महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
8 Jul 2010 - 7:06 pm

उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ||

उचल तुझे हात नको भिऊ आता
आपूलाच जय होईल सीमेत शिरता
झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१||

राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे
वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे
सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२||

पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला
महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला
सामिल करू हलियाल,भालकी, अरूड अन बिदर*
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||३||

* महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्तीय मराठी शहरे (BCC's 2005 resolution हा परिच्छेद पहा.) (कृपया शहरांच्या नावांचे उच्चार योग्य आहेत का ते सांगा जेणेकरून बदल करता येईल.)

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०७/२०१०

वीररसरौद्ररसकविताभाषाराहती जागाभूगोल

प्रतिक्रिया

अवलिया's picture

8 Jul 2010 - 7:11 pm | अवलिया

मस्त रे मस्त !!!
खरंच आता काहीतरी करायला हवे अशी वेळ नक्की आली आहे.

(जोपर्यंत समोरचा दरवाजे, कुंपण, सीमा मानत आहे तोपर्यंत अशा गोष्टींनी खुप फरक पडतो असे मनापासुन मानणारा ) अवलिया

प्रशु's picture

8 Jul 2010 - 9:52 pm | प्रशु

पाषाणभेद साहेब, कोणाला उठायला सांगताय... माझ्या धाग्यावर आलेल्या विक्षीप्त प्रतिक्रिया वाचा...

पाषाणभेद's picture

8 Jul 2010 - 10:40 pm | पाषाणभेद

खरे आहे दादा. काळ बदललाय. आपले पोट भरते ना मग झाले तर. दुसरा काय रडतोय ते कुणाला समजते? अन पोट भरलेले असणे अन ते दाखवणे हे योग्य आहे असे पोट भरलेल्या वाटते.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

विसोबा खेचर's picture

8 Jul 2010 - 9:57 pm | विसोबा खेचर

छान रे.

पण मराठी-काँग्रेसजन इटालियन राज्यकर्त्यांची थुंकी झेलतात त्याचं काय?

शिल्पा ब's picture

8 Jul 2010 - 10:52 pm | शिल्पा ब

कोणीही उठू नका...झोपून राहा...हळूहळू चीनच्या घशात भारत जाईल तेव्हा हे फालतू प्रश्न सुटतील...नाहीतरी अरुणाचल प्रदेश वर चीनने हक्क सांगितला आहेच....तिबेटनंतर...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

Manoj Katwe's picture

9 Jul 2010 - 7:10 am | Manoj Katwe

From Misalpav

जम्मू काश्मीरच जर जगभर जाहीर आहे, पण हे अरुणाचलच्या सीमा सुद्धा तुटक तुटक आहे , हे त्याचंच द्योतक आहे का ?

भारताचे नशीब कि तो अर्ध्या बाजूने (निर्जीव) पाण्याने वेढला गेलेला आहे. नाहीतर तिथे पण दोन-तीन तुटक तुटक सीमा बघायला मिळाल्या असत्या.

नाकर्ते राजकारणी असले तर ह्या तुटक तुटक सीमांमध्ये अजून भरच पडत जाणार.
(कोणे एक दिवशी त्या ठळक होतील, तो प्रदेश पूर्णपणे आपल्या ताब्यातून गेल्यावर )

अवांतर : येत्या गणपतीला तुटक तुटक भारताच्या नकाशाचाच देखावा करावा असे मनात येत आहे. निदान लोकांना (गल्ली गल्लीतल्या , चिरी मिरी साठी मारामारी करण्यार्या तुच्छ राजकारण्यांना) निदान समजेल तरी कि जग रोज हाच भारताचा हाच नकाशा बघतात ते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jul 2010 - 11:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मॅप्स.गुगल.इन वर पहा, संपूर्ण, अखंड भारत दिसेल.
मॅप्स.गुगल.सीएन वर पहा, अरूणाचलला तुटक रेघ दिसणार नाही, आणि आख्खा (अक्साई चीन+) अरूणाचलही चीनला जोडलेला दिसेल.
मॅप्स.गुगल.पीके पहा ... साईट अस्तित्त्वात नाही (प्रतिसाद लिहीपर्यंततरी)! ;-)

असो. भारतात रेघा कशा मारायच्या आणि भारत आणि त्यांचे शेजारी यांच्यात रेघा कशा आहेत, माराव्यात या दोन प्रश्नांची आपण का सरमिसळ करता आहात हे कळलं नाही. भारतात कितीही आणि कशाही रेघा मारलेल्या असल्या तरी फरक पडला नाही तर आणि तरच आपण सीमानामक रेघांचा सांभाळ चांगला करू शकतो.

पाभेसाहेब,

आपले पोट भरते ना मग झाले तर. दुसरा काय रडतोय ते कुणाला समजते?

आमच्याच राज्यात आणि देशात अनेकांना उपाशी पोटी झोपावं लागतं त्याचा विचार काही जणांना महत्त्वाचा वाटतो. कोण लोकं कोणती भाषा बोलतात यापेक्षा किती टक्के लोकांना दोनवेळा पोटभर जेवण मिळतं याची काही जणांना जास्त काळजी वाटते.
बाकी, कोणत्या राज्यात कोणतं गाव आहे याचा आणि पोट भरण्याचा काय संबंध?

अदिती

ऋषिकेश's picture

8 Jul 2010 - 10:58 pm | ऋषिकेश

एक गाणे म्हणून रचना आवडली

मात्र, आशय म्हणून फारशी आवडली नाहि. एकुणच मराठी माणसापेक्षा फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी लिहिलेले वाटते. (विषेशतः शेवटच्या कडव्यावरून)

अवांतर: मराठी माणूस सूरत, बडोदा, इंदोर वगैरे ठिकाणीही बराच आहे. त्यांना का नाहि संयुक्त महाराष्ट्रात / या गाण्यात स्थान?

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

शिल्पा ब's picture

8 Jul 2010 - 11:02 pm | शिल्पा ब

<<< मराठी माणूस सूरत, बडोदा, इंदोर वगैरे ठिकाणीही बराच आहे. त्यांना का नाहि संयुक्त महाराष्ट्रात / या गाण्यात स्थान?

इतर ठिकाणची मराठी मंडळी कधी गेली तिकडे? का पूर्वापार तिथेच राहत आहेत? सीमावर्ती भागासारखी?

बाकी मराठी माणूस चेचायला इतरांची गरजच नाही....

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

ऋषिकेश's picture

8 Jul 2010 - 11:04 pm | ऋषिकेश

तिथे मंडळी पुर्वापार आहेत सीमावर्ती भागासारखी. तिथे शिंदे/होळकर मंडळींच्या जहागिर्‍या होत्या

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

पाषाणभेद's picture

9 Jul 2010 - 8:35 am | पाषाणभेद

>>> एक गाणे म्हणून रचना आवडली
धन्यवाद.
>>> मात्र, आशय म्हणून फारशी आवडली नाहि. एकुणच मराठी माणसापेक्षा फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी लिहिलेले वाटते. (विषेशतः शेवटच्या कडव्यावरून)
मएस साठी हे गीत लिहीलेले नाही. मएस ही मराठी माणसांची प्रतिनिधी आहे जी सीमाप्रश्नावर लढते. (बाकी ही समिती कार्य करते की नाही, व्यवस्थापक कोण, कार्यालय कोठे आहे या बाबत मी अनभिक्षक्त आहे. तुम्ही/ कोणी त्याबाबत माहीती दिल्यास ते तिसरे कडवे पुन:लेखन करू शकतो.)

अवांतर: मराठी माणूस सूरत, बडोदा, इंदोर वगैरे ठिकाणीही बराच आहे. त्यांना का नाहि संयुक्त महाराष्ट्रात / या गाण्यात स्थान?

ॠषि, मी केवळ वादाच्या सीमाभागाबद्दलच बोलतोय. सूरत, बडोदा, इंदोर वगैरे ठिकाणे उगाचच वादात ओढू नका. जे न्याय्य आहे तेच आम्ही मागतोय. तुमचे म्हणणे खरे असेल तर ग्वाल्हेर, अटक, तंजावर, जिंजी सुद्धा महाराष्ट्रात यायला हवी. आमची भुक तेवढी नाही. जे पोटाला पुरते तेच आम्हाला द्या. याचा अर्थ असा नाही की आमच्या ताटातले तुम्ही हिसकावून घ्या.

तुम्ही मध्यप्रदेशात बर्‍हाणपूर, खंडवा, गुजराथ मधला अहवा, डांग, सापुतारा म्हटले असते तर ठिक आहे.

सूरत, बडोदा, इंदोर, ग्वाल्हेर, तंजावर, जिंजी आदी ठिकाणे मराठी माणसाचा स्पुर्तीदायक इतिहासच सांगतात. पुर्वी आपल्या सीमा विस्तार करणे हा हेतू असायचा. आता आहे त्या सीमा आपण गमावतोय. इतरत्र धाग्यांवर आलेल्या (मराठीच!) वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून मात्र खुपच खंत वाटली, उद्वेग वाटला, शरम वाटली, आश्चर्य वाटले, दुबळेपणा वाटला.

एक आठवण सांगतो. नवापुर हे महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या अगदी सीमेवरचे शहर आहे. महाराष्ट्र-गुजरात च्या वाटणीत हे शहर गुजरातेत जाणार होते. तेथील स्थानिक लोकांनी आंदोलन करून नवापुर हे शहर महाराष्ट्रात राखले. माझे चुलत सासर्‍यांनी त्याचे नेतृत्व केले होतो. त्यांच्या तोंडून मी तो इतिहास ऐकला आहे. मला त्यांचा अन तेथील स्थानिक लोकांचा अभिमान वाटतो.

- मराठी आणि बेळगाव, निप्पाणी, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, सापूतारा संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

ऋषिकेश's picture

9 Jul 2010 - 12:10 pm | ऋषिकेश

एक आठवण सांगतो. नवापुर हे महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या अगदी सीमेवरचे शहर आहे. महाराष्ट्र-गुजरात च्या वाटणीत हे शहर गुजरातेत जाणार होते. तेथील स्थानिक लोकांनी आंदोलन करून नवापुर हे शहर महाराष्ट्रात राखले. माझे चुलत सासर्‍यांनी त्याचे नेतृत्व केले होतो. त्यांच्या तोंडून मी तो इतिहास ऐकला आहे. मला त्यांचा अन तेथील स्थानिक लोकांचा अभिमान वाटतो.

वा! तुमच्या चुलत सासर्‍यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यांनी त्यांच्या काळात जे प्रश्न होते ते त्यांच्यापद्धतीने सोडवले ह्या कृतीशीलतेबद्द्ल त्यांना सलाम.

मात्र त्याचा आणि ५० वर्षांनंतरही राजकारण्यांनी मुद्दाम कुरवाळलेल्या ह्या सीमावादाचा संबंध कळला नाहि. सध्याचा सीमावाद असा आहे की त्याचे त्यावेळी नेतृत्त्व केलेल्यांनीही सुज्ञपणे प्रश्न वेळीच सोडून दिला आणि इतर अनेक ज्यांना केवळ या प्रश्नाचे राजकारण करायचे आहे त्यांनी (ज्यांस सध्याचे सर्व पक्ष/समित्या आल्या) हा प्रश्न असाच चिघळत ठेवला आहे, जेणेकरून योग्यवेळी तो वापरता यावा.

ही गावे महाराष्ट्रात येण्याने तेथे रहाणार्‍या मराठी माणसाला किंवा मराठी भाषेला किंवा महाराष्ट्राला किंवा देशाला काय फायदा होणार आहे?

अवांतरः 'अनभिक्षक्त' हा नवा मराठी शब्द वाचून हृदय भरून आले

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

अभिषेक९'s picture

8 Jul 2010 - 11:50 pm | अभिषेक९

विदर्भाचे इतके दिवस हाल केले, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई ने ... मग बेळगाव कशावरून सुखी राहील...
इकडे बेळगाव महाराष्ट्रात घ्या म्हणायचे, आणि तिकडे विदर्भातील मराठीच लोक वेगळे राज्य मागत आहेत...
आधी याचे उत्तर द्या....

शिल्पा ब's picture

9 Jul 2010 - 12:43 am | शिल्पा ब

काही कुणाला वेगळे राज्य देणार नाही....आणि आमचे बेळगाव सुद्धा हवे आहे...उगा काय दंगा लावलाय?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

चिरोटा's picture

9 Jul 2010 - 10:23 am | चिरोटा

गाणे आवडले. काही मुद्दे-

बाकी ही समिती कार्य करते..

बेळगावातच अनेक लोकांशी मी बोललो आहे ह्या विषयावर. हा मुद्दा पेटता ठेवून वृत्तपत्रे खपवणे/निवडणूका जिंकायला बघणे हा समितीचे मुख्य कार्य आहे.बाकी महाजन आयोगाने निकाल दिल्यावर सीमा प्रश्नावर 'त्याग' करुन नक्की काय मिळवणार हा प्रश्न आहे .ह्या मुद्द्यावर मिडियात प्रसिद्धी मिळाली की पुढारी आपसूकच 'मराठीचा मुद्दा मांडणारे'होतात.
P = NP

शानबा५१२'s picture

9 Jul 2010 - 10:41 am | शानबा५१२

सरळ सर्व विकुन महाराष्ट्रात या ना!
पण बेळगाववासियांना नक्की काय अडचण आहे तिथे राहण्यात?

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

प्रदीप's picture

9 Jul 2010 - 12:05 pm | प्रदीप

बेळगाववासियांना नक्की काय अडचण आहे तिथे राहण्यात?

अहो, चक्क २४ तास वीज की हो मिळतेय तेथे!! काय करायचीय (चाटता पण येत नाही). त्यापेक्षा आमचा बाणा, आमचे वाद हे आम्हाला महत्वाचे. कसले हो मर्हाटी तुम्ही!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jul 2010 - 12:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =))
तसं असेल तर मग किमान त्यांनातरी तिथे सुखात राहू देत ... शेवटी भारताचाच पासपोर्ट घेऊन ओळख सिद्ध होणार ना त्यांची!

अदिती

शानबा५१२'s picture

9 Jul 2010 - 2:22 pm | शानबा५१२

त्यापेक्षा आमचा बाणा, आमचे वाद हे आम्हाला महत्वाचे

होय हे बाकी खर.पण मला त्याच महत्व नसल तरी 'तिथे कुणाला मराठी म्हणुन त्रास दीला जात नाही' असे काहीसे समज आहेत(ते कीती बरोबर ते माहीती नाही.)म्हणुन तस लिहल आहे.
एकदा स्टार माझावर 'बेळगाव - जीव अडकुन बसला' की काय तो कार्यक्रम पाहीला,तेव्हा 'तो' वरचा समज झाला. त्यात 'मी मराठी' सारखा बाणा जपणा-या लोकांच्या म्हणण्यावर जोर दीला गेला.'आम्हाला हा न तो त्रास होतो' अस म्हणणार एकही तोंड नाही दीसल.
आपण बेळगाववासी असल्यास व माझ्या एखाद्या विधानामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मला................काय बोलु जाउ दे.
माझे वडील आर्मीच्या ट्रेनिंगला बेळगावला होते,तेव्हा मी ३-४ वर्षाचा असेन.तेव्हा मला वडील तिथुन खुप काही खाउ आणायचे.त्यात खारट्,कुरकुरीत बिस्किट्स पण असायचे.त्याअर्थी मी बेळगावचे मीठ खाल्ले आहे,म्हणुन आता हक्काने लिहु शकतो......हीहीही.
(आता ते मीठ कानडींच होत की 'आपल्या मराठी' माणसांच ते मी नाही विचारल कधी वडीलांना.........आपला एकच स्वार्थी प्रश्न : खाउ काय आणला??)

कसले हो मर्हाटी तुम्ही!!

हेय डीयर!.....ते वेगळे प्राणी असतात,आम्ही 'होमो सेपीयन सेपीयन'च्या कुळातले मराठी...९६ कुळी मराठा.

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

चिरोटा's picture

9 Jul 2010 - 5:13 pm | चिरोटा

सध्या आहे तीच परिस्थिती बरी आहे असे अनेक स्थनिक लोकांबरोबर बोलताना जाणवते.किंबहुना बेळगाव चुकुन महाराष्ट्रात आले तर आपले मराठी पुढारी बेळगावच्या पर्यावरणाचा बँड वाजवतील आणि शहर उजाड करतील अशी भितीही अनेकांना वाटते.
P = NP

अमोल केळकर's picture

9 Jul 2010 - 10:50 am | अमोल केळकर

गाणे आवडले. मराठी अभिमान गीतासारखं हे गाणं प्रसिध्द व्हायला पाहिजे असे प्रामाणिक मत

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jul 2010 - 1:54 pm | llपुण्याचे पेशवेll

छान कविता आहे रे पाभे.
बाकी २ वेळा जे लोक उपाशी आहेत त्यांची काळजी करणारे लोक स्वतः काहीही करत नाहीत हे लक्षात घे आणि लिहीत रहा.
(२ वेळच्या उपाशी लोकांना फुकट न पोसणारा)
-पेशवे

आपल्याला जे पाहीजे ते दडपून करायचंच त्यासाठी साम, दाम, दंड, भेद सगळ्या नितींचा वापर करायचा. कोण काय बोलतं याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही.
(स्वतंत्र)
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

अवलिया's picture

9 Jul 2010 - 2:07 pm | अवलिया

>>>हे लक्षात घे आणि लिहीत रहा.
नुसतेच लिहु नकोस काही कार्य सुध्दा जमेल तसे करावे.
अर्थात विचार हा मह्त्वाचा असतो कारण तो अनेकांना कार्याला प्रवृत्त करत असतो.

--अवलिया

गणपा's picture

9 Jul 2010 - 2:37 pm | गणपा

आवडल रे पाभे