गाभा:
तुमच्या मते गेल्या चार वर्षातले मिपावरील संग्रहणीय, अक्षर, सर्वोत्कृष्ट लेखन कोणकोणते ?
बरेच मिपाकर वेळेअभावी अधून मधून काही काळ मिपावर येऊ शकत नाहीत, या मधल्या काळातील चांगले दुवे खाली गेल्याने सहजगत्या मिळत नाहीत.
अनेक धागे तात्कालीन महत्वाचे असले, तरी कालांतरने तसे वाटत नाहीत... त्यामुळे मिपाकरांच्या पसंतीस उतरलेले, कायम महत्वाचे धागे कोणते ? हे कळल्यास/ उपलब्ध झाल्यास फार सोयीचे होईल, असे वाटते.
प्रतिक्रिया
2 Sep 2011 - 3:38 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
चित्रगुप्तांना असे प्रश्न पडावेत याचे आश्चर्य वाटले ;)
9 May 2020 - 10:27 pm | पाषाणभेद
असले प्रश्न आणि याचे धागे निघावे हेच मोठे वैषम्य आहे. असले धागे वर्ष दोन वर्षांनी नेहमी निघतात. त्यात त्या त्या वेळच्या महानुभावांच्या मगदुरानुसार यादीही बनते.
पण असल्या संग्रहणीय धाग्यांची यादी बनवण्याची रित किंवा पातळी काय? जास्त प्रतीसाद किंवा गाजलेला लेखक.
संग्रहणीय, सर्वोत्कूष्ट याचे निकष कोण ठरवणार?
आणि एखादा धागा, लेखन एखाद्या कमी प्रतिष्ठेच्या लेखकाने लिहीलेले असेल आणि ते माझ्या मते सर्वोत्कृष्ट असेल तर?
दुसरे असे की अशी यादी बनवावीच का लागावी? ते ही काही पिरिअडनुसार? दोन एक वर्षात?
जो येथे नवीन येतो त्याला अशी तयार यादी देण्याचे काय कारण? त्याला गरज असेल, वाचनाची आवड असेल, खोदकाम करावे वाटले तर त्याने ते लेख वाचावे.
अशी यादी करण्यामुळे इतरांवर अन्याय होतो असे वाटत नाही काय?
2 Sep 2011 - 4:16 pm | अत्रुप्त आत्मा
मला मिपावर येउन अजुन ४महिने सुधा झालेले नाहीत,त्यामुळे मी कोणतीच प्रतिक्रीया देऊ शकत नाही, पण १ प्रश्न पडतो------------संग्रहणीय आणी सर्वोत्कृष्ट हे समजलं,पण ''अक्षर'' ही काय भानगड आहे? :puzzled:
@ गेल्या चार वर्षातले मिपावरील संग्रहणीय, अक्षर, सर्वोत्कृष्ट लेखन कोणकोणते?
2 Sep 2011 - 4:34 pm | गणपा
क्षर = नाश पावणारे.
(विरुद्धार्थी शब्द)
अक्षर x क्षर
चित्रगुप्तजी समुद्रातुन एक थेंब वेगळा काढायला लावताय होय. :)
2 Sep 2011 - 10:38 pm | अत्रुप्त आत्मा
गणपाशेठ खरोखर मनापासून धन्यवाद,,,एरवी शब्दाशब्दाची चिकित्सा करणारा मी,या एका सुंदर अर्था पासून का बंरं दुरावलो होतो,मालाच कळत नाहीये...
वाहव्वा-क्षर -नाश पावणारे<>अक्षर- अविनाशी,म्हणजे जे उमटल्यावर नाश पावत नाही ते...ही कल्पना आमच्या वेदातल्या मंत्र निर्मितीच्या तत्वाशी खूप जुळते,,याची या निमित्तानी अठवण झाली...
2 Sep 2011 - 4:21 pm | विनायक प्रभू
मी खुप लिहीले. वाचले.
पण मला जिवापाड आवडणारे.
रामदासः काटे कोरांटीची फुले
धनंजयः कोणार्क ची शिल्पे.
विप्रः जीवती.
आणखीन काही आहेत सुचले की कळवीन.
3 Sep 2011 - 12:14 am | सही रे सई
या सगळ्या ले़खांची क्रुपया लिंक द्यावी म्हणजे आम्हाला पण वाचता येईल.
3 Sep 2011 - 12:05 pm | विनायक प्रभू
१+
मिपावरील सर्व मान्यवर लेखकांना विनंती.
स.रे.स म्हणताहेत त्या प्रमाणे लिंक इथे द्यावी.
आपल्या सर्व लेखनामधील आपल्याला आवडणारे.
10 May 2020 - 11:38 am | चौथा कोनाडा
ही घ्या एकः
काटे कोरांटीची फुले : रामदास
3 Sep 2011 - 12:26 am | शुचि
जिवती कथा नि:शब्द करुन गेली.
2 Sep 2011 - 4:30 pm | पिलीयन रायडर
गवि हयांचे सर्व....
9 May 2020 - 8:34 pm | रघुनाथ.केरकर
आमच्या बोकाशेट ना देखिल एकदा वाचुन पहा... मोसाद तर आज देखिल वाचतो....
2 Sep 2011 - 6:00 pm | चित्रा
सर्वोत्कृष्ट ठरवणे कठीण आहे, पण खालील दुव्यावर मिपावरील दर्जेदार लेखनाची अनेक उदाहरणे मिळतील.
http://www.misalpav.com/node/14173
येथील अनेक प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.
3 Sep 2011 - 7:05 pm | बिपिन कार्यकर्ते
जुन्या धाग्याची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद! अरुंधती आणि भानस यांची आठवण आली. उत्तम लेखन.
3 Sep 2011 - 9:59 am | शुचि
प्रेम सेवा शरण ..... रामदासकाकांचे अतिशय काव्यमय स्फुट
लीमाउजेट चे तिच्या आजीचे प्रभावी व्यक्तीचित्रण
काटे कोरांटीची फुलं .... रामदासकाकांची कथा
झरण
अथ काका पुराण
मेंदीची दरवळ ... मितानचा अलवार लेख
चिंजंनी एका मनस्व्व शिल्पकर्तीची करुन दिलेली ओळख .... अप्रतिम लेख
बरेच काही उगवून आलेले १
बरेच काही उगवून आलेले २
नंदन यांचे चिंतनगर्भ प्रकटन
रामदास काकांची फारच गोड कविता
नंदन यांचा लेख
रामदास काकांचा अतिशय सुरेख लेख
सन्जोप रावांचे सर्व लिखाण
....... नाचरी गाय केवळ अ-प्र-ति-म बालगीत - चित्रा यांनी भाषांतरीत केलेलं!!!!
..... प्रा डॉ दिलीप बिरुटे यांचा अतिशय तरल, हळवा लेख. सुरेख!!!
... पिवळा डांबिस यांचा हा विनोदी लेख वाचून हसून मरायची वेळ आली होती.
...... मुक्तसुनीत यांचं छोटेखानी पण बावनकशी लिखाण!!!
मेघवेडा यांचं काव्यशास्त्रविनोद १,
मेघवेडा यांचं काव्यशास्त्रविनोद २,
........ मेघवेडा यांचं काव्यशास्त्रविनोद ३.
पुष्करिणी चे इतिहासावरचे "डंकर्क" आणि "पर्ल हार्बर" लेख क्या केहेने!!! मास्टरपीस!,
हादेखील
अर्धवटराव यांचा पुलंवरचा लेख माझा खूप आवडता आहे
३_१४ विक्षिप्त्_आदिती यांच्या स्त्रीची आजची प्रतिमा मधील हा लेख
ननिंचा अतिशय विनोदी लेख
ननिंची मनाला चटका लावणारी कथा - कागद
पिडा काकांचे नास्तिक नावाचे अतिशय संतुलित स्फुट.... अप्रतिम!!!
सुवर्णमयी यांनी लिहीलेली ही गूढकथा - शर्यत
3 Sep 2011 - 12:21 pm | सहज
आळश्यांचा राजा यांचे लेखन - विशेषता प्रांतांच्या गोष्टी
स्वगत - प्रकाश घाटपांडे
पहिला अनुयायी (बाबागिरीच्या साबणाचा गिऱ्हाइक) असा मिळवावा - राजेश घासकडवी
वामनसुत यांची लेखमाला - स्मृतीगंध
ब्रिटिश यांचे लेखन
3 Sep 2011 - 5:12 pm | प्रदीप
ह्यांपैकी बर्याच निवडीशी सहमत आहे.
3 Sep 2011 - 5:54 pm | किसन शिंदे
टिचला बिलोरी आयना - रामदास काका
शिंपीणीचं घरटं - रामदास काका
अजूनही पुर्ण न केलेली प्रिटी वुमन - सुनील
भेट - बिका
परवशता पाश दैवे - बिका
तात्यांची रोशनी
प्रियाली तैंच्या सगळ्या भयकथा
टार्याचे आणी ब्रिटीश दादूस यांचे सगळेच लेख.
सवडीने अजूनही या यादीत भर टाकल्या जाईल.
3 Sep 2011 - 6:18 pm | विसोबा खेचर
धन्यवाद रे किसना. इतक्या सर्व थोरामोठ्या लेखकांच्या यादीत माझी आठवण ठेवल्याबद्दल तुझा ऋणी आहे... :)
तात्या.
3 Sep 2011 - 6:23 pm | श्रावण मोडक
ते लेखन अर्धवट राहिलेलं आहे. पूर्ण करायचं बघा. :)
आत्ताच्यापेक्षा अधिक धन्यवाद देण्याची वेळ त्यानंतर येईलच.
3 Sep 2011 - 7:00 pm | बिपिन कार्यकर्ते
माझेही नाव घेतल्याबद्दल धन्यवाद! :)
मला या यादीत श्रावण मोडकांचे बहुतेक सगळे लेखन टाकावेसे वाटते. त्यांचे लेखन इथे दिसेल. http://www.misalpav.com/newtracker/640 ... विशेष करून 'काही नोंदी...'
माहितीची भर : एखाद्या सदस्याचे सगळेच लेखन बघायचे असल्यास वरील दुव्यामधे ६४० ऐवजी त्या सदस्याचा सदस्यक्रमांक टाकावा. जिथे कुठे त्या सदस्याच्या नावाचा दुवा असेल तिथे कर्सर नुसता प्लेअस केल्यास (हॉवर केल्यास) त्या सदस्याचा क्रमांक खाली स्टेटस बार मधे दिसतो. रामदास यांचा सदस्य क्रमांक १८५ आहे. http://www.misalpav.com/newtracker/185
3 Sep 2011 - 10:35 pm | सुनील
अजूनही पुर्ण न केलेली प्रिटी वुमन - सुनील
थोरा-मोठ्यांच्या मांदिया॑ळीत माझेही नाव पाहून डोळे पाणावले!
4 Sep 2011 - 9:46 am | नगरीनिरंजन
वरच्या यादीत माझं नाव पाहून मनाला गुदगुल्या झाल्या (खोटं कशाला बोला?) पण नंतर लाज वाटली.
"उल्लेखनीय" या विशेषणानेच फुगून जावी या यत्तेतल्या माझ्या लिखाणाची छाती सर्वोत्कृष्ट आणि अक्षर या विशेषणांच्या वामनपावलांखाली पिचून जाईल हो.
वरच्या-खालच्या यादीतल्या सगळ्यांचे लेखन संग्रहणीय आहे यात शंका नाही.
सर्वोत्कृष्ट हे विशेषण स्थळ, काळ, व्यक्तिसापेक्ष असल्याने, मिपाच्या बाबतीत वर्तमानाचा विचार करायचा झाला तर रामदासकाकांचे लेखन सर्वोत्कृष्ट आहे असे माझे मत आहे (संजोपराव, धनंजय, बहुगुणी, जयंत कुलकर्णी, गवि, बिका, प्रभू मास्तर, नंदन, लीमाउजेट, पिंडाकाका, मितान, यकु, घासकडवी, अवलिया, चिंजं, प्रा.डॉ.,मुटे, परा,टारझन इत्यादींनी मला क्षमा करावी).
बाकी व्यास, वाल्मिकी, ज्ञानेश्वर, तुकाराम आदींच्याच लेखनाला अक्षर म्हणता येईल अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. मिपावर असो वा इतरत्र नजिकच्या भूतकाळात आणि सध्याही उत्तम लिहीणार्यांचे लेखन अक्षर आहे की नाही ते आपण कसे ठरवणार? ते काळच ठरवील.
या धाग्याच्या निमित्ताने उत्तमोत्तम वाचलेल्या लेखांची उजळणी करता आली आणि न वाचलेल्या लेखांचा आनंद घेता आला या बद्दल धन्यवाद!
2 Sep 2011 - 6:50 pm | अप्पा जोगळेकर
जयंत कुलकर्णी यांचे सगळे लिखाण, इंद्रराज पवार यांचे सर्व लिखाण आणि नितिन थत्ते यांचे काही प्रतिसाद.
2 Sep 2011 - 9:30 pm | नीलकांत
या धाग्यावर शक्य तेवढ्या लोकांनी प्रतिसाद द्यावे. म्हणजे लोकप्रसिध्द धागांची एकत्र गुंफण करून एका विशेष दालनात ते ठेवता येतील आणि नवीन येणार्या सदस्यांना ते एकत्र वाचता येईल.
- नीलकांत
3 Sep 2011 - 2:18 am | चित्रगुप्त
धन्यवाद.
..... लोकप्रसिध्द धागांची एकत्र गुंफण करून एका विशेष दालनात ते ठेवता येतील आणि नवीन येणार्या सदस्यांना ते एकत्र वाचता येईल......
हे खूपच छान होईल.
3 Sep 2011 - 10:57 am | फारएन्ड
यातील काही वाचलेले होते, बाकीचेही वाचायला मिळतील आता, धन्यवाद!
4 Sep 2011 - 5:47 pm | अप्पा जोगळेकर
म्हणजे लोकप्रसिध्द धागांची एकत्र गुंफण करून एका विशेष दालनात ते ठेवता येतील
जे ब्बात. या बद्द्दल तुमचे विशेष आभार.
आणि हा धागा काढणार्या चित्रगुप्त साहेबांचेसुद्धा आभार.
2 Sep 2011 - 10:25 pm | अर्धवटराव
सन्जोपरावांचा "पार्टी रे पार्टी" कधिही वाचा आणि आपला मूड फ्रेश करा !
http://www.misalpav.com/node/11858
(मिपाकर) अर्धवटराव
3 Sep 2011 - 12:46 pm | परिकथेतील राजकुमार
ठरवणे अवघड... खरे तर अशक्यच आहे.
काही फुटकळ आणि टाकाउ (उदा. माझे लिखाण) सोडल्यास मिपावर कायमच दर्जेदार साहित्यच बघायला मिळाले आहे. कुठल्याही पानावर जावे आणि कुठल्याही धाग्यावर जावे. तुम्हाला काहीतरी नक्की गवसेल. आणि एखादा लेख अगदीच निघाला फालतू, तर त्याच्याखाली एखादी 'क्या कहेने' टाइप प्रतिक्रिया हमखास तुमचा मूड बनवून जाईल.
असे एखाद दोघांचे नाव घेणे म्हणजे इतरांवर अन्याय करण्यासारखे आहे. बिकांच्या टिंबवाल्या धाग्यापासून ते नंदनच्या रोजनिशीपर्यंत आणि पुप्याच्या बुधवारच्या कवितांपासून कवि सतिशच्या कवितांपर्यत आम्हाला सर्व प्रिय आहे. पाकृ विभाग हा सगळ्यांचाच खास असल्याने त्या विषयी मी पामर काय बोलणार ? तो एकमेव विभाग आहे जिथे आम्ही अजुन आमचे काळे तोंड मारलेले नाही ;)
देवबाप्पा आणि टार्या तसेच अवलिया ह्या सर्वांनी आपापल्या पद्धतीने अशा लेखन आणि लेखनाची एक यादी बनवली होती. ज्यांची इच्छा असेल त्यांनी जरुर वाचावी.
टार्याची यादी
अवलिया :- डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर भाग १-१०
देवबाप्पा ह्यांचे लिखाण दिसत नाहीये.
3 Sep 2011 - 7:07 pm | बिपिन कार्यकर्ते
शरदिनी : http://www.misalpav.com/newtracker/3807
भडकमकर मास्तर : http://www.misalpav.com/newtracker/418
3 Sep 2011 - 8:30 pm | भडकमकर मास्तर
धन्यवाद...
सध्या वाचनमात्र आहे...
पण हा धागा उत्तम आहे... यावर पुनःपुन्हा भेट देऊन चुकलेले काही ( मिस झालेले या अर्थाने) सापडले की छान वाटते...
4 Sep 2011 - 2:50 am | पक्या
सर्वात बेस्ट विनोदी लिखाण ब्रिटीश उर्फ मिथुन काशिनाथ भोईर यांचे. अगदी हसून हसून पुरेवाट.
ह्या काही त्यांच्या लेखाच्या लिंका -
http://misalpav.com/node/3359
http://misalpav.com/node/8554
http://misalpav.com/node/5127
http://misalpav.com/node/10537
http://misalpav.com/node/3330
http://misalpav.com/node/5323
http://misalpav.com/node/5929
http://misalpav.com/node/9235
4 Sep 2011 - 10:40 pm | शुचि
हहपुवा.
खरच खूप विनोदी आहेत. मस्त!!
4 Sep 2011 - 6:26 am | सन्जोप राव
'संग्रहणीय' हा काय शब्द आहे? 'संग्राह्य' हा शब्द ऐकला होता. संग्रहणी हा माझ्या माहितीनुसार पोट बिघडण्याचा एक विकार आहे...
4 Sep 2011 - 6:58 am | शुचि
या विषयावर येथे बरीच चर्चा आधीच झाली आहे.
मी लहानपणापासून "संग्राह्य" हाच शब्द ऐकला आहे.
4 Sep 2011 - 11:58 am | नगरीनिरंजन
एवढी चर्चा?
ज्याप्रमाणे
वाच्य म्हणजे वाचता येईल असे
आणि
वाचनीय म्हणजे आवर्जून वाचावे असे.
त्याप्रमाणे
संग्राह्य म्हणजे साठवून ठेवता येईल असे
आणि
संग्रहणीय म्हणजे आवर्जून साठवावे असे.
असे का असू नये? हे माझ्या बालबुद्धीस समजले नाही.
केवळ संग्रहणी हा एक स्वतंत्र शब्द आहे म्हणून संग्रहणीय या शब्दाचा एकच अर्थ असला पाहिजे असे काही आहे काय? वाचन, मनन, चिंतन, ग्रहण, धरण इत्यादी धातुसाधित नामांप्रमाणे संग्रहण या धातुसाधित नामाला ईय प्रत्यय लावायला काही प्रत्यवाय आहे काय हे मला चर्चा वाचूनही कळले नाही.
असो.
4 Sep 2011 - 10:36 am | प्रदीप
तुम्ही दाखवलेली चूक बरोबर आहे. पण त्याचबरोबर रास्त शब्द सुचवला असतात तर आमची अधिक चांगली मदत झाली असती. शुचि ह्यांनी तो सुचवून आमची मदत केली आहे.
शब्दांच्या प्रयोजनांच्या, शुद्धलेखनाविषयीच्या इ. चुका काढत रहाण्याइतपत उत्साह तुम्हाला अजूनही आहे, हे लक्षणीय आहे. 'ओ असे का म्हणता तुम्ही?', अशा तर्हेचे लिखाण आता सर्रास येऊ लागल्याने ह्याबाबतीतला माझा उत्साह तरी केव्हाच संपला आहे.
4 Sep 2011 - 11:29 am | चित्रगुप्त
यावरून बरे सुचले, मिपावरील वेळेवर 'उपयोगी' पडणारे धागे पण संग्रहात हवेत....
जसे "संग्रहणी वरील सत्तावीस उपाय" किंवा "हगवण कशी हटवाल"
4 Sep 2011 - 7:43 pm | योगप्रभू
प्रसिद्ध आणि आवडत्या लेखकांच्या यादीत माझा साधा नामोल्लेखसुद्धा करावासा तुम्हाला वाटला नाही ना? अरे हाच दिवस बघायचा होता तर आम्ही स्वातंत्र्य चळवळीत कशासाठी लढलो मग?
तसा मी प्रसिद्धीसाठी कधीच हपापलेला नव्हतो. माझ्या 'विचारांचा उकीरडा' या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार देण्याचे ठरले होते. मी विनयाने पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. आता वाटते, की ती चूकच झाली.
असो, जेव्हा मला साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळेल तेव्हा तुम्हाला माझी किंमत कळेल. पण नकोच. कुणाच्या नजरेत भरण्यासाठी पुरस्कार हवाच कशाला?
आज लोक मला विसरलेत, पण एकेकाळी 'राया माझा धोतरातच' या नाटकाला लोकांनी केवढे डोक्यावर घेतले होते, याची तुम्हा मुलांना कल्पना नाही. काही कुचाळांनी 'शीर्षक अपुरे आहे. काही शब्द राहिलाय का?' असेही खवचटपणे विचारले, पण मी सांगितले, की 'जग जरी प्यांट वापरायला लागले असले तरी माझ्या रायाने अद्याप धोतर सोडलेले (वापरायचे) नाही. म्हणून नाटकाचे नाव 'राया माझा धोतरातच' असे आहे. शीर्षक तिथेच संपले आहे.' त्यानंतर या नाटकाने मागे वळून पाहिले नाही.
'वाचा आणि नाचा' (बालसाहित्य), 'एक तरी शिवी अनुभवावी' (गहन आध्यात्मिक साहित्य), 'भुंकले कोण..थुंकले कोण' (समीक्षा), 'रेझर इरेझर' (विज्ञानकथा), 'कारल्याच्या मांडवात' (काव्यसंग्रह), 'रस्त्यातले रहस्य' (रहस्यकथा), या माझ्या काही उल्लेखनीय साहित्यकृती. बाकी नावे यादीत बघून सांगेन.
असो. देवा त्यांना माफ कर. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून हे लोक माझी सही घ्यायला येतील तेव्हा माझ्या मनात काही पूर्वग्रह राहू नको दे...
4 Sep 2011 - 8:27 pm | राजेश घासकडवी
या प्रतिसादाला टाळ्या झाल्या पाहिजेत. व मिपावरील सर्वोत्कृष्ट, संग्रहणीय प्रतिसादांमध्ये तो असल्यामुळे तो तसा संग्रहणीत ठेवावा अशी मी सूचना मांडतो.
5 Sep 2011 - 12:53 am | पाषाणभेद
योगप्रभुंचे लिखाण प्रेरणादायी आहे.
4 Sep 2011 - 9:45 pm | अश्फाक
सर्वोत्कृष्ट = टिचला बिलोरि आइना ( रामदास )
5 Sep 2011 - 10:15 am | शुचि
मेवेंचा हा लेखसुद्धा अतिशय विनोदी आणि सुरेख आहे.
अरुंधतीचा हा लेख फार सुंदर आहे
5 Sep 2011 - 11:06 am | समीरसूर
मिपा हा एक समृद्ध खजिना आहे! कुठली रत्ने निवडावीत हा एक प्रश्नच आहे. तरी मला हमखास आवडणारी किंवा विचार करायला लावणारी साहित्यसंपदा निर्माण करणारे ताकदीचे खालीलप्रमाणे:
गवि, परीकथेतला राजकुमार, रामदास, पंगा, छोटा डॉन, टारुशेट, ब्रिटीश, नगरीरंजन, सुधीर काळे, तात्या, आदिजोशी, ऋषिकेश, अपर्णा अक्षय, आत्मशून्य, स्पा....
यादी खूप मोठी आहे. यांचे लेख, वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे, मुख्यपानावर दिसताच उघडले जातातच...आणि वाचनाचा आनंद देऊन जातात. अजून बरेच लेखक आहेत जे वाचनानंद मुक्तहस्ताने वाटत असतात.
असेच उत्तमोत्तम लिखाण वाचायला मिळत राहो ही प्रार्थना.
5 Sep 2011 - 11:26 am | सहज
हा प्रतिसाद भरपूर वाचन आनंद देतो....
(ग्लटन)सहज
5 Sep 2011 - 12:05 pm | मृत्युन्जय
"रामदासकाकांचे सगळे लेखन" असे ३ शब्दात सांगुन मोकळा होतो. अर्थात इतरही लोक उत्तम लिहितात हेवेसांनल.
बिकांचे काही लेखन उत्कृष्ट आहे.
गवि सुंदर लिहितात.
स्पावड्याचे २ लेख आवडले होते.
शानबाचाही एक आवडला होता.
जे पी मॉर्गनचे लेख उत्कृष्ट.
आदिजोशी चे लेख आणि परीक्षण कातिल.
फारएण्डकाकांची परीक्षणे सलाम ठोकण्यायोग्य.
पिडांकाकांची काही व्यक्तिचित्रणे खल्लास.
जयंत कुलकर्ण्यांच्या सगळ्याच लेखमालिका उत्तम.
समीरसूर, अभिजीत यांचेही काही लेख उत्तम.
पराचे प्रतिसाद आणि काही परीक्षणे अतिउत्तम.
5 Sep 2011 - 6:16 pm | साबु
ब्राउ सिरिझ आणि और गिटार....बी पी ओ...
विनीत सन्खे... यान्च्या काही कथा....
16 Sep 2011 - 2:37 pm | क्राईममास्तर गोगो
मी कथा आणि विनोदी लेखच वाचतो.
गवि, स्पा, अदिजोशी, विनीत संखे, परा, रामदास भाऊ... आणि इतर ग्रेट मिपाकर.
:-)
16 Sep 2011 - 3:49 pm | सुहास..
गणपा, अपर्णा अक्षय, प्राजुताई, जागु, इन्द्रा - द टायगर आणि विमुक्त चे नाव नसल्याचे आश्चर्य वाटले .
आवराच !!
9 May 2020 - 8:36 pm | रघुनाथ.केरकर
काहि प्रतिसाद तर मुळ लेखापेक्शा सरस आहेत.
9 May 2020 - 10:30 pm | पाषाणभेद
असले प्रश्न आणि याचे धागे निघावे हेच मोठे वैषम्य आहे. असले धागे वर्ष दोन वर्षांनी नेहमी निघतात. त्यात त्या त्या वेळच्या महानुभावांच्या मगदुरानुसार यादीही बनते.
पण असल्या संग्रहणीय धाग्यांची यादी बनवण्याची रित किंवा पातळी काय? जास्त प्रतीसाद किंवा गाजलेला लेखक.
संग्रहणीय, सर्वोत्कूष्ट याचे निकष कोण ठरवणार?
आणि एखादा धागा, लेखन एखाद्या कमी प्रतिष्ठेच्या लेखकाने लिहीलेले असेल आणि ते माझ्या मते सर्वोत्कृष्ट असेल तर?
दुसरे असे की अशी यादी बनवावीच का लागावी? ते ही काही पिरिअडनुसार? दोन एक वर्षात?
जो येथे नवीन येतो त्याला अशी तयार यादी देण्याचे काय कारण? त्याला गरज असेल, वाचनाची आवड असेल, खोदकाम करावे वाटले तर त्याने ते लेख वाचावे.
अशी यादी करण्यामुळे इतरांवर अन्याय होतो असे वाटत नाही काय?
9 May 2020 - 10:43 pm | मोदक
>>अशी यादी करण्यामुळे इतरांवर अन्याय होतो असे वाटत नाही काय?
नाही.
9 May 2020 - 10:51 pm | पाषाणभेद
सर्वोत्कृष्ट चा निकष काय?
असे निकष असणार्यांचे निकष काय?
तुम्हाला सर्वोत्कृष्ट वाटणारे धागे या यादीत नसतील तर काय?
(असली यादी म्हणजे पाठ्यपुस्तकातल्या अभ्यासक्रमात आपला लेख धड्याच्या रुपाने प्रकाशित झाल्यासारखे वाटते. अभ्यासक्रम तयार करणारे सर्व प्रकारातील असतात. यात प्रादेशिकता, जातीभेद आदी सगळे प्रकार पडद्याआड असतात. आताच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांतील धड्यांमध्ये सर्रास चुकीचे वाकप्रचार, हिंदी वाक्य, हिंदाळलेली मराठी वाक्य, शब्द समाविष्ट असणारे पाठ आहेत. अनेक लॉजीक नसलेले पाठ उच्च इयत्तांना लावलेले आहेत ज्यातील विद्यार्थ्यांच्या जाणीवा प्रगल्भ झालेल्या असतात.)
असो.
10 May 2020 - 6:57 am | कंजूस
विषयवार अनुक्रमणिका आहेत. आपल्याला आवडणारी उघडून मागे मागे शोधत जातो / जात होतो.
मी फक्त भटकंती उघडून ( मिपा आणि मायबोली ) सर्व वाचले.
अर्थात हे सर्व मी इकडे आलो २०१३ मध्ये तेव्हा त्या अगोदरचे शोधावे लागले. शिवाय त्या वेळी इंटरनेट आणि कंम्पुटर नव्हता ( अजूनही नाही।)२०१६ नंतर मोबाईलचे इंटरनेट चाळीसपट स्वस्त झाले आणि युट्युब विडिओ पाहणे परवडू लागले. सर्वच प्रश्न झटकन सुटले. त्यात आणखी उत्तम मोबाइलची भर पडली.
कविता,कादंबरी,राजकीय लेख, माझा प्रांत नाही.
ज्या आइडींना आपले लेखन इतरांनी वाचावे असे वाटत असेल त्यांनी आपल्या लेखात माझे लेखन इथे पाहा ही लिंक स्वत:च टाकावी. कारण वाचनमात्र आणि सभासद नसणाऱ्यांना याचा उपयोग होईल. विषयवार लेख पाहताना एखाद्याचे आणखी लेखन पाहण्याची सोय होईल. या लिंकमध्ये 'युजर नंबर' असतो तो धोरणानुसार उघड करणे बाद आहे. पण लेखक स्वत: आपला देऊ शकतो.
10 May 2020 - 6:49 pm | जव्हेरगंज
ज्या आइडींना आपले लेखन इतरांनी वाचावे असे वाटत असेल त्यांनी आपल्या लेखात माझे लेखन इथे पाहा ही लिंक स्वत:च टाकावी. कारण वाचनमात्र आणि सभासद नसणाऱ्यांना याचा उपयोग होईल.
एक्झ्याक्टली!!!
11 May 2020 - 4:07 pm | मराठी कथालेखक
रातराणी : कळते रे!
11 May 2020 - 7:04 pm | हस्तर
हस्तर परीक्षण वार बुधवारी वारला
http://www.misalpav.com/node/45482
14 May 2020 - 9:33 am | आदित्य कोरडे
मला जयंत कुलकर्णी ह्यांचे सगळे लेखन त्यातूनही पिसुक हे काफ्काच्या मेतामोर्फोसीस चे भाषांतर, आणि अजिंठा वरची लेखमाला हे फार आवडले
17 May 2020 - 2:41 am | मेघनाद
तसे मिपावरचे बहुतांशी सर्वच लेख छानच असतात. तरी पण काही लेख मनात जागा निर्माण करतात, माझ्या मनात जागा कोरलेले काही लेख. तसे अजून बरेच आहेत पण सध्या आठवतील तेवढे प्रतिसादात टाकलेत.
१ मिपावरील हरवलेला लेखक - स्पार्टाकस यांचे खालील लेख (जवळ जवळ सगळेच लेख आवडलें मला )
छावणी
आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट -
थोडे अद्भुत थोडे गूढ
९० डिग्री साऊथ
के-२ : द सॅव्हेज माऊंटन
१९९६ माऊंट एव्हरेस्ट - हा मिपावर वाचलेला पहिला लेख ज्यामुळे मिपाशी नातं जुळलं.
२ विसोबा खेचर यांची रोशनी
३ डॉ सुहास म्हात्रे यांची सगळीच प्रवासवर्णने
४ टर्मीनेटर यांचे ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव.
५ विजुभाऊ यांची अप्रतिम लेख मालिका दोसतार
६ स्वॅप यांच्या भयकथा
मिपासंपादक मंडळासाठी विनंती: शक्य असल्यास ह्या धाग्यावर आलेल्या सर्व लेखांचे दुवे खास पानांवर दिले तर फार बरं होईल.