आमची प्रेरणा:- http://www.misalpav.com/node/21151
बंद बनियन आटलेला
भायेर येती बेंबी
चुन्याची निवळी जणू
पिचपिचीत
घामाचा हा वास
कोंडे आत श्वास
फाडावा तो बनियन
जीवं-घेणा
ढेरं जणू सागर
बेंबी उपडी घागर
प्यांटही सैलू
घालीतसे
तिची माझी साथ
बनियन मधे प्यांट
भायेर येई खास
डोकाऊनी
(न घातलेली)-टिपः-घट्ट बनियन घालायचा पहिलाच प्रयत्न आहे... उसवले तर शिऊन घ्यावे
प्रतिक्रिया
28 Mar 2012 - 11:38 am | सुहास झेले
हा हा हा हा.... प्रचंड भारी ;)
28 Mar 2012 - 11:46 am | गणामास्तर
मेलो मेलो..ठार मेलो..!!! हसून हसून जीव जायचा बाकी राहिलाय आता फक्त..
भटजी बुवा कुठे फेडाल हि पापे...?
28 Mar 2012 - 12:22 pm | अत्रुप्त आत्मा
@भटजी बुवा कुठे फेडाल हि पापे...? >>> इथेच... :-p
.............................................तुम्हाला हसवुन हसवुन ;-)
28 Mar 2012 - 11:47 am | प्रचेतस
तुमच्याच नुकत्याच पंख लागलेल्या विडंबनाची आठवण झाली.
हे विडंबन तरी राहू दे अशी त्या भोळ्या सांबाकडे प्रार्थना. :P
28 Mar 2012 - 12:17 pm | अत्रुप्त आत्मा
@तुमच्याच नुकत्याच पंख लागलेल्या विडंबनाची आठवण झाली. >>> ती कशी विसराल आपण... दु दु दु... अ***** :-p
@हे विडंबन तरी राहू दे अशी त्या भोळ्या सांबाकडे प्रार्थना.>>> काहितरी वास येतोय.
30 Mar 2012 - 9:10 am | अग्यावेताळ
कोणाला अग्यावेताळ म्हणताय हो तुम्ही ?
इथे एक आहेच.
30 Mar 2012 - 10:24 am | अत्रुप्त आत्मा
@कोणाला अग्यावेताळ म्हणताय हो तुम्ही ? >>> ते आपण नाही,हे आपल्याला कळुन चुकलच असेल,नसेल तर आज अवतरलात तसेच अधुन/मधुन येत रहा...एक दिवस चुकुन-कळेल...की आपण ते नाही... ;-) ह्ही: ह्ही: ह्ही:
@इथे एक आहेच. >>> तुंम्ही उघड/उघड आहात..छुपे किती आहेत ठाऊक आहे का..? नसेल तर वरचाच सल्ला... येत रहा....
अवांतरः- आपण नावावरुन तरी सजातीय,एकधर्मी ;-) आहोत... हे आपणास मान्य आहे का..? असेल, तर मग धिंगाण्याला अविट गोडी येणार...
अग्यावेताळ-अत्रुप्त आत्मा
30 Mar 2012 - 10:32 am | अग्यावेताळ
नक्कीच येत राहू हो आता. पण उगा दुसर्याला आमच्या नावाची उपाधी देऊ नका. त्याचे हक्क्त आमच्याकडेच आहेत.
तो ब्लॉग अपडेट करा की किती वेळा जाऊन आलो पण त्याच त्या पोस्ट्स.
मान्य आहे की. धिंगाणा घालूच. फक्त जिलबीपाडू विडंबनं जरा कमी करा आणि स्मायल्यांचा अतिरेक टाळा.
--------
(अनेक त्रुप्त अत्रुप्त आत्म्यांना गणामध्ये समाविष्ट केलेला) अग्यावेताळ
30 Mar 2012 - 10:35 am | प्रचेतस
आवरा.
जाम मजा येणार आता.
30 Mar 2012 - 3:43 pm | अत्रुप्त आत्मा
प्रतिक्रीया व्यनीमधे पाठवलेली आहे...
30 Mar 2012 - 3:52 pm | वपाडाव
मालक, ही स्वाक्षरी अशी लिहा...
बस यहीं भुल हर बार करता रहा, धुल चेहरे पर थी और आइना साफ करता रहा...
30 Mar 2012 - 6:44 pm | अग्यावेताळ
उत्तराचा व्यनी केला आहे.
28 Mar 2012 - 11:54 am | ५० फक्त
अआ, त्या कवितेतल्या स्माईली नको होत्या, उगा कॉमेडी सर्कसच्या प्रेक्षकांना बटण दाबुन हसायला लावल्यासारखं होतंय ते, जिथं आणि जसं हसायचं तसं पब्लिक हसतंच आहे.
बाकी विडंबन छान झालंय, जरा ओढुन ताणुन आणलंय एक दोन ठिकाणी पण ठिक.
28 Mar 2012 - 11:58 am | अत्रुप्त आत्मा
वोक्के... अत्तच डिलिव्हरी झालीये... बघू जगत का ते.. ;-) पण जगलं वाचलं तर फक्त आम्ची नाळ म्हणजे स्मायल्या कापयची इनंती करितो ...डॉ.संपादकांना ;-)
28 Mar 2012 - 12:16 pm | प्रचेतस
नवकवींना प्रोत्साहीत करा जरा भटजी, नायतर तुम्हासही आता जिलब्या मिळत जातील. :P
28 Mar 2012 - 12:20 pm | अत्रुप्त आत्मा
@नवकवींना प्रोत्साहीत करा जरा भटजी, नायतर तुम्हासही आता जिलब्या मिळत जातील.>>> :-(
28 Mar 2012 - 12:40 pm | स्पा
तोंड गोड कराच्च आता भटजी ब्वा
28 Mar 2012 - 12:46 pm | अत्रुप्त आत्मा
दगा.... दगा.... दगा.... ;-) हे घे तुला>>> ;-)
अ.आ.==== मन्नू ;-)
28 Mar 2012 - 12:47 pm | प्रचेतस
ही पहा, मिळालीच लगेच. ती पण एका बोक्याकडून.
28 Mar 2012 - 1:53 pm | सूड
हात् मेल्या , येवढ्याने का भागणार गुर्जींचं ?
गुरजी ह्या घ्या हो आणखीन, लागल्या तर बरीक मागा हो. संकोच करु नका.
28 Mar 2012 - 1:55 pm | प्रचेतस
हा घ्या हो मग गुर्जी. जिलब्यांचा डोंगूर.
28 Mar 2012 - 1:00 pm | सांजसंध्या
धम्माल आहे विडंबन ...
28 Mar 2012 - 1:11 pm | चौकटराजा
कंट्री कारी - चुकलो क्रान्तीकारी कविता. आशयघन कविता. दाट कविता.अचाट कविता. महान काव्य . भन्नाट. जमलेले.
जबरा...
ढेरी व बनियन यांचे नाजुक गूढ नाते कविने फार वेचक शब्दात मांडले आहे.
मैलाचा ( की मौलाचा ) दगड आहे ही कविता !
दहावीच्या मराठी पुस्तकात येणार. नव्या साठी तिथे कोटा आहे.
अरे हे काय आम्हालाही प्रेरक आहे की ही कविता ... पहा पहा !
ढेर जणू सागर
गलबते केसांची
बेल्टचा तो सेतू
शोभतसे
आम्ही ही निसर्ग कवि झालो की काय ?
सगळाच संभ्रम पडलाय भौ !
28 Mar 2012 - 1:44 pm | हारुन शेख
बीभत्स रसात घोळवलेली विडंबनाची जिलबी !!
28 Mar 2012 - 2:20 pm | अत्रुप्त आत्मा
चिडचिडरसात तळलेली प्रतिक्रीयेची चकली ;-)
उजेडात सगळेच बोके एकमेकांकडे बघतात ;-)
28 Mar 2012 - 5:02 pm | हारुन शेख
अ. आ.
प्रतिक्रिया हलकी घ्या.
विडंबन करायला कविपेक्षाही अधिक बुध्यांक लागतो कारण एकाच वेळी विनोदनिर्मिती आणि काव्य असा मामला असतो. तुमच्या बुध्यांकाबद्दल म्या पामराने काय बोलावे ;-) त्यात बर्याच जनांच्या +१ चा वाटा आहेच. आईनस्टीनने जर विडंबनं लिहली असती तर तो 'विज्ञानातला अतृप्त आत्मा' म्हणून ओळखला गेला असता. शिवाय मिपावरच्या कवींना शिस्तीत ठेवण्याचा तुम्ही जो वसा घेतला आहे त्यात थोडी उत मात होणारच. कोकरू चुकले म्हणजे योग्य टिकाणी(च) काठीने ढोसून वळावे लागते अश्या आपल्या श्रद्धेचा मला आदर वाटतो. ते काम अलम मिपावर तुम्ही सचोटीने करून दाखवले आहे. (चू. भू. द्या.घ्या.)
तुम्ही स्वतंत्र कविता लिहित असल्यास महाराष्ट्राचे एक ख्यातनाम कवी म्हणून तुमची प्रसिद्धी कशी नाही याबद्दल एतद्देशीय लोक करंटे आहेत काय असा प्रश्न पडतो. कमरेच्या वर खालच्या प्रदेशात तुम्हाला शक्य असलेला काव्यसंचार हेवा वाटावा असा आहे. अश्या पुढच्या प्रत्येक भरारी करीता आपणाला आमच्या शुभेच्छांची गरज नाही. डॉक्टर श्रीराम दिवटे ह्या ऐतिहासिक पुरुषानंतर दक्षिण दिग्विजयाचे potential फक्त तुमच्यात दिसते.
"उजेडात सगळेच बोके एकमेकांकडे बघतात" ह्या वाक्याची माळ तुमच्या फोटोला घालून आम्ही लोटांगण घातले आहे असे चित्र कल्पावे.
तुमचा (न फिरणारा) पंखा
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
28 Mar 2012 - 5:12 pm | अत्रुप्त आत्मा
@"उजेडात सगळेच बोके एकमेकांकडे बघतात" ह्या वाक्याची माळ तुमच्या फोटोला घालून आम्ही लोटांगण घातले आहे असे चित्र कल्पावे. >>> उत्तम...आपलेही कल्याण असो... आंम्ही आपले आभारी आहोत... :-)
@तुमचा (न फिरणारा) पंखा >>> कदाचित वीज गेली असावी ;-)
असो... तुमची प्रतिसादातली मननीय भावना पोहोचली,,,धन्यवाद :-)
28 Mar 2012 - 6:38 pm | प्रचेतस
आत्मा तो हा अत्रुप्त,
परी जाहला संत्रस्त,
होवूनी लैच संतप्त
प्रतिसादाने.
28 Mar 2012 - 5:45 pm | शैलेन्द्र
दुसर्याच वाक्याला डिश्क्लेमर टाकुन प्रतिक्रीयेतील हवा काढुन घेण्याच्या प्रव्रुत्तीचा निषेध.. :(
28 Mar 2012 - 11:53 pm | सोत्रि
कवितेतले जास्त काही कळत नाही तरीही प्रेरणास्त्रोत असलेली कविता अतिशय उच्च आहे असे मला वाटते (वैयक्तिक मत). गणेशाचा प्रतिसाद त्या कवितेवरचा फारच बोलका आहे.
भटजीबुवा, त्या कवितेचे विडंबन ही निव्वळ एक बळंच पाडलेली जिलबी आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.
असो!
- (आता जिलब्यांची अॅलर्जी होईल अशी भिती वाटणारा) सोकाजी
28 Mar 2012 - 11:56 pm | जेनी...
सोकाजी हल्के हल्के घ्या वो :)
( उगाचच चिडलेले ) सोकाजी
चांगले नाहि दिसत :(
29 Mar 2012 - 1:13 am | अत्रुप्त आत्मा
@भटजीबुवा, त्या कवितेचे विडंबन ही निव्वळ एक बळंच पाडलेली जिलबी आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. >>>खरं आहे अगदी...पण...आता थोडं उघड बोलावं म्हणतो... मी व्यक्तिशः हे विडंबन करायच्या विचारात नव्हतो... ;-)
@आणी-हे विडंबन म्हणुन वाचू नये असा डिसक्लेमर टाकायचा र्हायलाच जरा... ;-)
29 Mar 2012 - 2:11 pm | स्पा
खरं आहे अगदी...पण...आता थोडं उघड बोलावं म्हणतो... मी व्यक्तिशः हे विडंबन करायच्या विचारात नव्हतो...
काय सांगता.. तुम्हाला कोणी blackmail केल कि काय.. का जबरदस्ती केली हि जिलबी टाकायची :D
29 Mar 2012 - 2:19 pm | अत्रुप्त आत्मा
@काय सांगता.. तुम्हाला कोणी blackmail केल कि काय.. का जबरदस्ती केली हि जिलबी टाकायची >>> हा बघा पहिला चोर,याला हे इडंबन टाकण्यापूर्वी दाखवलं तेंव्हा ''छान जमलय... मेलो...मेलो... हसुन हसुन...'' अशी आर्त प्रतिक्रीया देऊन टाकायला उत्तेजना देणारा बोका... तिकडे छान/छान म्हणतो आणी इकडे जिलब्या देतो... अखेर जिलबीनीच गळा कापलान मेल्याने ;-)
29 Mar 2012 - 2:23 pm | स्पा
D
भटजी ब्वा .. चिल
का ताप्ताय एवढे .. चला जरा एक बार मारून येऊ मस्त ४२० .. हे आपल ३२० चा
29 Mar 2012 - 2:40 pm | अत्रुप्त आत्मा
मन्या... तुला गोळ्याच हन्या ;-)
29 Mar 2012 - 2:23 pm | प्रचेतस
29 Mar 2012 - 2:37 pm | अत्रुप्त आत्मा
हा बघा चोर नं -२...अता लोळतोय गड्बडा हसुन हसुन.... मेल्या गाव तू मला ;-)
29 Mar 2012 - 2:46 pm | प्रचेतस
आवरा आवरा हो बुवा.
हसून हसून मरायची वेळ आलीय आता.
29 Mar 2012 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा
@हसून हसून मरायची वेळ आलीय आता.>>> :-D अता का..? अता का..? अता आज हसुन हसुनच मरयचय तुंम्हाला... या इकडे आता---
उतारा काढलाय या धाग्याचा ;-) http://www.misalpav.com/node/21175
http://www.misalpav.com/node/21175
29 Mar 2012 - 2:39 pm | प्रीत-मोहर
सहमत आहे
28 Mar 2012 - 2:45 pm | प्यारे१
___/\___
भटजी बुवांचा विजय असो...
28 Mar 2012 - 4:32 pm | शैलेन्द्र
मार्या मस्त..
जम्या चुस्त..
:)
28 Mar 2012 - 11:10 pm | सर्वसाक्षी
आत्मारामपंत
खतरनाक कविता!
28 Mar 2012 - 11:39 pm | जेनी...
हे कस काय बॉ राहिल माझ्याकडुन?:(
आत्ता वाचलं :D
आत्मा त्रुप्त :P
29 Mar 2012 - 1:59 pm | रसप
हाहाहाहा!!
29 Mar 2012 - 2:36 pm | इरसाल
ह्याबद्द्ल बोलत होतात तर.
हे कसे काय सुटले.
29 Mar 2012 - 4:12 pm | मालोजीराव
अतिशय वास्तववादी कविता, बनियन सारख्या दुर्लक्षिलेल्या अंतर्वस्त्रावर महाकवींनी टाकलेला हा झगमगीत प्रकाश अवडण्यात आला आहे,
आपल्या कवितेला
१. अमृततुल्य मध्ये चहा गाळत बसलेला बंद बनियनमधला गाववाला अण्णा (बनियन कळकटलेला आहे याची नोंद घ्यावी )
२.उडुपी हाटेलात डोसे टाकणारा शेट्टी
३.किराणा,भुसार दुकानातल्या गल्ल्यावर बसणारा बंद बनियनमधला शेठ (बनियनला भोके पडली आहेत आणि शेठ कान खाजवत आहे याची नोंद घ्यावी)
४.मिठाईच्या दुकानात कढईसमोर बसून एका हाताने ढेरी खाजवणारा आणि दुसर्या हाताने जिलब्या सोडणारा बंद बनियनमधला हलवाई
तसेच कामावरून नुकतेच घरी आलेले आणि शर्ट काढून आपल्या बनियन ला एक्स्पोस करणारे सर्व कामगारबंधू (यात आय टी सकट सर्व कामगारांचा समावेश केला जावा)
हि मंडळी उभी राहून मानवंदना देत आहेत असे समजावे !
- मालोजीराव
29 Mar 2012 - 4:24 pm | वपाडाव
ह्या प्रतिसादावर आम्ही टोप्या उडवत आहोत असे समजावे...
21 Jul 2012 - 9:22 am | लीलाधर
बुवांची ही अद्भूत काव्यप्रतिभा सर्व मिपाकरांना पुन्हा एकदा आस्वाद घेता यावा म्हणून वर आणत आहे. ;)
21 Jul 2012 - 9:27 am | लीलाधर
24 Jul 2012 - 3:05 pm | प्रचेतस
सर्वाधिक जिलब्या मिळालेला हा मिपावरील एकमेव धागा असावा.
25 Jul 2012 - 12:22 pm | स्पा
=))
=))
=))
मेलो मेलो
बुव बुव...
सलाअम तुम्हाला
22 Aug 2012 - 3:53 pm | विजुभाऊ
==)) :) ;)