एक कहाणी (प्रेम) ३

चिप्लुन्कर's picture
चिप्लुन्कर in जनातलं, मनातलं
8 Jan 2011 - 5:12 pm

साधारण आठवड्याच्या विश्रांती नंतर मी पुन्हा कॉलेज ला फ्रेन्डशिप डे चा मुहूर्त पकडून गेलो. पहिले काम त्या परीला शोधणे हे होते . एक पायाला प्लास्टर होते साजन चित्रपटाच्या संजय दत्त सारखी आमची कॉलेज ला इंट्री झाली . मित्राच्या खांद्याचा आणि काठी चा आधार घेऊन आम्ही आमचे कॅन्टीन मधील आसनावर विराजमान झालो . अनेक मित्र मैत्रिणी येऊन चौकशी करून गेले पण जिची मी वाट पाहत होतो ती काही आली नाही . पूर्ण युथ फेस्टिवल ती मला एक क्षण दिसली नाही .
नाताळ संपला आणि पुन्हा कॉलेज सुरु झाले. हि वेळ सर्वांची येणाऱ्या परीक्षांच्या तयारीची होती आणि माझी मात्र येणाऱ्या १४ फेब्रु. ला तिला मी तिच्यावर प्रेम करतो ते सांगायची होती. मात्र परत माशी शिंकली . ती माझ्याशी बोलत नव्हती आणि तिच्याशी संपर्क करायला काही मार्ग मिळत नव्हता. त्यातच राहिलेले मित्रांचे वाढदिवस एकदम साजरे करण्याचे प्लान्स आमच्या कंपूत सुरु झाले. शेवटी चिपळूण च्या एका (सु) प्रसिद्ध हॉटेलात जाऊन पार्टी करायचे ठरले. त्याप्रमाणे आम्ही सगळे ठिकाणी पोचलो . आत जाताच एका मुलाने मित्रा माचीस आहे का असे मला विचारले , "नाही " असे मी त्यास उत्तर दिले. त्यात भर म्हणून कि काय लगेच सोबत च्या मित्राने , " हा फक्त बिअर पितो , धूर काढत नाही" असे उत्तर दिले. यावर तो माझा मित्रा (?) फक्त हसला. मी व माझे मित्र जाऊन एका टेबलावर बसलो . पार्टीत माझे लक्ष नव्हतेच आणि मी फक्त माझ्या प्रेमाचे काय होणार याचाच विचार करत होतो. त्या वातावरणाचा कंटाळा आला म्हणून मी बाहेर आलो आणि जाऊन बाहेरील बागेतील एका बाकड्या वर बसलो . इतक्यात तो माझा मित्र (?) येऊन शेजारील बाकड्यावर बसला आणि "मला कृपया रस्त्यावर एक रिक्षा थांबून द्याल का? "अशी विनंती करू लागला . मी प्रथम त्यास टाळले पण नंतर त्याची अवस्था बघून मी त्यास रिक्षा थांबवून द्यावी या विचाराने रस्त्यावर आलो . त्याची अवस्था पाहून कोणी त्यास घेऊन जाण्यास तयार होत नव्हते. मी त्याला रस्त्या शेजारील दगडावर बसवून त्याची चौकशी केली. तो परीच्या घराजवळ राहतो हे जेंव्हा मला कळले तेंव्हा मी माझ्या प्रेमात पुढे मागे हा कुठे तरी उपयोगी पडेल म्हणून याला आपणच सोडूया असा विचार करून त्याला घेऊन त्याच्या घरी निघालो. वाटेत त्या माझ्या मित्राने (?) दोनवेळा तो जे प्यायला ते माझ्या शर्टला पाजले. तो वास सहन करत मी कसे बसे त्याचे घर शोधून त्यास घरा पर्यंत सोडले. अचानक तो मला म्हणाला ," मित्रा , जरा हळूच जाऊन ती खिडकी ठोक, माझी बहिण उठेल आणि दार उघडेल". मी जरा गडबडलो , एकतर रात्रीची १ वाजताची वेळ आपण ह्याला नीट ओळखत नाही आणि याच्या बहिणीच्या खोलीची खिडकी आपण ठोकणार. मी जरा धास्तीने त्याला विचारले, "अरे मित्रा हेच घर आहे ना तुझे ? मला मार खायला लाऊ नकोस ." तो म्हणाला ," ठोक तू हळूच". मी जरा घाबरत ती खिडकी ठोकली, दरवाज्या बाहेरचा दिवा लागला आतून आवाज आला , " अथर्व दादा तूच आहेस का ? " . " होय, मीच आहे" इति अथर्व. दरवाजा उघडला. अथर्व आत गेला आणि "अग त्या बाहेरच्या माझ्या मित्राला थोडे पाणी दे ." असे त्याच्या बहिणीला म्हणाला. त्याची बहिण बाहेरचा दादाचा मित्र कोण हे पाहायला आली आणि तिला पाहताच मी गार पडलो. ती दुसरी कोण नसून परी होती.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

या ठिकाणी अशी कथा टंकायची असते ना? जाणकार मार्ग दाखवतील अशी आशा आहे.
गेले ३ भाग मी कलादालनात टाकले नी " हि कथा इथे कशाला? " असा प्रतिसाद मिळाला होता .
या वेळी शक्य तितका शुद्ध लेखनाचा प्रयत्न केला आहे.
नंदादीपचे आभार त्याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

आपला चिपळूणकर.
महा -०८

नन्दादीप's picture

9 Jan 2011 - 11:16 am | नन्दादीप

मस्त जमलय.......प्रगती आहे मित्रा...असाच सपाटा चालू ठेव......

>>>>नंदादीपचे आभार त्याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

कसच...कसच....पार लाजेने चूर झालो...

विजुभाऊ's picture

8 Jan 2011 - 6:01 pm | विजुभाऊ

अरे वा.....
हे लिखाण वाचून एका त्रीशतकी काकांची आठवण आली.

चिगो's picture

8 Jan 2011 - 10:24 pm | चिगो

चांगलं लिहीताय तुम्ही, आणि शुद्धलेखनही सुधारलंय बरेच... पण एवढे छोटे छोटे भाग का टाकताय? थोडे मोठे भाग टाका की राव...

म्हणूनच तर कही काही आवडूनही जातात

विनायक बेलापुरे's picture

9 Jan 2011 - 7:29 am | विनायक बेलापुरे

च्च च्च च्च च्च

मित्राचीच बहिण निघाली का ? होमवर्क नीट केला नाही

:(

आत्मशून्य's picture

10 Jan 2011 - 12:18 am | आत्मशून्य

.