खेळ नियतीचा भाग १

किचेन's picture
किचेन in जनातलं, मनातलं
17 Nov 2011 - 5:03 pm

त्याचा फोन येऊनही आता १५ दिवस झाले.आणखीन २ दिवसात त्याचा फोन आला नाही तर संपल सगळ! नोकरीचाही राजीनामा द्यावा लागणार!

दुसरा काही मार्ग डोक्यात येत नव्हता! २ दिवसात १.२५ लाख रु. काहीतरी करून मलाच जमवावेच लागतील.दुसरा मार्गाच नाहीये! कोणी मित्रही असा नाहीये ज्याजवळ मी हक्काने पैसे मागू शकेल.सगळे माझ्यासारखेच चिंधी! राजवर्धन काही सोय झाली तर नक्की फोन करेल.आमदार साहेबांचा मुलगा तो! त्याला काय कमी आहे?इथे माझ्याकडे फोनेमध्ये बलन्स टाकायला पैसे नाहीत! कंपनीत पण चिंगु बोस साला फोनवर आणि इंटरनेटवर लक्ष ठेवून असतो.लवकर गेलो तर? नाहीतरी चावी माझ्याकडेच आहे.सवा सात झालेत निघायला हव.

सवा सात! म्हण्जे आज अंघोळीची गोळी! कोणी यायच्या आत गेलो तर निवांतपणे फोन करता येईल.बोस येतो ९.०० ला !पण साडे आठपासूनच सगळे ऑफिसमध्ये असतात.बास! तोंड धुतलं,गणवेशावर मित्राचा दिओ मारून मी बाहेर पडलो.पुण्याला येऊन दोन महिने झाले.पण पुण्याच्या रस्त्यांवर मी एवढ्या लवकर पहिल्यांदाच आलो होतो.
फडके हौदाचा बस स्टोप .रूमपासून मोजून ५ मिनिट.पण आज एवढी गर्दी का रस्त्यात?भांडण नाहीतर अपघात ! दुसर काही असूच शकत नाही! मला काय घडलंय जाणून घायची आजीबात इच्छा नव्हती! मी मार्ग काढत पुढे सरकायचा प्रयत्न करत होतो!पण गर्दी मला दुसरीकडेच नेत होती! कधी विचारही नव्हता केला,अशा ठिकाणी मला गर्दीने आणून सोडलं होत.

'महालक्ष्मी लॉटरी'

नाही शक्यच नाही! मी आणि लॉटरी ...छे! कष्टाचे ते आपले! चोर्या मर्या, जुगार लोतार्यचे पैसे कधीच लाभत नाहीत..हि लहानपणापासूनची शिकवण!मला पूर्ण पटणारी! मग का देवाने मला इथला रस्ता दाखवला?त्याच्याचीच इच्छा असेल! 'महालक्ष्मी लॉटरी' ...साक्षात कुलादेवताच आपल्याला साद घाल्तीये.तिच्याकडे पाठ फिरवून निघून जाऊ? नाही!नशिबात असेल तर मिळेच नाहीतर राहियाल!
मागे एका फळ्यावर तिकिटांचे दर लिहिले होते...
१५ रु तिकिटाला १५ लाखांचं पाहिलं बक्षीस! १.५ लाखच दुसर, आणि १५ हजारच तिसर!
माझे डोळे चमकले! बक्षीस लागल तर चांदीच चांदी.गेला बाजार दुसर बक्षीस लागल तरी १.२५ लाख वजा करून २५ हजार हातात येतायत.
तिकीट घेऊन मी ऑफिसमध्ये आलो.झाडूवाल्या मावशी शिवाय दुसर कोणीही नव्हत.आता राजला फोने करायचा होता.पण त्यांच्यासमोर बोलन बर नाही.तशा त्याही साहेबांच्या खबर्या! आमचा मजला झाला कि त्या वरच्या मजल्यावर जातील.तेव्हा राजशी नित बोलू शकेल.
मावशी गेल्या!मी राजला फोन लावला.तो उद्या संध्याकाळ पर्यंत फोन करतो बोलला!
हा मला टाळत तर नसेल!लहानपण्पासुंचे मित्र आम्ही!मग काय झाल अस?हा नीट बोललाही नाही!एका वाक्यात फोन कट !
आता माझ नशीब फक्त लोटरीच्या तिकिटावर होत!

दिवसभर कामात काहीच लक्ष नव्हत.सतराशे साठ चुका झाल्या असतील! उद्या परत एकदा सगळ्या फाईल डोळ्यांखालून घातल्या पाहिजेत!सकाळी लवकर निघाल्याने मेस मधून डबाही घेतला नव्हता.आज दिवसभर उपाशी! आता कावळेही ओरडायला लागलेत.मावशींचा डबा येयला अजून ३ तास आहेत.
मित्राच्या गाडीजवळ काळ सकाळची भाजी तशीच पडली होती!...बुडत्याला कधीच आधार.अजुन कामावरून कोणीच आल नव्हत.मी एकड तिकड पाहत अधाशासारखी एकाच झटक्यात भाजी खाली.जोरात ठसका लागला.पाणी...पाणी.आज मावशीनी हंडा ब्भारून ठेवला नव्हता.मी बाथरूम मधलं बादलीतल पाणी पिऊन जरा शांत झालो. एका वर्तमान पत्रावर हिशोब करू लागलो.१५ लाख मिळाले तर काय काय करायचे?१.५ लाख मिळाले तर काय काय करायचं?त्याच पानावर खाली बातमी होती...इंटरनेटवरच्या लोतारीने फसवणूक केल्याची!
नाही! अस काही होणार नाही! हि इंटरनेटवरची लॉटरी थोडीच आहे! मी स्वतःला समजवायचा प्रयत्न करत होतो.
इतक्यात मावशी दाबा घेऊन आल्या.मी अधाश्यासारखा जेवायला बसलो!घास तोंडापर्यंत न्यायलाही हात थर थर कापत होते....नाही लागल बक्षीस तर?माझीही फसवणूक झाली तर?राजवर्धन केल न नक्की फोन.का हूल देतोय मला?माझ डोक जड व्हायला लागल.पूर्ण खोली आपल्याभोवती गर गर फिर्तीये अस वाट्याला लागली!

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

प्रास's picture

17 Nov 2011 - 5:40 pm | प्रास

येऊ द्या....

पुलेप्र

(वाचेन) ;-)

पुलेप्र

म्हण्जे. काय? नवीन असल्यामुळे याचा अर्थ माहित नाही.
पुलेशु आणि प्र का टा आ इंध माहित आहे

इंटरनेटस्नेही's picture

17 Nov 2011 - 5:58 pm | इंटरनेटस्नेही

मस्त. पुढील भाग लवकर येऊ द्या. कथेने चांगला स्पीड मेन्टेन केला आहे. फक्त गूगल ट्रान्सलिट्रेशनचा वापर संभाळुन करा.. ;) अनेक शब्दांतुन ते प्रकर्षाने जाणवतयं.. ;)

किचेन's picture

19 Nov 2011 - 3:07 pm | किचेन

हो मी तेच वापरलाय.!:(
आता त्यापासून दूर राहाचा प्रयत्न करेल!नाहीतर याच्या पुढे टार्गेट पियू नाही तर मी असेल ;)

मोहनराव's picture

17 Nov 2011 - 7:36 pm | मोहनराव

वाचतोय!! पुलेप्र!!
तुमच्या लेखनात तशी खुप सुधारणा झाली आहे. पण फक्त प्रकाशित करण्याआधी पुर्वदृश्य पाहावे ही एक सुचना!! ;)

अन्या दातार's picture

17 Nov 2011 - 9:41 pm | अन्या दातार

प्रगती चांगली आहे. पण डिटेलिंग बघता या कथेची लांबी काय असेल हा प्रश्न पडलाय!!!

५० फक्त's picture

18 Nov 2011 - 10:38 pm | ५० फक्त

'तुमच्या लेखनात तशी खुप सुधारणा झाली आहे. पण फक्त प्रकाशित करण्याआधी पुर्वदृश्य पाहावे ही एक सुचना!! '

+१०० टु मोहनराव.

लागली तुम्हाला पण क्रमशं करुन लटकवायची सवय, त्यातुन तुम्ही पेठवाले मग काय.

असो वेगळा विषय आहे. आज पर्यंत एकदाच लॉटरीचं तिकिट घेतलंय, ५/- चं बक्षिस लागलं होतं, ते तिकिट अजुन जपुन ठेवलं आहे,

चांगला - हे लिहायचं राहिलं होतं.

किचेन's picture

19 Nov 2011 - 3:04 pm | किचेन

>>'तुमच्या लेखनात तशी खुप सुधारणा झाली आहे.

धन्यवाद! तशी सगळी आपलीच कृपा!
>> पण फक्त प्रकाशित करण्याआधी पुर्वदृश्य पाहावे ही एक सुचना!! '

नक्कीच!तुमच्या सूचनांच स्वागत आहे!

>>+१०० टु मोहनराव.

पण ते प्र ले शु काय आहे?

>>लागली तुम्हाला पण क्रमशं करुन लटकवायची सवय, त्यातुन तुम्ही पेठवाले मग काय.

कै च्या कै! सगळेच पेठ्वले सारखे नसतात!