काही बाही...

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
1 Aug 2010 - 1:18 pm

कधी कधी एखादं पुस्तक समोर असलं तरी अथपासुन इतिपर्यत वाचुन होत नाही.

कारणं अनेक असतात. अशा वेळेस आमचे परममित्र बिकाशेट यांच्या सारखं कुठलंही पान काढुन वाचायचं ही पद्धत मी अवलंबतो.

काल असंच झालं. एक पुस्तक काढलं आणि मधूनच वाचायला सुरवात केली. अर्ध मुर्ध पान झालं की जा पुढे नाही तर मागे. असं करता करता काही वाक्य समोर आली. बिकाशेटनी आवडलेलं काही.. असं कधीतरी लिहिलं होतं. म्हटलं आपण पण लिहावं. आता हे तुम्हाला आवडेल की नाही माहित नाही. म्हणुन काही बाही हे नाव ठेवलं.

वाचा....

"(सत्तेने मदांध) राजा लोक विद्वानांच्या विषयोपभोगाला त्यागुन विद्याभ्यासात रममाण होण्याला वेळेचा व्यर्थ उपयोग असे समजुन उपहास करतात. वृद्धांच्या उपदेशाला म्हातारचळातली बडबड असं समजुन दुर्लक्ष करतात. मंत्र्यांच्या सल्ल्याला राजाच्या बुद्धिचा तिरस्कार समजतात. राज्याच्या हिताचे बोलणा-याला रागाने पहातात.

(हे राजा लोक) सदैव त्याचेच स्वागत करतात, त्यालाच जवळ बसवतात, त्यालाच पुढे करतात, त्याच्याच बरोबर सुखाने रहातात, त्यालाच धन वगैरे देतात, त्यालाच मित्र समजतात, त्याचाच सल्ला मानतात, त्याच्याच धनाची वृद्धी करतात, त्यालाच मानतात, त्यालाच विश्वासपात्र समजतात जो आपली सगळी कामे टाकुन, हात जोडून दिवसरात्र उपास्य देवतेची करावी तशी त्यांची स्तुती करत असतो आणि गुणगान गात असतो."

संदर्भ - बाणभट्टाच्या कादंबरीतील एक प्रसंग. शुकनास नामक मंत्री आपल्या राज्याच्या युवराजाला भावी आयुष्यात कसं वागावं याचा उपदेश करतांना बेजबाबदार वागणं कसं असतं हे समजावुन सांगत असं तु वागु नकोस असा सल्ला देतो.

हे आवडलं असेल तर असंच काही बाही अधुन मधुन येत राहिल.

संस्कृतीसमाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2010 - 1:27 pm | बिपिन कार्यकर्ते

छान!!!

असेच वेगवेगळे पैलू दाखवणारे लेखन येईल अशी अपेक्षा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2010 - 1:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>असेच वेगवेगळे पैलू दाखवणारे लेखन येईल अशी अपेक्षा.
असेच म्हणतो. बाणभट्टाच्या कादंबरीवर समीक्षणात्मक लेखन येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

चांगल आहे. येउदे रे अजुन.

अर्धवट's picture

1 Aug 2010 - 1:45 pm | अर्धवट

आवडलय

प्रकाश घाटपांडे's picture

1 Aug 2010 - 1:53 pm | प्रकाश घाटपांडे

काही बाही ला विषयाच बंधन नसाव. आजुक येउं देत

अवलिया's picture

2 Aug 2010 - 12:19 pm | अवलिया

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

राघव's picture

2 Aug 2010 - 12:38 pm | राघव

असे बरेच काही बाही वाचायला मिळेल ही अपेक्षा!