नमस्कार !
मिसळ पाव वरील पहिलेच लेखन आहे माझे .. तसे तर कवितामध्ये रमणार मी , पण आजकाल त्या लिहितच नाहीत [:)].
एक कादंबरी लिहित आहे( बरेच दिवस आळसामुळे लिहाय्ची राहिली आहे ) . त्यात आलेले + मनाचे काही वन लाईनर्स येथे देत आहे.
आवडल्यास तुम्ही ही येथे लिहिले तरी आनंद आहे.
(मिसळ पाव वरील तमाम लिहिणार्या लोकांना माझा धन्यवाद त्यांच्या छानच्या लिखानामुळे माझे लिखान पुन्हा सुरु करण्याची उमेद मिळाली .. आभार )
----------
1. "समर्थन हे चुकीच्या गोष्टींना लागते, जे बरोबर असते ते शास्वत असते त्याला आधाराची गरज नसते."
2. मिळालेल्या सुखापेक्षा त्या पलिकडील न मिळालेल्या सुखाकडे मन धावत असते आणि या अस्थिरतेचे रुपांतर होते असमाधान मध्ये, माणुस असाच जीवनाचा प्रवास करतो आणि मनाच्या सुखासाठी यशाचे डोंगर तयार करतो . पण जेंव्हा जेंव्हा तो शिखरावर आरुढ होतो त्याला दिसते फक्त दरी आत्म्याच्या दबलेल्या स्वरांची दरी "
३. "आपण आपल्या माणसांशी आणि मनाशी प्रामाणिक रहायचे बस्स.. या सारखे सुख जगात दूसरे कुठलेच नाही "
4. "शब्दांना चेहरा नसतो.. तो असतो स्वछ आरसा मनाचा ...जेंव्हा या आरस्यास चेहरा चिकटतो..तेंव्हा समजावे शब्दरुपी आरस्यावरती मानवी अहंकाराचे प्रतिबींब उमटले ते"
5. कलाकारास वय नसते .. आणि त्याच्या कलाकृतीस कुठलेही बंधन.. लहान-मोठे पणाचे नाते एकदा का कलाकाराशी जोडले की उरतो फ़क्त आभास..बस्स.. कलाकृतीवरील निस्सीम प्रेमा ऐवजी राहतो फ़क्त एक क्रुत्रिम देखावा..
6. "अखंड दु:ख भोगणार्यांना ही दूसर्यास दु:ख देवूनच आनंद उपभोगता येतो "
7. "परीवर्तन .. परीसा प्रमाणे राहुन येणार्या प्रत्येक गोष्टीचे सोने केल्यास मिळणार्या यशास परीवर्तन म्हणतात "
8. "हातात असलेले फुलपाखरू उडाले की मागे उरतात ते रंग,फक्त रंग आणि ते ही फिकट , तसाच हा काळ .. तो ही असाच पटकन निघून जातो आठवणींचे रंग मागे ठेवून "
9. " काळाच्या प्रवाहात आयुष्य वाहत जात अण् या प्रवाहात शरीर रुपी अंगरख्याची लक्तरं होतात .. म्हातारपण हे आत्म्याच्या उच्छादी पणाला शाप असतं "
10. " मन हे एक वृक्ष असते अन आठवणी त्या वृक्षाची पाने, ओळखीच्या दृष्यांची झुळूक एकदा का आली की ही पाने सळतात.. पूर्ण वृक्ष शहारून जातो अन कधी कधी तर नयनांवाटे गालावर अश्रू फुलांची ओघळण होते."
11. "शिखरावरती पोहचण्यासाठी प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात आणि दृष्टिकोन भिन्न फक्त शिखरावरती पोहचल्यावर प्रत्येकाने निर्मायची असते ताकद आपल्या पायात शिखरावरती ठाम उभे रहाण्यासाठी ... "
12. "ambulance वरील अक्षरे उलटी असतात कारण प्रत्येक जीविताचा प्रवास हा जीवनाकडून मरणाकडे चालू असतो, फक्त ambulance मधील व्यक्तीचा प्रवास हा उलटा मरणाकडून जीवनाकडे चालु असतो"
13. "काळाच्या प्रवाहात आयुष्य वाहत जात अन या प्रवाहात शरीर रुपी अंगरख्याची लक्तरं होतात.. म्हातारपण हे आत्म्याच्या उच्छादी पणाला शाप असतं" ..
15. "नातं कीतीही सुंदर असले ना तरी त्यातील बंध कोठे सैल आहेत आणि कोठे घट्ट हे नातं निभावणार्यालाच माहीत असते, म्हणुन त्या अनुशंघाने आपण नातं निभवत रहायच ,बुट पायात घातला तर कदाचीत तो टोचणारच पण म्हणुन त्याला फेकून ध्यायचे नसते, आपल्या पायचे वळण आपोआप त्याला मिळते"
16. " आयुष्यामध्ये धडपड नसेल तर मिळालेल्या यशास ही काही अर्थ आणि आनंद नसतो "
17. "यशाच्या वाटेवर जाण्यासाठी फक्त नविन मार्गाची इच्छा असणे गरजेचे नाही तर परीचीत रस्ते सोडण्याचे धेर्य बाळगणे गरजेचे असते"
18. "लिहिण्याला प्रामाणिकतेची जोड मिळाली की फक्त लिखाण होत नाही तर तो आयुष्याचा शिलालेख बनतो"
19 . "राजकारण हे प्रत्येक माणसाच्या मनात दडलेले असते .. माणुस जितका शांत तितका त्याचा रंग गडद"
20. " अनुभव हा खुप वाईट मित्र असतो"
21. " प्रतिष्टावंतानी विचार करावा .. आपली जी प्रतिष्टा आहे ती समाजामध्ये आहे की मनामध्ये कारण या जगात प्रतिष्टा मिळवण्यासाठी बर्याचदा मनाला गहान ठेवावे लागते"
22. " आपल्या विचारांशी प्रामाणिक रहाणे, हेच या जगातील सर्वश्रेष्ट कर्तव्य आहे "
23. "सुख आणि दु;ख हे एकटेपणाच्याच दोन समान बाजू आहेत. माणसाचे दु:ख हे धृव तार्यासम असते.. अटळ आणि एकटे.. सुखा मध्ये माणुस अविरत आनंदी असतो, सूर्यासम.. अविरत.. स्वयंप्रकाशित.. पण सुर्यासही शाप असतो एकटेपणाचा म्हणुनच कदाचीत सुर्यासोबत कोणीच तारा नसतो सोबतीला"
24. "चांगल काय आणि वाईट काय यांची सिमा जशी ठरलेली , तसेच गुरु आणि शिष्य
यांचे नाते असते.. अबाधीत ..समांतर"
25 .एकटेपणा हाच आयुष्याचा एकुलता एक सोबती आहे ..
२६. "काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरे शोधली नाहीत तर जीवनाची असाध्य उत्तरे आपणास मिळतात"
27 ." या जगात मैत्रीला स्थर नसतो , पण जर माणुस आपल्याच विचारांच्या टेकडीवरून मैत्रीकडे पहात असेल तर त्याला ती ठेंगणीच वाटणार.... अस्थीर विचार मैत्रीचा स्थर ठरवू शकतात, पण मैत्री विचारांचे स्थित्यंतरे पेलुन आपल्या जाग्यावर सदैव स्थिर असते "
28. "जोपर्यंत पुरुष तन सोडून मनाकडे वळत नाही, तो पर्यंत मुलींनी आपणास मन नाही असेच समजून वागावे, मुली एकदा का मनाच्या चक्रात अडकल्या की समोरच्याची दृष्टी त्यांना अस्पष्ट दिसते .. आणि या चक्रात त्या स्वताला परावलंबी समजतात आणि मनाच्या गुरुत्वीय शक्तीभोवती फ़िरताना त्या कधी दूर फ़ेकल्या जातात त्यांनाच कळत नाही "
29 "मन आणि विचार यात काहीच फरक नसतो, आपल्या विचरांना एक रुप देण्यासाठीच माणसाने मनाचे अस्तित्व निर्माण केले.. पण आता माणुसच विचार करतोय मनाचे स्थान कोठे आहे .. पण तो विसरलाय विचार हाच मनाचा जन्मदाता आहे "
30 ."वय वाढते शरीराचे .. मन तरुण असते ..भावनांना चिरतारुण्याचे वरदान लाभलेले असते..म्हणुन कुठलाही कलाकार वयस्कर नसतो, त्याच्या नजरेत सदा तारुण्य असते.. "
३१. आपल्या कलाकृतीच्या निर्मितीचा अहम नसलेला एकमेव कलाकार म्हणजे निसर्ग.
प्रतिक्रिया
3 Sep 2010 - 5:30 pm | निवेदिता-ताई
छान,सुंदर , विचार करण्यायोग्य.......
3 Sep 2010 - 5:34 pm | अरुण मनोहर
>>आरस्य>><< हे "आरशास" असे हवे का?
3 Sep 2010 - 5:37 pm | मिसळभोक्ता
आता या वन लायनर भोवती एकादी कथा गुंफा, म्हणजे झालाच तुमचा वपु.
4 Sep 2010 - 1:35 pm | सहज
त्रिशतकवीर! कितीतरी वनलायनर वाचुन प्रो. देसाई व मित्रमंडळींची आठवण नाही आली? परत वाचा बरे!
ग.प्र.मं. सभासद नोंदणी सुरु करावी लागेल.
4 Sep 2010 - 8:33 pm | मिसळभोक्ता
अद्याप ह्या "ग" ला कशाचीही बाधा झालेली नाही.
बघू पुढे.
आणि त्रिशतकाचे म्हणाल, तर पुण्यात न्हेरू श्टेडियम वरचे त्रिशतक, आणि मेलबोर्न वरचे, ह्यात फरक नको का ?
3 Sep 2010 - 6:13 pm | गांधीवादी
गपुर्झा
3 Sep 2010 - 8:51 pm | शुचि
>> "नातं कीतीही सुंदर असले ना तरी त्यातील बंध कोठे सैल आहेत आणि कोठे घट्ट हे नातं निभावणार्यालाच माहीत असते, म्हणुन त्या अनुशंघाने आपण नातं निभवत रहायच ,बुट पायात घातला तर कदाचीत तो टोचणारच पण म्हणुन त्याला फेकून ध्यायचे नसते, आपल्या पायचे वळण आपोआप त्याला मिळते" >>
सुंदर!!!!
3 Sep 2010 - 8:57 pm | अविनाशकुलकर्णी
वन लाईनर.???????????? एक ओळीचे धागे गुंफल्या मुळे आम्हि बराच ओरडा खाल्ला आहे..........
3 Sep 2010 - 9:29 pm | बबु
वि. स. खांडेकर स्टाईल जाणवली.
3 Sep 2010 - 11:04 pm | केशवपुत
छान श्रीगणेशा!!!
4 Sep 2010 - 12:39 am | वाटाड्या...
एका ओळीचे वाक्य पायजे नाहीतर फाऊल धरण्यात येईल...३र्या फाऊलला आउट...
आता तुम्हीच मोजा...
- फावल्या...
4 Sep 2010 - 12:29 pm | संजयशिवाजीरावगडगे
छान !!! अप्रतिम !!
4 Sep 2010 - 10:22 pm | मदनबाण
मस्त... :)
4 Sep 2010 - 10:45 pm | एक अनामी
छान लिहीलय...
पण " अनुभव हा खुप वाईट मित्र असतो"
हे नाही पटलं बुवा... प्रत्येक अनुभवाकडे आपण कुठल्या दॄष्टीकोनतून पाह्तो ते महत्त्वाचे...
अजून एक वन लाईनर...
" अहंकार आणि आत्मसन्मान यादरम्यान एकच पुसटशी रेघ असते... ती ओळखणारे खूपच कमी..."
5 Sep 2010 - 11:14 am | सूर्यपुत्र
>>" अनुभव हा खुप वाईट मित्र असतो"
>>.एकटेपणा हाच आयुष्याचा एकुलता एक सोबती आहे ..
ही वाक्ये :
अनुभव हाच आयुष्याचा एकुलता एक सोबती आहे
एकटेपणा हा खुप वाईट मित्र असतो
अशी असावीत का???
6 Sep 2010 - 2:28 pm | गणेशा
सर्वांचे आभार !
- अरुण जी आपण म्हणत आहत तसेच बरोबर आहे. चुकुन स्पेल मिस्टेक झाल्या आहेत.
- मिसळ उपोभोक्ता प्रो. देसाई कोण आहेत ? आणि त्यांचे लिखान असेच आहे का ?
आणी व. पु. काळे हे माझे सर्वात आवडते लेखक आहेत. हे वन लाईनर त्यांच्या लिखानाच्या प्रेरणेतूनच लिहिले गेले आहे.
परंतु त्यांची उंची खुप मोठी आहे. त्यामुळे तेथपर्यंत झेप घेणे आपले काम नाही.
असो .. आपले विरजन छान असते .. त्यामुळे आनंद मात्र वाढतो ...
- बबु
[:)] वि.स.खांडेकर खुप उत्कृष्ट लेखक आहेत, परंतु हि वाक्य माझी असली तरी स्टाईल व्.पु. काळेंसारखी आहे.
आणि कथा/कादंबरी मध्ये अशी वाक्य नसल्यास .. खुप विनाकारण लेखन करावे लागते या बदल्यात.
- एक अनामी
आपले वाक्य खुप खुप आवडले .. मस्त आहे .. लिहित चला ..
- ध्येयहीन ध्यनवाद .. तुमचे म्हणने बरोबर आहे.
काही वेळेस संभाषणात ती वाक्य आलेली आहेत कादंबरी मध्ये म्हणुन तशी आहेत.
बाकी आपले म्हणने योग्य आहे.
----------
सर्वांचे आभार
गणेशा
6 Sep 2010 - 5:43 pm | विसुनाना
माझे नव्हेत पण स्तिमित करणारे उद्गार-
"कफन को जेब नही होती और मौत रिश्वत नहीं लेती."
इथून साभार...