चुकीचे मोबाईल रिचार्ज

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
21 Sep 2011 - 5:00 am

चुकीचे मोबाईल रिचार्ज

गट्टू अन गिट्टी जात होते एकाच कॉलेजात
तेथेच जुळले त्यांचे; गुंतले दोघे एकमेकात

गट्टू स्वभावाने वांड होता गावात सोडलेला सांड होता
याच्याशी भांड त्याच्याशी भांड असले उद्योग करत होता

गिट्टीला तो खुपच सोज्वळ भासे
कच्च्या लिंबाप्रमाणे कोवळा वाटे

कॉपी केल्याने कॉलेजमधून रस्टीकेट झाला
अपेक्षेप्रमाणे गट्टू एस.वाय.ला फेल झाला

मनापासून प्रेम होते त्याचे गिट्टीवर
ती न भेटली तर जीव होई खालीवर

इकडे गट्टूच्या बापाने त्याला घराबाहेर काढला
काहीतरी कामधंदा कर तरच घरी ये म्हणाला

काय करावे काय करावे प्रश्न मोठा पडला
उत्तर त्याचे माहीत नव्हते तेथेच गट्टू अडला

गरीब बापाला दया येवून थोडे भांडवल त्याला दिले
गट्टूने कमी मेहनतीचे मोबाईल रिचार्जचे दुकान सुरू केले

नजरानजर होण्यासाठी एका गल्लीत त्याने टाकले दुकान
आता कसे सोईस्कर झाले; समोरच त्याच्या गिट्टीचे मकान

दुकान आता थोडे बरे चालत होते
कुणी दहा तर कुणी वीसचे रिचार्ज मारत होते

मात्र दिवसातून एखादे नवीनच गिर्‍हाईक २०० चे रिचार्ज मारून जाई
पुन्हा तेच गिर्‍हाईक रिचार्ज मारण्यासाठी त्याच्या दुकानी न येई

हळूहळू त्या २०० च्या रिचार्जचा एकच नंबर त्याला पाठ झाला होता
नवनवीन गिर्‍हाईक जो नंबर रिचार्ज करी तोच नंबर गिट्टीच्या मोबाईलचा होता

- पाभे
२१/०९/२०११

प्रेमकाव्यकविताविनोद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

21 Sep 2011 - 10:08 am | प्रचेतस

जबरी रे पाभे.

इंटरनेटस्नेही's picture

21 Sep 2011 - 12:44 pm | इंटरनेटस्नेही

खत्री! अजुन एक ज्ञानपीठ पुरस्कार योग्य कविता.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Sep 2011 - 2:39 pm | अत्रुप्त आत्मा

@---गिट्टीला तो खुपच सोज्वळ भासे
------कच्च्या लिंबाप्रमाणे कोवळा वाटे--- :-D मालक पाय कुठायत? खपलो... ''आज पासुन आपले नाव पाषाणभेद असे पुसुन ''भेदक-पाषाण असे ठेवण्यात येत आहे...

@---हळूहळू त्या २०० च्या रिचार्जचा एकच नंबर त्याला पाठ झाला होता :-p
नवनवीन गिर्‍हाईक जो नंबर रिचार्ज करी तोच नंबर गिट्टीच्या ;-) मोबाईलचा होता--- हा कळस आहे

इंटरनेटस्नेही यांचेशी पूर्ण सहमत- पा.भें. ना ज्ञानपीठ पुरस्कार :grade: मिळालाच पाहिजे,,,मिळालाच पाहिजे

इंटरनेटस्नेही's picture

21 Sep 2011 - 8:47 pm | इंटरनेटस्नेही

इंटरनेटस्नेही यांचेशी पूर्ण सहमत- पा.भें. ना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाच पाहिजे,,,मिळालाच पाहिजे

सहमती बद्दल आभारी आहे दिवेकर साहेब.

मी-सौरभ's picture

21 Sep 2011 - 7:40 pm | मी-सौरभ

:)

दुकानामुळे वाचला गट्टू....

५० फक्त's picture

22 Sep 2011 - 12:30 am | ५० फक्त

जाम भारी रे, पण रेट लवकरच उतरला काय ?

प्रकाश१११'s picture

22 Sep 2011 - 12:35 am | प्रकाश१११

झकासच रे ..!!

सुहास झेले's picture

22 Sep 2011 - 1:40 am | सुहास झेले

हा हा हा .. मस्त !!

गट्टू किती खट्टू झाला असेल नाही? ;-)

चिप्लुन्कर's picture

22 Sep 2011 - 11:19 am | चिप्लुन्कर

लई भारी लेच भारी लई लई लैएच भारी. .......