कॉमनसेंस आणि पालीचं पिल्लू

विनीत संखे's picture
विनीत संखे in जनातलं, मनातलं
14 Apr 2011 - 9:46 am

कधीकधी साधासुधासा विचार करणं आणि तसं वागणं आपल्या हातात नसतं. म्हणतात नं "कॉमनसेंस इज अ सेंस विच इज नॉट सो कॉमन!". मुळातच लग्न झाल्यावर आणि पोरं बाळं आल्यावर कॉमनसेंस वापरणे दुर्मिळ होत जाते हे आपण सर्वच खाजगीत मानतो. अर्थातच मुलांचा अभ्यास घेताना एखाद दुसऱ्यावेळेस हा सेंस कामी येत असेलही, पण त्याबाबतीत पालकांपेक्षा मुलंच जास्त सरस ठरत असतात हेही तितकेच खरे.

त्यात पुन्हा स्त्री किंवा मुलगी असल्याचा एक आभिशाप... एमसीपी म्हणजे मेल च्शॉविनिस्ट पिग्स, अर्थात मराठीत, पुरूषत्व हेच प्रगतीचं अन बुद्धिमत्तेचं प्रमाण मानून चालाणारे पुरूष भोवताली असले की अधिकच... "तुम्हा बायकांना काही कळतच नाही" असं टाकून बोलणं ज्यांच्या "वाय" क्रोमोसोम्ससोबत आलंय असे आपले पुरूष आप्तप्रिय .. मग त्यात नवऱ्यापासून मुलांपर्यंत सगळेच आले. मग अशावेळेस त्यांच्या विरोधात बंड करण्यापेक्षा ‘त्यांना त्यांच्याच भ्रमात राहू दे’ असं समजून आपलं स्त्रीमन ‘महागणारं सोनं’, ‘वागळेंच्या मोठीने केलेलं लव्ह मॅरीज’ किंवा ‘सानेबाईसोबत पाणीपुरी खाताना दिसलेला पुष्पाचा नवरा’ अशा सामाजिक गोष्टींत गुंतवलेलं परवडतं.

पण मग कधी कधी अशा गोष्टी होतात जिथे नियती आपण स्त्रीलिंगी असल्याचं आपल्याला पटवते... आणि ते सुद्धा त्या 'एमसीपी' बुद्धिमत्तेस कोड्यात टाकून..,.

तर झालं असं की घरात पाली पसरल्या. पेस्ट कंट्रोल करावं तर छोट्या कार्तिकला वास येतो. "अगं हर्बल पेस्ट कण्ट्रोल करूया", मिष्टर बोलले... "नको महाग पडेल", सासऱ्यांचं मत, "त्यापेक्षा अर्धवट फोडलेली अंडी ठेवू."

"श्शी! नको घाण दिसेल, त्यापेक्षा पालींचं नसबंदी करणारं औषध पालींच्या खाण्यात दिलं तर?", मोठ्या सौम्याने पर्याय ठेवला, "त्यांना ठार मारण्यापेक्षा हे जास्त ह्युमेन आहे".

परवाच पाली "रेप्टाईल" वर्गात मोडतात हे कार्तिकला शिकवताना पटवून दिल्यावर आज त्यांच्याशी "ह्युमेन" का वागावं हा प्रश्न मात्र कुणी सौम्याला विचारला नाही... त्यात पालींना औषध घालून द्यायला लागणारं खाणं कोणतं, ते कुठून आणावं आणि ते फुकट देणं किती आपल्याला परवडेल ह्याचं गणित आम्ही मांडू लागलो.तेवढ्यात कार्तिकने दोन तीन माशा आणि एक झुरळ पकडून आणलंच... "उईईई!", सौम्या किंचाळली आणि तिनं कार्तिकला धपाटे घातले (तसं अठरा वर्षांची झाल्यापासून माझं हे काम ती अत्यंत स्वखुशीने करते).

"पण मी तर पालींचं डीनर आणलं होतं...", कर्तिकने त्याची बाजू मांडायचा फुटकळ प्रयत्न केला जो कोणी कानांवरही घेतला नव्हता... पाठ चोळत तो आणि चर्चेत नववाद निर्माण करूण सौम्या आपापल्या खोलीत परतले.

आम्ही इथे स्वस्तातलं पेस्ट कण्ट्रोल करायचं ठरवलं त्यासाठी कार्तिकला दोन रात्र त्याच्या सुमीमावशीकडे ठेवायचंही सोबत ठरवून टाकलं. तिचा चार वर्षांनी मोठा आशिष कार्तिकचा "आयडॉल" आहे म्हणून कार्तिक दोन रात्र मजेत तिथे काढेल आणि आशिषला फुशारक्या मारायला तेवढंच अवसान मिळेल हे आमचं प्लानिंग व्यवस्थित ठरलं होतं.

"उईईईईई!", सौम्याची किंचाळी पुन्हा घुमली आणि मिस्टरांनी कार्तिकला हाक घातली...

"कार्तिऽऽऽक! ताईला सतवू नकोस!"
"पण पप्पा मी तर माझ्या खोलीत आहे!" इति कार्तिक.
"मम्मी पप्पा पाऽऽऽऽआल!!!", सौम्याचा आवाज पुन्हा घुमला.

आम्ही तिच्या खोलीत धावलो. कार्तिकही तिथून आला... हातात बॅडमिंटनचं रॅकेट घेऊन.

"कुठेय पाल?", मिस्टर ओरडले.
"ती बघा तिथे माझ्या बेडवर. शी इज ह्युज .. लाईक अ डायनो!", सौम्या खोलीबाहेर पळाली. समोरच बेडवर एक मोठी पाल पडलेली होती. बऱ्यापैकी मोठी होती पण सौम्याने उगीच तिला डायनोसॉरची उपमा दिली असावी.

"मी मारतो. मी मारतो!", कार्तिक बॅडमिंटनचं रॅकेट घेऊन आमच्या पुढ्यात घुसला.
"अरे बेडशीट खराब होईल., कार्तिक. मागे ये!" मी ओरडले. उगीच पालीच्या कलेवराचे डाग घेऊन मला ती बेडशीट उद्या धुवायची नव्हती.
"तरी पण .. मी हलकंच मारीन", कार्तिकने आश्वासन दिलं आणि तो त्याच आवेशात बेडपर्यंत पोहोचलाही पण तिथंच थबकला.

मी आणि ह्यांनी कार्तिकच्या डॊक्यावरून पाहिलं तर बेडवर पाल दिसली... उताणी पडलेली.

"आधीच मेलेली दिसतेय!", मी.
"हो!", सासरेबुवा.
"नाही पण पोट वर खाली होतंय. ती श्वास घेतेय. मी चिरडतो!", कार्तिक.
"नको! तू आधी पाठी हो बघू!", मी कार्तिकला मागे ढकललं, "मला कळत नाही तुम्हा मुलांना गोष्टी चिरडायला का आवडतात."
"या! सो वॉयलण्ट किड्स आर दीज डेज.", सौम्याने टिप्पणी केली, "बाय द वे काढा नं तिला?", सौम्या मागून येत म्हणाली.
"नाही आधीच मेलेली दिसतेय", हे.

मग दोन मिनिट खोली गप्पच होती.

"अहो! फरट्याने काढा हो तिला.", मी म्हणाले
"पण टुणकन उडाली तर?", सौम्या.
"म्हणून मी सांगतोय ना... मला मारू द्या प्लीज!", कार्तिक पुन्हा मागूनच ओरडला.
"कार्तिक मला ते रॅकेट दे", हे म्हणाले
"नको बाबा!", कार्तिक आणि सौम्या दोघे ओरडले.

ते दोघे ओरडले तसे आम्ही थांबलो.

"तिला मारू नका." ... "पण मला मारायचं होतं’... "बिचारी आधीच अर्धमेली झालीय"... दोघे एकत्रच बोलते झाले तसं आम्हीही बुचकळ्यात पडलो.

कुणाचं ऎकावं?

"मी मारत नाहीय फक्त तिला उचलून घराबाहेर टाकतोय.", हे म्हणाले, "कुणाकडे काही आणखी आयडीया असेल तर सांगा."

खोली गप्प झाली.

दोन्ही मुलांना नाराज न करता त्यातला सुवर्णमध्य साधलेला पाहून मला ह्यांच्या एमसीपी बुद्धिमत्तेचं थोडंसं कौतुक करावसं वाटलंच.

मागून काहीच प्रतिक्रिया आली नाही तसं त्याला "ओके!" समजून ह्यांनी रॅकेटने त्या पालीला उचललंच.

"एक मिनिट बाबा!", सौम्याला काहीतरी जाणवलं. ती म्हणाली तसं आम्ही तिथे थबकलो.. "नीट बघा त्या पालीला."
"का?", आम्ही सगळेच ओरडलो.
"तिच्या पोटातून काहीतरी बाहेर येतंय.", सौम्या म्हणाली तसं कातिकने पालीचं नितंब डोळ्यांनी ढुंडाळलं.
"कुठे? शी करतेय का ती?"
"तिथे नाही डंबो!", सौम्याने कार्तिकच्या बुद्धीची कीव त्याला टपली मारून केली.
"तिथे पोटाकडे"

सगळे पोटाकडे पाहू लागले. सासरेबुवांनीही चश्मा चढवला.

आणि खरोखरंच त्या पालीच्या पोटातून काहीतरी बाहेर येत होतं. ओटीपोटाकडच्या भोकातून एका छोटसं गुलाबी लांबट असं काहीतरी होतं. पाल जोरात श्वासोछ्वास करत होती. आम्ही आश्चर्यचकित झालो. ह्यांनी त्या गोष्टीला हात लावला तसा तो भाग पुन्हा आत घुसला अन एक मिनिटात पुन्हा बाहेर आला. जरा जास्तच बाहेर आला होता.

"ओह माय गॉड!" कार्तिक ओरडला, "हिला तर पिल्लू होतंय!"
"अरे देवा ... म्हणुनच पाली पसरल्या घरात... अशा रेटने पिल्लं होऊ लागली तर एक दिवशी आपल्याला घराबाहेर पडावं लागेल.", सासरेबुवा म्हणाले.

"खरंय ते", आम्ही मान्य केलं आणि हे नव्या जोमाने त्या पिलाच्या बाहेर पडणाऱ्या हाताला पकडण्याचा प्रयत्न करू लागले.

पण पुन्हा तेच झालं.

"वाटतंय की तिला पिल्लू बाहेर येताना खूप त्रास होतोय", मी तर्क बांधला.
"ओके. मग काय करू आता मी?", ह्यांनी थोडसं रागातच विचारलं, "टाकू हिला बाहेर?"
"नको!", सौम्या एकदम म्हणाली, "आपण सहाव्या फ्लोर वर राहतो बाबा. हिला बाहेर टाकलं तर लेबरमध्ये असलेल्या एका मुक्या आईला आणि त्याला न जन्मलेल्या पिल्लाला मारायचं पातक आपला माथी लागेल."

सौम्याचे हे शब्द तिच्या दहावीच्या मराठीतल्या निबंधातले होते हे मला ठाऊक असल्याने तिच्या ह्या डायलॉगवर मी सोडून सगळेच भावूक झालेले दिसले.

बिचारी पाल अजूनही उताणी पडलेली प्रसूतीच्या कळा सोसत होती.

पण तिला बाहेर टाकायचे धारिष्ट्य कुणालाही होत नव्हते. मिस्टर मात्र अजूनही तिच्या बाहेर पडणाऱ्या पिलाला खेचून काढायचा वायफळ प्रयत्न करत होते.

"जाऊद्या बाबा! हिला बाहेर व्हरांड्यात सोडा... तिथे पायऱ्यांवर", सौम्याचा सल्ला मानायचा आम्ही नाईलाजाने ठरवलाच. ह्या प्रकारातून लवकरात लवकर सुटका करवून घ्यायचा तोच एक मार्ग दिसत होता.

पालीला शेवटी बाहेर सोडलं आणि सुटकेचा निश्वास सोडला. सौम्याच्या हातात असतं तर तिनं "गेट वेल सून!" चं ग्रिटीन्ग त्या पालीला तिथंच प्रेजेन्ट केलं असतं.

"हुश्श!", पालप्रकरण संपलं बाबा एकदाचं.", सासरेबुवा म्हणाले आणि सौम्या आणि कार्तिक आत आपापल्या खोल्यात गुल्ल झाले.

नंतर पालीचं काय झालं ते कळ्ळं नाही अन दुसर्‍या दिवशी ती किंवा तिचं पिल्लू काही तिथं दिसलं नाही. अनेक दिवस गेले आणि पेस्ट कंट्रोल ही झालं. आम्ही पालमुक्त झालो.

अशाच एका दिवशी मी, सासरेबुवा आणि हे हॉलमध्ये बसलो होतो टिव्ही पाहात. ह्यांनी रिमोटचा ताबा घेतला होता आणि ते इथं तिथं सर्फ करत होते. सर्फ करता करता नॅशनल जियोग्राफिक लावलं आणि समोरचं चित्र पाहून तिथंच गोठलो.

एक सरड्याएवढी मोठी पाल आपल्या पाठीवर उताणी पडलेली होती आणि तिच्या पोटातून तिचं पिल्लू बाहेर येत होतं. अगदी त्या दिवशी घडलेलं तसंच. मी आवाज वाढवला...

"... रेप्टाईल्स जातीच्या प्राण्यांचं हे रूप आपल्याला विचित्र वाटत असेल पण हे त्यांच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं कार्य आहे. अशाप्रकारे उताणे पडून सरडे आपल्या प्रेयसींची कामक्रियेसाठी आराधना करतात. आपलं लिंग शरीराच्या आतबाहेर करून ते फेरॉमॉन्स सोडतात ज्याने माद्या नरांकडे आकर्षित होऊन काम क्रियेसाठी उत्सुक होतात..."

मी निर्विकार चेहेऱ्याने सासरेबुवांकडे पाहिलं. तेही थंडपणे माझ्याकडे बघत होते. आम्ही दोघांनी मध्ये बसलेल्या ह्यांना हेरलं...

ह्यांनी बुजऱ्या चेहेऱ्याने रीमोटचं बटन दाबलं आणि चॅनल चेंज केला...

समोर मास्टरकार्ड ची जाहिरात लागली होती....

पालीला मारताना तुटू शकणारं बॅटमिण्टन रॅकेट - ५० रूपये
पालींमुळे खराब झालेल्य बेडशीटचं ड्रायक्लिन - १०० रूपये
पालींचा पेस्ट कण्ट्रोल करण्याचा खर्च - ५०० रूपये....

...पण कामक्रियेत मग्न असलेल्या सरड्याचं लिंग पकडायचा प्रयत्न करणाऱ्या नवऱ्याच्या चेहेऱ्यावरचा भाव ----- प्राईझ्लेस्स!!!!

... आणि खरंच प्राईझ्लेस्स होतं त्यानंतरचं खळखळलेलं आम्हा सर्वांचं हास्य....

.... अरे हो पण तुम्ही विचाराल ह्यात कॉमन्सेंस असल्याचा काय संबंध?

अहो असणारच.... त्यानंतर दोन दिवसांनी जीवशास्त्र शिकवताना एक महत्त्वाची बाब आपल्या बुद्धीतून सटकल्याची जाणवली....

तेव्हा वाटलं आपल्या विद्यार्थीदशेत जीवशास्त्राच्या वर्गात चोरून चिंचा खाण्याऎवजी लक्ष दिलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं...

काय? तुम्हाला अजूनही कळलं नाही?

... अहो कॉमन्सेंस.....

... पाली अंडी घालतात हो.


--- (एक जुना आयरीश जोक)
--- विनीत संखे

विनोदमौजमजालेखअनुभवभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

14 Apr 2011 - 10:23 am | मृत्युन्जय

हाहाहाहा. आयला बेक्कार हसलो. बेक्कार. साला शेवट वाचुन तर पडलो. मस्त लिहिले आहे तुम्ही. प्रवाही एकदम

सेम टु सेम असेच मत माझे ही ...

इथून पुढे जेव्हा कधी पाल दिसेल तेव्हा-तेव्हा पालीचे पिल्लू आठवेल..........
Animated Pictures Myspace Comments

टारझन's picture

14 Apr 2011 - 12:06 pm | टारझन

शेवटी हसुन हसुन मेलो . ... लिटरली .. =)) मला पहिल्यांदा ते गुलाबी गुलाबी तेच वाटलेलं .. पण म्हंटलं लेखीकेने लेख लिहीलाय .. ते 'ते' नसेलंच .. नंतर तुम्ही तिचा प्रेग्नंसी प्रसंग उभा केलात .. =)) आणि शेवटी .........

बाकी तुमच्या कथेत "ह्यांनी " त्या नर पाली ला ऑरगॅझम दिला नसेल अशी अपेक्षा करतो ;)

असो .. सर्वांनी डिस्कव्हरी आणि नॅट जिओ पहाणे जरुरी आहे . पण एक गोष्ट कळली नाही . तुमच्या घरात पालिंची संख्या किती होती ? नाही म्हणजे नरांमध्ये काँपिटिशन किती ? हे जाणुन घ्यायचं होतं ;)

अवांतर :
"मला कळत नाही तुम्हा मुलांना गोष्टी चिरडायला का आवडतात."
कारण ते नॅचरल आहे .. आफ्टरऑल मुलं आर अल्वेज मुलंच :)

- (गोष्टी चिरडायला आवडणारा ) टारगट मुलगा

प्रास's picture

14 Apr 2011 - 11:02 am | प्रास

विनित, एकदम ह. ह. पु. वा.

प्रवाही लिखाण.....

नरेशकुमार's picture

14 Apr 2011 - 11:04 am | नरेशकुमार

आयला काय भन्नाट आहे.
.
.

मी निर्विकार चेहेऱ्याने सासरेबुवांकडे पाहिलं. तेही थंडपणे माझ्याकडे बघत होते. आम्ही दोघांनी मध्ये बसलेल्या ह्यांना हेरलं...

इथुन पुढे हसुन हसुन पुरेवाट झाली. प्राईझ्लेस्स!!!!

एक सरड्याएवढी मोठी पाल आपल्या पाठीवर उताणी पडलेली होती आणि तिच्या पोटातून तिचं पिल्लू बाहेर येत होतं.
संख्ये साहेब बेसीकमध्ये काहीतरी गडबड आहे.
पाल वर्गातील सर्व प्राणी अंडी घालतात. पिल्लाना जन्म देत नाहीत. अगदी मगर सूसर सारखे मोठे प्राणी देखील अंडीच घालतात

संख्ये साहेब बेसीकमध्ये काहीतरी गडबड आहे.

आता तुम्ही तरी कॉमन सेन्स लावा की विजुभाऊ :) :) :) की तुम्हाला ही त्या साठी नॅट जिओ दाखवावा लागेल ?

विनीत संखे's picture

14 Apr 2011 - 11:35 am | विनीत संखे

विजुसाहेब तुमच कॉमन सेंस अगदी ताळ्यावर आहे हे कळले.

:-)

नेहमीप्रमाणे अर्धवट वाचून दिलेला "विद्वत्तापुर्ण" प्रतिसाद पाहुन ड्वाले पाणावले. विजूभौंचा सत्कार करा रे कुणीतरी.

रमताराम's picture

15 Apr 2011 - 3:10 pm | रमताराम

काय हे निळ्या. कधी नव्हेते +१ द्यावा असा प्रतिसाद दिला आहे विजुभाउंनी, तर उगाच झाडू नको रे त्यांना.
विजुभाउ, तुमचे म्हणणे अक्शी बराबर हाय. पाल अंडज प्राणी आहे. आमच्या विजेच्या मीटरच्या खोक्यात तिची अंडी आम्ही बरेचदा पाहिली आहेत.

मराठमोळा's picture

14 Apr 2011 - 11:21 am | मराठमोळा

हाहाहा
=)) =))

पार फुटलो हसुन हसून.... जबरा जोक आहे हा आयरीश.. अजून आयरीश अनुवाद वाचायला आवडतील. :)
और भी आने दो..

दैत्य's picture

14 Apr 2011 - 11:39 am | दैत्य

मागे एकदा ट्रेकिंगला गेलो होतो तेव्हा, सरड्याच्या मादीनं अंडी देताना पाहिलं होतं...ते आठवलं....म्हणून गोष्टीच्या सुरुवातीला गोंधळून गेलो की नक्की गोष्टीत पुढे काय आहे ते!!

मनराव's picture

14 Apr 2011 - 11:44 am | मनराव

=)) =))

Nile's picture

14 Apr 2011 - 11:52 am | Nile

प्रसंगनिर्मिती छान.

तळटीपः दाक्षिणात्य नावांच्या ऐवजी जर मराठी नावं असती तर जास्त प्रभावी झालं असतं असं वाटतं. पण हे महत्त्वाचं नाही.

तळटीपः दाक्षिणात्य नावांच्या ऐवजी जर मराठी नावं असती तर जास्त प्रभावी झालं असतं असं वाटतं. पण हे महत्त्वाचं नाही.

-Nile

नेहमीप्रमाणे अर्धवट वाचून दिलेला "विद्वत्तापुर्ण" प्रतिसाद पाहुन ड्वाले पाणावले.
वागळे ,साने, सुमी मावशी, कार्तीक , आशीष ,ही नावे कधीपासून दाक्षीणात्य झाली?
असो.
आपण बॉ त्याबाबतीत एकदम अज्ञानी.

वा वा.. विजुभौंचा अजून एक 'विद्वत्तापूर्ण' प्रतिसाद, अजून एकदा सत्कार प्राप्त. तुम्हाला खुलासा द्यायची गरज वाटत नाही. तुमचं धाग्यावरंच अवांतर चालू द्या.

सत्काराचं नाही बोललात ते????

करुन घ्यायचा ना हातासरशी 'वरच्या'च हार फुलांनी...;)

-फांदीवर पॉपकॉर्न घेऊन बसलेला प्यारे.

प्यारे१'s picture

14 Apr 2011 - 12:01 pm | प्यारे१

अग्गागागागागागा.......

खपलेलो आहे.

रच्याकने हे इकडे प्रसवलेलं का आधीचंच पिल्लू??? ;)

छोटा डॉन's picture

14 Apr 2011 - 12:37 pm | छोटा डॉन

येकदम जबराट लेख.
शेवट वाचुन अक्षर्शः खपलो !!!

- छोटा डॉन

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Apr 2011 - 1:17 pm | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा.. खपलो. हसून हसून फुटलो.

क्राईममास्तर गोगो's picture

14 Apr 2011 - 2:22 pm | क्राईममास्तर गोगो

हा हा हा हा!

फुटलो च्यायला...

:-)

मस्त. खुप दिवसांनी मनसोक्त हसलो. :)

आत्मशून्य's picture

14 Apr 2011 - 3:15 pm | आत्मशून्य

हा हा हा

सूड's picture

14 Apr 2011 - 3:30 pm | सूड

सुरुवातीला गोंधळलो, पण पूर्ण वाचल्यावर हापिसातली चार टाळकी चार मिनटांपूर्वी हा बरा होता असा भाव चेहर्‍यावर आणून बघत होतीत माझ्याकडे. हसून हसून पुरेवाट. :D

धमाल मुलगा's picture

14 Apr 2011 - 3:49 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))
=)) =))
=))

नशीब! त्या पालीचं सुईणपण करायच्या भानगडी डोक्यात नाय आल्या. ;)

चेतन's picture

14 Apr 2011 - 3:50 pm | चेतन

कथाही मस्त आहे आणी अनुवाद मस्त जमलाय..

चेतन

क्राईममास्तर गोगो's picture

14 Apr 2011 - 4:05 pm | क्राईममास्तर गोगो

मूळ जोक इथे... http://www.vetlocator.com/videos/lizard_joke.php

अनुवाद खरंच मस्त केलाय... मराठीत जास्त भावला.

:-)

जाम आवडलं, लई भारी विनित येउ द्या अजुन. पाली नाही ओ, लेखन.

स्मिता.'s picture

14 Apr 2011 - 6:07 pm | स्मिता.

अरे काय आहे हे?? टिव्ही पाहतानाची मजा तर जबरा :))

तरीच वाचताना मी विचार करत होते की पाल कशी पिल्लाला जन्म देणार... पाल तर अंडी घालते...

प्रभो's picture

14 Apr 2011 - 7:37 pm | प्रभो

=)) =)) =)) =))

सौप्र's picture

14 Apr 2011 - 7:53 pm | सौप्र

अनुवाद वाटत नाहीये. छान !

शाहरुख's picture

14 Apr 2011 - 7:56 pm | शाहरुख

खि खि खि !

प्राजु's picture

14 Apr 2011 - 7:59 pm | प्राजु

सॉल्लिड!! =))

लंबूटांग's picture

14 Apr 2011 - 8:14 pm | लंबूटांग

मस्तच. पाली अंडी घालतात हे मी पण विसरून गेलो होतो.

बाकी ते प्राइस्लेस वाले कार्ड मास्टर कार्ड हो, विसा नाही.

विनीत संखे's picture

14 Apr 2011 - 9:21 pm | विनीत संखे

आत्ताच बदलतो...

लक्षात आणून दिल्याबद्दल... श्येश्ये...

(सध्या सिंगापूरला आहे म्हणून... ;-) )

मराठे's picture

14 Apr 2011 - 9:09 pm | मराठे

शोल्लेट!

रेवती's picture

14 Apr 2011 - 9:55 pm | रेवती

पाल अंडी घालते हे न विसरल्याने शेवट समजल्यासारखा वाटला पण भलताच निघाला.;)
जे विसरले त्यांना मजा वाटणारच पण न विसरलेल्या वाचकांनाही हसू आले असणार.
लेबरमध्ये असलेल्या एका मुक्या आईला आणि त्याला न जन्मलेल्या पिल्लाला मारायचं पातक आपला माथी लागेल."
हे भारीच हां!

शिल्पा ब's picture

15 Apr 2011 - 1:56 am | शिल्पा ब

संख्येआजोबा आजकाल लैच फॉर्मात!!
मस्त लेख..

क्राईममास्तर गोगो's picture

15 Apr 2011 - 8:20 am | क्राईममास्तर गोगो

मला वाटते संखेसाहेब आजोबा किंवा काका ह्यातल्या कुठल्याही हॅटेगरीत येत नाहीत.

विनीत संखे's picture

15 Apr 2011 - 8:55 am | विनीत संखे

अहो ताई, अजून तारूण्यपिटीका मोजतोय मी.

:-)

शिल्पा ब's picture

15 Apr 2011 - 9:15 am | शिल्पा ब

कोणाच्या?

लोकांना पर्सनल प्रश्न विचारणे कधी सोडणार तुम्ही ? :) किती ती क्युरियॉसिटी ?

असो , गप्प रहायचे ठरवले आहे .

शिल्पा ब's picture

15 Apr 2011 - 10:11 am | शिल्पा ब

काही लोक जसं खाउन पिउन उपास करतात तसा तुमचा लिहुन, बोलुन गप्प बसायचा विचार आहे का?
सहज आपलं क्युरीऑसिटी म्हणुन विचारलं.

काही लोक जसं खाउन पिउन उपास करतात तसा तुमचा लिहुन, बोलुन गप्प बसायचा विचार आहे का?

अभिमानस्पद :)

सहज आपलं क्युरीऑसिटी म्हणुन विचारलं.

ब्लश :)

Nile's picture

15 Apr 2011 - 9:30 am | Nile

मला वाटते संखेसाहेब आजोबा किंवा काका ह्यातल्या कुठल्याही हॅटेगरीत येत नाहीत.

पण (आमच्या) शिल्पा ब काकू ह्या (तुमच्या संखे ) साहेबांच्या किंवा (शिल्पा काकूंच्या संखे) आजोबा किंवा काकांच्या नात किंवा पूतणी या हटाईगीरीत का येऊ शकत नाहीत?

सविता००१'s picture

15 Apr 2011 - 9:34 am | सविता००१

जबराट लेख
बेस्ट

अमोल केळकर's picture

15 Apr 2011 - 9:52 am | अमोल केळकर

लेखन आवडले :)

अमोल केळकर

sneharani's picture

15 Apr 2011 - 10:46 am | sneharani

सुपर्ब! मजा आली वाचायला!

बबलु's picture

15 Apr 2011 - 11:47 am | बबलु

लै भारी !!!!!

विनीत संखे's picture

15 Apr 2011 - 4:00 pm | विनीत संखे

माझ्या टोपणनावाने अजून कुणीतरी मिसळपावकर सापडला तर.

एकदम सारू छे.

:-)

रमताराम's picture

15 Apr 2011 - 3:15 pm | रमताराम

टाकाऊ अशा मेकॉल्यन शिक्षणपद्धतीनुसार शिकवलेला शाळेतला अभ्यास देखील कधी कधी उपउक्त ठरतो हे ठसवणारा किस्सा.

विनीत संखे's picture

16 Apr 2011 - 6:01 pm | विनीत संखे

अहो पण चिंचांचं काय?