पॅट टिलमन : एक शोकांतिका

हुप्प्या's picture
हुप्प्या in जनातलं, मनातलं
4 Nov 2010 - 9:58 pm

कुठल्याही देशाचे देशप्रेमी नागरिक त्यांच्या सैन्याविषयी आदर, दबदबा, कौतुक, अभिमान अशाच भावना बाळगतात. सैन्य म्हणजे तळहातावर शिर घेऊन, देशावरील अफाट प्रेमापोटी आपला जीव धोक्यात घालणारे सैनिक अशी आपली कल्पना असते. आणि हे केवळ भारत नाही तर सगळ्या देशांबाबत होते.

पण ह्या कल्पनांना तडा जाईल असे एक पुस्तक वाचण्यात आले. बूट्स ऑन द ग्राऊंड बाय डस्क (सायंकाळच्या आत सैनिक हजर पाहिजेत) ह्या नावाचे पॅट टिलमन ह्या सैनिकाच्या आईने लिहिलेले हे पुस्तक.
हा माणूस एक उत्तम खेळाडू. अमेरिकन फूटबॉल हा त्याचा आवडता खेळ. व्यावसायिक फुटबॉलपटू अमेरिकेत अफाट पैसे मिळवतात. ह्याच्याही हातात तशी कारकीर्द होती. ५ लाख डॉलर वर्षाला मिळत होते. पुढील दोन वर्षात असेच १५-२० लाख मिळवायचे कॉंट्रॅक्ट खिशात होते. पण ९/११ चा हल्ला झालेला बघून, त्याने प्रेरित होऊन आपण आपल्या देशासाठी काहीतरी करावे म्हणून हा तरूण आपला आवडीचा व्यवसाय सोडून, नुकतेच लग्न झालेले असताना बायकोचा निरोप घेऊन सैन्यात साधा सैनिक म्हणून भरती झाला. इराकमधे उत्तम कामगिरी बजावून नंतर अफगाणिस्तानात लढाईला गेला. तिथे एक आक्रित घडले.

कुठल्याशा, पाकिस्तानच्य सीमेजवळच्या मोहिमेवर असताना त्यांच्या तुकडीकडे असणारी एक जीप खराब झाली. धोकादायक जागा, कुठल्याशा खेड्यात सायंकाळच्या आत पोचायचा निर्वाणीचा हुकुम. ही एक मोठी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली होती. तुकडीच्या नेत्याने ती मोडकी जीप मागे सोडायची परवानगी मागितली. पण मिळाली नाही. जीप नष्ट करून मग मागे ठेवावी अशीही विचारणा झाली पण तीही फेटाळून लावली गेली. त्या तुकडीतील काही लोकांनी ती जीप दुरुस्त करायचा प्रयत्न केला पण तोही फसला. नाईलाजाने त्या गटाचे दोन भाग केले. एक गट (गट १) ठरल्याप्रमाणे त्या खेड्याकडे रवाना झाला. दुसरा (गट २) त्या जीपला हलवायच्या कामाला लागला.

क्रमशः

समाजसमीक्षामत

प्रतिक्रिया

असुर's picture

4 Nov 2010 - 10:50 pm | असुर

क्रमशः चा चटका बसून पोळलो आहे!

--असुर

प्राजु's picture

4 Nov 2010 - 10:57 pm | प्राजु

पुढे लिहा... लवकर. भाग मोठे लिहा.

भाग लहान झाला आहे. दुसर्‍या भागात काय झालं हे वाचायची उत्सुकता आहे.

प्रियाली's picture

4 Nov 2010 - 11:37 pm | प्रियाली

यापेक्षा मोठे भाग लिहा.

नेत्रेश's picture

4 Nov 2010 - 11:20 pm | नेत्रेश

ऑक्टोबर २०१० मध्ये नेवाडा - अ‍ॅरिझोना या राज्याना जोडणारा (हुव्हर डॅम बायपास) ब्रिज चालु झाला. त्या ब्रिज ला 'पॅट टिलमन मेमोरियल ब्रिज' असे नाव देण्यात आले आहे.

हुप्प्याभाउ,
जरा मोठे भाग लिहा हो.

दिपाली पाटिल's picture

5 Nov 2010 - 12:45 am | दिपाली पाटिल

अच्छा... फार मोठ्ठा प्रोजेक्ट आहे तो...

स्वाती२'s picture

4 Nov 2010 - 11:44 pm | स्वाती२

वाचतेय.

पुष्करिणी's picture

5 Nov 2010 - 12:07 am | पुष्करिणी

(जरा मोठ्या ) पुढील भागाच्या प्रतिक्षेत

आवडला भाग , पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

हर्षद खुस्पे's picture

5 Nov 2010 - 7:21 am | हर्षद खुस्पे

अ रेरे
असं का क्रमशः लावता बरे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2010 - 7:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रमश का बरं ?

-दिलीप बिरुटे

सूर्य's picture

5 Nov 2010 - 4:26 pm | सूर्य

दुसरा भाग कधी?