एक हिंस्र कविता (?)... (१८+ only)

अस्वस्थामा's picture
अस्वस्थामा in जे न देखे रवी...
16 Mar 2012 - 5:59 pm

हाणा रे हाणा ,
या विडंबकांना..
हे चावताती,
हळव्या कवींना..

टांगून उलटे,
माळावरी अन..
नवकवितांची
धुरी द्या हो त्यांना..

जशी कोवळ्या कवितांची,
पिसे हे उपटती..
यांच्या बोडक्याचे,
केस केस उपटा..

तरीही जर उरले,
अतृप्त अस्वस्थ आत्मे,
हृद्य गद्य ललितात यांना बुडवून टाका..

(अपूर्ण आणि विस्तारासाठी सर्वाना खुले आवाहन... आणि ह. घ्या. हे सांगणे न लगे.. )

भयानकहास्यबिभत्सकविताविनोदविडंबन

प्रतिक्रिया

गवि's picture

16 Mar 2012 - 6:02 pm | गवि

हॅ हॅ..
१८+ कशापाई?

ते १८+ बहुतेक बोडक्यासाठी असेल.

आमच्या रायगड जिल्ह्यात बोडके हा शब्द फारसा प्रचलित नाही. त्याऐवजी ** बोडकी अशी जोड शीवी खुपच प्रसिद्ध आहे.

दादा कोंडके's picture

16 Mar 2012 - 7:44 pm | दादा कोंडके

१८+ बघून मोठ्ठ्या आशेने आलो होतो.

हे म्हणजे अस्सल कोल्हापुरी मटण थाळी खाण्यासाठी हॉटेलात जावं आणि त्यानी शिकरण पुरी किंवा मटार उसळ आणून द्यावी तसं झालं! :)

सोत्रि's picture

16 Mar 2012 - 11:18 pm | सोत्रि

अगदी अगदी!

एकतर कविता ह्या दालनात मी येत नाही पण १८+ वाचून अपेक्षेने लाळ गाळतच आलो होतो पण..... KLPD ;)

- (आंबट शौकीन) सोकाजी

इरसाल's picture

16 Mar 2012 - 6:11 pm | इरसाल

कुठेतरी कामाला लागलेले असतीलच.

तात्पर्य : तयार रहा.

निराशा झाली. ;)

तुमच्याकडे इनो मिळत नाही का ?

अस्वस्थामा's picture

16 Mar 2012 - 6:27 pm | अस्वस्थामा

तुम्ही कसली आशा लावून बसले होते या 'जिलबी' कडून.. :)

यात कसलेही साहित्यिक मूल्य शोधायला नका हो जाऊ.. वांत्या होतील.. इनो दूरच मग..
(तरी "हलके घ्या." असा बोर्ड पण लावला आहे.. ;) )

काय राव, मी इनोचं तुमच्यासाठी विचारलं होतं. :)

यात कसलेही साहित्यिक मूल्य शोधायला नका हो जाऊ..

कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय. ;)

चौकटराजा's picture

16 Mar 2012 - 6:22 pm | चौकटराजा

भा रा तांबे यानी वीररसात लिहिलेली " डुमडुमत डमरू ये" यातील" कडकडा फोड नभ उडव उडू मक्षिका , खडबडवी दिग्गजा तुडव रविमालिका "
याची आठवण झाली. किवा" विरूप झाली शुर्पंणखा ही दाशरथीची कृती सूड घे त्याचा लंकापति" या गदिमांच्या ओळींची आठवण झाली.
अवस्थामा आपण वीरू सेह" वाघ" चे काम केले आहे. धन्यवाद ! मुख्य म्हणजे कविता पटकन समजावी अशी लिहिलेली आहे. त्यासाठी खास
आभार ! पुढे ही लिहित रहा !

अस्वस्थामा's picture

16 Mar 2012 - 6:33 pm | अस्वस्थामा

"चौकटराजा" आपले आधीच्या कवितांचे प्रतिसाद वाचले आहेत.. तेव्हा आपल्याकडून काही सुधारणा सुचवण्याची अपेक्षा होती तरी प्रोत्साहनाबद्दल आभार...

बाकी गदिमांची कविता ऐकली आहे.. परंतु भा. रा. तांबे यांच्या कवितेबद्दल प्रथमच ऐकतोय.. शोधून वाचेन आता..

चौकटराजा's picture

16 Mar 2012 - 7:18 pm | चौकटराजा

ओ त्थामू बुवा ! इधर तोच तुम्हारा चुकता है ! भौ , मी काय इथं पाने ( कवितेची पाने नव्हे वर्कशॉप मधले पाने ) आणि पकड ( पकड म्हणजे जी कवि आस्वादकाची घेउन पहातो ती नव्हे ही पकड म्हणजे आईच्या भाषेत प्लायर ) घेऊन बसलोय काय ? जे निर्दोष आहे त्यात काय दुरुस्ती?

त्या भारांच्या कवितेतील काही ओळी
पाड सिहासने दुष्ट ती पालथी
ओढ हतीवरूनी मत्त नृप खालती
मुकुट रंकासी दे करटी भूपाप्रति
झाड खट खट तुझे खडग रुद्रा
( ह्यातील मत्त राजा म्हणजे ब्रिटीश साहेब )

पैसा's picture

16 Mar 2012 - 6:46 pm | पैसा

एकदम सुसाट बाहेर आलेला दिसतोय! पण विडंबक कुठे आहेत? ;)

पक पक पक's picture

16 Mar 2012 - 10:01 pm | पक पक पक

घाबरु नका आम्ही इथेच आहोत ;) सद्ध्या यशस्वी माघार घेतली आहे ,लवकरच भेटु ;)

भा रा तांबे हे राज कवि होते.

त्यांचि एक नितांत सुंदर कविता आहे , जन पळभर म्हणतिल हाय हाय, मि जाता राहिल कार्य काय, जन पळभर म्हणतिल हाय हाय.
अप्रतिम कविता

चौकटराजा साहेब, भा रा तांबे ह्यांचि आठवण करुन दिलित म्हणुन तुम्हाला धन्यवाद

विजुभाऊ's picture

16 Mar 2012 - 6:54 pm | विजुभाऊ

पण विडंबक कुठे आहेत?

या कवितेच्या विडंबनाचे काम बहुतेक शरदिनी तैच करु शकतील ;)

शरदिनीआप्त's picture

16 Mar 2012 - 8:24 pm | शरदिनीआप्त

वितंड तांडव अस्वस्थांचे
रापोनिया पंख दिशांचे
आत्म्यांचे भयात्कारी मुखवटे
जळमटे जळमटे आणी जळमटे ...

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2012 - 7:00 pm | अत्रुप्त आत्मा

कोण कोण आहे
हा अस्वस्थामा
बनु पाही हळव्या
कविंचा हा माम्मा ;-)

नावापरी वाटे
जख्मी कधीचा
असा का हा आला..?
करण्या पंचनामा :-p

आंम्हास देण्यास
जाशी धुरी तू
पचवेल का रे
आग नवकवितांना..?

तैलार्त केसास
आमुच्या उपटतांना
तव पार्श्वभागे येवो
मज्जा अपटतांना ;-)

तरिही जर उरलास
जख्मी अस्वस्थाम्मा ;-)
करु आंम्ही तुझा
वारंवार माम्मा :-p

अवांतर--- ज्यांना क्षमस्व म्हणायचे त्यांना म्हणुन झाले,,,आणी आम्च्या एखाद वेळेस झालेल्या थोड्याश्या अवांतरपणाला तथाकथित टोला द्यायला,फुकाच्या जख्मा घेऊन हे अस्वस्थामा बनुन कशाला आले...? ते काहि केल्या कळेना..! ...असो... याउप्परही खेळायचे असल्यास अमच्याकडुन येलकम ;-)

अस्वस्थामा's picture

16 Mar 2012 - 8:07 pm | अस्वस्थामा

कावळा बसायला आणि फांदी तुटायला.. असे काहीसे झालंय वाटते.. मी स्वतः विडंबक पक्षाचा समर्थक असून अतृप्त आत्मा आणि वल्ली दोघांचा पण फ्यान आहे तसा.. पण

" ज्यांना क्षमस्व म्हणायचे त्यांना म्हणुन झाले,,,आणी आम्च्या एखाद वेळेस झालेल्या थोड्याश्या अवांतरपणाला तथाकथित टोला द्यायला,फुकाच्या जख्मा घेऊन हे अस्वस्थामा बनुन कशाला आले...? ते काहि केल्या कळेना..! "

हे अवांतर वाचून असे वाटतेय की अशुभ घडलेल्या ठिकाणी आम्ही पेढे वाटायला पोचलोत बहुतेक... येथे आधी काही घडले असल्यास मला काही कल्पना नाही आणि त्यात पडायचे ही नाही..

हे "विडंबकांचे विडंबन" असे काहीसे डोक्यातले गेल्या रविवारी लिहिलेले फक्त इथे टाकलेय..

अतृप्त आत्म्यास काही व्यक्तिगत वाटले असल्यास क्षमस्व.. परंतु तुमच्या लेखणीस दाद द्यावी तितकी कमीच...

इथे व्यक्तीशः कोणास ओळखत नाही आणि वावर ही कमीच... त्यामुळे कोणाबद्दल काही राग अथवा लोभ नाहीय.. आणि कोणत्याही व्यक्तिगत वादापासून तर दूरच राहणे पसंत करीन ..

बाकी खेळीमेळीने खेळणार असाल तर खेळू नायतर आमी कटाप आत्ताच.. ;)

प्रचेतस's picture

16 Mar 2012 - 8:45 pm | प्रचेतस

. मी स्वतः विडंबक पक्षाचा समर्थक असून अतृप्त आत्मा आणि वल्ली दोघांचा पण फ्यान आहे तसा.

आमचे नाव आल्यामुळे आम्ही भरून पावते झालोत. पण मी विडंबक नाही हो, एखाद दोन फुटकळ कधी मधी टाकली असतील तितकीच.

बाकी आत्म्याबद्दल सांगायचे तर तो महान विडंबक आहे. तो सुद्धा खेळीमेळीने खेळात भाग घेईल हो.

तरी मी विडंबकांना सांगत होतो की आता नवकवी उठावाच्या तयारीत आहेत.
भविष्य खरं ठरलं म्हणायचं.

तरी मी विडंबकांना सांगत होतो की आता नवकवी उठावाच्या तयारीत आहेत.

सद्ध्या बोटांना तेल लावत आहे... ;)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2012 - 10:24 pm | अत्रुप्त आत्मा

@तरी मी विडंबकांना सांगत होतो की आता नवकवी उठावाच्या तयारीत आहेत.>>> ऐका हो ऐका...! वल्ली विडंबक नाहित बंरं ;-)

छे हो, फारच हिंस्त्र लेखन आहे हे, अशा हिंस्त्र लेखनप्रकाराला कविता असे कोमल्,नाजुक नाव द्यायला तुमचं मन तरी कसं धजावलं ?
बाकी, या लेखनात उल्लेखिलेला उपक्रम उत्तम, पण हळव्या कवींच्या, नवकवितांची धुरी करुन दिल्यावर नवकविता उरणारच नाहीत विडंबनं करायला,म्हणजे सुंठिवाचुन खोकला गेला असा प्रकार होईल.

मग हे विश्व किती रुक्ष आणि रखरखीत होउन जाईल, बाहेर असलेल्या उन्हाळ्याप्रमाणे होउन जाईल हे विश्व. असो.

अत्रुप्त आत्मा हा खरच मोठया मनाचा मित्र आहे.

मि सकाळी त्याच्या विड्बनाला आक्षेप घेतला होता.
त्याने माझि माफि मागितलि अगदि मोठया मनाने.
मित्र म्हटल त्याने मला. मग त्यावर मि राग कसा धरु.
मित्रांवर राग धरायचा नसतो.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2012 - 7:49 pm | अत्रुप्त आत्मा

निश...धन्यवाद... अता तरि मामांना शांती ;-) मिळो ही सदिच्छा :-)

प्रचेतस's picture

16 Mar 2012 - 8:02 pm | प्रचेतस

दोन मित्रांचे हृद्य संवाद वाचून डोळे पाणावले.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2012 - 9:23 pm | अत्रुप्त आत्मा

@डोळे पाणावले>>> दुष्ट ;-) दुष्ट ;-) दुष्ट ;-)

अत्रुप्त आत्मा हा खरच मोठया मनाचा मित्र आहे.

त्यावर दुमत नाहीच मुळी.. :)

मि सकाळी त्याच्या विड्बनाला आक्षेप घेतला होता.
त्याने माझि माफि मागितलि अगदि मोठया मनाने.

का घेतला..? मला आवड्ली होती :crazy:

मित्र म्हटल त्याने मला. मग त्यावर मि राग कसा धरु.

त्यावर राग धरु नकाच्..खुप चांगला आहे तो ...फक्त कविता तेव्ह्ड्या चांगल्या करा ;)

मित्रांवर राग धरायचा नसतो.

भड्भडुन आले आहे... :bigsmile: :bigsmile:

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2012 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा

@भड्भडुन आले आहे... >>> आता बास... प्लीज नको... ;-) मी शाप दिला तर तुंम्हाला ------ होतिलं हं ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2017 - 12:40 pm | अत्रुप्त आत्मा

पुनर्वाचनात मज्जा आली.

http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

आणी आगोबानी लावलेली आगंही आठवली. दू दू आगोबा.