गरुडाचल विद्यापिठ - बेलबारी (मेघालय)

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in भटकंती
8 Mar 2012 - 3:19 pm

विद्या भारती जगातली सर्वात मोठी भारतातील गैर सरकारी शैक्षणीक संस्था म्हणुन ओळखल्या जाते. या संस्थेने अशा एका राष्ट्रीय शिक्षण प्रणालीची सुरुवात केली आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांच्या, शारीरिक, मानसिक, बौध्दीक, नैतिक व आध्यात्मिक विकासावर भर दिला जातो. या संघटनेचे ध्येय मुलांना आपल्या जिवनात ज्ञान संपादनाची ओढ व सामाजिक समतेबद्दल आत्मियता याबद्दल आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने योग्य संस्कार करते. विद्या भारतीची शिक्षण पध्दती भारतिय संस्कृती व मुल्यांवर आधारित आहे. विद्या भारती शी सलग्नीत शाळांमध्ये आधुनिक पध्दती व तंत्रांचा वापर करण्यावर भर दिला जातो जेणेकरुन मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध्द होवुन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल. आजघडीला १२५००० शिक्षक देशातील २८हजार शाळाद्वारे ३० लाख विद्यार्थ्यांमध्ये हा संदेश पोचवण्याचे महत्कार्य करीत आहेत.

अशाप्रकारचे कार्य इशान्य भारतात तेथील आजघडिला तेथील जनजाती व त्यांच्या पुढील पिढीवर चर्च द्वारे होत असलेल्या धर्मातरण व पर्यायाने अलगाववादावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने खुपच गरजेचे आहे. अरुणाचल प्रदेशात विद्या भारतीच्या १२३ शाळा हे कार्य करित असुन मेघालयात जेथे धर्मांतराचा आकडा ८० टक्के पार करित आहे.तेथे आवश्यक ठरले आहे.

या योजने अंतर्गत पुर्वोत्तर जनजाती शिक्षा समिति ही विद्याभारतीशी सलग्न असलेली संस्था १९९७ मध्ये निव्वळ इशान्य भारतासाठी स्थापन करण्यात्त आली. या संस्थेचे कार्य येथील सुदुर व निर्गम क्षेत्रात जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचुन त्यांना शिक्षित करणे या एकाच उद्देशाने सुरु आहे. व त्या साठी एकल विद्यालयाची संकल्पना अमलात आणल्या गेली.(Single Teacher School).

मेघालय शिक्षा समिती या विद्या भारतीच्या राज्य स्तरीय समीतीची स्थापना २००१ मध्ये स्थापन करण्यात आली व याचे मुख्यालय विद्या भारतीच्या शिक्षणाचा प्रसार संपुर्ण राज्यात करण्याच्या उद्देशाने शिलांग या राजधानी च्या शहरात ठेवण्यात आले. मेघालय शिक्षा समिती चे ध्येय मेघालय या सांस्कृतीक दृष्ट्या समृध्द पण राष्ट्रिय दृष्टिने अतिशय संवेदनशिल अशा राज्यातील शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या असलेल्या तसेच आर्थीक दुर्बल असलेल्या घटकांच्या मुलांना उत्तम व दर्जेदार शिक्षण उपलब्ध्द करुन देणे हे असुन त्यांचा व त्यांच्या कुटुबांचा सामाजिक व आर्थीक विकास घडवुन आणणे हे देखील उद्दीष्ट समोर ठेवुन स्थानीक परिस्थीला अनुसरुन शिक्षणात अनुकुल बदल करुन त्यांना तो उपलब्ध करुन देणे असे ठेवण्यात आले आहे.समीती ने आजतागायत खासी, जयंतीया व गारो हिल्स या जिल्ह्यात २१ शाळांची स्थापना करुन या कार्याला गती आणली आहे. तरी अजुनही खुप मोठा पल्ला गाठवयाचा आहे.

गरुडाचल विद्यापिठ, बेलबारी ही सह-शिक्षण व अर्ध निवासी शाळा वेस्ट गारो हिल्स या जिल्ह्यातील बेलबारी येथे दि. ८ मार्च १९९३ रोजी सुरु करण्यात आली. जिल्ह्याचे मुख्यालय तुरा हे येथुन ३५ कि.मी त्तर आसाम मधिल मनकाचर हे शहर ८ कि.मी वर आहे.तर बांगला देशाची सीमा देखील येथुन जवळच आहे. या गावाचे मुख्य नोक्मा(Headman of the Village) दिवंगत श्री बिसेश्वर कोच यांनी ३० बिघे जमीन या शाळेला दान दिली. त्यांचे कडे त्यावेळी चर्च ने भरपुर पैशाचे आमीष त्यांना मिशन स्कुल साठी देण्याबद्दल दिल्यानंतरही केवळ गावातिल मुले आपल्या भारतीय परंपरेत वाढावे या उदात्त हेत्तुने त्यांनी गरुडाचल शाळेला ही जंमीन दिली. सुरुवातिला लोअर के.जी. व अप्पर के.जी या दोन वर्गासोबत शाळा सुरु झाली. आज या शाळेत १० वी पर्यंत वर्ग असुन ३५० विद्यार्थी शिक्षण घेतात्त त्यात २१० विद्यार्थी निवासी आहेत. यात १५० मुले व ६० मुलींचा समावेश आहे. परिसरातील ६० गावातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत असुन शाळेचा दर्जा लक्षात घेता येथे दरवर्षी मोठी वेटिंग लिस्ट असते.
दिवसाची सुरुवात प्रार्थना व कवायतीने होते

उजव्या बाजुला दिसणारी विज्ञान प्रयोगशाळेची इमारत, मध्ये कार्यालय व डावीकडे मुलांचे वसतीगृह

सेवा भावी वृत्तीने व्यवस्थापक म्हणुन तर वेळ पडल्यास हिंदी चा शिक्षक म्हणुन गेले ८ वर्षापासुन काम करित असलेला राहुल सोबत लेखक. आजुबाजुला पसरलेले इमारत बांधकामाचे साहित्य.

जिल्हा प्रशासनातर्फे मंजुर पाकगृहाची इमारत

शाळेचे प्रवेशद्वार व कंपाउंड जवळुन जाणारा गावातील रस्ता.

मला या शाळेत ५ दिवस कामानिमीत्त राहण्याचा योग आला. शाळेचे प्रिन्सीपाल हे ७० वर्षाचे शर्माजी एक उत्साही व्यक्तिमत्व असुन मध्यप्रदेशातील भिंड मधील निवृत्त शिक्षक आहेत व आपली विनामुल्य सेवा गेल्या २ वर्षापासुन देत्त आहेत. या शाळेचे वस्तीगृहाचे व्यवस्थापक राहुल हा तरुण राजस्थान मधील असुन तो देखील गेल्या ६ वर्षापासुन येथे आपली सेवा देत आहेत्त. शर्माजींनी आपल्या अथक प्रयत्नामुळे दिल्ली सारख्ह्या दुरच्या ठिकाणाहुन देणग्या गोळा करुन एक अद्ययावत प्रयोगशाळेची इमारत बांधली आहे व एक कम्प्युटर सेंटर देखील उपलब्ध शाळेला करुन दिले आहे. मात्र तोटका पगार असल्यामुळे येथे सायंस व कम्प्युटर शिकविण्यासाठी नियमीत शिक्षक मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलुन दाखविली.

शाळेच्या परिसरातच एका गौशाला प्रकल्प ची योजना असुन त्यासाठी योग्य त्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.
हा लेख वाचत असतांना कुणाला जर १ वर्षासाठी शिक्षक म्हणुन सेवा देण्याची इच्छा झाल्यास त्यांनी या शाळेस जरुर संपर्क साधावा.

शाळेची इमारत तर भव्य आहेच येथील परिसर देखील खुपच मनोवेधक आहे.
या शाळेला देण्यात येणार्‍या देणग्या ८०जी खाली करमुक्त असतात.

शाळेचा पत्ता-
गरुडाचल विद्यापिठ, बेलबारी
पोस्ट बोर्कोना
जि. वेस्ट गारो हिल्स
मेघालय - ७८३१३१
शाळेला या वर्षी सरकारी अनुदानाद्वारे नुकताच विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी पाकघराची इमारत बांधुन देण्यात आली आहे. व इंधना साठी सवलतीचे दरात केरोसीन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

जाई.'s picture

8 Mar 2012 - 3:22 pm | जाई.

ऊत्तम माहिती

चिगो's picture

8 Mar 2012 - 3:59 pm | चिगो

माझ्या सब-डिव्हीजनमध्येच आहे हे विद्यापिठ. मी गेलो होतो तिथे.. आणि शर्माजी आणि सुरेंद्रजी ह्यांना भेटलोही आहे.

विश्वास कल्याणकर's picture

9 Mar 2012 - 8:26 am | विश्वास कल्याणकर

मी तिथे असतांना मला तुमची माहिती मिळाली होती. शाळेला केरोसीन चे परमीट आपल्या सहकार्याने मिळाले याची मला जाणीव आहे. शर्माजी माझ्याकडे ते परमीट घेउन आले तेंव्हा त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद लपत नव्हता. तुम्ही नागपुरचे आहात याचा मला खुप अभिमान वाटला व असे संवेदनशील अधिकारी इकडे आहेत याचे समाधान वाटले, श्री बक्षी व गोयल हे देखील शाळेला खुप सहकार्य करतात.

जुन मधील माझ्या तेथील भेटित मला आपल्याला भेटायला आवडेल.

पैसा's picture

8 Mar 2012 - 5:44 pm | पैसा

कित्येक ठिकाणी अशी कामं चालू आहेत हे वाचलं की जगात अजून चांगुलपणा आहे यावर परत विश्वास बसतो. संस्थेची ओळख करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!

गणेशा's picture

8 Mar 2012 - 9:48 pm | गणेशा

छान माहिती..

धन्यवाद

छान आहे.

पुर्वाचलांबद्दलची माहिती मालीका अशीच चालू ठेवा.

पुर्वाचलांबद्दलची माहिती मालीका अशीच चालू ठेवा