नमस्कार.
मिपावर आल्यानंतर काही दिवसातच माझ्या भुलेश्वरच्या सहलीचा व्रुतांत इथे टाकला होता, त्यावर ब-याच प्रतिसाद्कांनी या ठिकाणी जाण्यांत इंटरेस्ट दाखवला होता. काही मिपाकरां बरोबर खव मधुन चर्चा झाली होती, आज श्री. गणेशा बरोबर बोलुन १६.०१. २०११ रविवार रोजी सकाळी भुलेश्वरला जायचं ठरलं आहे.
काही मिपाकरांना खव व व्यनितुन कळवलं आहे, तरी ही नविन मित्र मॅत्रिणि जोडायची हॉस भारी म्हणुन खुलं आमंत्रण देतो आहे.
साधारण प्लॅन असा आहे,
१६.०१.२०११ ला सकाळी पुण्यातुन १०च्या सुमारास निघुन भुलेश्वर येथे जाणे , अर्थात जाताना वाटेत काहीतरी खाणं होईलच.
भुलेश्वरचं देउळ पाहणे, वेळेत जेवण, नंतर वेळ उरल्यास सासवड मार्गे नारायणपुर , बालाजी मंदिर करुन येताना शिवापुरला कॅलास गार्डन येथे जेउन पुण्याला परत येणे.
योग्य व व्यवहार्य सुचना आल्यास बदल शक्य आहेत.
ज्यांना येण्यात ईंटरेस्ट असेल त्यांनी व्यनि करुन माहिती पुढील माहिति द्यावी ही नम्र विनंती
नाव -
पुण्यातील पत्ता - ( कोठुन निघु शकता किंवा एकत्र येउ शकता / जॉईन करु शकता)
कितिजणं येणार आहेत -
कसे येणार आहात - २ व्हिलर / ४ व्हिलर
बाकी इतर प्रश्नांची उत्तरे व्यनितुन मिळतील.
प्रतिक्रिया
14 Jan 2011 - 12:29 am | टारझन
ट्रिप व्हाया लडाख घ्या म्हणनार होतो :) पण ... :)
असो , लै शॉर्ट णोटिस वर सांगितलं राव :) किती जण आहेत ऑलरेडी ते तरी सांगा .. कोण कोण आहेत ?
14 Jan 2011 - 9:23 am | गवि
टारझन +1
शॉर्ट णोटिस वर सांगितलं राव ..
Agreed.
14 Jan 2011 - 6:50 am | नरेशकुमार
प्लि़ज लिंक द्या. फोटो बघुन ठरवेन.
14 Jan 2011 - 9:29 am | प्रचेतस
हि पाहा माझी लिंक
14 Jan 2011 - 9:33 am | प्रचेतस
पुणे -सोलापूर रोडवर भुलेश्वर फाट्याच्या अगदी अलीकडे 'कांचन व्हेज' नावाचे एक हाटेल आहे. पंजाबी तसेच महाराष्ट्रीय जेवण तिथे एकदम उत्कृष्ट मिळते तेव्हा तिथे जेवणाचा आस्वाद घ्याच.
तसेच जाता जाता थेउर, रामदरा पण करता येईलच.
14 Jan 2011 - 9:30 am | Pearl
चांगला उपक्रम आहे.
काश(योग्य मराठी शब्द सुचवा) मी येउ शकले असते :-(
सहलीसाठी शुभेच्छा.
14 Jan 2011 - 2:20 pm | अविनाशकुलकर्णी
काठी न घोंगडं घेऊ द्या की रं,
मला बी तुम्हा संग येऊ द्या की रं
14 Jan 2011 - 2:39 pm | ५० फक्त
श्री. अविनाश,
स्वागत आहे, व्यनि चेकवा, माझा नंबर दिला आहे. तसेच वर धाग्यांत दिलेली माहिती व्यनि मध्ये दिली तर मदत होईल.
हर्षद.
14 Jan 2011 - 2:25 pm | सुहास..
दिलगिरी मालक !
सध्या आम्ही दक्षिण प्रातांत मुलुखगिरी करीत आहोत.
बाकी ट्रिपला मनापासन शुभेच्छा !!
14 Jan 2011 - 2:54 pm | विनायक बेलापुरे
चांगला उपक्रम आहे. पुन्हा कधीतरी.
सहलीसाठी शुभेच्छा !
14 Jan 2011 - 2:59 pm | मुलूखावेगळी
तु एवढे कळवुन ही मी ह्या वेळेस नाही येउ शकत पन नेक्ष्ट टाइम ट्राय करेल.
छान आहे अनि धन्यवाद.
14 Jan 2011 - 3:51 pm | ५० फक्त
सहलीला येणा-या सर्वांना नम्र विनंती, आपला क्रमांक आपल्या दोन्ही नावासहित ( आयडी व प्रत्यक्ष ) मला कळवावा - ९९७५४९५९२ या नंबरवर ( एसएमएस ला एक्स्ट्रा चार्ज पडणार नाही, सारेगमा सारखा) , रविवारी सकाळी मला लॅपटॉप घेउन सगळ्यांचे खव किंवा व्यनि चेक करणे शक्य होणार नाही. गॅरसमज करुन घेउ नये.
तसेच वर धाग्यांत मागितलेली माहिती व्यनितुन कळवावी. उद्या शनिवारी दुपारी १ वाजता हे खुलं आमंत्रण बंद होईल व दुपारी ४ वाजता रविवारचा प्लॅन याच धाग्यावर तसेच व्यनि / खव मधुन कळवला जाईल. सहलीतील जेवणाखाण्याचा सगळा खर्च सर्वांमध्ये समान विभागला जाईल. प्रवास खर्चाची विभागणी फायनल प्लॅन मध्ये सांगेन.
येथे आत्ता पर्यंत येणार आहेत त्यांची नावे देतो आहे, यानंतर येणा-या प्रत्येकाने आपले नाव टाकले व मला नंबर दिला तर आभारी राहु.
१. charshad
२.गणेशा
३. भरत
४. आत्मशुन्य
५. अविनाश कुलकर्णी
14 Jan 2011 - 3:59 pm | ५० फक्त
वर नंबर चुकीचा पडला आहे, ९९७५४९५९२७.
हर्षद.
14 Jan 2011 - 4:25 pm | आत्मशून्य
सातवाहन कालीन (प्रत्यक्ष चांगदेवाने तेथे शीवपींड नीर्माण केली असे तेथे लीहले आहे) हेमाडपंथी शीव मंदीर आहे तेथे गेला आहात काय, अत्यंत शांत, पवीत्र असे ते ठीकाण आहे. तसेच सासवड्ला जाणार असाल तर तेथील टेकडीवरील कनीफनाथ समाधी बद्दल एकून असालच ?
14 Jan 2011 - 4:31 pm | ५० फक्त
शिवमंदिराबद्दल माहित नाही, पण कनिफ्नाथ समाधीला ब-याच पुर्वी गेलो आहे. सध्याच्या प्लॅन मध्ये सासवडला थांबण्याचा काही प्लॅन नाही. भुलेश्वरला बराच वेळ जाईल, नंतर तिथुन नारायणपुर व बालाजी करुन संध्याकाळी भोजनासाठी खेड-शिवापुर असा कार्यक्रम आहे.
भुलेश्वरला किती वेळ जातोय ते पाहुन प्रत्यक्ष ठरवता येईल.
हर्षद.
14 Jan 2011 - 8:42 pm | पिंगू
अरेरे मी एक छान कार्यक्रम मिस करणार आहे. पुढच्या वेळेस आठवड्याअगोदर धागा काढा.. म्हणजे प्लॅन करता येईल... :(
- पिंगू
15 Jan 2011 - 1:33 pm | ५० फक्त
काल सांगितल्याप्रमाणे हे सहलीचं खुलं आमंत्रण आता बंद करत आहे. आपणा सर्वांना अतिशय धन्यवाद.
या वेळी जी शॉर्ट नोटीसची चुक झाली ति परत होणार नाही याची खात्री देउन हा धागा लॉक करीत आहे,
१. charshad
२.गणेशा
३. भरत
४. आत्मशुन्य
५. अविनाश कुलकर्ण
आम्ही एवढे जण जात आहोत, सहलीचा व्रुतांत व फोटोचा धागा सोमवारी किंवा मंगळवारी टाकेन, तो पर्यंत टाटा बाय बाय आणि टुक टुक पण.
येणा-या सर्वांना नम्र विनंती, आपल्याला डिटेल्स इमेल व व्यनि द्वारा आज ५ वाजेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करीत आहे, चेक करुन काही शंका असल्यास फोन करा, ९९७५४९५९२७ वर. आज ५ वाजताचं कम्युनिकेशन हे नेटवरचं या विषयावरचं शेवटचं असेल, हे लक्षात घ्या.
हर्षद.