आज्याची शिकवन

ब्रिटिश's picture
ब्रिटिश in जनातलं, मनातलं
3 Sep 2008 - 1:45 pm

मी तवा सातवीत आसन

मी माजे दोन चुलतभाउ सादारन यकाच वयाच
आमी तवापासुन आज्याच्या बीड्या चोरुन पीवाचो. त्याची पन यक झम्मड हाय

आजा म्हन्जे गावचा सरपंच. पन लई पेताड. सकाली उटला क आंगोल धवाचे आदी भट्टी वर हजर न दुपारचा
जेवला क बेड्यान (सुद मराटीत - बैलांचा गोठा) झोपाचा आनी संद्याकाली उतरली क गावचे कामाला लागाचा.
म्हन्जे तेला भेटाचा आसन तर संद्याकालीच. पन गावान धाक जबरा. यकदा क आवाज टीपवला क कोनाची टाप नाय सामनी यवाची

तर क झाल्त ,

आमाला रोज बीड्या लागाच्या आनी खीच्यान पैस कुटल ?

रोज दुपारच्या टायमाला आमी सगले आज्याची वाट बगाचू. यकदा क आजा झोपला क हलूच जावून तेच्या बीड्या पलवाचू.
सुरवातीला आज्याला कई कलाचा नई पन नंतर नंतर तेला शक याला लागला

दुपार झाली

आजा बेड्यान चिप परला व्हता. फुल्ल तर्राट.

आमची टोली हलूच त्याजेजवल सरकु लागली . यकानी मना फुर लोटला बीड्या काराला. मी गेलू न जसा बंडलाला हात लावला
आज्यान चटाककन माजा हात पकरला बोल

मी थरथरलू, पोटान गोला.आता क कराचा ? आज कई खर नाय . आजा न बा दोगेव मिलुन चामडी लोलवनार.

आज्याचा यक डोला उगडला
"बाला आज नूको न्हेव. आज कमी हायत" आजा

मी थंनगार

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ल्ला सगला काय नावानच हाय)

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

गणा मास्तर's picture

3 Sep 2008 - 2:22 pm | गणा मास्तर

लै भारी

लिखाळ's picture

3 Sep 2008 - 3:38 pm | लिखाळ

मजा आली..
--लिखाळ.

विसोबा खेचर's picture

3 Sep 2008 - 4:49 pm | विसोबा खेचर

ए बाला, तू अन तुजा आज्जा लै जबरा हाय बोल!

मी पन ल्हानपनी जाम लफरी केली बोल! :)

तात्या,
दिवा गाव.

वेताळ's picture

3 Sep 2008 - 5:15 pm | वेताळ

पण लेका तु अमावशा पुनवेलाच का लिहतस. जरा कायबाय खरडत जा इकड.

शितल's picture

3 Sep 2008 - 5:33 pm | शितल

तुम्ही गार झाला असाल ना तुमच्या आजोबांच्या वाक्याने.
:)
आज्याची शिकवन आवडली. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Sep 2008 - 5:38 pm | बिपिन कार्यकर्ते

आज्या द ग्रेट.... मस्त आहे रे बाला तुज्जा आज्जा...

चकली's picture

3 Sep 2008 - 8:24 pm | चकली

मस्त आहे
चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

3 Sep 2008 - 8:32 pm | प्राजु

भारी आहे आजा तुझा!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

3 Sep 2008 - 9:03 pm | धनंजय

नातू एक नंबरी, आजा दस नंबरी

प्रमोद देव's picture

3 Sep 2008 - 9:38 pm | प्रमोद देव

धन्य तुझा आजा आणि तुही धन्य आहेस! :)
मस्त लिहीलंय.

सर्किट's picture

3 Sep 2008 - 9:39 pm | सर्किट (not verified)

लय भारी रे मिथुन !!!

-- सर्किट

पांथस्थ's picture

3 Sep 2008 - 9:52 pm | पांथस्थ

आमचा आजा पण एकदम 'स्पोर्ट' होता...तो आन आम्ही नातू मिळुन पण लय धमाल करायचो....कधी वैशाली मधे चरत बसा...नाहीतर बिर्याणी खायला जा....काहि वेळा तर ग्लास पण एकत्र भरले आहेत...आणि ग्लास खाली झाले की मग कोंबडी चेपायला निघा....

आता फक्त आठवणी.....

असो... तुमचा लेख वाचुन मजा आली....आजा असावा तर असा....

(आज्याच्या आठवणीत रमणारा) पांथस्थ

(स्वगतः नाहीतर काही आजे नातवाला मिसरुडं फुटली तरी लंगोट घेउन तयार....)

चतुरंग's picture

3 Sep 2008 - 9:52 pm | चतुरंग

डांबीसच दिसतोय की आज्जा तुझा!

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2008 - 11:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डांबीसच दिसतोय की आज्जा तुझा!
नाही तर काय ! आम्हीबी थंनगार पल्डो, आज्याच्या शिकवणीनं :)

देवदत्त's picture

3 Sep 2008 - 11:21 pm | देवदत्त

=)) >:)

रामदास's picture

3 Sep 2008 - 11:28 pm | रामदास

मेरे आजोबा तेरे आज्ज्या जसे होते.

सहज's picture

4 Sep 2008 - 9:22 am | सहज

मिथुन मस्त रे!

आज्या लई भारी!

विसुनाना's picture

4 Sep 2008 - 3:19 pm | विसुनाना

आगरी भाषेतला चुटकुला चाट करून गेला.

भडकमकर मास्तर's picture

4 Sep 2008 - 5:56 pm | भडकमकर मास्तर

मस्त रे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

4 Sep 2008 - 6:10 pm | मुक्तसुनीत

आज्या लई भारी !

बेसनलाडू's picture

5 Sep 2008 - 1:42 am | बेसनलाडू

आज्या लै भारी!
(नातू)बेसनलाडू

मदनबाण's picture

5 Sep 2008 - 4:30 am | मदनबाण

जल्ला लय भारी लिवतोस रे तु.. :)

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda