http://www.misalpav.com/node/१९७८१
इतक्यात मावशी दाबा घेऊन आल्या.मी अधाश्यासारखा जेवायला बसलो!घास तोंडापर्यंत न्यायलाही हात थर थर कापत होते....नाही लागल बक्षीस तर?माझीही फसवणूक झाली तर?राजवर्धन केल न नक्की फोन.का हूल देतोय मला?माझ डोक जड व्हायला लागल.पूर्ण खोली आपल्याभोवती गर गर फिर्तीये अस वाट्याला लागली!
----------------------------------------------------------------------------------------------------------
डोळे उघडले तेव्हा काहीच आठवत नव्हत! मी बेडवर कसा काय? खूप वेळ झोपलो होतो अस वाटल.हळू हळू कपाळावर काहीतरी गार गार जाणवलं.रूम मधल्या मित्राने मी शुद्धीवर याव म्हणून शिंपडलेलं पाणी होत! मी उठायचं प्रयत्न केला तेव्हा हातात जोरदार चमक भरली. मी जोरात किंचाळलो! मित्रानेहि उठून दिल नाही! माझ्यासाठी ताट घेऊन आला आणि चक्क मला त्याने हाताने भरवायला सुरुवात केली!पहिलाच घासाला जाणीव झाली आपली जीभ चावली गेलीये!,मित्राने बघितलं तर बरंच रक्तही आलं होत.मित्राने भरपूर पाणी पाजळ.तेव्हा थोडं बर वाटल.तो लगेच बाहेर पडला.थोड्यावेळाने दुध ब्रेड घेऊन आला.अगदी खिरीसारख पातळ केल आणि मला चमच्याने हळू हळू भरवू लागला.
मला आईची आठवण आली.मी कधी आजारी पडलो कि ती अशीच भरवायची मला! बाबा गेल्यानंतर आई खूप एकटी पडली.काका गावातून येऊन रोज आमच्या पुण्याच्या घरावर हक्क दाखवू लागला! रोजचा दिवस आईसाठी एक नवीन टेन्शन घेऊन येऊ लागला.गेल्याच आठवड्यात मी घर आईच्या नावावर केल आणि काकाचा त्रास थांबला.आई मात्र रोज दिवसभर खिडकीतून बाहेर बघत बसायची.शून्यात! अगदी तासनतास!माझ्याच्याने हे बघवत नव्हत! मी तिला कौउन्सालरकडे न्यायचं ठरवलं! पण त्याच रात्री अडीचच्या सुमारास आई माझ्या कुशीत जोरजोरात हुंदके देऊन रडायला लागली!मी तिला थोपटून शांत केल.थोड्यावेळान ती सावरली.तिने माझ्या हातात एक बरीच जुनी तांब्याची नक्षीदार पेटी ठेवली.मी गोंधळलेल्या नजरेन तिच्याकडे बघितलं.तिने दुसर्या हातात त्याची चावी दिली.आणि पुढे बोलू लागली
'हि पेटी दिसते छोटी.पण तीच महत्व आपल्या कुटुंबासाठी खूप मोठी आहे.तुझा काका इथे येत होता ते याच पेटीसाठी!हि मला माझ्या लग्नानंतर सासुबैनी दिली आणि त्याबद्द्दल कोणाला अगदी तुझ्या बाबांनादेखील बोलू नको असाही सांगितलं!
आपल्या थोरल्या सुनेला हि पेटी द्यायची असहि सांगितलं.आपल्या घरची परंपराच आहे तशी! सासुबैनही त्यांच्या सासुबैनी दिली होती! हि अध्येमध्ये उघडायची नाही!जेव्हा अस वाटेल कि आपल्यासमोर दुसरा कोणताच मार्ग नाही, अशावेळेस हि पेटी उघडायची! पण हि उघडाची वेळ यायला नको असा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा.आपल्या घरच्या परंपरेप्रमाणे मी हि माझ्या सुनेला द्यायला हवी.पण मला माझा काळ समोर दिसतोय! मी आता जास्त दिवस नाही राहणार! कदाचित उद्याची सकाळी माझ्या नशिबी नसेल!पण मी गेल्यावर माझ हे शरीर दान कर बाला आणि माझे सगळे दागिने आणि शालू सुनेला लग्नात दे! '
'आई काय अभद्र बोलातीयेस! अस काहीही होणार नाही!'
आईन मला घट्ट मिठी मारली आणि थोड्याच वेळात.....
आईच्या इस्छेप्रमाणे तिचे देहदान कार्यात आले.
आईच्या तेराव्यानंतर मला त्या घरात राहवेना.घरच घरपणच नाहीस झाल होत.मी घरातलं सगळ फार्निचर एका खोलीत ठेऊन उरलेला ५ खोल्या मी एका कंपनीला भाड्याने दिल्या.स्वतः एक कपड्याची bag आणि ती पेटी घेऊन बेवारशासारखा एका रुममध्ये २ अनोळखी मित्रांबरोबर राहायला लागलो.आईची आठवण आली कि तिची साडी कुशीत घेऊन झोपायचो.
आज बराच उशीर झाला तरी झोप येत नव्हती.जीभ जळजळ करत होती.दुसर्या कोणाकडे हात पसरण्यापेक्षा आणि लोटरी च्या नादी लागण्यापेक्षा पेटी उघडायची का? जर ती पेटी काही मदत करू शकत असेल तर...?मी ती पेटी उघडायच ठरवलं.मित्र झोपलाय याची खात्री करून मी हळूच,आवाज न करता पेटी उघडली.त्यामध्ये एका कापडावर संस्कृत मध्ये लिहिलेला श्लोक होता.मी ३-४ वेळा वाचला पण काही ओळखीचा वाटत नव्हता.त्याच्याखाली एक खूप जुनी झालेली कापडी पिशवी होती.त्यामध्ये काही दागिने असावेत अस मला वाटल! त्याखाली आणखीन एका कापडावर आणखीन एक श्लोक.मी कापडी पिशवी काही उघडली नाही.सगळे आहे तसं ठेवाल.पण राहून राहून त्या श्लोकाचा अर्थ काय असेल अस वाटत होत.मी मोबिलेवर त्याचा फोटो काढून घेतला.परत पेटी बंद करून जागेवर ठेऊन झोपायला गेलो.
सकाळी उठून मोबिले बघितला तर राजचा एस एम एस ' पैसे तुझ्या अकौंट वर ट्रान्स्फर केलेत.काळजी करू नको.'
मी निश्चिंत झालो.आता मला नोकरी सोडायची गरज नव्हती.बाबांनी काढलेल्या कर्जातून आता मुक्तता
झाली होती.आत्ता मला कोणत्याही लॉटरीची गरज नव्हती.मी थोडा निश्चिंत झालो.मित्रानेच कंपनीत फोन केला आणि मी येणार नसल्याच कळवलं.
मी फिरायला म्हणून बाहेर निघालो.पण सहज बघुयात काय निकाल लागलाय,म्हणून मी 'महालक्ष्मी लॉटरी' कडे वळलो.आजही तिथे कालच्या सारखीच गर्दी होती.आज त्या दुकानात कोणाला टरी पाहिलं बक्षीस लागल होत! मी माझ तिकीट घेऊन पुढे गेलो.शेवटचे ३..४..५...सगळे नंबर जुळले होते.ममी १५ लाखाचा विजेता झालो होतो!दुपारपर्यंत मी सगळ्या फोर्मालीतीज पूर्ण केल्या आणि दुसर्या दिवशी दुपारी माझ्या हातात १५ लाखाचा चेक आला.
.घरच्या बागेतला,नारळ,फुले आणि तो चेक घेऊन मी तळ्यातल्या गणपतीला गेलो.
क्रमशः
प्रतिक्रिया
20 Nov 2011 - 4:10 pm | ५० फक्त
शुद्ध आणि शब्दलेखनाच्या नावाने बोंब कायम आहे असे अतिशय खेदाने नमुद करावे लागत आहे.
कथावस्तु, विषय चांगला असला तरी अशुद्धतेमुळे बाजार उठतो आहे वाचताना.
'आईच्या इस्छेप्रमाणे तिचे देहदान कार्यात आले.' - यातल्या शब्दांचा आणि पुर्ण वाक्याचा अर्थ समजुन सांगाल का जरा ?
! हे शिफ्ट +१ चं उदगारवाचक चिन्ह, तुम्ही पुर्णविरामासारखं का वापरता आहात, वर हे जिथं वापरलंय त्या वाक्यात 'मित्रानेहि उठून दिल नाही! माझ्यासाठी ताट घेऊन आला आणि चक्क मला त्याने हाताने भरवायला सुरुवात केली!पहिलाच घासाला जाणीव झाली आपली जीभ चावली गेलीये!, -- मी तिला कौउन्सालरकडे न्यायचं ठरवलं!' उदगारवाचक चिन्हाचा प्रयोजन काय आहे ते कळेल का ?
'पण तीच महत्व आपल्या कुटुंबासाठी खूप मोठी आहे.' इथं मोठी हे विशेषण पेटी साठी नसुन महत्व साठी आहे मग ते स्त्रीलिंगि का ?
' बेवारशासारखा एका रुममध्ये २ अनोळखी मित्रांबरोबर राहायला लागलो.' - अनोळखी असतील तर मित्र कसे असतील, मित्र झाल्यावर कुणी अनोळखी राहिल का?
मोबाइल - एम्+ओ+बी+ ए+ ए + आय + एल - फोनेटिक असलं तरी अगदी प्रत्येक वेळी इंग्रजी स्पेलिंग लिहुन मराठी बरोबर येतंच असं नाही.
तुम्ही एकदा लिहिलेला म्हणजे टंकलेला शब्द काहीही झाले तरी बॅकस्पेस देउन / खोडुन रिटाईप करायचाच नाहीच असंच ठरवुनच टाइप करता का ओ?
इथं प्रसिद्ध करण्यापुर्वी एकदा तरी पुन्हा वाचत जा प्लिज.
20 Nov 2011 - 5:53 pm | प्रचेतस
अहो नवशिक्या आहेत त्या, शिकतील बुवा हळू हळू.
20 Nov 2011 - 5:55 pm | प्रास
'चांगला' प्रतिसाद हवा तर हे असलं सहन करायलाच लागणार ना?
मिपावरचा 'चांगला' प्रतिसाद कसा असतो ते नक्की कळेल आता.....
:-)
22 Nov 2011 - 1:15 pm | किचेन
कळल! कळल! पण सध्या तरी ते मला सुधरवायचा प्रयत्न करत आहेत!त्यानंतर ते चांगले प्रतिसाद देतील!
20 Nov 2011 - 9:40 pm | मोहनराव
असेच म्हणतो..
किचेन ताई/माई आक्का, आता तरी शुद्धलेखनाचा विचार करा पक्का!!
(खवचट मिपाकर) मोहन
20 Nov 2011 - 7:31 pm | डॉ.श्रीराम दिवटे
नक्कीच. आपण जे लिहीत जात असतो ते पुन्हा एकदा वाचले जायलाच हवे, तरच भाषा शुद्धी जमू शकेल. बाकी क्रमशः लेखन चालू राहू द्या...
20 Nov 2011 - 8:15 pm | रेवती
१५ लाखाचा चेक?
आणि ट्याक्स?;)
20 Nov 2011 - 8:49 pm | अन्या दातार
ओ मॅडम, टॅक्स बक्षिस मिळालेल्या व्यक्तिने संबंधित आर्थिक वर्षाअखेरीस भरायचा असतो. लॉटरीवाले काय टॅक्सचा चेक वेगळा देणार हायेत काय?
20 Nov 2011 - 9:19 pm | पैसा
ट्याक्स कापून देत असावेत. आपला पगारसुद्धा ट्याक्स कापूनच देतात.
20 Nov 2011 - 10:30 pm | आत्मशून्य
पण शूध्द लेखनाने रसभंग होतोय.
आपण जे टंकतो त्याचे इथं स्क्रिप्टच्या सहायाने मराठीत रूपांतर केलं जातं त्यामूळे आपल्याकडे इंग्रजी किबोर्ड असूनही मराठीमधील शब्द/अक्षर पडद्यावर उमटतं. अर्थातच हे स्क्रिप्ट संपूर्ण निर्दोष अथवा इंटेलिजंट नसल्याने बरेचदा ते गोंधळ करतं. ज्याचा परीणाम म्हणून ते थोडासा विचीत्रपणा बरेचवेळा हमखास दाखवतं, अथवा आधीच योग्य प्रकारे टाइप केलेला शब्दही चूकवतं.
सोपं उदाहरण म्हणजे copy हा शब्द टंकून बघा तो "कोपि" अथवा "कोप्य" वगैरे यायला हवा पण इथं "आय" च्या ठीकाणी "वाय" गोंधळ करतो कारण वेलांटीसाठी वाय नाय आय हाय, त्यामूळे स्क्रिप्ट गंमत करत व तो शब्द "चोप्य" असा स्क्रिनवर बदलतो. थोडक्यात सबमीट करण्यापूर्वी प्रिव्ह्यु ऑप्शन वापराच अथवा माझ्या सारखं शूध्दलेखना बाबतीत निर्लज्ज व्हां ;)
22 Nov 2011 - 1:10 pm | किचेन
>>माझ्या सारखं शूध्दलेखना बाबतीत निर्लज्ज व्हां ;)
आता काय बोलु? बाकि मार्गदर्शनासाठी धन्यु!