आओ, कानसेन, पहेचानो...भाग ८

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
9 Jul 2010 - 5:57 pm

बहुगुणी यांनी चालू केलेली स्पर्धा आता मी या भागात पुढे चालवतेय. उद्देश हा की, या खेळात जितकी मला मजा आली, ती त्यांनाही मिळावी..
तेव्हा पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...
या आधीचे दुवे:
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७

***********

जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.

****************

कानसेन क्रमांक ५०: रेवती
कानसेन क्रमांक ५१: मिसळपाव, गणपा आणि प्रभो..
कानसेन क्रमांक ५२: मेघवेडा आणि प्रभो.
कानसेन क्रमांक ५३: डॉ. प्रसाद दाढे.
कानसेन क्रमांक ५४: ----
कानसेन क्रमांक ५५: प्रमोद_पुणे
*****************

सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!

हा एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील इतर गाजलेल्या गाण्यांच्या तुलनेत किंचित मागे पडलेल्या गाण्याचा अंतरा आहे.

संगीतमौजमजाचित्रपटप्रश्नोत्तरेविरंगुळा

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

9 Jul 2010 - 6:10 pm | क्लिंटन

हे गाणे आहे हिरो चित्रपटातील 'निंदिया से जागी बहार'.

दुवा

क्लिंटन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jul 2010 - 6:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरोबर वाटतं आहे उत्तर!
पण जरा बरी गाणी निवड गं ... काय पण lousy, टुकार गाणं आहे हे!

अदिती

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 6:14 pm | मस्त कलंदर

कानसेन क्र> ५४: क्लिंटन

पुढचे कोडे बहुगुणी देतील

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 6:34 pm | मस्त कलंदर

मेघवेड्याने मोजणी चुकवली माझी. क्लिंटन कानसेन क्रमांक ५६ आहेत.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बहुगुणी's picture

9 Jul 2010 - 6:27 pm | बहुगुणी

हिंदी, अंतरा देतोय:

प्रभो's picture

9 Jul 2010 - 6:30 pm | प्रभो

http://www.youtube.com/watch?v=txv7RCe8DXM

ये चांद सा रोशन चेहरा, कश्मीर की कली..

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 6:32 pm | मस्त कलंदर

ये चॉंदसा रोशन चेहरा

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 6:29 pm | मस्त कलंदर

प्र का टा आ

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

प्रतिसाद काढून टाकला आहे, चालू ठेवा क्र. ५५...

बहुगुणी's picture

9 Jul 2010 - 6:34 pm | बहुगुणी

कानसेन क्र. ५५: मस्त कलंदर

प्रभो's picture

9 Jul 2010 - 6:37 pm | प्रभो

मकी च्या २ मीनीट आधी मी लिहिलाय हो प्रतिसाद... ;)

का आम्हाला व्हीआरएस???

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 6:42 pm | मस्त कलंदर

अरे मी आधी नुसतेच उत्तर लिहून नंतर व्हिडिओ क्लिप देऊन तो अद्ययावत केला.. रडू कुठचा!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

अरेरे!
E-गोंधळ!!

असो, तुम्ही दोघेही संयुक्त विजेते:

कानसेन क्र. ५७: प्रभो आणि मस्त कलंदर

बहुगुणी's picture

9 Jul 2010 - 6:47 pm | बहुगुणी

क्र. ५८:

हिंदी, अंतरा दिलायः

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 6:47 pm | मस्त कलंदर

हिंट द्या.. ओळखत नाहीए.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

धर्मेन्द्रचा सिनेमा होता...

मिसळपाव's picture

9 Jul 2010 - 6:53 pm | मिसळपाव

दोस्त मधलं
http://www.youtube.com/watch?v=zbYpxQlbdk0

(ईमानदारीत बराच वेळ नुसता बघत उभा होतो हां.)

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 6:58 pm | मस्त कलंदर

_/\_
आतापर्यंत कुठलं गाणं असेल म्हणून १५-२० गाणी ऐकून झाली.. पण हे असेल म्हणून क्लिकलंच नव्हतं...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बहुगुणी's picture

9 Jul 2010 - 7:01 pm | बहुगुणी

कानसेन ५८: मिसळपाव

या गाण्याचा clue हवा असल्यास तोही त्याच देतील...हे त्यांनीच सुचवलेलं गाणं आहे..

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 7:41 pm | मस्त कलंदर

या चित्रपटाचा नायक विक्रम गोखले आहे. गायक-गायिका: लता दीदी नि सुरेश वाडकर

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मेघवेडा's picture

9 Jul 2010 - 7:42 pm | मेघवेडा

पुन्हा एक फुल्टॉस..

गाणे : माजें रानी माजें मोगा, तुजें डोल्यांत सोधता ठाव.. फुलाफुलाक पुशीत आयलो तुजें माजें प्रीतीचो गाव!
गायक : लता मंगेशकर, सुरेश वाडकर
चित्रपट : महानंदा.

हापिसात युट्युब बंद असल्याने व्हिडिओची लिंक नाही. :)

इथे गीत पहा!

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 7:59 pm | मस्त कलंदर

गुड..
कानसेन क्र. ५९: मेघवेडा

कोडे क्र. ६०
हिंदी गाण्याचा अंतरा:

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 8:19 pm | मस्त कलंदर

मिसळपाव यांनी हे गाणं ओळखलं आहे. आणखी कुणाला प्रयत्न करण्यास हिंट:
शर्मिला टागोरवर चित्रित झालेलं गाणं आहे

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 8:25 pm | मस्त कलंदर

कानसेन क्र ६०: मिसळपाव.
मिसळपाव उत्तर इथे जाहिर करा.. आणि यापुढे मेघवेडा किल्ला लढवतील.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मिसळपाव's picture

9 Jul 2010 - 9:13 pm | मिसळपाव

http://www.youtube.com/watch?v=UfUhpbe-Jg0

पिक्चर नाहि बुवा माहिही कोणता ते.

मेघवेडा's picture

9 Jul 2010 - 8:34 pm | मेघवेडा

मस्त कलंदरना आधी त्यांच्या विजेटने मस्त कलटी देऊन त्यांची विकेट काढली होती. पण तरी त्यांनी लढाऊ बाणा दाखवत विजेटवर मात केलीच त्यामुळे मघापासून आम्ही कोडं घालण्याची संधी कधी मिळते याची वाट पाहत होतो. आता ती मिळाली आहे तर हे घ्या पुढलं कोडं कानसेन क्र. ६१ करता..

पुन्हा एकदा लतादीदींच्या आवाजातल्या एक पवित्र गाण्याचा अंतरा. गाणं मराठीच आहे. :)

रेवती's picture

9 Jul 2010 - 9:27 pm | रेवती

भस्म विलेपित रूप साजिरे
लताबाई
गाण्याचा दुवा सापडत नाहिये पण शब्दाचा दुवा
http://www.geetmanjusha.com/marathi/lyrics/1537.html?rss
रेवती

मेघवेडा's picture

9 Jul 2010 - 9:40 pm | मेघवेडा

(प्रकाटाआ)

गणपा's picture

9 Jul 2010 - 9:19 pm | गणपा

ए मेव्या हलकट माणसा ८-१० सेकंदाचे पीस काय टाकतोस रे जरा १५-२० सेकंदाचे टाक ना....

स्वगत : आहारे काय दिवे लावंणारेस.

मेघवेडा's picture

9 Jul 2010 - 9:40 pm | मेघवेडा

एकदम बरोबर! कानसेन क्र. ६१ : रेवती.

हा घ्या गाण्याचा दुवा!

पुढलं कोडं. कानसेन क्र. ६२.

खास आमच्या गणपाभौकरता १७ सेकंदाची क्लिप टाकली आहे! कुठल्या 'प्रेरणादायी' मराठी गाण्याचा मुखडा आहे बरं हा? वळका बगू वळका बगू..

गणपा's picture

9 Jul 2010 - 10:06 pm | गणपा

च्छ्या बुवा आमचं घोड शर्यतीत एकटं धावल तरी पहिलं येइल याची खात्री नाही.
(दमलेला) गणा

चतुरंग's picture

9 Jul 2010 - 10:09 pm | चतुरंग

चतुरंग

मेघवेडा's picture

9 Jul 2010 - 10:14 pm | मेघवेडा

गदिमांचं गीत आहे. काशिनाथ घाणेकर, सुधीर मोघे होते चित्रपटात. चित्रपटाचं किंवा गायकाचं नाव सांगणं म्हणजे खूपच सोप्पं होईल म्हणून सांगत नाहीये! ;)

मस्त कलंदर's picture

9 Jul 2010 - 10:26 pm | मस्त कलंदर

प्रीत करू लपून छपून लपून जगाला....??
तपासून पाहायला हे गाणं ध्वनिफीत्/चित्रफीत काहीच मिळत नाहीए. पण हे असावं असं वाटतंय

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मेघवेडा's picture

9 Jul 2010 - 10:55 pm | मेघवेडा

प्रीत करू लपून छपून हे प्रेरणादायी गाणं आहे होय.. :P

चला आणखी एक क्लू.. रंगाशेठनी चित्रपटाचं नाव बरोबर ओळखलंय! :)

हे गीत असावं पण मला ट्रॅक कुठे गावत नाहीये हो! :(

चतुरंग

मेघवेडा's picture

9 Jul 2010 - 10:58 pm | मेघवेडा

हा हा हा! हे गीत सुद्धा 'प्रेरणादायी' नक्कीच नाही! :)

चतुरंग's picture

9 Jul 2010 - 11:03 pm | चतुरंग

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा
(पण पुन्हा ट्रॅक नाहीच हो! :()

चतुरंग

प्रभो's picture

9 Jul 2010 - 11:04 pm | प्रभो

झाकून टाक जिवा दुबळेपणा....

रंगाशेठ्च्या क्ल्यु मुळे आठवलं... व्हिडीओ मिळाला नाही.. :(

चतुरंग's picture

9 Jul 2010 - 10:44 pm | चतुरंग

त्याची गाणी मला ऐकायला मिळाली नाहीत कुठे...:(

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jul 2010 - 10:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डायनोसोरच्या काळातली गाणी आम्हां बालकांना कशी बरं माहित असणार? अंमळ नवीन गाणी ठेवा की, कोंबडी पळाली वगैरे!

अदिती

मराठे's picture

9 Jul 2010 - 11:05 pm | मराठे

मधुचंद्र सिनेमातलं असावं (सुधिर मोघे + काशिनाथ घाणेकर)!
गाण्याचं नाव??
'झटकून टाक जीवा दुबळेपणा' ??? नक्की नाहि. लिंक पण सापडत नाहिये.

मेघवेडा's picture

9 Jul 2010 - 11:08 pm | मेघवेडा

रंगाशेट, अगदी बरोबर! हे गाणं आहे "झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा.."
कानसेन क्रमांक ६२ : चतुरंग

डाऊनलोडची लिंक आहे. व्हिडीओ मिळत नाही.

पुढलं कोडं : कानसेन क्रमांक ६३ नव्या धाग्यावर! :)