ईशान्य भारतातील जनजातींचे पुनरुत्थान

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in जनातलं, मनातलं
13 Mar 2011 - 6:26 pm

संस्कृती हरवली तर व्यक्तीत्वाची ओळखच हरवते.(If culture is lost identity is lost.) धर्मांतर झालेल्या नागांच्या एका बैच ला चर्च ने अमेरिकेत नेले. त्याचे कार्यक्रम केले. पण ते आपली संस्कृती हरवले होते. त्यांना तिथे सांगण्यात आले तुमच्या संस्कृती बद्दल काही दाखवा पण दोन पिढ्यांपासुन वेस्टर्नाइझ्ड झालेले ते त्यांन कुठे ते माहित असणार. लहानपणापासुन नियमीतपणे दर रविवार ला चर्च ला जाणारे ते. लोक म्हणाले तुम्ही नागा मग तुम्ही तर आमच्या सारखेच वेगळे ते काय. निराशेने परत आले पण एक धडा शिकुन आपण नागा , नागा सारखेच रहायला पाहिजे , संस्कृती जपली पाहिजे यातुनच एका चळवळीचा जन्म झाला आहे. हे कळले की आपण नागा असु तरच जगात आपल्याला किंमत आहे. संस्कृती विसरलो तर आपण इतरांसारखेच काही महत्व नही. याच भावनेचे फळ म्हणजे तिथे आपाअपल्या जनजातीचे एकत्रीकरण करुन एक संयुक्त व्यासपिठ तिथे तयार झाले आहे. आसामच्या होजाई या नगरात या सर्व जनजातीच्या पुढ्यार्‍यांची परिषद ५-७ सप्टेंबर २००८ रोजी भरली होती. ईशान्या भारतातील सर्व जनजातींचे सदस्य येथे उपस्थीत होते. याचा लेखा जोखा एक स्मरणिका काढुन मांडण्यात आला. या स्मरणिकेचे संपादक आहेत डॉ.सच्चीदानंद. त्यांचे संपादकियात सर्व जनजातीतील पुढार्‍यांनी प्रगट केलेल्या भावनांचा गोषवारा दिला आहे त्यातील ठळक मेद्दे मी या ठिकाणी मराठीत देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातील माहितीपुर्ण कथन त्यांचे व त्या भाषांतरात राहिलेले दोष माझे.

कुठल्याही देशाचा वा जमातीचा इतिहास त्याच्या संस्कृतीच्या माहितिशिवाय अपुर्ण असतो. राजकिय कारणाने कालपरत्वे त्या सीमा कदाचित बदलतीलही पण सांस्कृतिक सीमा या अबाधित असतात. पश्चिम पाकिस्तानातील पश्चिम पंजाब आणि भारततील पुर्व पंजाब आणि बंगला देशातील व भारतातिल पुर्व व पश्चिम बंगाल हे याचे जिवंत उदाहरण आहे. ही एक सततची व स्वयंनिर्धारीत प्रक्रिया असते. आणि यामुळे त्या वंशपरंपरेला एक विशिष्ठ ओळख मिळत असते जेणेकरुन ती इतरांपासुन वेगळि जाणवते. हे निसर्गाने मानवजातीला दिलेले एक वरदान आहे.

अनादिकालापासुन ब्रम्हपुत्रेच्या खोर्‍याचा भाग असलेल्या प्रदेशाला कामरुप म्हणुन ओळखल्या जाते. याला पौराणिक आधार आहे. हे काही एक राज्य नव्हते तर भारताचा संपुर्ण इशान्य प्रदेश हा कामरुप समजल्या जातो. या आधी यास प्रागज्योतिषपुर म्हणुन ओळखल्या जात असे. याचा उल्लेख ऋग्वेद व रामायणातही आढळतो.

इथे प्रचलित असलेली गाणी आणि कथा या प्रदेशाशी निगडित आहेत. पण इंग्रज राजवटीत त्यांच्या लेखकांनी इथल्या इतिहासामध्ये स्वत:च्या स्वार्थापोटी ढवळाढवळ करुन तसेच बुध्दी भ्रंश करुन इथला इतिहासच नामशेष करुन टाकला. त्यांनी येथील लोकांच्या मनात हे भरवले की हे मुळचे इथले नसुन मंगोलीया, चीन, बर्मा आणि इतरत्र ठिकाणाहुन आले आहेत तसेच इथली प्रत्येक लहान अथवा मोठी जमात ही स्थानिक नसुन परक्या ठीकाणाहुन स्थलांतरित झाली आहे आणि त्यांचे या देशाशी काहिही घेणे देणे नाही . खरे तर एखादी गोष्ट ही इंग्रजीत सांगितली म्हणजे ती अस्सल होउ शकत नही त्यासाठी पुरावा आवश्यक असतो. त्यातील माहिती चा आधार सांगावा लागतो. त्याप्रदेशातील शिलालेख, आख्यायीका, फोल्क साँग्स, फोल्क टेल्स, धार्मिक विधी त्या जमातीतील विधी निषेध या सर्व गोष्टींमुळे त्या प्रदेशातील ऐतिहासीक घटनांची नोंद होते. कुठलाही इतिहास ज्याला या गोष्टीचा आधार नसतो तो असत्य व काल्पनिक असतो. त्यामुळे भारतिय इतिहासातील वसाहतवादाचा सिध्दांत हा वरिल एकाही गोष्टीशी साधर्म्य नसल्यामुळे व आपल्या धर्मग्रंथातील कथनाशी विसंगत असल्यामुळे फोल ठरतो. रामायण व महाभारतातील घटनामध्ये इशान्य भारतातील संबध ओतप्रोत भरले असल्याने येथील लोक हे बाहेरुन येउन स्थाईक झाले या ईंग्रजी इतिहासकारांचा सिध्दांत किती फोल आहे हेच दर्शविते.

या भागातील लोकांची चेहरे पट्टी, त्यांचे शब्द, स्वयंपाकातील भांडे किंवा शिक्के याचे साधर्म्य जर बाहेरील देशाशी असेल तर त्याचा अर्थ असा होतो की येथील लोक त्या काळात इतके समृध्द व विकसित होते कि त्यातील काही विद्वान हे जगात इतरत्र आपल्या संस्कृतीचा व शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पसरले. आपल्या देशाच्या समृध्द संस्कृती बाबत अनेक शिलालेख आपल्याच नव्हे तर परदेशात इतरत्र आढळले आहेत. ब्रिटीशांनी मोठ्या चतुराईने मोंगोलाईड' चा उपयोग चेहरेपट्टीवरुन जगातील लोकांची विभागणी करण्यासाठी केला. त्यांना या गोष्टीचा विसर पडला की उस्क्रांती च्या सिध्दांतानुसार त्या त्या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितिनुसार, वातावरणानुसार लोकांच्या राहणीमानात तसेच त्यांच्या शरीरयष्टी मध्ये फरक पडत असतो. शिलाँग मध्ये असतांना मी स्वत: तिथे सदाफुलीचे झाड बघितले पण त्याची पाने आपल्या कडील झाडांसारखी मोठी नसतात तर फारच लहान असतात. तसेच पहाडात राहणारी माणसे ते इशान्य भारत असो अथवा हिमाचल प्रदेश त्याचे पाय हे आपल्या पायांसारखे लांब नसतात. सारखे पहाडी प्रदेशात राहण्यामुळे त्यांचे पाय लहान असणे तेथील वातावरणात आवश्यक असते. हिमाचल प्रदेशात गेल्यावर आपण लवकर थकतो ते आपले पाय लांब असल्याने तेच तेथील लोक सरसर चढायी चढुन जातात.

आमच्या देशावर परकियांची इतकी आक्रमणे झाली की आमचे शिलालेख आमचा इतिहास त्यात नष्ट झाला हाच प्रकार इशान्य भरतात झाला. आहोम राजवट तेथे ६०० वर्षे होती. त्याकाळातील वैभवशाली परंपरेची साक्ष देणारी अनेक ठिकाणे तिथे आहेत.
नागालाँड च्या डिमापुर शहरात एक ऐतिहसीक पार्क आहे तेथे बुध्दिबळाचे प्यादे असतात त्या प्रकारचे मोठं मोठे कोरलेले दगड त्या ठिकाणी आहेत. त्याल माज्या आठवणी प्रमाणे हिडींबा पार्क म्हणतात. त्या दगडी प्याद्याचे काय महत्व आहे याबाबत मला दुर्दैवाने माहिती मिळाली नाही. आजही तो दुर्लक्षितच आहे. आपले राज्य असतांना ही आपण इतके उदासिन आहोत तर ब्रिटिश राजवटित या भागावर काय काय अन्याय झाले असतिल याची कल्पना न केलेलीच बरी.

इतके असुनही तेथील जनजाती आज संघटित पणे आपली संस्कृती जपण्याची पराकाष्टा करित आहेत आणि त्यासाठी सर्व इशान्य भारतातील जनजाती एका व्यासपीठावर येउन जन जागृती करित आहेत यावरुन एक गोष्ट नक्किच स्पष्ट होते की बाहेरील शक्ती इमारतील रंग देउन जरी आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करित असले तरी इमरतीची रचना बदलविणे त्यांना शक्य नाही. ती रचना संरक्षीत करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना आपला खारीचा वाटा जरी आपण उचलला तरी ते एक मोठे कार्य होइल आणि भावी पिढीसाठी तो एक आदर्श होइल यात शंका नाही.

संस्कृतीमत

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

13 Mar 2011 - 7:06 pm | मस्त कलंदर

वाचताना श्री. अविनाश बिनिवाले यांच्या 'पूर्वांचल'ची आठवण सतत होतेय.
धन्यवाद

विश्वास कल्याणकर's picture

14 Mar 2011 - 7:20 am | विश्वास कल्याणकर

श्री अविनाश बिनीवाले याचा त्या भागाशी संपर्क गेल्या ५० वर्षापासुन आहे. त्या संपुर्ण भागात त्यांचा सातत्याने वावर आहे. मी त्यांची 'बोमडिला' ही कादंबरी वाचली आहे. सुनिल देवधरांच्या 'माय होम ईडिया' च्या पुण्यातिल कार्यक्रमात त्यांची प्रत्यक्ष भेट एकदा झाली आहे. त्यांच्या समोर माझा संपर्क त्या भागाशी हा ३ वर्षाचा म्हणजे नगण्यच. तुम्हाला पुर्वांचल ची आठवण झाली हे वाचुन बरे वाटले भाषा बदलली तरी तेथील परिस्थीती तीच असल्याने असे झाले असावे. हा विषय अधिकाधीक लोकांपर्यंत व मुख्यत्वे करुन तरुण पीढी पर्यंत पोचावा हा माझा मुख्य उद्देश आहे.

चिंतातुर जंतू's picture

13 Mar 2011 - 11:39 pm | चिंतातुर जंतू

इशान्य भारतातील लोक वंशाने मंगोलॉईड आहेत हे डी.एन.ए. चाचण्यांनी सिद्ध होते. त्यांच्या पुष्कळशा भाषा ऑस्ट्रो-एशियाटिक वा तिबेटो-बर्मन कुळातल्या आहेत आणि त्यांवर संस्कृतचा प्रभाव नगण्य आहे हे भाषाशास्त्रज्ञांनुसार सर्वमान्य आहे. इंडो-युरोपिअन भाषा (ज्यात संस्कृत, हिंदी व मराठीसुद्धा समाविष्ट आहे) या नंतर स्थलांतरित झालेल्या लोकांकडून विकसित झाल्या असाव्यात असेही मानले जाते. इशान्य भारतातील लोक आणि दक्षिण आशिया, आग्नेय आशिया येथील लोक यांमध्ये वांशिक, भाषिक नाते आहे असेही दिसते. उदा: हे पहा. इतर भारतातील प्रमुख वांशिक/भाषिक गट व इशान्य भारतातील वांशिक/भाषिक गट यांत मोठे फरक आहेत. इशान्य भारतातील लोक त्यांची संस्कृती जपण्यास झटत आहेत असे म्हणताना ती संस्कृती भारताच्या इतर भागांतील संस्कृतीहून खूप वेगळी आहे हे मान्य करावे लागते. ते मान्य केल्यास हा भूभाग भारताच्या आधिपत्याखाली असूनही त्यांना आपले वेगळेपण जपावेसे वाटणे स्वाभाविक वाटते.

स्पंदना's picture

14 Mar 2011 - 8:03 am | स्पंदना

अतिशय माहिती पुर्ण लेख.

लिहित रहा कल्याणकर साहेब.

धर्मांतरान आपण दुसर्‍या संस्कृतीचा भाग होउ शकत नाही , हे सांगणारा वरील प्रसंग अप्रतिम.

यशोधरा's picture

14 Mar 2011 - 9:00 am | यशोधरा

वाचत आहे, लिहित रहा.

अवलिया's picture

14 Mar 2011 - 10:51 am | अवलिया

वाचत आहे...