाद्या मोठ्या ताणातून मोकळा झाल्याची एक भावना निर्माण करतो. सुरूवातीची अॅकॉस्टिक गिटार एकदम मूड बनवते आणि जॉर्ज गायला सुरू करेपर्यंत आपण एका सुंदर गाण्यासाठी तयार होऊन जातो. एकूणच मोकळ्या भावावस्थेतल्या जॉर्जच्या उल्हसित झालेल्या चित्तवृत्ती गाण्यात छान प्रकारे अभिव्यक्त होतात असं आपलं मला वाटतं. 'Here Comes The Sun' हे माझं 'जॉर्ज'च्या गाण्यामधलं ऐकलेलं आणि आवडलेलं पहिलं गाणं......
इथे गाणं छान ऐकू येतं
गीत -
Here comes the sun (doo doo doo doo)
Here comes the sun, and I say
It's all right
Little darling, it's been a long cold lonely winter
Little darling, it feels like years since it's been here
Here comes the sun
Here comes the sun, and I say
It's all right
Little darling, the smiles returning to the faces
Little darling, it seems like years since it's been here
Here comes the sun
Here comes the sun, and I say
It's all right
Sun, sun, sun, here it comes
Sun, sun, sun, here it comes
Sun, sun, sun, here it comes
Sun, sun, sun, here it comes
Sun, sun, sun, here it comes
Little darling, I feel that ice is slowly melting
Little darling, it seems like years since it's been clear
Here comes the sun
Here comes the sun, and I say
It's all right
Here comes the sun
Here comes the sun, and I say
It's all right
It's all right
छायाचित्रं आंतरजालावरून साभार
प्रतिक्रिया
12 Feb 2012 - 5:54 pm | अन्या दातार
एरिक क्लॅपटन तुमचा मित्र आहे काय हो आचार्य? कुठुन मिळवता इतकी माहिती??