स्वयंप्रेरणा :- ज्या http://www.misalpav.com/node/21154 या धाग्या वरुन हे गीत स्फुरले,
त्या धाग्याचे हे गीत म्हणजे स्वयं-उपशमनच आहे ;-)
भगवंता रे भगवंता,खरच सांग.....हे काय झाले?
टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले? ॥धृ॥
तवा तापवुन वाटी मला,त्यांनीच होती हतात दिली।
पण रवा-मसाला सांगुन त्यात,यांनी अंडी मॅश केली॥
फसवुन माझ्या हतात वाटी,ठेऊन ते पळुन गेले।
टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?॥१॥
ग्यास बारिक ठेऊन मी,टाकू लागलो घट्टं डोसा।
पिठच मेलं अंग सोडी,जणु तवा व्हावा नकोसा॥
आच नीट ठेऊनही,डोसे बरेच जळुन गेले।
टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?॥२॥
खायला येऊ असे सांगुन,काही खरच येऊन गेले।
मार्केटिंग करणारे मात्र, मार-के-टिंगss करुन गेले॥
वास नीट घेतला तेंव्हा,कळले नेमके कुठे जळले।
टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?॥३॥
पिठात नाक खुपसलं तेंव्हा, अंड्याचा त्यात आला वास।
अंडं चिकट/बुळबुळीत म्हणुन,पीठ अमल्याचा झाला भास॥
टाकुन दिले पीठ मी अन,कालचे दुकान बंद केले।
टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?॥४॥
आता दुकान लावताना मी,अंडीच घेऊन बसणार आहे।
मग जे डोसा कुरतड्तील त्यांना,बुदुक बुदुक मारणार आहे॥
चला आता जातो मीही,आज लैच काम केले।
आज पासुन नवा धंदा,जे काही केले ते आंम्हीच केले॥५॥
प्रतिक्रिया
29 Mar 2012 - 3:34 pm | आत्मशून्य
.
29 Mar 2012 - 3:36 pm | आत्मशून्य
.
29 Mar 2012 - 3:47 pm | सांजसंध्या
मेरा नाम चिन चिन चू..
या चालीवर मस्त बसतंय :D
बाकि डोसा आम्लेट.. हहपुवा
29 Mar 2012 - 4:02 pm | अमृत
प्रकार इकडे साऊथ मधे कॉमन आहे कवयित्री बाई. :-)
अमृत
29 Mar 2012 - 10:33 pm | सांजसंध्या
ओह ! माहीत नव्हतं हे.. थँक्स
29 Mar 2012 - 4:09 pm | सूड
>>मेरा नाम चिन चिन चू..या चालीवर मस्त बसतंय
कैच्याकै. 'जाई-न विचारीत रानफूला' या चालीवर आत्ताच म्हणून पाह्यलं, झक्कास जमतंय.
29 Mar 2012 - 4:29 pm | वपाडाव
असं बोलु कसं शकतोस रे... तुला म्हैत्ये का कुणाला बोलतो आहेस ते? जीव प्यारा नाही का तुला !!!
29 Mar 2012 - 10:32 pm | सांजसंध्या
अरेच्चा.. !
इतकी जळजळ ?
29 Mar 2012 - 6:45 pm | अत्रुप्त आत्मा
@मेरा नाम चिन चिन चू..
या चालीवर मस्त बसतंय >>> येस...येस... एक नंबर बसतीये चाल... व्वा..व्वाss...व्वा...व्वाss...! :-)
29 Mar 2012 - 3:50 pm | वपाडाव
भटजीबुवा, आसलं काहीतरी होउ द्या...
29 Mar 2012 - 4:04 pm | अमृत
मस्त जमलाय. बाकी आपल्या विडंबन निपुणतेवर आम्ही फिदा आहोत हे सांगणे न लगे.
अमृत
29 Mar 2012 - 4:43 pm | प्रचेतस
अफाट तुमची काव्यप्रतिभा. _/\_
आमचेही दोन.
विडंबनाच्या तव्यावर भाजले तुम्ही फाफडे
पाणी सगळे वाहून गेले, उरले रिकामे डबडे.
भटजी असूनी तुम्ही खाल्ले की हो पापलेट
आता तरी कळ्ळं का बाहेर का आले आम्लेट
29 Mar 2012 - 4:48 pm | रमताराम
सद्गुरू! सद्गुरु! चला दोन विडंबक गुर्जी सापडले. गंडाबंधन कधी करायचं वल्लीशेट?
त्या सूडरावांना म्हणावं अशा एखाद्या गुरुगिरुचं पाय धऽर नि नीट बशीव की रेऽ नीऽटं. का उगाच धागे टाकून गावभर पुसायला लागलाऽय म्हंतो मीऽ.
29 Mar 2012 - 5:02 pm | पियुशा
__/\__
आमच्या बी दोन ओळी आपकी शान मे ;)
हे अत्रुप्त आत्म्या हे तु काय केले?
वाचुनी तुझी विडंबन, मी हसुन हसुन मेले
अचानक का अशी तुझ्या प्रतिमेस बहार आली
सुस्तावलेल्या समस्ताच्या कि - बोर्ड ला जाग आली
लाविले तु मोगर्याचे रोप्,त्यास धोतर्याचे फुल का आले ;)
अन वर म्हणतसे " का हसती मज मी निरागस ,बाकी सगळे दुष्ट मेले ;)
29 Mar 2012 - 5:13 pm | अमृत
तुला पण पछाडलं म्हणायचं या अ. आ. नी. सध्या या पछाडण्याचा प्रादुर्भाव झालेला आहे मिपा वर.
कृ. ह. घे.
अमृत
29 Mar 2012 - 6:43 pm | अत्रुप्त आत्मा
मरू नकोस पिवशा तू,अता आमच्या धंद्यात सामिल हो...
केस-सुटलेली कविता आली,तर बांध तिच्यावर विडंबनाचा बो ;-)
माझ्या प्रतिभेस बहार अशीच अचानक येत असते...
तुलाही जमतय,तूही ये,हळूहळू आस्ते...आस्ते...
मोगर्याच्या जागी धोत्र्याचे बी,फसवुन माझ्या हतात दिले
व्वा....!तुलाही चांगलच कळतय की,कोण निरागस,कोण-दुष्टं** मेले**... ;-)
**>> पिवशाचा हा दुष्टांवरचा निरागस राग पहाता,आंम्हाला-दार उघड बये,दार उघड... या चालीवर... राग अवर बये,राग अवर... असे विडंबन करायचा आदेश अंतर्मन-बांदेकरांकडुन येत आहे.. ;-)
29 Mar 2012 - 6:27 pm | अत्रुप्त आत्मा
फाफडे भाजायला आम्हाला,भरिस पाडलं तुंम्ही
आणी विकायच्या वेळी,नेमके झालात कमी ;-)
भटजी असुन आंम्ही,कुठे खाल्लं पाप-लेट
आता कळ्ळं कसं येतं,अचानक बाहेर आम्लेट :-p
29 Mar 2012 - 10:09 pm | प्रचेतस
सतत विडंबने टाकूनी नवकवींवर बाण सोडलात तुम्ही
ढाल घेऊनी तो अडवाया मध्येच उभे राह्यलो आम्ही.
ही विडंबने आहेत गंमतीशीर मनात ठेवू नका अढी
डोश्याऐवजी आम्लेट येऊनी पातळ का हो तुमची कढी. :P
29 Mar 2012 - 11:42 pm | अत्रुप्त आत्मा
@सतत विडंबने टाकूनी नवकवींवर बाण सोडलात तुम्ही
ढाल घेऊनी तो अडवाया मध्येच उभे राह्यलो आम्ही. >>> नविन माहिती ;-)
@ही विडंबने आहेत गंमतीशीर मनात ठेवू नका अढी>>> ब्वार..ब्वार...
डोश्याऐवजी आम्लेट येऊनी पातळ का हो तुमची कढी. >>>
29 Mar 2012 - 5:25 pm | सुहास झेले
जबरदस्त !!!
वल्लीशेठ तुमच्या दोन ओळी पण एकदम भारी ... ;)
29 Mar 2012 - 6:09 pm | अमितसांगली
कवितेपेक्षा विडंबनच जास्त आवडायला लागले आहे .......
29 Mar 2012 - 6:30 pm | सुकामेवा
जबरदस्त !!! एक नंबर हसुन हसुन पक्की वाट लागली आहे ....................
बाकी वल्लीनी पण इडंबन करुन त्यात छान भर घातली आहे
वाचुन इडंबन कलिजा खलास झाला
इडंबन करणारर्याना आम्ही मुजरा केला |
29 Mar 2012 - 7:54 pm | सोत्रि
:D
खरंच मूळ कविताच न लिहीता डायरेक्ट विडंबन लिहीता येते का रे भाऊ ?
- (विचारात पडलेला) सोकाजी
29 Mar 2012 - 8:33 pm | अत्रुप्त आत्मा
@डायरेक्ट विडंबन लिहिता येतं का रे भाऊ?>>> :-D
मूळ दारवां शिवाय कॉकटेल करण्याइतकच सोप्पं आहे ते...! ;-)
29 Mar 2012 - 10:24 pm | सूड
तुम्हाला मॉकटेल म्हणायचं आहे का ?
29 Mar 2012 - 11:48 pm | सोत्रि
धन्यवाद सूडक्या !
- (आभारी) सोकाजी
30 Mar 2012 - 12:14 am | अत्रुप्त आत्मा
@तुम्हाला मॉकटेल म्हणायचं आहे का ? >>> तसं म्हटलं तरी फारसा फरक पडत नाही,त्यालाही काही मुळ घटकद्रव्य(सोडा/सरबते,स्क्वॅश) लागतातच... ;-)
29 Mar 2012 - 7:58 pm | जेनी...
मरनार मी एक दिवस .ही दुसरि वेळ आहे बर का :(
आत्मोजि हे चुकिच आहे ..
आज्पासुन हापिसात मिपा उघडायचा नाहि .
बेक्कार बेक्कार हसवता तुम्हि ..
जय हो विडंबन बाबा कि :D
:D
29 Mar 2012 - 8:09 pm | किसन शिंदे
भटजी बुवा,
तुमची काव्यप्रतिभा जबरदस्त आहे यात वादच नाही पण अलिकडे तुम्ही वारंवार लिहीत असलेली विडंबनं वाचून खुप कंटाळा आलाय.
तुमच्याकडून आता एखाद्या गंभीर काव्याची अपेक्षा आहे. कधी लिहताय बोला?
29 Mar 2012 - 11:46 pm | अत्रुप्त आत्मा
@पण अलिकडे तुम्ही वारंवार लिहीत असलेली विडंबनं वाचून खुप कंटाळा आलाय. >>> जी किसनद्येवा... मान्य हाय... :-)
@तुमच्याकडून आता एखाद्या गंभीर काव्याची अपेक्षा आहे. कधी लिहताय बोला?>>> शिरियसली इचार करनेत येइल... प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद :-)
30 Mar 2012 - 10:34 am | मी-सौरभ
जोवर पडतायत तोवर विडंबन पडू द्यात...
एकदा(चं) शिरेस झालात की मंग काय खरं नाय :)
धन्याच्या उदा. वरन बोध घ्यावा ही नम्र विनंती.
(तुमचा हितचिंतक माणुस)
29 Mar 2012 - 8:55 pm | बॅटमॅन
अत्रुप्त आत्म्याचे त्रुप्त करणारे विडंबन :) झकास जमलंय.
1 Feb 2016 - 7:12 pm | सूड
कविता वर आणतोय.
1 Feb 2016 - 11:31 pm | अन्नू
शैतान खुश हुआ!
2 Feb 2016 - 7:58 am | अत्रुप्त आत्मा
दुत्त दुत्त!
2 Feb 2016 - 8:42 am | प्रचेतस
निव्वळ म हा न.....
2 Feb 2016 - 10:14 am | अत्रुप्त आत्मा
2 Feb 2016 - 3:39 pm | सूड
अश्लील!!
2 Feb 2016 - 3:44 pm | पगला गजोधर
हातात धरुन तर उभे आहेत गुरुजी, त्यान्ची तलवार हो...
2 Feb 2016 - 4:50 pm | अत्रुप्त आत्मा
पगलाजी,
जे त्यांच्या डोळ्यात ठेवलय, ते आपल्या मनात नैय्ये ना!..
2 Feb 2016 - 4:56 pm | पगला गजोधर
काय तुमच्या मनांत, सांगा त्यांच्या डोळ्यात कानांत …
2 Feb 2016 - 5:29 pm | अत्रुप्त आत्मा
कान त्यांचा त्यांच्या मापाचा , कसा-भरेल ???,,, कुणी ठरवायचा? ;)
2 Feb 2016 - 6:43 pm | सूड
होय हो होय!! तुमच्या मनात लिबलिबित गोष्टी असतात ते विसरलोच होतो मी!! =))
2 Feb 2016 - 6:44 pm | सूड
म्हंजे, जिल्बी, आम्लेट, डोसा असं हो!!
2 Feb 2016 - 7:47 pm | अत्रुप्त आत्मा
@तुमच्या मनात लिबलिबित गोष्टी असतात ते विसरलोच होतो मी!! >> अगदी अगदी.. जाणीवपूर्वक लक्षात ठेवावं अश्याच तर मुल्य-वान गोष्टी टुम्ही लक्षात ठेविता.. होय की नै..सूडूक्सर!
2 Feb 2016 - 8:02 pm | सूड
तुमच्याच शब्दरचना!! लक्षात न राहतील तर काय? =))
2 Feb 2016 - 9:52 pm | खटपट्या
अरेरे, हे ऑमलेट खायचे राहुन गेले होते. मस्त झालेय...
3 Feb 2016 - 12:53 pm | नाखु
काव्यप्रतीभा "सोळात"ही तितकीच भेदकपणा टिकवून आहे.
सभीक्षक नाखु