प्रतिक्रिया
आला ब्रिटीश आला
हवालदारांचे पाय पडाला दोगांनाव तरास नाय झाला. खालीच लोळलेवते. नीस्ती कूस बदलली
हे खास लिहीलंय.
खात
पुणे नाशिक रोडवर पेठ घाटातल्या वायरलेस स्टेशन चे इंचार्ज आमी व्हतो तवाची गोष्ट .आमच्या सहकारी पोलिस शिपायाच गावातल्या गुत्तेवाल्याकड खात व्हत.पोलिस अस्ला म्हनुन काय झालं? फुकाट किती दिवस परवडन? यकदा तो दोन पायाव चालत आला. सायकल नवती. म्हन्ल कुड गेली सायकल? लईच उदारी झाल्ती काळे मामान (गुत्तेवाल्यान) ठेउन घेत्ली म्हन्ला. मंग मी त्याच्याक गेलो. म्हन्ल मी तीन म्हैने ड्युटीवर हय तोवर तुपली उदारी वसुल करुन देतो. यक काम करायच कोटा ठरवुन दिला तेवडाच द्यायचा. न्हाईत मी जबाबदार नाई. आत्ता सायकल दे न्हाईत त्यो ड्युटीला उशीर करतोय. सायकल घेतली. पगार घेतला. उधारीचा पहिला हप्ता दिला. उरलेले पैशे त्याच्या बायकोक दिले. तीन म्हैन्यात त्याच्या हातात पैशे ठेवलेच नाई.तीन म्हैन्यात निल केली उदारी. जाधव शिपाइ खुश ,त्याची बायकु खुश,काळे मामा खुश. आमी खुश.
प्रकाश घाटपांडे
भारी गोष्ट!
आवडली.
गड्याचं नाव सगळीकडे एकच दिसत नाहीये,
कि मलाच न घेता चढलीये?;)
रेवती
कं लिवलंस रे बाला! मज्जा आली.
मना बी आता दारुचा धंदा खोलाचा .बोल! करतं क पार्टनरशिप?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
हलू बोल बाला!
मना तिकरुन प्रकाशकाका आन तात्या खाकी प्यांट आन दंडुका घिउन येताना दिसलं! ;)
चतुरंग
:)
येऊ दे की रं! न मी कय फुकट धंदा करतं क रं!! हप्ता घेवून जातं ना रं त्ये. :)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
मस्तच रं बाला!
यका गुत्तेवाल्याला फुल गब्बर करून मगच दुसर्या गुत्याव जाईल आसा परोपकारी मानूस.
हवालदारांचे पाय पडाला दोगांनाव तरास नाय झाला. खालीच लोळलेवते. नीस्ती कूस बदलली
=)) =))
कं लिवलंय! कं लिवलंय!
चतुरंग
असंच
असंच म्हंतो..कं लिवलंय! कं लिवलंय!
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
असंच म्हणतो
बाल्या,
लै भारी लिवलंय... हहमु वळली.
तुपला
(गावकरी) आजानुकर्ण
आला रे आला
=))
आला रे आला बाला आला.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
दादूस...
जल्ला कं लिवतं रं तू :)
'त्याच आस बगा' झिपर्यान जवल येऊन आज्याचे खांद्याव हात टाकला खाडकन गां*वर लात बसली. 'पायरीवर बस वर येव नको.' आजा फुगारलाह हा हा...आमचा मल्हारपण असाच आजोबांच्या लाथा खायचा !
'ती त गंमत हाय न शेट. आवो धा च्या तीस कराच्या. शंबर टक्के प्रापीट ' झिरप्यान प्रोजेक्ट रीपोर्ट बनवला.प्रोजेक्ट रिपोर्ट???? =)) लय भारी!!!
हवालदार आपल्याला तुडीवतान ह्ये समजालाच धा मीन्ट लागली. दम लागला म्हुन हवालदार थांबले.=)) आरारारारा....माल येकदम करक व्हता दिस्तंय! धा मिंटं मामालोकं तुरवतांव ह्या कल्लाच नाय :)
तीस बाटल्या संपल्या गल्ल्यात पैशे शुन्य टोटल लास धंदा बंदआगरी आसला म्हनुन काय झालां? म्हराटीच ना? जल्ला शंबरात येकांद्याचाच धंदा चालनार, बाकी आपुन सगले टोटल लासवालेच :( दादूस तुजा ह्यो श्टोरी आवरला रं :)
एकदम झ्याक रं बाल्या
जल्ला तुझं नाव वाचलन हासया सुरुवात केल्ली...... =)) ...पहिल्यान धारची पाजलिस किर बाल्या...लई झ्याक
वेताळ
++१
आला रे आला ,बाला आला.......
>>>यका गुत्तेवाल्याला फुल गब्बर करून मगच दुसर्या गुत्याव जाईल आसा परोपकारी मानूस.
>>>>गल्यापातुर आली क बास कराची
>>>>सकाली पीवला गांधी खिचान आसल त सांजच दोन हिरव गांधी उरतान
>>>>सा बाटल्या पीउन हवालदारांनी आज्यावर दया केली न नीगुन गेले
:D =D> :-D =D> :-D =D> :-D =D>
अवांतरःआपण कधी बसायचं दादूस ? :?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
ब्रिटिश, आत
ब्रिटिश,
आता तुमचा एखादा "आगरी कथासंग्रह" प्रकाशित होण्याची वाट बघतोय
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
शुद्ध आगरीचा आनंद
व्वा भोईर साहेब, काय खुसखुशीत कथा! दिल खूष झाला. हस्य फवारे उडवत उडवत आम्ही सहकुटुंब कथेचा आनंद लुटला. आमच्या बायडीला आगरी समजायला जरा जड जातं. पण तिला सुद्धा ही हलकी फुलकी झुलती (तिची प्रतिक्रिया) कथा आवडली.
लिखानात आगरीचा ठेका मस्त जुळवला आहे. आमच्या काही आगरी मित्रांच्या आठवणी जाग्या झाल्या. साधी भोळी अन कष्टाळू माणसं. त्यांचा बडबडा पण मोकळा स्वभाव. मनात एक अन ओठावर दुसरं असं होणार नाही. सच्चे मित्र. माझ्या कित्येक आगरी मित्रांच्या देवघरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आहेत (त्या सहसा दिवानखान्यातल्या भिंतीवर असतात म्हणून वैशिष्ट्यपूर्ण वाटले).
रायगड जिल्ह्यात फक्कड मासे खायचे असतील तर आगरी कुटुंबांकडे आमंत्रण हवं. त्यात पेग असेल तर सोन्याहून पिवळे. आम्ही मात्र हातावर झेलून बनवलेल्या तांदळाच्या भाकरी न आमटीवर थांबत असू.
असो... एकंदर मला पनवेल/पेन/वडखळ चे दिवस आठवले.
आपला,
(आगरी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
वाचलां आनि हसुन पोट दुकलां
अरे तुझ्या या ष्टोरीला प्रतिसाद द्यायचा दोन वेळेला प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळा लेख वाचायला लागलो आणि लेखातच गुंगून गेलो....
काय मस्त लिहिलंय...
'आसा बग सकाली पीवला गांधी खिचान आसल त सांजच दोन हिरव गांधी उरतान'
व्वा, गांधी सांगून गेलेलेच होते, की ग्रामोद्योगाला प्रोत्साहन द्या.....
'धंदा कराचा ? चालल क र?' आजा आगरी आसला तरी मराटी व्हता.
क्या बात है!!!! आगरी झाला म्हणुन काय झालं? मराठीपणा कुठं लपवणार!!!!:)
हवालदारांचे पाय पडाला दोगांनाव तरास नाय झाला. खालीच लोळलेवते. नीस्ती कूस बदलली
मस्तच!!!!
जियो बेटा, हमारी उमर लेके जियो!!!!
तुझा पक्का फॅन,
डांबिसदादूस
(पुढल्या ट्रीपला आलं पाहिजे तुझ्याकडे! सुक्या जवल्याची चटनी आणि पटनीची भाकरी खायाला!!!:))
कंदी बी या
कंदी बी या सगली सोय करत बगा
नक्कीच! संगती थोडी थोडी मोहाची पण घेऊ. लै दिस झालं मोहाची पिल्याला! :)
आणि सगली सोय म्ह़णजे? अगदी सगली? लागंल ती? ;)
आपला,
(बाईबाटलीतला) तात्या.