काही दिवस सुरळीत सुरु होते . मी तिला पाहून हसणे तिने मला पाहून हसणे वगैरे. त्यामुळे मी हिंदी सोडून मराठी गाण्यांवर वळलो हा भाग वेगळा. लाजून हासणे... , तुझ्या माझ्या सवे गायचा पाऊस हि ... आशी गाणी तोंडात आली ( संदीप खरे प्रेमी झालो) . पण दुर्दैव एके दिवशी मी आणि विशाल केवळ विशाल ला धूर काढावा म्हणून टपरीत घुसलो आणि तिने मला तेथे जाताना पहीले आणि " मुन्ना बदनाम हुवा ......". मग माझ्या शी बोलणे दूर च राहिले माझ्या कडे बघत नव्हती .
आम्ही इकडे दर्द ए दिल ... गात होतो . साधारण अधून मधून सणा सुदी मध्ये भेटी गाठी जुळवून आणत होतो पण काही खासगीत बोलण्याचा योग जुळून येत नव्हता .
आणि डिसेंबर उजाडला , युथ फेस्टिवल चे वारे वाहू लागले. त्या आधी खेळ सुरु होत असत . मी दुर्दैवाने क्रिकेट टीम मघ्ये होतो. आमचा सामना दुपारी होता आणि ती कॅन्टीन मध्ये असणार हे खात्री मनाशी बाळगून मी कॅन्टीन च्या बाजूस फेल्डिंग ला उभा राहिलो. नजर ग्राउंड वर कमी आणि कॅन्टीन मध्ये जास्त भिरभिरत होती . कॅप्टन न हे कळले आणि आमची रवानगी रस्त्याच्या बाजूस क्षेत्रा रक्षण करण्यास झाली. नाराज होऊन मी तिकडे गेलो . एक उंच उडालेला झेल घ्याय ला हा " जॉन टी " धावला आणि धाडकन रस्त्याच्या जवळील बांधा वरून खाली मातीच्या ढिगार्यात ( आमचे ग्राउंड जरा उंचा वर होते आणि रस्ता खाली. चिपळूण कोलेज ज्यांना माहित असेल त्यांना कल्पना असेल ) पडलो.
डोळे उघडले ते घरीच . आई वैताग ले ली होतीच त्यात नातलग मित्र , मैत्रिणी वर्दळ चालू होती ( मी निर्लज्ज पणे पुन्हा याल तेंवा क्रीम बिस्कीट अन असे सांगत होतो .)
पण २-३ दिवसांनी ती परी घरी अवतरली अर्थात सोबत त्या दूरच्या बहिणीला घेऊन माझी जनरल चौकशी करून मला खाऊ दिला (पार्ले ग्लुकोज, हा आपला आता प्रिय आहे ) आईने चहा च्या निम्मित्ताने बहिणीला बोलावले ती किचन मध्ये जाताच मी तिला म्हटले "अगं मी नाही ओढत सिगारेट " . ती काही न बोलता गप्पच राहिली . थोड्यावेळाने चहा पाणी घेऊन ती निघून गेली.
प्रतिक्रिया
7 Jan 2011 - 5:32 pm | गवि
छान लिहिताय... इतर आलेल्या सूचनांनुसार "पूर्वदृश्य"चा उपयोग टायपो उचक्या काढून टाकण्यासाठी करालच..
एकाच दिवशी टाकणं शक्य होतं तर क्रमशः कशाला केलंत ?
पुलेशु.
7 Jan 2011 - 6:45 pm | चिप्लुन्कर
यापुढे अपेक्षित काळजी घेतली जाणार आहेच पण काही गोष्टी अजून टंकता येत नाहीत त्यामुळे अडचण होत आहे . मदत करणार्यांनी फोन केल्यास स्वागत आहे. क्रमांक . ९८३३९७३३२५, ८०८००८०५५६
7 Jan 2011 - 8:31 pm | प्राजु
अहो ही कहाणी कलादालना मध्ये कशाला??
7 Jan 2011 - 8:40 pm | गणपा
कदाचीत त्यांना आपली चित्तरकथा लिहायची हुक्की आली असेल ;)
7 Jan 2011 - 8:41 pm | प्राजु
ठ्ठ्यॉ!!
8 Jan 2011 - 12:12 pm | विजुभाऊ
बहुधा त्यांच्या ती चे णाव कला असेल
जरा उंचावून पहा कला दिसेल

7 Jan 2011 - 9:28 pm | गणेशा
छान लिहित आहे ..
अजुन छान येवुद्या
8 Jan 2011 - 3:32 pm | विनायक बेलापुरे
पुढचे वाचायला उत्सुक
लवकरच लिहिते व्हा.