कान्हा

कोमल's picture
कोमल in जे न देखे रवी...
23 Feb 2011 - 5:00 pm

श्रावणाच गाण तुझ्या ओठी सुरु होत,
ऊन पावसाशी झिम्मा, मन खेळत बसतं॥

इन्द्रधनुच्या कमानीत तुझी कमनीय काया,
माझ्या मनाला मोहते,तुझी सप्तरंगी छाया॥

ओठी बासरी तुझ्या, तिचे वेडे खुले सुर,
चिंब पावसात भिजे, मन बनून मयूर॥

माथ्यावरी सजे मोरपिसं, जणू पाचूचा खड़ा,
आला बघा गं सयांनो, माझा कान्हा-सावला॥

त्याच्या सोनेरी देहाची, सोन्या सारखी किरणे,
तशी सोनेरी शेवंती, गाते पहाटेचे गाणे॥

माझ्या सावल्या देहात, "सावल्या"चेच चैतन्य,
दर्पणात पाहे मी, माझ्या सावल्या चे बिंब॥

नाही मी राधा, अन मीरा ही नाही
तरी तुझीच आस कान्हा धरून मी राही...
तरी तुझीच वाट कान्हा पाहत मी राही॥

शृंगारशांतरसप्रेमकाव्यकविताकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

23 Feb 2011 - 6:15 pm | कच्ची कैरी

मस्त ग!आवड्ली कविता.

गणेशा's picture

23 Feb 2011 - 8:24 pm | गणेशा

कविता खुपच छान आहे .. २ दा वाचुन ही अजुन वाचाविशी वाटते आहे..
असेच लिहित रहा.. वाचत आहे ..

अवांतर : सावला हा हिंदी शब्द आहे बहुतेक, सावळा हा मराठी.. म्हनुन सावला शब्द सावळा म्हनुनच वाचला .. छान वआटला.
चु.भु.दे.घे.

हरिप्रिया_'s picture

24 Feb 2011 - 9:32 am | हरिप्रिया_

मस्त ग कोमल...
तुझ्या सगळ्या कविता मिळू दे आम्हाला वाचायला..