सचिनला भारतरत्न द्यायला हवी

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
3 Apr 2011 - 3:16 pm

माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच. आपल्या संघाची विजयी सलामी सार्‍या वानखेडे मैदानाला देत असताना त्याला त्याच्या सवंगड्यांनी खांद्यावर घेऊन जी फेरी मारली तसा सन्मान क्वचितच कुठल्या खेळाडूला मिळाला असेल.
माझ्यासारखे सामान्य लोक त्याच्यावर प्रेम करतातच पण ही भावना सामान्य जनतेला त्याच्याबद्दल वाटणार्‍या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे. पण जेंव्हां त्या क्षेत्रातल्या बारकाया जाणणारे त्याचे सवंगडी त्याच्याबद्दलचे प्रेम, आदर आणि जवळीक व्यक्त करतात त्याची पातळी वेगळीच. हे दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि दूरचित्रवाणीवर ते दृश्य पहाणार्‍या कोट्यावधी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल यात शंका नाहीं. हा प्रसंग सर्वांना सचिनला त्याचे सहकारी किती मान देतात हे दाखवून गेला आणि हे पहाणार्‍यांची हृदये गर्वाने फुगलीअसतील याची मला खात्री आहे. त्याच्या कित्येक सहकार्‍यांनी "आम्ही हा चषक सचिनसाठी जिंकला" असेही ठासून सांगितले.
भारताच्या राष्ट्रपती या नात्याने आपण पुढाकार घेऊन हा आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान सर्वांच्या लाडक्या सचिनला मिळवून देण्यासाठी भारत सरकारवर वजन व दबाव आणावा अशी मी आपल्याला विनंती करतो.
नमस्कार!
काळे, जकार्ता
===================================

To:
Mrs Pratibhatai Patil
President of India
(presidentofindia@rb.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as the Head of the State should become proactive & strongly press the Government to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

To:
Mr Man Mohan Singh,
Prime Minister of India
(pmosb@pmo.nic.in)
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday on the TV screen (& at Mohali earlier) is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as our Prime Minister should take lead to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

राजकारणविचारसद्भावनाशुभेच्छासल्ला

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

3 Apr 2011 - 4:29 pm | योगी९००

उत्तम..

एक गंमत वाटली..Manmohan Singh असे न लिहीता Man Mohan Singh असे लिहून तुम्ही त्यांना Man आहेत ते जाणवून दिलेत व स्वतःच हा निर्णय घ्या असे ही सुचवले आहेत असे वाटते..

बाकी सचिनला भारतरत्न हा मिळावाच..

टारझन's picture

4 Apr 2011 - 10:23 am | टारझन

१. श्री. काळे ह्यांच्या पत्रांचा काही फरक पडतो का ? ती पत्रे कोणी वाचतो का ?
२. जर पडत असेल तर असली फालतु विषयांची पत्रे पाठवण्यापेक्षा दुसरे चांगले विषय नाहीत का ?
३. सचिनला ह्या पुरस्काराची गरज आहे का ? किंवा सचिनला हा पुरस्कार न भेटल्यास काय फरक पडणार आहे ?

बहुगुणी's picture

3 Apr 2011 - 4:57 pm | बहुगुणी

प्रथमतःच, भारतीय जनतेने सचिनला देशाचा सर्वोच्च अभिमानबिंदू कधीच मानलेलं आहे, आणि त्याच्यासारख्या गुणी खेळाडूला कोणत्याही शासकीय सन्मानाची गरज नाही, हे माझं मत आधीच मांडतो. तरीही त्याचा सरकारनेही अधिकृत सन्मान करावा ही श्री. काळेसाहेबांची कळकळ नक्कीच समजू शकतो.

भारत सरकारच्या अधिकृत संस्थळावर भारतरत्न या सन्मानाबद्दल खालील माहिती मिळाली:

It is awarded for exceptional service towards advancement of Art, Literature and Science, and in recognition of public service of the highest order.

यात explicitly क्रीडा या क्षेत्राचा उल्लेख नाही. केवळ या कारणासाठी १९५४ पासून आतापर्यंतच्या ४१ मानकर्‍यांमध्ये एकाही क्रीडापटूचा समावेश झाला नसेल का?

Public service या क्षेत्राचं (सोयीस्कर रीत्या?) public affairs, social service; Trade and Industry आणि civil service या तीन उप-क्षेत्रांत विभाजन करण्यात आलं आहे असं दिसतं, आणि ४१ मानकर्‍यांपैकी कला, साहित्य आणि शास्त्र-तंत्रज्ञान ही क्षेत्रे सोडली तर तब्बल ३० मानकरी या Public service वर्गात मोडतात. यांत डॉ. कर्वे, डॉ. पां. वा.काणे, लोकनायक जयप्रकाश नारायण, जे आर डी टाटा यांसारख्या लोकप्रिय प्रभृतींचा समावेश आहे. जर व्यावसायिक कौशल्य, लोकसेवा आणि लोकप्रियता हे तीन निकष असतील (तसे ते असावेत अशी माझी समजूत आहे, काही वादग्रस्त अपवाद** सोडले तर :-) ), तर देशात अभूतपूर्व भावनिक एकीकरण करणारा सचिन नक्कीच या सन्मानाला पात्र ठरतो.

या सन्मानासाठी नावं कोण सुचवतं आणि ती मान्य कोण करतं याविषयी खालील माहिती वरील संस्थळावर आहे:

The recommendations for Bharat Ratna are made by the Prime Minister himself* to the President. No formal recommendations for this are necessary.

म्हणजे कोणतीही सांसदीय समिती वगैरे या निर्णयात सहभागी नसते. तेंव्हा श्री. काळेंनी योग्य त्याच दोन व्यक्तींना साकडं घातलं आहे हे स्पष्ट आहे. त्यांचं त्याबद्दल अभिनंदन.

*सन्मान-घटना लिहिणार्‍यांनी, एखादी स्त्रीही पंतप्रधान होऊ शकेल, याची संभावना लक्षात घेऊ शकली नसावी ;-)

** MGR, मोरारजी देसाई आणि व्ही. व्ही. गिरी ही मंडळी 'भारतरत्न' म्हणवण्याच्या लायकीची होती की नाही याबद्दल माझ्या मनात नक्कीच संदेह आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Apr 2011 - 5:06 pm | निनाद मुक्काम प...

ह्याच नियमात बदल व्हावा
व खेळाडूंना दुजाभाव देऊ नये ह्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत .

चतुरंग's picture

3 Apr 2011 - 6:08 pm | चतुरंग

क्षेत्राचा उल्लेख नाही हे चूकच आहे. नियमात बदल व्हायलाच हवा. सचिनसारखे एकमेवाद्वितीय खेळाडू हे नुसते त्या खेळाचे प्रतिनिधित्व करणारे राहत नाहीत तर ते एक आदर्श बनून राहतात. देशातल्या कोट्यवधी लोकांच्या भावनिक एकीकरणाचे काही काळासाठी का होईना ते निर्माते असतात. काल वानखेडेवरच्याच नव्हे तर सामना बघणार्‍या कोट्यवधी लोकांच्या सिनर्जीने भारताला हा सामना जिंकण्यासाठी बळ मिळाले आणि सचिन त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता. विजयी फेरीत त्याला खांद्यावर घेऊन जेव्हा खेळाडू आले तेव्हा डोळे भरुन आले.

काळेकाका तुम्ही पत्र लिहिलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन!

सचिनसारख्या व्यक्तीला नागरी सन्मानाची गरज नसते हे जरी खरे असले तरी अशा सन्मानामुळे लोकाश्रयाला राजाश्रयाचीही जोड मिळून यशाची झळाळी वाढते. तसे बघायला गेले तर हा कालचा विश्वचषक सोडला तर सचिनकडे क्रिकेटमधलं काय नव्हतं? त्याचे यच्चयावत विक्रम अनेकवार करुन आणि स्वतःच मोडून झालेत परंतु त्या सगळ्याला कालच्या विजयाने एक आगळा मुलामा प्राप्त झाला.संघभावनेचं एक असामान्य प्रात्यक्षिक बघायला मिळालं, सचिनचा आदरच नव्हे तर खेळाडू त्याला देवासारखे मानतात. त्याच्या अथक परिश्रमांचं, खेळावरच्या निष्ठेचं काल चीज झालं!

बाकी बहुगुणींनी वर उल्लेख केलेले इतर लोक हे भारतरत्न नसून नुसतीच 'रत्ने' होती ह्याबद्दल दुमत नसावे! ;)

प्राजु's picture

3 Apr 2011 - 7:08 pm | प्राजु

उत्तम प्रतिसाद. :)
१००% सहमत.

पिवळा डांबिस's picture

3 Apr 2011 - 8:55 pm | पिवळा डांबिस

सचिनने इतक्या भारतीयांच्या जीवनावर परिणाम (इंपॅक्ट) केला आहे की त्याला जरूर भारतरत्न द्यावं!!!
काळेकाकांप्रमाणे आमचेही हृदय गर्वाने फफुगले आहे!!!!
बाकी मराठी राष्ट्रपतींना एका मराठी माणसाने इंग्रजीत पत्र पाठवलेले पाहून निराशा झाली....
काळेकाका, यू शुड हॅव रिटन द वोरिजिनल लेटर इन मरॅटी!!!!!;)
राष्ट्रपती सचिनला भारतरत्न देतील नाय देतील पण काळेकाकांची मराठी छाती फफुगलेली वाचून त्या खुद्कन हसतील तरी!!! किती दुर्मिळ आहे ते दृष्य!!!!!
:)

(पळा, काळेकाका हाणतायत आता!!!!;))

'पिवळा डँबिस'जी,
शुद्धलेखनातील चूक निदर्शनाला आणल्याबद्दल धन्यवाद. 'गमभन'मधील कांही त्रुटींमुळे मुळक्षरे अस्त-व्यस्त होतात असतात (garbled) त्यामुळे या चुका होतात व मी एकाद्या 'पंतोजी'प्रमाणे त्यांना पुन्हा एका रेषेत उभेही करतो पण ही 'खट्याळ कार्टी' कधी-कधी नजरचुकीने विस्कळीतच राहून जातात. हा त्यातलाच एक प्रकार होता!
तुम्ही वर निदर्शनास आणलेली लगेच चूक दुरुस्त केलेली आहे.
या आधीची याच विषयावरची दोन पत्रे (एक ODI मधील त्याचे द्विशतक झाल्यानंतरचे आणि दुसरे ५० वे कसोटी शतक झाल्यानंतरचे) मराठीतच लिहिली होती पण त्यांचे दक्षिणी/यूपी-बिहारी/पंजाबी सहाय्यक हे निरोप न वाचता, न समजता डिलीट करतील म्हणून हे आंग्लभाषेतच लिहिले! या आधीच्या पत्रांत मी त्यांना हेही लिहिले होते कीं या अस्सल मराठी वीराला हा सन्मान मराठी राष्ट्रपतींच्या हस्तेच मिळावा अशी माझी इच्छा आहे.
आता चिदंबरम् आणि राजमाता 'सोगां' यांना ते पत्र forward करायची वेळ आल्यास भाषांतराचा त्रास (आणि त्यातून उद्भवणारा विलंब) होऊ नये म्हणून मी हे पत्र आंग्लभाषेतच लिहायचे ठरविले.
पुनश्च धन्यवाद!
सुधीर काळे

पिवळा डांबिस's picture

3 Apr 2011 - 9:37 pm | पिवळा डांबिस

तुम्ही मनावर घेऊ नका, काळेकाका.
तुम्ही आपले म्हणून जरा खट्याळपणा केला इतकंच!
बाकी खुद्कन हसणार्‍या प्रतिभाताई हे चित्र कसं वाटलं?
:)

आत्मशून्य's picture

3 Apr 2011 - 8:44 pm | आत्मशून्य

नो इशूज.

क्राईममास्तर गोगो's picture

3 Apr 2011 - 8:54 pm | क्राईममास्तर गोगो

सचिनला भारतरत्न द्या नाईतर काका मोगॅम्बोना सांगीन!

अविनाशकुलकर्णी's picture

3 Apr 2011 - 9:45 pm | अविनाशकुलकर्णी

सचिन कोहिनुर आहे

ज्यांना मनापासून सचिनला भारतरत्न हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांनीही अशीच साकड 'ममो' आणि 'प्रपा' यांना घालावी म्हणूनच वर त्यांचे ई-मेल पत्ते मी दिलेले आहेत.

बक्कळ पाठिंबा मिळेल.

एक शंका:-

भारतरत्नाबद्दलची मागणी विश्वनाथन् आनंद ह्याच्यबद्दल का होत नाही
किंवा खाशाबा जाधव्, ध्यानचंद ह्यांच्याबद्दल कधीच इतक्या आग्रहानं का झाली नाही
हे कुणी सांगेल का?

सचिनला भारत रत्न द्यायला हरकत कुणीच घेणार नाही हो पण बाबा आमटे, अभय बंग ह्यांना द्यावा असं कुणाला कधीच वाटत नाही का? समाजाच्या दृष्टीनं अधिक उपयुक्त/सामजिक मूल्य कुणाचं आहे? (मनोरंजक आणि आदरणीय/स्फूर्तिदायक मूल्य कुणाचही असलं तरीही. )

अक्षरधाम मंदीरावर घुसखोरांनी हल्ला केल्यावर थेट जीवावरचा सामना देणार्‍या जवानांना भारत रत्न द्यावा किंवा त्यानुसार त्याच्या अटिंमध्ये दुरुस्ती करावी असं कुणालाच का वाटत नाही?

--मनोबा

शिल्पा ब's picture

4 Apr 2011 - 3:48 am | शिल्पा ब

+१

...आणि Facebook वर त्यासाठी मोहीमही चालू आहे.

खुद्द आनंद ने स्वतःही सचिनला भारतरत्न मिळावं म्हणून मागणी केली आहे हेही नमूद केलं पाहिजे.

आणि एका वर्षात तिघांना भारतरत्न देता येऊ शकेल अशीही तरतूद आहे, तेंव्हा 'ही व्यक्ति' किंवा 'ती व्यक्ति' अशी निवड न करता 'ही व्यक्ति' आणि 'ती व्यक्ति' अशीही निवड होऊ शकते, तेंव्हा सचिनच्या बरोबरीने बाबा आमटे आणि डॉ. बंग यांच्या सारख्यांचाही सन्मान होऊ शकणं अवघड नाही. फक्त राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती हवी.

सुधीर काळे's picture

4 Apr 2011 - 8:18 am | सुधीर काळे

या माहितीबद्दल धन्यवाद. यातच सचिनची थोरवी आहे!

विनायक बेलापुरे's picture

4 Apr 2011 - 12:28 am | विनायक बेलापुरे

शतकांच्या शतकासाठी थांबले आहेत बहुदा .....

कारण आत्त्ताच भारतरत्न केले तर नंतर कोणता पुरस्कार देणार ?

या प्रतिक्रियेला +१०० द्यावेत असा विचार सुरु आहे....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Apr 2011 - 12:41 am | निनाद मुक्काम प...

संपूर्ण देश आपल्या समस्या किंवा देशात होणारे घोटाळे क्षणभर विसरून सर्व धर्म समभाव दाखवत एकाच माणसासाठी दोन दशके जयघोष करत आहे .
प्रचंड मानसन्मान /कीर्ती /पैसा मिळवून ह्या माणसाचे पाय जमिनीवर असतात .( ह्याच्या एवढी प्रसिद्धी साहेबाच्या देशात बेकम ची होती .पण तो बायकोसोबत जाहिरातबाजी करता राहिला आणी फुकट गेला .)
पण आपला देव आज भारतातील आबालवृद्ध लोकांसाठी राष्ट्रीय अस्मिता /एकात्मतेचे प्रतिक आहे .
त्याच्या निमित्ताने खेळाडूंना देशात भारतरत्न मिळाले की पूर्वी ''खेलोगे कुदोगे बनोगे खराब ,पढोगे लीखोगे तो बनोगे नवाब '' ही म्हण नक्कीच बदलल्या जाईल .

सुधीर काळे's picture

4 Apr 2011 - 8:53 am | सुधीर काळे

प्रिय निनाद,
माझ्यापेक्षा जास्त चांगल्या शब्दांत तू हा मुद्दा मांडला आहेस. धन्यवाद!

काळे काका आपल्या भावनांशी मी अगदी सहमत आहे...
सचिनला भारतरत्न हा पुरस्कार लवकरात लवकर दिला जावा ही तमाम हिंदुस्थानी जनतेची इच्छा आहेच... :)

जाता जाता :--- तिकडे काका जकार्ताहुन कळकळीने पत्र पाठवत आहेत... आणि इकडे आमच्या इथे नविन लोचा सुरु झाला आहे, आता तुम्ही म्हणाल कसला लोचा ?
तर खाली पहा :---


हा आहे वर्ल्ड कप ( ओरिजिनल)

ऑस्ट्रेलिया टिम वर्ल्ड कप हातात धरुन पोझ देताना ( वर्ल्ड कप नीट पहा)

आता
-
-
-
वर्ल्ड कप २०११ विजेता हिंदुस्थानी संघ पहा :---

या कपवर असणारी नाणी कुठे गेली बरं ?
कस्टममधे वर्ल्ड कप अडकला आणि त्याची २२ लाख किंमत आखण्यात आली होती म्हणे, त्यामुळे पैसे न भरता आपल्या संघाला वर्ल्ड कपची रेप्लीका देण्यात आली असे सध्या बातम्यांमधे सांगत आहेत...
जर ही गोष्ट खरी असेल तर... माझे मत असे आहे :--- ओरिजिनल गोष्टींची किंमत जर कळत नसेल तर हिंदुस्थानी लोक मुर्ख आहेत असे मी म्हणेन.
हा १ अब्ज २१ करोड हिंदुस्थानी जनतेच्या भावनांशी केलेला खेळ आहे असे मला वाटते.
---
तुम्हाला काय वाटत ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2011 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, ही विश्वकरंडकाची ही नवीनच भानगड आहे की काय ? दोन करंडकात फरक दिसतोय हे मात्र खरं आहे. जाणकारांनी माहिती द्यावी राव..........!

-दिलीप बिरुटे

मी_ओंकार's picture

5 Apr 2011 - 6:37 pm | मी_ओंकार

चित्राचा दुवा श्रेय अव्हेर
http://www.espncricinfo.com/db/PICTURES/CMS/75100/75179.jpg

चिरोटा's picture

4 Apr 2011 - 1:51 pm | चिरोटा

आता ही काय नविन भानगड? 'साहेबांनी' खिशात नाही ना टाकली नाणी?

हे वृत्त अंत्य सामन्याच्या आधीच आले होते व मी ते वाचलेही होते. असेही वाचले होते कीं हा वाद संपुष्टात आल्यावर खरा कप मिळेल!
त्यावेळी कुणास ठाऊक चषक लंकेला मिळाला असता तर "आपण कशाला ड्यूटी द्या?" असा कोता (कीं व्यवहारी) विचारही BCCI च्या अधिकार्‍यांच्या डोक्यात आला असेल. पण आता तरी आयकरमाफीतले(च) पैसे वापरून चषक आणायला हरकत नाहीं.

मदनबाण's picture

4 Apr 2011 - 5:37 pm | मदनबाण

पण आता तरी आयकरमाफीतले(च) पैसे वापरून चषक आणायला हरकत नाहीं.
२२ लाख भरणे जड का झाले? आयसीसीला सामना आयोजित करुन किती नफा मिळाला ? ४५ कोटीची कर माफी हिंदुस्थान सरकार ने कोणत्या उदार मनाने आयसीसीला दिली ?खेळ मंत्री अजय माकन हे या निर्णयावर नाराज झालेच ना ? (संदर्भ :--- http://connect.in.com/icc-events-yahoo/article-chaos-over-tax-exemption-... )
देशाच्या अभिमानापुढे,देशवासियांच्या इच्छा/ अपेक्षा/ विश्वास आणि खेळाडुंच्या प्रयत्नांपुढे २२ लाख भरणे आयसीसीला जड का गेले ?कस्टम विभागाच्या ताब्यात असलेल्या ट्रॉफी सोबत विश्वविजेता टिम फोटो सेशन का करु शकली नाहीत ?
असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्याची उत्तरे देशवासियांना मिळाली पाहिजेत.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Apr 2011 - 6:04 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्या टार्‍याला मिपारत्न कधी देणार ?

साला आता मलाच नीलकांतला एक अनावृत पत्र लिहावे लागणार असे दिसते.

विसोबा खेचर's picture

4 Apr 2011 - 9:39 pm | विसोबा खेचर

काळेसाहेब,

आपल्या पत्रातील मजकुराशी व भावनांशी मी पूर्णत: सहमत आहे; परंतु सचिन हा एक महाराष्ट्रीय माणूस आहे आणि दिल्लीश्वरांमध्ये अगदी नेहरूंपासून भिनलेला पट्टीचा महाराष्ट्रद्वेष आपण जाणत नाही काय..?

त्याचप्रमाणे दिल्लीत केन्द्रसरकारात बसलेल्या महाराष्ट्रीय नेत्यांची कणाहीनता आपण जाणत नाही काय..?

असो..

तात्या.

सुधीर काळे's picture

5 Apr 2011 - 3:02 pm | सुधीर काळे

तात्यासाहेब,
दिल्ली तो बहुत दूर है! इथे 'मिपा'करच कुठे एकमताने त्याच्या बाजूने उभे राहिले आहेत? आपल्यातच एकी नाहीं तर दिल्लीला कशाला दोष द्यायचा?
काळे

केवळ वस्तुस्थितीचं वर्णन म्हणून महाराष्ट्रातील सन्मानित माणसं कोण ते खाली देतोय :

पंडित भीमसेन जोशी
लता मंगेशकर
जे आर डी टाटा (हे मराठी नसले तरी मुंबईकरच)
डॉ. आंबेडकर
आचार्य विनोबा भावे
डॉ. पां. वा. काणे
डॉ. धोंडो केशव कर्वे

म्हणजे आतापर्यंतच्या एकूण ४१ सन्मानांपैकी महाराष्ट्र राज्यातील ७ दिग्गजांचा सन्मान झाला आहे, देशातील २८ राज्यांपैकी एक राज्य असणार्‍या महाराष्ट्राच्या दृष्टीने ही नगण्य बाब नक्कीच नाही असं वाटतं.

पण मला वाटतं ही वरची महाराष्ट्र/भारत चर्चाच अवांतर आणि गैरलागू आहे, अखेर सचिन (किंवा इतर सन्माननीय व्यक्तिही), 'भारतरत्न' आहेत (महाराष्ट्र्/राज्य-भूषण वगैरे नाहीत), तेंव्हा असला 'राज्यापुरता' सन्मान हवाय कुणाला?

आणि वरती टारझन ने व्यक्त केलेल्या प्रश्नांच्या संदर्भात असं म्हणावंसं वाटतं, की सचिनला ह्या सन्मानाची गरज मुळीच नाही, किंवा हा सन्मान न मिळाल्याने त्याला व्यक्तिशः काहीही फरक पडणार नाही; त्याच्या सन्मानाची खरी गरज आहे ते सध्या बहुतांशी दिशाहीन आणि अस्वस्थ असलेल्या, चांगल्या आदर्शांच्या शोधात असलेल्या देशातील तरूणांना आणि इतर देशवासीयांना. आणि सचिनसारख्या व्यक्तीचा सन्मान करणं हे देशाला ललामभूत ठरेल, त्या संजीवनीची गरज (सचिनला नसेल पण) देशाला आहे!

वपाडाव's picture

5 Apr 2011 - 2:01 pm | वपाडाव

भेटला तर बेहत्तर नाहीतरी बेहत्तर...
उपर नि.मु.पो.ज. यांनी म्हटल्याप्रमाणे..
तीच एकमेव्व अशी व्यक्ती आहे जी आपल्या देशाला प्रांत/धर्म/वर्ण या सर्व घटकांच्या उपस्थितीतही एकजीव करत असते...
आमच्या दिलातील तेंडुलकर भारत नाही तर विश्व'रत्न' साठी पात्र आहे...
'प्रपा' सम्मान करोत न करोत,देवाला भारतरत्न भेटो न भेटो...
आमचे त्रिवार प्रणाम... साष्टांग दंडवत...

मृगनयनी's picture

5 Apr 2011 - 3:25 pm | मृगनयनी

सचिन'ला तर भारतरत्न'सारखी मोठी पुरस्कार मिळायलाच हवी... पण महेन्द्र सिन्ग धोनी'लाही खेलरत्न'सारखी पुरस्कार द्यायला हवी! ;) कारण भारतीय क्रिकेट टीमच्या इतिहासातील तो ( माहि) सर्वांत यशस्वी कॅप्टन आहे...

कारण भारताची रास- मकर आहे.. जी, की सूर्याची उच्चराशी आहे (जरी मकरेचा स्वामी -शनि असला तरी).. आणि "म" हे नाव "सिंह" या राशीच्या अधिपत्याखाली येते.... त्यामुळेच माहि'ने व त्याच्या टीम्'ने मोटेरा, मोहाली, मुम्बई....च्या मॅचेस यशस्वी रीत्या निभावल्या!

त्यामुळेच माहि'ने व त्याच्या टीम्'ने मोटेरा, मोहाली, मुम्बई....च्या मॅचेस यशस्वी रीत्या निभावल्या!

त्यांच्या कर्माला तुम्ही जी राषीभविष्याची झालर लावत आहात त्यामुळे ते जोकर सारखे दिसत आहे . वरिल उदाहरण सुद्धा ओढुन ताणुन बसवल्या गेले आहे. मोटेरा हे ग्राऊंडचे नाव आहे तर मोहाली आनि मुंबै ही शहरं आहेत. धोणीच्या टिम ने म ने सुरु न होणार्‍या ग्राउंड्स वर पण विजय मिळवले आहेत.

सबब वरिल फॅक्टर जर केनियाच्या हातात आला , तर केनिया जगज्जेती होईल काय? किंवा ढोणी ला जर हॉकी किंवा फुटबॉल टिमचा कप्तान बनवल्यास तो त्या संघांना विजयश्री मिळवुन देऊ शकतो काय?

कृपया ढोनी आणि टिम च्या कर्माचे श्रेय कोणत्या ग्रह तार्‍याला देऊ नये .. :)

- ( नैनीश्री चा मित्र , आणि मृग्ग्ग्गाचा फॅन ) विसोबाण

मृगनयनी's picture

5 Apr 2011 - 4:15 pm | मृगनयनी

माननीय टार्या,
केनिया' या देशाची राशी मला माहित नाही! :(
जे यश सौरव्गान्गुली, राहुल्द्रविड, अझर... इ कॅप्टन नाही मिळवू शकले... ते धोनीने मिळवले... नि:संशय... यात त्याचे व टीमचे परिश्रमही महत्वाचे आहेत... पण प्रयत्नान्ना नशीबाची जोड लागते... हेच खरे...
_______________

विश्वकरन्डक जिन्कावा... म्हणुन धोनी "तिरुपती -बालाजी"ला नवस बोल्ला होता... आणि त्याप्रमाणे जिन्कल्यावरती...रात्री दीड वाजता... धोनीने त्याच्या डोक्यवरचे सगळे केस कापून मुण्डन केले... व आपले केस प्लॅस्टीक्च्या पिशवीत भरुन ठेवले आहेत... आता उचित समय पाहून तो "ते" बालाजीला जाऊन अर्पण करणार आहे!
असे खात्रीलायक सूत्रान्कडून समजते!

:)

-टार्याची मैत्रीण,
नाडीप्रेमी, नयनी! ;)

पुष्करिणी's picture

6 Apr 2011 - 12:55 am | पुष्करिणी

मला आधी हे माहित असतं तर मी पण मिपावर 'म' नं सुरू होणारा आय्डी घेतला असता की... :)

वेताळ's picture

5 Apr 2011 - 6:44 pm | वेताळ

मग ए. राजाची कोणती रास असावी बुवा?

सुधीर काळे's picture

6 Apr 2011 - 7:49 am | सुधीर काळे

काल एक छान बातमी ऐकली कीं 'सचिनला भारतरत्न हा किताब देऊन गौरवावे' हा ठराव काल महाराष्ट्र विधानसभेने एकमताने संमत केला आणि त्यानुसार आता महाराष्ट्र सरकारच ही मागणी केंद्रापुढे ठेवणार आहे. आपले आताचे मुख्यमंत्री (पृथ्विराज-जी) पूर्वी दिल्लीत केंद्रीय मंत्री असताना PMO चे कामही पहात असत. त्यामुळे त्यांना ही मागणी कशी (आणि कुठे) धसास लावायची हे माहीत असण्याची दाट शक्यता आहे. पाहू आता महाराष्ट्राचा किती आवाज आहे दिल्लीत आणि एका मराठी रत्नाला एका मराठी राष्ट्रपतीकडून हा किताब मिळतो का!

ऋषिकेश's picture

6 Apr 2011 - 9:33 am | ऋषिकेश

सध्याच्या मसुद्यानुसार भारतरत्न हे कला, समाजसेवा, विज्ञान व साहित्य यांत सर्वोच्च कामगिरी केलेल्यांसाठी आहे असे समजते. यात 'क्रीडा' हे क्षेत्रच नसल्याने सचिनचा समावेश करता येईल का?

क्राईममास्तर गोगो's picture

7 Apr 2011 - 3:35 pm | क्राईममास्तर गोगो

भारत खेळात का निजाधीन आहे हे कळले बाऊ.