http://www.misalpav.com/node/21157
सहसा स्वप्न पडत नाहीत मला, आणि पडलीच तर लक्षात रहात नाहीत, पण काही दिवसांपुर्वी पाहिलेले एक स्वप्न मात्र राहिल लक्षात, मी एकटाच एका शांत समुद्र किनारी बसलो आहे , आजु-बाजुला कोणीच नाही ,संध्या काळची वेळ, मंद-मंद , गार वारा वहातो आहे, लाटा सरावल्या सारख्या किनार्यावर धडकताहेत आणि पुन्हा मागे जात आहेत, हळु- हळु त्या लांटाचा वेग वाढतो, लाटा उंच व्हायला लागतात, काही क्षणातच प्रत्येक लाटे बरोबर एक प्रेत माझ्या पुढ्यात येत, पण परत जात नाही, तसच पडुन रहात, लाटा जातात, परत येतात नव्याने दुसरं प्रेत घेवून, बघता- बघता माझ्या समोर प्रेतांचा खच पडतो. त्या प्रेतातला एक-एक चेहरा स्पष्ट होत जातो, हा योगेश, तो मन्या, तो सुन्या, तो मधु, ती शालु वहिनी, संग्राम............, अचानक सगळे माझ्याकडे पाहुन छद्मी पणे हसायला लागतात, जणु काही ते सुटलेत संसाराच्या मोहातुन, जगाच्या अनावर झालेल्या पाशातुन आणि मी अजुन जखडलेला आहे !! जसा च्या तस्सा !! दगड झालाय माझा .....भावनाहीन दगड... ...
घामाघुम होवुन बाहेर पडलो बेडरूम मधुन ....
गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये.......एके दिवशी पाऊस जरा जास्त होता. ( कोणाला आठवत असेल तर, त्या दिवशी लोहगावात विक्रमी पाऊस पडल्याची नोंद झाली, तो दिवस ! ) मी ऑफिसच काम घरून करत होतो. दिवस सरायला आला होता, पण पावसाचा मात्र अजिबात सरायचा मुड नव्हता. तशात मेसेज आला की गारूडी वस्ती मध्ये काही घरांची पडझड झाली आहे, लवकर या, मदत हवी आहे. लोहगाव पासुन, निरगुडे रस्त्यावर साधारण ३ किमी दुर असलेल्या वस्ती मध्ये, १०-१२ घरे असतील, काही ईनामाची जमीन आणि शेत मजुरी च्या जीवावर , सामाजिक विषमतेत, स्वता:च अस्तित्व शोधणारे काही तरूण आहेत. उघड्या अंगावर फटकारे मारून जगण्यापेक्षा, लोहगाव च्या कॉलेजात शिक्षण घेवुन उद्याची स्वप्ने पाहणारे एक-दोन जिवलग ही झाले होते. त्यातल्या च एकाने मेसेज टाकला होता.आम्ही इथुन जुजबी सामान ( बिस्किटे, प्रथमोपचाराच सामान, चादरी, टॉर्च लाईटस), एका सिक्स सिटर मध्ये टाकल आणी निघालो.
पाऊस अंगावर येत होता, अंगावर असलेल जॅकेट, पावसापासुन संरक्षण करण्याकरता अपुर पडत होतं, पोरं कसला ही विचार न करता यायला तयार झाली ही किमान माझ्या साठी तरी , त्या वेळी, एक अचिव्हमेंट होती. तिथे पोचलो. खडबड्या रस्त्यामधुन पोचता-पोचता अंधारल. चार पाच घरं अक्षरशः नाहीशी झाल्यासारखी वाटत होती. एका लिंबाच्या झाडाच्या आडोश्याला मंडळी हताश आणि सुन्न बसलेली होती, मी विचारले " काय झालं रे ? " , " अक्का आणि **** दिसना रे नाहीये " . मला कसनुस झाल, समोर राडा-रोडा , ढिगारे, भिंतीचे तुकडे -ताकडे !! " " उपसण्याशिवाय पर्याय नव्हता " , ज्याला जे हातात येईल त्याच्या सहाय्याने राडा-रोडा उपसु लागले, माझ्या हाताला घमेल लागल !! कोणी शर्ट काढुन ठेवल, कोणी ईतरांच्या वाचलेल्या घरात बाकीच्यांना हलवण्यासाठी गेले.
एका भिंतीच्या तुकड्या खाली अक्का सापडली. कपाळाला जखम, पावसाच पाणी अंगावर पडल, तशी ती कण्हली, उचलुन झाडापाशी आणल, जरा सावरा-सावर झाल्यावर, एकाने **** कुठय म्हणुन विचारले. तिने ईशारा केला. त्या दिशेला सगळेच धावले !! वेगाने ढिगारा उपसल्या जात होता , अंधारलेल्या त्या राड्या-रोड्याच्या चिखलात एक हात दिसला, जराशी बोटांची हालचाल झाल्यासारखी वाटली म्हणुन सर्वांनी हळु-हळु उपसायला सुरुवात केली...पण ..आम्हाला तिथे, त्या रात्री, त्या हाताशिवाय दुसर काहीच सापडलं नाही .............................तिसर्या दिवशी 'प्रभात' ला एका कोपर्यात एक छोटीशी बातमी होती. " विक्रमी पावसाच्या तडाख्याने एका अल्पवयीन मुलाचा मृत्यु ...."
राग येतो, कधी डोळ्यांत पाणी येत ! असाच एकदा बोलता-बोलता कट्टयावर प्रसनदां समोर रडलो होतो. कधी कधी वाटत, हे संगळ इथं आंजावर का लिहावं ? लोक चांगल हसत-खेळत असतात, खुष असतात, क्षणभर विरंगुळा मिळतो. मग उगा का ? स्वार्थ म्हणा हवं तर, व्यक्त झाल्याने, माझी अश्या काही प्रसंगामुळे., मानसिक कुचंबणा, मनाला आलेली मरगळ थोडी का असेना, कमी होते. मला ही पहाल टवाळकी करताना कधे-मधे, तो ही एक सावरण्याच्या प्रयत्न..पण पुन्हा एकांतात मी सापडलो की.........
तो दिवस जणू लोहगाव साठी 'सोनियाचा दिनु 'होता, जागो-जागी त्याचे च फ्लेक्स लागले होते, त्याने कामच तस केले होते, बरोब्बर सत्तावीस वर्षापुर्वी जन्मुन, रस्त्याकडेच्या चाळीस एकर शेतीच्या मालकाला बाप बनविले होते. शिवाय ज्याला म्हणे पुण्याचा भावी गोल्डमॅन बनण्याची इच्छा आहे, त्याला आपली बहिण दिली होती. त्यामुळे फ्लेक्स फक्त लोहगावाच्या चौकात नव्हते, कात्रज, संगमवाडी, येरवड्याच्या चौकात ! फुल्ल टु फॉर्मात होता तो !! सख्खा काका जरी अंथरुणात कोम्यात असला तरी ही !! ...त्या दिवशी चैत्रालीला " नाद करायचा नाय " साठी पाचारण करण्यात आले होते. आपल्या पोरांना दारू कमी पडु द्यायची नाही याबद्दल च्या सुचना देशी दारू दुकान, बियर शॉपी आणि चोरून मिलीटरी ची दारु विक्रेत्या ला देण्यात आली होती. अर्थात त्यात फुकटचं हात धुवुन घेणारे ही बरेच होते, दत्ता त्यातलाच एक !!
दत्ता ला पहिल्यांदा मी भेटलो , तेव्हा तो माझ्या घराला रंग देण्यासाठी आला होता, त्याचे कपडे जाहिरातीत ( नेरोलॅक ई.) मध्ये जसे स्वच्छ पेंटर असतात तसे होते, मुळात काही अंशी मजुर कॅटॅगिरी विषयी असणारा गैरसमज दुर व्हावा अशी त्याच रहाणीमान होत. मी त्या आधी पाहिलेले काही पेन्टर्स म्हणजे, साधारण दाढी खुंट वाढलेली , अंगात एकोणिसशे पंचेचाळीस चे रंगावलेले कपडे, दुपारच्या जेवणाआधी अॅडव्हान्स मिळाला की परतल्यावर तोंडातुन हातभट्टी चा घमघमाट येणारे, चार वाजता पुन्हा हात - पाय धुवुन उर्वरित पैसै घेवुन पसार..अर्थात सगळेच नाही...पण दत्ता मात्र त्याहुन प्रचंड वेगळा होता. आला तेव्हा स्वच्छ होता, कपाळा ला गंध होत.. कपडे बदलल्यावर ही नेटका होता ते संध्या काळी , मजुरी चे पैसे हातात मिळे पर्यंत !!
पुढील दोन वर्षांत तो पेन्टींग ठेकेदार झाला, कामे मिळु लागली, गुंठामंत्रीं बिल्डर ला त्याच रेकेमंकेडशन देत होती. त्याच चांगल होत होत, दुसर्या बाजुला गावात एक वेगळी कुजबुज चालु होती, दत्ताची बायको ' छु ' झाल्याची !! आणी एक दिवस लई मोठ्ठा तमाशा झाला गावात !! खुद्द दत्तालाच ती रंगे-हाथ सापडली, दत्ता मनातुन खचला गेला, सरळ वाट धरली ती बारची ! नंतर लई भांडण झाली, त्या रात्री नवरा-बायकोच्या भांडणात कोणी पडल नाही , कोण कुठे झोपल हे ही ठावुक नाही, पण सकाळी दत्ता ची बायको गायब झाली ! आणि दोन दिवसांनी कळल की फ्लेक्स वाल्याचा चुलत-भाऊ पण गायब होता !! परतली दोघं पाच महिन्यांनी, पोटुशी होती ती, बळ आणि पैसा वापरुन दत्ताशी रितसर घटस्फोट घेतल्या गेला !! त्याने तरी दुसरे काय केले असते म्हणा, पण यामूळे एका देवभोळ्या माणसाचा बळी गेला आणि एक नवा दत्ता जन्माला आला.......बेवडा दत्त्या !!!
भर दुपारच्या उन्हात, पिवुन, स्वताशीच बडबडत उभा असणारा दत्त्या म्हणजे काही नवीन सीन नव्हता, माणूस चार तासांत आप्तस्वकीय मेला आहे हे विसरते, तिथे दत्त्या कोण ? त्या ही दिवशी , लोहगावात फ्लेक्स गजबजत असताना दुपारी चार च्या सुमारास मला तो दिसला होता, चौकातच ! मळवटलेल्या, फाटक्या कपड्यांमध्ये !! स्वता शी बोलत, क्षणभर वाटल, त्याच्याशी बोलाव त्याला सांगाव , सोड हे सगळ, मनाला यातना करुन स्वताला त्रास देवु नकोस ...पण नाही बोललो...का ते माहीत नाही ...माझ्या कामासाठी मी निघुन गेलो...आठ-सव्वा आठ च्या सुमारास परतलो, माझ्या ठराविक ठिय्या वर बसलो असताना खबर आली की फ्लेक्स वाल्याला , त्याच्या दाजीनी ११ तोळ्याचं कड गिफ्ट दिल , आता कार्यक्रम च जाहीर होता मग काय लपुन रहाणार म्हणा !! थोडा वेळ रेंगाळलो आणि घरी जायला निघणार तेव्हाच ....एक खबर अजुन आली...दत्त्या मळ्यात काळा-निळा होवुन पडलाय.....
साप- बिप चावला का काय ? गेलो मळ्यात ! खरच काळा-निळा झाला होता , तोंडातुन फेस..पटा-पट मळ्यात अॅम्ब्युलन्स-व्हॅन आणली, ससुन ला गेलो. तिथे डॉक्टर ने चांगल दहा वेळा चेक करुन सांगीतले की आणल नसतं तरी चालल असतं, पेशंट केव्हाच गेलाय, तिथल्या पोलीसांनी जरा सहकार्य दाखविलं, " ईथ ठेवलत तर दोन-चार दिवस, पोस्ट-मार्टम आणि ह्यांव-त्यांव करण्यात च जातील " त्या पेक्षा.........ईन्शुरन्स नव्हता!! माग रडणार कोणी नाही , गप घेवुन आलो. येताना , त्याच्या बरोबर जो होता त्याला विचारले " कस काय झाल रे " ....
" मण्यार होती मण्यार! ह्यानी पाय दिला त्यावर तेव्हा घोट्याच्या वरच्या नसाला चावली, हे बेणं नशेत होतं, ऊचलुन धरली हातानं, तवा मनगटावर चावली, मग म्हणे मी शंकर आहे शंकर ! गळ्यात धरली , मग गळ्याला चावा घेतली, मी पळत सांगाय येईपर्यंत ........... "
रात्री साधारण अकरा-सव्वा अकरा वाजता, लोहगावच्या स्मशानभुमीत दत्त्या जळत होता, आणि 'डिजे च्या कर्णकर्क्कश साऊंड मधुन आवाज येत होता...
नाSSद कराSSSSयचा नाSय , कुणीSबी नाSSद कराSSSSयचा नाSय ............
प्रतिक्रिया
5 Apr 2012 - 5:06 am | नंदन
...
5 Apr 2012 - 5:29 am | यकु
मी अर्धा तास विचार केला काय प्रतिक्रिया लिहायची त्याचा.
जे जे लिहून पाहिलं ते सगळं डिलीट मारावं लागलं.
पुन्हा वाचून पाहिलं तरी वर जे लिहिलंय त्यावर काहीच सुचत नाहीय.
प्रत्यक्ष भेटीत कधी विषय निघाला तर याबद्दल तुझ्याशी नक्कीच बोलायला माझ्याकडे काहीतरी असेल अशी आशा आहे.
5 Apr 2012 - 6:00 am | सहज
खर आहे!
आणि हे असे सुन्न झाल्यावर मग पुन्हा दिवसभर अन्य धाग्यावर ढांगचिक प्रतिक्रिया द्यायच्या म्हणल्या तर ह्या धाग्याशी, इथल्या भावनांशी अप्रामाणीक झाल्यासारखे, निबर झाल्यासारखे नाही वाटत?
निदान आज ही शेवटची प्रतिक्रिया.
5 Apr 2012 - 5:23 pm | यकु
>>>खर आहे!
>>>आणि हे असे सुन्न झाल्यावर मग पुन्हा दिवसभर अन्य धाग्यावर ढांगचिक प्रतिक्रिया द्यायच्या म्हणल्या तर ह्या धाग्याशी, इथल्या भावनांशी अप्रामाणीक झाल्यासारखे, निबर झाल्यासारखे नाही वाटत?
निदान आज ही शेवटची प्रतिक्रिया.
---- हे वाचलं तेव्हाच वाटत होतं खरंच ही आजची शेवटची प्रतिक्रिया असायला पाहिजे, पण मन मानत नाही. दुसर्या धाग्यांवरही मनात आलेल्या प्रामाणिक भावनांचं काय? त्या अँगलनं अप्रामाणिकपणा तिकडेही होईलच.
5 Apr 2012 - 5:50 am | रामपुरी
...
5 Apr 2012 - 5:57 am | सहज
नाSSद कराSSSSयचा नाSय
5 Apr 2012 - 6:52 am | पिंगू
प्रतिक्रिया काय द्यावी सुचत नाहीये.. तूर्तास एवढेच..
- पिंगू
5 Apr 2012 - 7:15 am | शिल्पा ब
अरे बापरे!! ही खरं तर नुसतं लिहायचं म्हणुन प्रतिक्रीया झाली.
मनात आलं ते : समजा गेली बायको पळुन तर जाउदे. स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करुन घेतल्याने कोणाला काय फरक पडणार आहे? स्वतःचं आयुष्य मजेत जगायचं हे कोणीतरी त्याला सांगायला हवं होतं.
दुर्दैवाने कोणत्याही कारणाने असं स्वतःच्याच आयुष्याची राख करणारे लोकं भेटले तर त्यांना हे सांग. शेवटी काय ए ना की कारण काहीही असो, स्वतःचे हाल करुन घेण्यात काहीच अर्थ नसतो.
:( असोच आता. बाकी नेतेमंडळींच्या उचापतींचे क्या कहने!!
5 Apr 2012 - 7:23 am | रेवती
वाचवत नाही असं काही.
5 Apr 2012 - 9:44 am | प्रचेतस
दाहक
5 Apr 2012 - 10:16 am | साबु
..
5 Apr 2012 - 10:32 am | sneharani
काय बोलावं, लिहावं सुचत नाही!सुन्न!
5 Apr 2012 - 11:07 am | निश
सुहास साहेब, एक शब्द सुन्न झालोय लेक वाचुन मी.
आता पुन्हा वाचला ३ वेळा परत तेच सुन्न होउन गेलोय मी.
लेख रुपी कट्यार काळजातच घुसली....
5 Apr 2012 - 11:18 am | गवि
झटके देऊन अन हलवून सोडणारं लेखन.
5 Apr 2012 - 12:03 pm | श्रावण मोडक
:(
5 Apr 2012 - 12:29 pm | प्यारे१
काही बोलणार नाही....!
दुसरं काय करु शकतो म्हणा?
5 Apr 2012 - 2:04 pm | प्रास
काळीज चिरत जाणारं चरचरित लेखन.
5 Apr 2012 - 2:17 pm | स्मिता.
खरं तर हे वाचून एवढी सुन्न झालेय की काय बोलावं कळत नाहीये. त्यामुळे पोच देण्यापुरता हा प्रतिसाद.
तुम्ही लिहावसं वाटेल तेव्हा लिहित रहा. ते वाचून किमान आम्हाला आमच्यातल्या संवेदना अजून मेल्या नसल्याची तरी जाणीव होते.
5 Apr 2012 - 2:23 pm | स्पा
+१
सुहास
__/\__
5 Apr 2012 - 7:56 pm | सुहास..
तुम्ही लिहावसं वाटेल तेव्हा लिहित रहा. ते वाचून किमान आम्हाला आमच्यातल्या संवेदना अजून मेल्या नसल्याची तरी जाणीव होते. >>>
धन्यवाद
5 Apr 2012 - 2:22 pm | जाई.
......
5 Apr 2012 - 2:32 pm | ढब्बू पैसा
सुन्न! बास्स बाकी काही नाही :(
5 Apr 2012 - 2:39 pm | विसुनाना
.
5 Apr 2012 - 3:51 pm | चिगो
भयंकर लिहीतोस रे बाबा.. :-(
5 Apr 2012 - 4:15 pm | मी-सौरभ
............
5 Apr 2012 - 4:58 pm | आचारी
नि:शब्द !!
5 Apr 2012 - 5:11 pm | स्वातीविशु
विदारक अनुभव लिहिला आहे तुम्ही. वाचून डोकं सुन्न झालं. :(
5 Apr 2012 - 5:39 pm | परिकथेतील राजकुमार
इथे मी काहीतरी भावूक प्रतिक्रिया देणार आणि रात्री दोन घोट मारत आयपीएल बघणार.
त्यापेक्षा नकोच प्रतिक्रिया. :)
5 Apr 2012 - 5:39 pm | ५० फक्त
आता खरंच सुखी मरणाचे किंवा मरणाचे सुखी अनुभव लिहायला घ्यावेत असं वाटतंय, जे मागं उरतात ते तरी कुठ आयुष्यभर दुखी राहतात, मग जो मरतो तोच दुखात असतो असं का मानायचं ?
5 Apr 2012 - 6:27 pm | गणपा
तुला वाईट्टच लिहिता येत का रे?
:(
5 Apr 2012 - 8:27 pm | पैसा
काय लिहितोस रे!
10 Apr 2012 - 4:27 am | स्पंदना
आधी लिहित नाही !
अन लिहिल
की वाचवत नाही.
10 Apr 2012 - 8:13 am | पाषाणभेद
दोन्ही प्रसंग सुन्न करून सोडणारे आहेत. सुहास तुझी मात्र कमाल आहे दादा! मानलं तुला.