३१ डिसेंबर : मदत : हॉली-डे रिसॉर्ट ( माहिती )

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
21 Dec 2010 - 2:04 pm

नमस्कार मिपाकरांनो,

मागच्या काही दिवसात खादाडीच्या चर्चेत जे भरभरुन प्रतिसाद आले तेच पाहुन ( असो, पण टीआरपीचा आम्हाला मोह नाही ) ही चर्चा टाकण्याचे धाडस करतो आहे.

विषय : पुण्यापासुन ५०-६० किमी अंतरापर्यंत असणारे एखादी हॉलिडे रिसॉटची माहिती सांगणे

अंदाजे ८-९ लोकांसाठी

बजेट : नो बार !

अपेक्षा ( कमीत कमी ) :
१. शहरापासुन, गर्दीपासुन, गोंगाटापासुन दु ऽऽऽऽऽ र असावे
२. जंगलात, तळ्याच्या काठाशी ( मराठीत : लेक नियर ) किंवा हिल-स्टेशनवर असलेले चालेल.
३. रहाण्यास एकच मोठ्ठी डॉर्मेट्री वगैरे असलेलेच रिसॉर्टच हवे.
४. २४ तास रुम सर्व्हिस असणे अपेक्षित आहे
५. बाकी इतर टीटी टेबल, स्नूकर, बास्केटबॉल आदी तत्सम खेळ असले तरी चालतील नसले तरी चालतील.
६. त्या ठिकाणी शक्यतो 'मोबाईल रेंज नसल्यास उत्तम'.
७. पार्टी गेम्स, डीजे म्युझिक, रेन डान्स आदी तत्सम प्रकारात रुची / शौक / आवड / उत्सुकता नाही.

शक्य असल्यास 'संपर्क क्रमांक' दिल्यास उत्तम.
सोबत थोडक्यात तिथली माहिती आणि उपलब्ध / अनुपलब्ध सोईसुविधांविषयी टिप्पणी अपेक्षित आहे.

धन्यवाद !

अवांतर : योग्य माहिती पुरवणार्‍याचा 'योग्य सन्मान' केला जाईल :)

वावरजीवनमानमौजमजालेखशिफारसचौकशीप्रश्नोत्तरेमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

लावासात जा.....

बांधकाम चालू आहे....
भरपूर जागा मिळेल...

आणि शांतता सुद्धा ;)

श्रावण मोडक's picture

21 Dec 2010 - 2:17 pm | श्रावण मोडक

"स्टॉक" सोबत नेणार का? की तोही तिथंच मिळाला तर (अर्थातच, चढ्या भावाने) चालेल?

छोटा डॉन's picture

21 Dec 2010 - 2:20 pm | छोटा डॉन

ह्याला म्हणतात मदत.

असो, आमचा एक मित्र नुकताच युएस्सेमधुन येणार आहे ( ही झाली जाहिरात, असो ) त्यामुळेच बजेट आणि 'इतर' अत्यावश्यक मुलभुत गरजांची काळजी नाही.
आम्ही त्या बाहेरच्या बाहेर भागवु, तिकडुन आम्हाला काहीही नको, फक्त रिसॉर्ट मात्र द्या.

स्वगतः आयला, मोडकांना फोन करावा काय ? ;)

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 2:34 pm | परिकथेतील राजकुमार

एकच मोठी डॉर्मेट्री घेतल्यावर 'इतर' अत्यावश्यक मुलभुत गरजा कशा भागणार ?

मुंबई- गोवा हायवेवरील कामथ रिसॉर्ट बरे आहे.

लोणावळ्याचे ट्रि हाऊस रिसॉर्ट देखील छान. तिकडे मस्त मचाण वगैरे पण आहे.

पुण्यापासून बरोबर १०९ किलोमिटर्सवर ब्लू कंट्री रिसॉर्ट उत्तम आहे.

खोपोली जवळील दर्शेट फॉरेस्ट रिसॉर्ट बेस्टच.

गेला बाजार तापोल्याचे तापोला रिव्हर कँप आहेच.

छोटा डॉन's picture

21 Dec 2010 - 2:44 pm | छोटा डॉन

धन्यवाद परा !

ह्यातले 'दर्शेट फारेस्ट' हा ऑप्शन खटाखट वाटतो आहे.

मचाण : भाड्या, अरे बजेट 'नो बार' ह्याचा अर्थ आम्ही आमची 'एफ डी' वगैरे मोडुन प्यार्टी नाय रे करणार, मायला तिकडे इतर सामान्य दिवशी २०-२२ हजार आरामात जातात, अशा पेश्शल ऑकेजनला तर काय इच्चारुच नकोस.

ब्यु कंट्री : फुल्ल झाले बॉस

असो,
आता किंचित सुधारणा सांगतो.
केवळ मुक्काम करण्याचे बजेट 'जास्तीत जास्त ६-७ हजार असावे ' पर्यंत असावे, बाकी खर्च वेगळा हे अध्याहृत आहे.

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 2:51 pm | परिकथेतील राजकुमार

ह्यातले 'दर्शेट फारेस्ट' हा ऑप्शन खटाखट वाटतो आहे.

हे निट वाचले ना ??

All male groups are not permitted.

Alcohol strictly prohibited.

छोटा डॉन's picture

21 Dec 2010 - 2:52 pm | छोटा डॉन

असो.

टारझन's picture

21 Dec 2010 - 2:58 pm | टारझन

हा 'असो' आम्हाला गाल चोळत डोळे पुसत असताना चा वाटला =)) =)) =))

सुनील's picture

21 Dec 2010 - 6:58 pm | सुनील

मराठमोळ्या दूरशेतचे दर्शेट झालेले पाहून डोळे पाणावले!

नवीन वर्षाच्या (आगाऊ) शुभेच्छा!

शिल्पा ब's picture

23 Dec 2010 - 3:10 am | शिल्पा ब

प्रतिसादात शिवीगाळ करायला परवानगी आहे का?( मग ती प्रेमाने असु किंवा नसु!!)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Dec 2010 - 4:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तेजायला, चोता दोन कधीही शिव्या देत नाहीत हे तुम्हांस माहित नाही काय?

हरी कथेतील वानगी कुमार
तुमचे वाचन हल्ली फार कमी झाले असावे किंवा तुम्हाला एखादी गोष्ट फार एन्लार्ज करून पहायची सवय लागली असावी
श्री श्री श्री चोतादोन याणी सपष्ठपणे विषय : पुण्यापासुन ५०-६० किमी अंतरापर्यंत असणारे एखादी हॉलिडे रिसॉटची माहिती सांगणे

असे लिहिलेले असतानाहीतुम्ही ते ५०-६० किमी एन्लार्ज करून १०० - १५० किमी केलेत.
उदा: पुण्यापासून बरोबर १०९ किलोमिटर्सवर ब्लू कंट्री रिसॉर्ट उत्तम आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 2:57 pm | परिकथेतील राजकुमार

विषय : पुण्यापासुन ५०-६० किमी अंतरापर्यंत असणारे एखादी हॉलिडे रिसॉटची माहिती सांगणे

काजुखौ आता हे वाचुन देखील तुमच्या सारखे वयोवृद्ध तपस्वी बंगल्याची माहिती देउ शकतात तर मग आम्हीच काय घोडं मारलय ?

श्रावण मोडक's picture

21 Dec 2010 - 2:35 pm | श्रावण मोडक

कर, पण उपयोग नाही. कारण तू वायदेआझम असल्याने मी भरोसा ठेवणार नाही. परवा 'पूनम'ला येणार होतास. नाही आलास.
हा नेहमीच असं करतो. तेव्हा बाकीच्यांनी सावध रहावे. ;)

अ‍ॅम्बी व्हॅली चालेल का
तिथे आमचा एक छोटासा बंगला आहे. ( ही आमची झैरात ) टेरेस वर जागा देवू. मटीरीयल ,स्टॉक वगैरे उत्तम दर्जाचा असेल तर फीमध्ये सवलत देण्याचा विचार करू.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 2:37 pm | परिकथेतील राजकुमार

अ‍ॅम्बी व्हॅली चालेल का
तिथे आमचा एक छोटासा बंगला आहे.

मेसचे डबे मिळतात का हो जवळ ?

विजुभाऊ's picture

21 Dec 2010 - 2:48 pm | विजुभाऊ

मेसचे डबे मिळतात का हो जवळ ?

"आमची कुठेही शाखा नाही " अश्या पाट्यांची हौस असलेल्या लोकाना त्या पाट्यामुळे त्याना मर्याद आल्या असाव्यात.
त्यामुळे तिथे मेस दिसली नाही कुठे पण एवढी हौस असेल तर घरून डबा घेउन या. मायक्रो वेव्ह मध्ये गरम करून देवु.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 2:52 pm | परिकथेतील राजकुमार

त्यामुळे तिथे मेस दिसली नाही कुठे पण एवढी हौस असेल तर घरून डबा घेउन या. मायक्रो वेव्ह मध्ये गरम करून देवु.

घरचाच डबा खायचा असेल तर बाहेर कशाला जायचे विजुभौ ?? ओशो निट वाचत नाही का तुम्ही आजकाल ?

घरचाच डबा खायचा असेल तर बाहेर कशाला जायचे विजुभौ ??
काय म्हैत.... तुम्ही मेस चे विचारले...आम्ही तुम्हाला चांगले घरचेच अन्न खा असे म्हंटले.
बाकी बाहेरच्यापेक्षा घरचेच चांगले हा अनुभव घ्या एकदा

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 3:03 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी बाहेरच्यापेक्षा घरचेच चांगले हा अनुभव घ्या एकदा

ह्या वयात ? तुमच्या येवढे वय झाले की तो घ्यावा लागणारच आहे की ;)

असो....

मेसचे डबे मिळतात का हो जवळ ?

छोटा डॉन's picture

21 Dec 2010 - 2:51 pm | छोटा डॉन

>>तिथे आमचा एक छोटासा बंगला आहे. ( ही आमची झैरात ) टेरेस वर जागा देवू. मटीरीयल ,स्टॉक वगैरे उत्तम दर्जाचा असेल तर फीमध्ये सवलत देण्याचा विचार करू.

बेश्ट, चालेल, अगदी १००% ओके.
बाकी फी मध्ये सवलत वगैरे नको, फक्त एकच करा, आम्ही तिथे असोस्तोवर तुम्ही तेवढे आमच्या पुण्यातल्या ३ बीएचके फ्लॅटमध्ये रहायला जा, अगदी फुक्कट बरं का ;)
( पळा रे भौ ............ )

- छोटा डॉन

तुम्ही आम्हाला तुमच्या त्या ३ बी एच एके फ्लॅट मध्ये पिटाळणार आणि स्वतः तिकडे प्यार्टी करणार......
आम्हाला सिंगल आउट करण्याचा तुमचा कावा कळतो हो डॉनकथेतील हरी कुमार

५० फक्त's picture

21 Dec 2010 - 2:30 pm | ५० फक्त

पानशेत जवळ शांतिवनला जा, अगदी तुमच्या गरजांना फिट आहे, ०२०६५२०५५५३ हा त्यांचा पुण्यातला दुरध्वनी क्र. आहे. तुम्ही दिलेल्या लिस्ट पॅकी १,२,३,५,६,७ या फिट्ट बसतात. मोबाईल रेंज बिएसएनएल्ची कामापुरती आहे, इतर साठी थोडे टेकडिवर चढावे लागेल. रुम सर्व्हिस चा जरा आनंदच आहे. त्यांचे कार्यालय प्रेसिडेंट हॉटेल्च्या जवळ आहे.

हर्षद.

सुहास..'s picture

21 Dec 2010 - 3:07 pm | सुहास..

१ ) पुणे -नगर हाय वे

" स्माईलिंग स्टोन "

लेक मानव निर्मीत आहे .

खेळण्या करिता लिमीटेड साहित्य.

स्वस्त आणि मस्त

२ ) पुणे नगर हाय वे

तुळापुर च्या फाट्यापासुन वीस -एक किमी आत

नाव आठवत नाही ..

पेरुच्या बागामंध्ये बसण्याची व्यवस्था !! + १५ एक जण बसतील अश्या खोल्या + शेकोटीची सोय .

चुलीवरच सांगाल ते बनवुन देणार अगदि विदर्भी ठेच्या पासुन तांबड्या -पांढर्‍या मटण रश्श्यासकट (त्यांच्या मदतीने स्वतादेखील बनवु शकता. )

दारू मिळत नाही. आपण आणलेल्या बाटली बरोबर प्रत्येकी ५० रु. चार्ज

विषेश सुचना : जास्तीचा दंगा केल्यास गावकरी धरुन .......

३ ) पुणे -शिवापुर रोड

बनेश्वरच्या फाट्याच्या अलिकडे ..

तळे नाही ..

नाव माहीत नाही

खेळायला भरपुर साहित्य ..थेट कॅरमपासुन ते लॉन टेनिस पर्यंत ..

मराठी वेटर्सचा अभाव !

सुचना : मी या ठिकाणी ३१ च्या रात्री गेलेलो नाही . त्या दिवशीचा क्राउड वेगळाच असल्याने, ज्याने त्याने आप-आपल्या रिस्कवर जाणे .

छोटा डॉन's picture

21 Dec 2010 - 3:15 pm | छोटा डॉन

मालक, जरा त्या तुळापुरच्या स्पॉटचे अजुन डिटेल्स मिळतात का बघा बरं.
येताना तुळापुरलाही जाऊन येता येईल :)

त्ये स्पोर्ट्स वगैरे कायबी नको है, जरा जुने दोस्त बसुन गफ्फा वगैरे हाणणार आहे लै दिवसांनी.
फक्त रुम सर्व्हिस मिळावी आणि रुम्स ओक्के असाव्यात ( डास नको, थंडी वाजु नये, प्यायचे पाणी ओके असावे, आंघोळीला गरम पाणी वगैरे ) एवढीच अपेक्षा आहे.

अवांतर :
केवळ ३१ नव्हे तर इतरही वेळी कुठे शॉर्टमध्ये सुट्टी घालवता येईल अशा ठिकाणांची माहिती ह्या धाग्यावर आल्यास सर्वांनाच त्याचा फायदा होईल.

- छोटा डॉन

विजुभाऊ's picture

21 Dec 2010 - 3:28 pm | विजुभाऊ

( डास नको, थंडी वाजु नये, प्यायचे पाणी ओके असावे, आंघोळीला गरम पाणी वगैरे ) एवढीच अपेक्षा आहे.

मात्र या प्रत्येक अपेक्षेसाठी वेगवेगळा चार्ज पडेल अशी पाटी असेल तिकडे.
त्यासाठी खास ट्रेन्ड डासेस असतील.
कमी चार्ज मध्ये कमी चावतील.
एक्स्ट्रा चार्ज दिल्यास हलकेच चावतील.
थोडे जास्त एक्स्ट्रा दिल्यास नुसतेच कानाभोवती यमन गुणगुणतील.

छोटा डॉन's picture

21 Dec 2010 - 3:34 pm | छोटा डॉन

>>थोडे जास्त एक्स्ट्रा दिल्यास नुसतेच कानाभोवती यमन गुणगुणतील.

=)) =)) =))
भौतेक इजुभौंचा थर्टीफश्ट सुरु झाला ...

- छोटा डॉन

मालक, जरा त्या तुळापुरच्या स्पॉटचे अजुन डिटेल्स मिळतात का बघा बरं. >>>

बघतो !

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Dec 2010 - 7:08 pm | बिपिन कार्यकर्ते

त्ये स्पोर्ट्स वगैरे कायबी नको है, जरा जुने दोस्त बसुन गफ्फा वगैरे हाणणार आहे लै दिवसांनी.

एवढे आहे तर मग तुमच्या तीन बीएचकेमधेच बसा ना!!

मी या वर्षी थर्टीफस्ट बहुतेक मौन्ट अबू च्या थन्ड हवेत व्यतीत करेन.
येताय का. पुण्यापासून फार नाही फक्त ९०० किमी वर आहे.

अवलिया's picture

21 Dec 2010 - 3:53 pm | अवलिया

अरे वा ! प्यार्टी !!

श्रावण मोडक's picture

21 Dec 2010 - 5:34 pm | श्रावण मोडक

वायदे आझमांचा धागा आहे, तो वर रहावा म्हणून हा प्रतिसाद. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत आहे.

येवढी गहन चर्चा करुन हे ३० तारखेला रात्री पंढरपूरच्या यष्टीत बसणार हे नक्की.

श्रावण मोडक's picture

21 Dec 2010 - 5:39 pm | श्रावण मोडक

विठ्ठल विठ्ठल जय हाssssssssरी...!!!

धमाल मुलगा's picture

22 Dec 2010 - 2:39 pm | धमाल मुलगा

त्या विठोबालाही 'येतो' असं सांगून कलटी द्यायला कमी नाही करायचे हे म्हाराज. ;)

छोटा डॉन's picture

21 Dec 2010 - 5:42 pm | छोटा डॉन

तुर्तास 'तुमची गल्लत होते आहे' एवढेच सांगतो.
बाकी चालु द्यात :)

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 5:46 pm | परिकथेतील राजकुमार

ते सगळे सोडा हो !

ह्या ३१ ला शुक्रवारच येतो आहे. त्या निदेच्या जोडीला ह्या इंट्या आणि स्पा ला बोलवा आणि धुळवड करा ;)

चिंतामणी's picture

21 Dec 2010 - 6:02 pm | चिंतामणी

परा तु हे वाचलेले दिसत नाही.

http://www.misalpav.com/node/15935#comment-269211

इंटरनेटस्नेही's picture

28 Dec 2010 - 1:45 am | इंटरनेटस्नेही

=)) =)) =))

विजुभाऊ's picture

21 Dec 2010 - 6:11 pm | विजुभाऊ

डान्याने इथे कुठेही या पार्टीला कट्टा सम्बोधले नाही.
ही बहुधा खाजगी वैयक्तीक प्यार्टी असावी.
चोता दोन ने कुलासा करावा

धमाल मुलगा's picture

22 Dec 2010 - 2:42 pm | धमाल मुलगा

का बोंबलुन र्‍हायला बे?
सरळ गाडी काढायची आन् ग्रीनगेटला जायचं. तिथं आनंद म्हणून म्यानिजर आहे. त्याला आपलं नाव सांग. ष्टाक सोबत घेऊन जाणे. बाकी तिथल्या सोयी-सुविधा तुम्हाला अनुभवून ठाऊक आहेतच.

विजुभाऊ's picture

22 Dec 2010 - 3:27 pm | विजुभाऊ

सरळ गाडी काढायची आन् ग्रीनगेटला जायचं. तिथं आनंद म्हणून म्यानिजर आहे. त्याला आपलं नाव सांग
सांभाळून रे....गेल्या खेपेला एकाने असेच केले . त्या आनंदला धम्याचं नाव ऐकून लै आनंद झाला. म्हणाला लै बरे झाले भौ...मागली उधारी येणे बाकी र्‍हायली होती त्यांची.
धम्या न्हेमी असच कर्तो....

धमाल मुलगा's picture

22 Dec 2010 - 3:34 pm | धमाल मुलगा

आन तुम्ही लास होऊन पल्डा तवा तुमच्या रिक्षाचंपण पैकं आमीच भरलं तवा? आँ?

विलासराव's picture

22 Dec 2010 - 5:19 pm | विलासराव

डॉनराव सरळ आपल्या 'रॉयल' क्रुजवरच जा ना.
तेही फुकट.( आता तुम्ही डॉन अन त्यात आमचे मित्र फक्त त्या धमालरावांना सांगु नका).

स्वगतः ही काय रॉयल क्रुजची जाहिरात नाही.

मुळशी लेकसाईडला दोन तीन रिझोर्ट आहेत.

तळ्याशेजारी निवांत.

सर्व अटींत बसतात.

काहींमधे डॉर्मिटरीही आहेत.

हर्षद खुस्पे's picture

27 Dec 2010 - 9:51 pm | हर्षद खुस्पे

अरे बनेश्वर ला जावा. सर्व अटींमध्ये बसणारे आणी सोय असणारी जागा आहे. माझा मित्राचे आहे.www.balajiresorts.net
Mr. Chetan Rane. ३५ किमी लांब आहे पुण्यापासुन.

काय झाले रे या चर्चेचे.
मंडळी नक्की कुठे बस्ली होती?

श्रावण मोडक's picture

7 Jan 2011 - 3:58 pm | श्रावण मोडक

धागाकर्त्यांना वायदेआझम म्हणतात हे विसरलात की काय? ;)

बरे झाले . मार्गदर्शन मिळाले