संसर्गजन्य जिवाणू

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
29 Jan 2012 - 7:56 pm

आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो.
म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा.
कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.
आम्ही ज्याच्या संपर्कात त्याला लागलेत आजार रोग.
काही अंधश्रध्दाळू म्हणोत बापडे आपल्याच कर्माचे भोग.

तर शरीरात थोडे आतवर - नसांमध्ये पोहोचलो.

इतर माणसांच्या तुलनेत या व्यक्तीचे शरीर काही वेगळेच होते.
इतरांचे रक्त लाल तर याचे रक्त कोठे लाल, कोठे हिरवे, कोठे निळे,
कोठे भगवे, कोठे पिवळे, कोठे दुरंगी, कोठे तिरंगी होते.
जरा जरा वेळाने त्या रक्ताचे रंग बदलत होते.

मी मनात म्हटले की या सर्वरक्तीय प्राण्याच्या शरीरात काही रुजता येणार नाही.
तो माणूस जोरजोतात झिंदाबाद मुर्दाबाद च्या घोषणा देत असतांना त्याच्या तोंडावाटे बाहेर पडलो.

औषधोपचारसमाजजीवनमानराजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

29 Jan 2012 - 8:00 pm | नितिन थत्ते

वेगळ्या कल्पनेचे लेखन आवडले.

गणपा's picture

29 Jan 2012 - 8:13 pm | गणपा

असेच म्हणतो.

इन्दुसुता's picture

29 Jan 2012 - 11:49 pm | इन्दुसुता

+२
असेच म्हणते

- कलरफुल

chipatakhdumdum's picture

29 Jan 2012 - 11:07 pm | chipatakhdumdum

देवाशप्पथ , हा धागा उघडून वाचताना तुम्ही पहीले आठवला आणि खाली खरोखरच तुमची प्रतिक्रिया.

चतुरंग's picture

29 Jan 2012 - 8:32 pm | चतुरंग

कल्पक आविष्कार पाभे! :)

-लालरंग

बहुगुणी's picture

29 Jan 2012 - 9:10 pm | बहुगुणी

कविकल्पनेतच 'इंटरेस्टिंग जर्म' आहे असं वाटलं :-)

(स्वगतः 'सर्व-रक्तीय' म्हणजे 'सहिष्णू' असं अभिप्रेत असेल का? तसं असलं तर 'जंतू' नेमका कशाचा आहे आणि त्याला 'सहिष्णू' सावज वर्ज्य का असावं हे नीटसं कळलं नाही :-( पण ते झालं माझं न्यून, कवितेच्या ज्या समजल्या त्या ओळी आवडल्याच.

[बाकी 'नस' म्हणजे चेतातंतू, रक्तवाहिनी नव्हे, एवढं एकच शास्त्रीय खुस्पट :-) अर्थात्, नसेतही जंतू प्रवेश करू शकतातच.] . )

जाई.'s picture

29 Jan 2012 - 8:53 pm | जाई.

रोचक लिखाण

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2012 - 10:50 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा..व्वा...पा.भे...अल्टिमेट कल्पना लढवलीत... पण अजुन थोडं रंगवायचं ना पुढे,,,मजा आली असती... :-(

कवितानागेश's picture

29 Jan 2012 - 11:22 pm | कवितानागेश

पण अजुन थोडं रंगवायचं ना पुढे,,,मजा आली असती..>>
म्हणजे जिवाणूला एखादी जिवाणीण भेटेल, वगरै वगरै...... ;)

कॉमन मॅन's picture

30 Jan 2012 - 12:37 pm | कॉमन मॅन

फारच छान रुपक..