एखाद्या गोष्टीशी आपली अवचित ओळख होते आणि नंतर ती आपल्या मनात घर करून जाते ते नेहमीसाठीच. कधी ते एखादे पुस्तक असते तर कधी एखादी व्यक्ती, कधी एखादी जागा, एखादा रस्ता. अशीच एकदा radio वरून ओळख झाली एका जंगलाची,मदुमलाईच्या जंगलाची. आकाशवाणीवर पुस्तक वाचन सुरु होते ,"एका रानवेड्याची शोधयात्रा". ऐकता ऐकता मग ते पुस्तक स्वतः घेऊन वाचाव अस वाटू लागल...आणि वाचताना त्यातले फोटो पाहून तिथे जाऊनच यायला पाहिजे ह्याची जाणीव झाली... पण अश्या गोष्टींसाठी मुहूर्त यायला लागतो हेच खर.
पुस्तक वाचल्या नंतर बरयाच वर्षांनी कंपनीच्या कृपेने बंगलोरला जाणे झाले. आणि मग पुन्हा त्या जंगलाचे साद घालण सुरु झाले. जाण-येणं ह्या तरी सोप्या गोष्टी झाल्या,पण अश्या ठिकाणी जायला सारख्या आवडीची लोक मिळण सगळ्यात मोठी गोष्ट असते. कुठून कुठून अशी जमवा जमव केली..पण आमच्या group मध्ये जरा घाबरट मंडळी पण होती, आणि त्यांच्या पासून त्या जंगलाला कोणे एके काळी वीरप्पनचे जंगल म्हटले जायचे वगैरे शुल्लक माहिती लपवून ठेवण्यात आली होती.
आमचीच हौस दांडगी असल्याच्या कारणाने राहण्याची सोय, जाण्या-येण्याची व्यवस्था ह्या जबाबदाऱ्या पण आम्हीच पार पाडणार होतो. नाही म्हणायला एका मैत्रिणीची सोबत होती. आम्ही net वरूनच राहायची आणि जायची व्यवस्था केली.जाताना कर्नाटक राज्य परिवाहन मंडळाची बसचे बुकिंग केले. Friday night ला निघायचं आणि रविवारी परत यायचं असा plan होता. १०.३० ची बस आहे अस मी सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांनी ८ वाजतातच आमच्या घरी जमायचं आणि ८.३० पर्यंत निघायचं अस ठरवलं गेल. कारण बेंगलोर च्या traffic चा आम्हा सगळ्यांनीच अनुभव घेतलेला होता. पण indian standard timming नुसार निघता निघता ९ वाजून गेले. आणि बसस्थानकावर पोहचायला १० वाजले..अजून अर्धा तास वेळ आहे अस म्हणत सगळी कुठे कुठे स्थानापन्न झाली..मी मात्र orgnizer ह्या नात्याने बस कुठे लागणार ह्याची चौकशी करायला गेले. आणि थोड्याच वेळात मला कळले की बस ची वेळ १०.३० नसून ९.३० होती आणि आम्ही येत नाहीये अस पाहून वैतागलेला conducter आम्हाला सोडून निघायच्या विचारात होता.. बस निघायचा आणि मी पोहचायचा मुहूर्त एकच होता म्हणून बर..नाहीतर आमची खूप दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल मदुमलाई भ्रमण बंगलोरच्या त्या बसस्थानकावरच आटोपल असत. पळापळ करून सगळ्यांना बस मध्ये धरून आणलं.
आम्ही सगळ्यांनी आत शिरताच दंगा सुरु केला.बस उटीला जाणारी होती, आणि ते मधुचंद्रासाठीच आवडत destination असल्याने जोडप्यांचीच बस मध्ये वर्दळ होती. आधीच आमच्या मुळे झालेला उशीर, आमचा दंगा आणि सोबतीला बस च्या सीटवर साम्राज्य असणारे ढेकुण ह्या सगळ्यामुळे त्या बिचाऱ्या जोडप्यांना तो प्रवास भयंकर अडचणीचा गेला हे नक्की. अगदी आम्ही जंगलात उतरल्यावर ही सगळी पोर तिथेच गायब होऊन जावीत असा आशीर्वाद देण्या इतपत नकोसा.
कर्नाटक,तामिळनाडू आणि केरळ अस तीन राज्यांच्या सीमेवर पसरलेलं ते जंगल. दाट,प्राण्यांची आणि तस्करांची पण वर्दळ असणार जंगल. कर्नाटकात बंडीपुर,तमिळनाडूत मदुमलाई तर केरळात पेरियार म्हणून ओळखल जाणार जंगल. रात्री ३-३.३० ला जंगलाच्या सीमेवर आमची बस पोहचली. इथून पुढे सकाळी ७ शिवाय नो एन्ट्री... अभयारण्य असल्याने फक्त दिवसाच त्या जंगलातून फिरता येत. पण जंगल एक सलग असले तरी अधून मधून छोट्या छोट्या वस्त्या आहेत. अश्याच एका छोट्या गावात जंगलाच्या शेजारीच आम्ही राहायला तंबू घ्यायचे ठरवले होते.आमच्या पैकी निम्म्या जणांना तर आपण तंबूत राहणार ह्याचीच मज्जा वाटत होती.
आम्हाला उटीच्या आधीच १ तास येणाऱ्या थोरापल्लीला ह्या छोट्या गावात उतरायचे होते.उच्चारायला अतिशय अवघड अशीच तिथली गावांची नाव. त्यात तिथे कुणालाही हिंदी येत नाही अशी अवस्था, बोलायचं तर इंग्लिश मधून नाहीतर हातवारे करतच. मग इंग्लिश कम हातवारे अशी वैश्विक भाषा बोलत आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी कस जायचं ते शोधून काढल. जवळ जवळ ३ किलोमेतेरची पायपीट करून आम्ही पोहचलो.तिथे सर्व सोयीनीयुक्त तंबू आमची वाटच पाहत होत. (अश्या तंबूत आपण जंगलाचा अनुभव कसा घ्यायचा असा कुटप्रश्न आमच्या पैकी काही जणांना तरी पडला,नशीब आमच... नाहीतर शनिवार रविवार वेगळ्या ठिकाणी झोप काढण्यात जाणार अशी शंका वाटू लागली होती मला...) आमच्या तम्बुंच्या पाठीमागच्या बाजूनेच एक छोटा झरा वाहत होता. आणि पलीकडे जंगलची हद्द. फ्रेश होऊन लगेचच आम्ही जंगलात फिरून यायचं ठरवलं. आणि थोड फिरून जेवायच्या वेळेस परत यायचं आणि जीपने थेप्पाकाडूच्यानाक्यावर जायचं अस सर्वानुमते ठरवलं गेल.
जंगलात गेल्यावर येणारा वेगळाच सुगंध,पक्षांचे वेगवेगळे आवाज,हवेतला गारवा आणि सर्वत्र भरून राहिलेला निवांतपणा सगळ अनुभवत आम्ही चालत होतो. आमच्या तंबूच्या मागचा झरा जंगलात जात जात हळू हळू रुंद होत होता. त्याच्या कडेकडेने आम्ही फिरत होतो. तेवढ्यात आमच लक्ष त्याच्या काठावर असलेल्या मोठ्या पावलांकडे गेले...हत्तीची भली मोठी पावलं तिथे उमटली होती.पण ती पावलं बरीच जुनी वाटत होती.२-३ दिवसांपूर्वी हत्ती ह्या भागातून फिरू गेले असावेत अस वाटल.तेवढ्यात काही तिथल्याच बायका कपडे धुंवून परत जाताना दिसल्या आणि त्यांनी त्यांच्या तोडक्या-मोडक्या इंग्लिश मध्ये go elephant ..go ... अस सांगयला सुरुवात केली. आधीच आमच्यातल्या काहींची अशी फिरायची पहिलीच वेळ होती,त्यांनी पण मग परत जाऊयात अस म्हणायला सुरु केल. मी अजून थोडे पुढे जाऊयात अस म्हणत त्यांना सांभाळायचा प्रयत्न केला...आणि जेमतेम ५ मिनिट अजून चाललो असू आणि कोतवाल पक्ष्याच्या आवाजने त्या जंगलातील शांततेचा भंग केला. मग कुणीतरी आपले ज्ञान पाजळायला सुरुवात केली,पक्षी आजूबाजूला काही धोका असेल तर शिळ घालून सूचना देतात वगैरे...मग सगळ्यांचीच अवस्था बिकट झाली..आता पर्यंत धीर धरून असलेल्या मंडळींनी बंड पुकारल आणि तुम्हाला जीव प्यारा नसेल तरी आम्हाला आहे अस सांगून आमच्यात फूट पडली...खर तर आतून सगळेच थोडे फार धास्तावलो होतो...आणि मग सगळ्यांनी जंगलाबाहेर पडायचा निर्णय घेतला...(खरतर त्या जंगलात अस कुणाही guide शिवाय जाण खरोखर मूर्खपणाच काम होत हे आम्हाला नंतर जाणवलं...)जंगलाच्या बाहेर पडेपर्यंत आम्ही सगळे चिडीचूप होतो आणि बाहेर पडल्यावर सगळेच उगीच घाबरलो,वाघ राहूदे हत्ती तरी दिसायला हवा होता अश्या बढाया मारू लागलो.
आता आम्हा सगळ्यांनाच संध्याकाळच्या सफारीचे वेध लागले होते..आम्ही पटापट जेवण उरकले आणि जीप ची वाट पाहत बसलो...
क्रमशः
प्रतिक्रिया
14 Feb 2011 - 3:45 pm | गणपा
जंगल दर्शन आवडलं. जमल्यास आणि असल्यास तिथेले फोटो टाकल्यास या सफारीची लज्जत नक्कीच वाढेल. पुढील भाग वाचणास उत्सुक.
जंगलात जाताना वाघ बगायला मिळेलच या अपेक्षेने कधी जाउ नये. भारीच लाजर बुजरं जनावर आहे ते :). मागे जीम-कॉर्बेट ला गेलो होतो तेव्हा गाईडने दुर एका झाडीत झालेली खुसफुस पाहुन, तो पहा हत्ती अस सांगीतल. आम्ही गप गुमान त्यावर विश्वास ठेवला. माकडं /सांबरं नी हरणं पाहुन सफारीचा आनंद लुटला. (वाघाचे मात्र ठसेच दिसले.)
मनीच्या बाता : दोन चार ठिकाणी इंग्रजी शब्द आल्याने बिर्याणी/पुलाब खाताना दाताखाली खडा आल्यासरख झाल नै.
14 Feb 2011 - 5:05 pm | चिंतामणी
लिहीत रहा. फटु टाकतेल तर अजून मजा येइल.
पु.ले.शु.
14 Feb 2011 - 5:32 pm | हरिप्रिया_
फोटो टाकायचा असफल प्रयत्न केला आहे. कृपया फोटो कसे टाकू याचे मार्गदर्शन करा.
14 Feb 2011 - 10:27 pm | निनाद मुक्काम प...
चायला
एकदम माझी आठवण झाली .
लगेच
टार्याचा चा सल्ला आठवला .
निलीकांत ची मदत आठवली .
चिंतामणी आणि परा चे व्यनी आठवले (ह्या एकाच वाक्याने सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या )
सुरवात मस्त झाली आहे /काही दिवसातच फोटो टाकण्यात इतका तरबेज होशील
कि मिपाकर म्हणतील ''अरे आवरा ह्याला ''
स्वानुभवाचे बोल
अरे अरे ओर्कुट आणि फेसबुक वरील सुद्धा फोटो मिपा ने सांगितलेल्या सूचनेनुसार टाकता येतात .
पु ले शु
15 Feb 2011 - 12:42 am | चिंतामणी
कि मिपाकर म्हणतील ''अरे आवरा ह्याला ''
स्वानुभवाचे बोल
अनेक मिपाकर पडले असतील हे वाचुन. :D
15 Feb 2011 - 12:44 am | चिंतामणी
कि मिपाकर म्हणतील ''अरे आवरा ह्याला ''
स्वानुभवाचे बोल
अनेक मिपाकर पडले असतील हे वाचुन. :D
14 Feb 2011 - 6:03 pm | स्वाती२
हरिप्रिया, http://www.misalpav.com/node/921 येथे फोटोसाठी माहिती मिळेल.
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.
14 Feb 2011 - 6:08 pm | हरिप्रिया_
ही मदुमलाईत प्रवेश करतानाची पाटी...

आणि हा सुंदर रस्ता ..दूरवर दिसणारे हत्ती पण आहेत...
जंगलातील झरा ...
आणि आमचे निवासस्थान ...

16 Feb 2011 - 3:41 pm | गणेशा
आजच पाहिला हा थ्रेड ..
मस्त लिहिले आहे .. उत्कंठा वर्धक लिखान आहे..
लिहित रहा .. वाचत आहे
16 Feb 2011 - 9:37 pm | स्वाती दिनेश
वर्णन छान, आवडले.
स्वाती
18 Feb 2011 - 11:16 am | गुंडोपंत
छान लिहिले आहे.
जंगलात गेल्यावर येणारा वेगळाच सुगंध,पक्षांचे वेगवेगळे आवाज,हवेतला गारवा आणि सर्वत्र भरून राहिलेला निवांतपणा सगळ अनुभवत आम्ही चालत होतो. अगदी आवडलेच. जंगलाचा एक मस्त असा वास असतो. मलाही तो फार आवडतो.
जंगलाच्या बाहेर पडेपर्यंत आम्ही सगळे चिडीचूप होतो आणि बाहेर पडल्यावर सगळेच उगीच घाबरलो,वाघ राहूदे हत्ती तरी दिसायला हवा होता अश्या बढाया मारू लागलो. अगदी अगदी. असेच होते. त्या काळात सगळे गपचूप बसतात. मग सगळ्यांना कंठ फुटतो :)
भीमाशंकरला आमच्या समोर वाघाने झेप घेतली असता, हातातले सर्व काही टाकून आम्ही सगळे क्षणात फरार झालो होतो. नंतर मात्र सगळे मोठमोठ्या गप्पा करायला लागले!
असो, हा किस्सा नंतर कधी तरी.
छान लिहिताय. वर्णन चांगले जमते आहे, अजून विस्तृतही चालेल. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.