'रॉयटर'च्या श्री. अलिस्टर स्क्रटन (Alistair Scrutton) यांचा एक लेख

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
6 Jul 2010 - 9:29 pm

सुमारे महिन्यापूर्वी 'जकार्ता पोस्ट'मध्ये 'रॉयटर'च्या श्री. अलिस्टर स्क्रटन (Alistair Scrutton) यांचा एक लेख आला होता. शीर्षक होते, "As Pakistan stares at India, India eyes the world". हा लेख 'मिपा'कर http://www.reuters.com/article/idUSTRE6590YJ20100610 या दुव्यावर वाचू शकतील.

आपण भारतीय नागरिक परदेशी मीडियात भारताबद्दल साधारणपणे तुच्छतादर्शक मतप्रदर्शन वाचतो व रागावतो. पण या लेखातले भारताबद्दल उदार मतप्रदर्शन वाचून मला साश्चर्य आनंदाचा धक्काच बसला.
भारताने स्वातंत्र्यानंतरच्या साठाहून जास्त वर्षांत अस्सल लोकशाही, कधी-कधी अनागोंदीचीही म्हणता येईल, राबवीत जे कांहीं साध्य केले आहे त्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटतो. आपल्या देशाने कधीही कुणावरही आक्रमण केले नाहीं, अगदी बांगलादेश युद्धातही. कारण लवकरात लवकर भारताने तो नवनिर्मित देश शेख मुजीबुर रहमान यांच्या सरकारच्या हवाली करून आपली सेना परत बोलावली होती.

भारत जरी प्रगतीशील देश असला तरी गरीबच आहे. पण भारताने कधीही भीक मागितली नाहीं. कर्ज जरूर घेतले, पण व्याजासकट फेडले. एक गरीब देश म्हणून भारताने आपली सर्व शक्ती आणि संपत्ती जनतेच्या उद्धारासाठी, तिचे राहाणीमान सुधारण्यासाठी वापरली पाहिजे, तशीच पाकिस्ताननेही. पण कुठलाच देश आपले शेजारी निवडू शकत नाहीं आणि क्वचितच शेजारी राष्ट्रे गुण्यागोविंदाने रहातात, मग ती इंग्लंड-फ्रान्स-जर्मनी असोत किंवा भारत-पाकिस्तान असोत किंवा भारत-चीन असोत. (आणखीही अशी उदाहरणे असतील, पण मला आठवतो तो एकच अपवाद अमेरिका-कॅनडाचा!) त्यामुळे संरक्षणावर दोघांचा अवाच्या सवा खर्च होत आहे.

आज भारत अशा टप्प्यावर पोचला आहे कीं त्याला त्याची जोडी पाकिस्तानबरोबर लावल्यास मत्सर वाटत नाहीं, तो पाकिस्तानकडे एक ज्याच्याशी आपले पटत नाहीं, जो उधळ्या आहे पण कमवत नाही, जो कायम 'मदत' मागून जगतो असा एक शेजारी म्हणून बघतो. महागडी आणि धोकादायक 'खेळणी' जमा केलेला एक शेजारी! पण भारतीयांना त्याच्या सरकारचा जितका राग येतो तितकीच तिथल्या जनतेची कींव येते.

भारताची नजर सध्या खरोखरच खूप दूरवर जागतिक मंचावर लागली आहे.

ऑगस्ट २००९ मध्ये कुठल्या पाश्चात्य 'गोर्‍या' मीडियाने नव्हे तर अल जझीरा या दुबईस्थित अरबी दूरचित्रवाणीने "कुणापासून त्यांच्या राष्ट्राला सर्वात जास्त धोका संभवतो" या विषयावर पाकिस्तानी जनतेत एक सर्वेक्षण केले होते व त्यात पाकिस्तानी जनमताचा मागोवा घेतला होता. (पहा माझा लेख http://www.misalpav.com/node/8949 या दुव्यावर) सानंदाश्चर्याची गोष्ट अशी कीं फक्त १८ टक्के लोकांना भारतापासून धोका आहे असे वाटले तर ज्या देशाच्या पैशावर पाकिस्तानचा बराचसा खर्च चालतो त्या अमेरिकेपासून धोका आहे असे म्हणणारे ५९ टक्के निघाले. http://tinyurl.co/m65wbh आणि http://tinyurl.com/nwlv99 हे दुवे पहा. याचा अर्थ पाकिस्तानी जनता भारताला सर्वात मोठा धोका मानत नाहीं. भारतीय जनता ही घटना स्वागतार्ह मानत असली तरी पाकिस्तानी सरकारच्या पवित्र्यात जाणवण्याइतका बदल दिसत नाहीं.

पाकिस्तानात खर्‍या-खुर्‍या लोकशाहीने मूळच धरले नाहींय्. दोन लागोपाठच्या लष्करशाहीमधील एकादे स्वल्पविराम-पूर्णविरामासारखे चिन्ह एवढीच आतापर्यंत तिथल्या लोकशाहीच्या अस्तित्वाची जाणीव झालेली आहे. उद्या पाकिस्तानात लोकशाही जर रुजली तर परिस्थिती सुधारण्याची शक्यता वाटते कारण मग दोन्ही बाजूची सरकारे आपल्या देशांतर्गत समस्यांना पुढे करून आपापले अपयश लपवू शकणार नाहींत.

भारताने आपल्या परमाणू व प्रक्षेपणास्त्र या विभागातील अग्रणी शास्त्रज्ञाला 'भारतरत्न' देऊन तर गौरवलेच, पण नंतर त्याला राष्ट्रपतीभवनात पाठविले. या उलट दोन वेळा दोन वेगवेगंया राष्ट्राध्यक्षांकडून 'नीशाँ-इ-इम्तियाज़' हा सर्वोच्च मुलकी किताब मिळविलेल्या डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या एकट्याच्या डोक्यावर अण्वस्त्रप्रसाराबद्दलचे संपूर्ण खापर फोडून त्यांना त्यांच्याच घरी कैदेत ठेवण्याचा कृतघ्नपणा पाकिस्तानी लष्करशहाने बिनदिक्कत केला व लोकांनी तो मु़काट्याने सहनही केला!

आज जगातील सर्वात जास्त अपयशी सरकारांची यादी "Foreign Policy" या नियतकालिकाने केली असून त्यात सोमालिया सर्वात जास्त अपयशी सरकार म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे, अफगाणिस्तान, इराक ६व्या व सातव्या क्रमांकावर, पाकिस्तान दहाव्या क्रमांकावर, चीन ६२व्या क्रमांकावर, भारत ७९व्या क्रमांकावर तर नॉर्वे सर्वात यशस्वी राष्ट्र या नात्याने १७७व्या क्रमांकावर आहे. http://tinyurl.com/26lfpa5 या दुव्यावर तपशील वाचा.

पाकिस्तानने आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे व त्यासाठी भारताबरोबरचे उभे वैर संपवून खर्‍याखुर्‍या मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. असे केल्यास भारत नक्कीच पाकिस्तानला मदत करायला तयार होईल असे मला वाटते.

बहुतेक सर्व भारतीय नागरिकांना पाकिस्तानी जनतेबद्दल वैरभावनेपेक्षा कींव जास्त आहे. त्यांचे इतके हाल होऊ नयेत असेही वाटते. मग वाटते कीं केंव्हां है वैर संपणार?

जितक्या आधी संपेल तितके बरे.

राजकारणविचारसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

सुनील's picture

6 Jul 2010 - 9:44 pm | सुनील

तुमच्या बहुसंख्य लेख-प्रतिसादात पाकिस्तान किती हुषार, किती चलाख, किती चतुर आणि याउलट भारतीय राज्यकर्ते किती बावळट, किती शामळू, असा रोख असतो.

आता तुमचेच प्रतिसाद आणि आता हा तुम्हाला आवडलेला (आणि खरा वाटलेला) लेख, यांची सांगड कशी घालायची?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

6 Jul 2010 - 9:49 pm | विसोबा खेचर

पण भारतीयांना त्याच्या सरकारचा जितका राग येतो तितकीच तिथल्या जनतेची कींव येते.

खरं आहे..

पाकिस्तानने आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे व त्यासाठी भारताबरोबरचे उभे वैर संपवून खर्‍याखुर्‍या मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. असे केल्यास भारत नक्कीच पाकिस्तानला मदत करायला तयार होईल असे मला वाटते.

हो, पण वारंवार इथे होणार्‍या बॉम्बहल्ल्यांचे काय? मुंबैवर लादलेल्या २६/११ सारख्या छोटेखानी युद्धाचे काय? ११/७ ला मुंबैच्या उपनगरी गाड्यांमध्ये जे सिरियल बॉम्बहल्ले झाले आणि निरपराध मुंबैकर नागरीक मेले/कायमचे जायबंदी झाले त्यांचं काय??

हे प्रकार पाहता आय एस आय धार्जिणे, अतिरेक्यांना आसरा देणारे पाक-शासनकर्ते भारतासोबतचे उभे वैर संपवून मैत्रीचा हात पुढे करतील हा भाबडेपणा वाटतो..

तात्या.

सुनील-जी आणि तात्यासाहेब,
पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी जनता यातला हा फरक आहे.
पाकिस्तानी सरकार भारताला स्वस्थ राहू देत नाहीं पण जनतेचे तसे नाहीं असे मला वाटते. 'लष्कर-ए-तोयबा'ला जन्म ज. मुशर्रफ यांनीच दिला आहे व हे लंडनमधील एका अलीकडच्या वक्तव्यात मुशर्रफनी स्वतःच मान्य केले आहे. 'फसवणूक'मध्ये तर कितीतरी जागी याचा उल्लेख आला आहे. बेग व गुल हे दोन जनरलच ISI मार्गे भारताला छळत आले आहेत. बेनझीरबाईंनाही यांनीच राज्य करू दिले नाहीं!
पाकिस्तानी जनता व पाकिस्तानी लष्करी सरकार यात गल्लत करता कामा नये! मुंबईवरील हल्ल्यानंतर जरदारी ISI प्रमुखाला भारतात पाठवायला तयार झाले होते हे विसरू नये. पण लष्कर जास्त ताकदवान असल्यामुळे त्यांना गप्प बसावे लागले. काल ज. मॅकक्रिस्टलला काढताना ओबामाही हेच म्हणाले कीं लोकशाहीत मुलकी सरकारचे वर्चस्व गरजेचे आहे. पाकिस्तानात तसे नाहीं व लोकशाही रुजली तर ही परिस्थिती बदलेल!
पण हे होईल कां? कधी होईल? या प्रश्नाची उत्तरे कुणाकडे आहेत?
लोकशाही आल्यास हा फरक कमी होईल, लष्करशाहीत वाढेल!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)

स्पंदना's picture

6 Jul 2010 - 9:52 pm | स्पंदना

मला स्वतःला पाकिस्तानी नागरिकांचा अनुभव आहे. निदान मी तरी कधीही त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे नाही करणार.
आणी अजुन आपल्या इथल दारिद्र्य कुठ संपलय कि आपण त्यांना मदत करायची अस तुम्हाला वाटतय?
लेखातली बरीच माहिती खरी आहे...ती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

सुनील's picture

6 Jul 2010 - 10:20 pm | सुनील

काळेसाहेब, माझा प्रतिसाद पुन्ह्या एकदा वाचा. मी गल्लत केलेली नाही. फक्त स्वतःच्या देशाला भिकेला लावणारे राज्यकर्ते हुशार आणि प्रगतीकडे वाटचाल करणारे राज्यकर्ते बावळट कसे, हे सांगा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मी त्यांच्या परदेशनीतीतील यशाबद्दल कौतुक करतो. त्यांनी हा भाग चांगला हातळला आहे.
आपल्या लोकशाही राबवत केलेल्या प्रगतीचा तर मला प्रचंड अभिमान आहे व मी त्याचा प्रत्येक ठिकाणी आर्जवाने उल्लेख करतो. आपण परदेशनीतीत सुधारणा करायला हवी यात शंका नाहीं.
इतर कशाहीबद्दल मला पाकिस्तानचे कौतुक तर नाहींच, उलट त्यांनी स्वत:च्या देशाला भिकेला लावले आहे असेच माझे मत आहे. अमेरिका फुकट खायला घालतेय व त्यावर चाललीय् त्यांची टुरटूर!
काळे
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)

सुनील's picture

8 Jul 2010 - 5:36 pm | सुनील

मी त्यांच्या परदेशनीतीतील यशाबद्दल कौतुक करतो. त्यांनी हा भाग चांगला हातळला आहे

हे कसे काय बॉ?

जो काश्मिर प्रश्न पाकिस्तान आपला जीवन-मरणाचा मानते, त्या प्रश्नावर आजतागायत जगातील किती देशांचा पाठिंबा त्यांनी मिळवलाय? तोंडदेखला सोडून द्या. तीच गोष्ट भारताला सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळण्याबाबत असो वा भारताने अमेरिकेबरोबल केला तसा अणूकराराबाबत असो. पाकिस्तानच्या जागतिक आदळाआपटीला पूर्ण अपयशच आले आहे.

याउलट, शीतयुद्धाच्या काळात रशियाशी जवळीक साधलेला (पण अमेरिकेशी शत्रुत्व नव्हे) भारत, सोवियत युनियन कोसळताच, क्षणार्धात टोपी बदलून अमेरिकेच्या जवळ गेला (पण रशियाशी शत्रुत्व पत्करून नव्हे). ही परराष्ट्र नीती अधिक यशस्वी वाटते.

तुम्ही ज्या डॉन वृत्तपत्राचा नेहेमी उल्लेख करता त्यातील आजचे संपादकीय वाचा. बाकी मजकूर पटणार नाही पण त्यातील - Regrettably — and it is a measure of the failure of Islamabad’s diplomacy — the world at large, including lame duck OIC, has taken no notice of the unrest in the valley and of gross violations of human rights there हे वाक्य पुरेसे बोलके आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रदीप's picture

9 Jul 2010 - 10:29 am | प्रदीप

सुधीरभाऊंनी पाकिस्तानच्या परदेश नीतिचे अमाप कौतुक केले आहे, त्याविषयी मी फारसा सहमत नाही. पण १००% असहमतही नाही. स्वतःचे भौगोलिक व स्ट्रॅटेजिक स्थान पाकिस्तानी नेते-- कालचे व आजचे--चांगले ओळखून आहेत व त्याचा ते पुरेपूर फायदा घेत आलेले आहेत, व ह्यापुढेही ते तो भरपूर घेत रहातील. अफगाणिस्तानच्या युद्धासाठी पाकिस्तानचा वापर करणे अमेरिकेस महत्वाचे आहे. तसेच भारतावर पाचर म्हणून पाकिस्तानचा चीन वापर करून घेते. पाकिस्तान ह्या अगदी परस्परविरोधी देशांशी साटेलोटे बांधून व राखून आहे. हे करतांना त्यांना एक सार्वभौम देश म्हणून फारसा मान राहत नाही. पण तेथील नेते आम जनतेशी फारसे बांधिल आहेत असे नाही. ते पडले मूळचे पंजाबातील जमिनदार. तेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाचा, मानाचा वगैरे प्रश्न त्यांना पडत नाही. तसेच आम जनतेचे भले करावे अशा अर्थाचा कसलाही 'दुष्ट' विचार त्यांना शिवत नाही. मात्र अमेरिकेशी तसेच चीनशीही गुफ्तगू करतांना त्यांना आम जनतेच्या मतांचा मान राखणेही जरूरीचे आहे. अमेरिकेकडून सर्व प्रकारची पदत घेता घेताच तेथील जनतेच्या मनात त्या देशाविषयी प्रचंड तिटकारा आहे. तेव्हा त्या तिटकार्‍यांची दखल घेणे राज्यकर्त्यांना जरूरीचे आहे. चीनच्या संबंधाचे थोडे वेगळे आहे. चीन हा आपला 'जुना दोस्त' ही भावना तेथील आम जनतेच्या मनात रूजलेली आहे. तेव्हा चीनशी, क्षिंज्यांगमधील विघरांच्या चळवळींच्या संदर्भात संयुक्तपणे केलेली सैनिकी सामायिक कारवाई जनतेच्या लक्षातही येत नाही. हे असे तीन (अमेरिका, चीन व देशांतील व अरब राष्ट्रांतील धर्मांध मुस्लिम) दगडांवर पाय ठेऊन पुढे जात रहाणे सोपे नाही. ही अवघड तारेवरील कसरत तेथील राज्यकर्ते गेली अनेक वर्षे करत आले आहेत, इतपत त्यांचे कौतुक मान्य आहे.

पाकिस्तानच्या काश्मिर प्रश्नाच्या आदळाअपटीला यश येत आहे की नाही, हे नक्की माहिती नाही. पण अनेक अमेरिकन व ब्रिट भाष्यकार अलिकडे सातत्याने अफगानिस्तानमधील तिढा सुटण्याचा काश्मिर प्रश्नाशी संबंध लावत आहेत, हे आपल्या दृष्टिने नक्कीच चांगले लक्षण नाही. ही नवी हाकाटी गेले काही महिने सातत्याने ऐकू येत आहे आणि ह्यामागे अमेरिकन सरकारच्या मताचा पगडा आहे, असे मानण्यास जागा आहे.

सुनील ह्यांच्या भारतीय नेत्यांच्या कौतुकाशी मात्र मी तितकासा सहमत नाही. रशियाच्या समाप्तिनंतर आपल्यापुढे फारसे पर्याय नव्हतेच. तेव्हा आपण अमेरिकेशी मिळतेजुळते घेतले, त्यात नवल नाही, अथवा त्यात काही मोठे यशही नाही. उलट अमेरिकेच्या संदर्भात आपली परिस्थिती गेली अनेक वर्षे केविलवाणी आहे. भाजप सरकार अमेरिकेशी घनिष्ट संबंध प्रस्थापित करण्याविषयी बरेच उत्साही होते. अफगाणिस्तानचे युद्ध सुरू झाले तेव्हा आपण काही सक्रिय मदतही देऊ केली होती, असे वाचनात आले होते. आपल्या सुदैवाने अमेरिकेने ती ऑफर स्वीकारली नाही. आताची परिस्थिती थोडी तटस्थपणे पाहिली तर हे जाणवेल की अमेरिकेतील सध्याचे सरकार आपल्याला फार महत्व देत नाही. निवडून आल्यानंतर ओबामाने चीनच्या, माझ्या आठवणीप्रमाणे कमीत कमी दोन तरी वार्‍या केल्या आहेत. अगदी निवडून आल्या आल्या त्याने चीन व आग्नेय आशियातील देशांचा दौरा केला होता, अर्थातच तो ब्रिटन व युरोपातही गेला. आपल्याकडे तो अजून फिरकलेला नाही. हे बर्‍यापैकी बोलके आहे. भारताशी घनिष्ट संबंध ठेऊन अमेरिकेस फायदा काय? फारसा नाही. (जगातील मोठ्ठी लोकशाही वगैरे जाऊ देत, त्याचा उपयोग त्यांच्यासाठी शून्य).

आपल्या अवतीभोवतीच्या देशांशी आपले संबंध कसे आहेत? चित्र काही फारसे आशादायक नाही. पाकिस्तानचे सोडू या. बांग्लादेश-- प्रश्नचिन्ह. नेपाळ-- हातातून गेलेले, म्यानमार-- तत्वांच्या व निष्ठेच्या मागे लागून आपली पीछेहाट, श्रीलंका-- संबंध वाईट नाहीत, पण चीन तिथेही आपल्यावर मात करेल असे चिन्न्ह. अफगानिस्तान-- आपण प्रयत्न चांगले केलेत, पण आपले सध्याचे नेतृत्व अमेरिकेच्या दबावास बळी पडण्याची शक्यता बरीच दिसते.

जरा दूर पाहू या.. चीन आपल्या आजूबाजूंच्या देशांशी (श्रीलंका, म्यानमार, नेपाळ)विशेष संबंध प्रस्थापित करत असतांना, आपण आग्नेय आशिया (कंबोडिया, व्हिएतनाम) ह्यांच्याशी काही विशेष संबंध प्रस्थापित करतो आहोत का? मला नक्की माहिती नाही, कुणास असल्यास येथे सांगावे. जपान, आपल्या इतकेच चीनविषयी सांशक आहे. आपण त्या देशाशी विषेश संबंध प्रस्थापित केले पाहिजेत, तसे ते होतांनाही दिसत नाहीत. (एक संबंधित प्रश्नः जपानचे प्रमुख नेते आपल्या येथे आले असता त्याविषयी किती चर्चा होते?) थोडक्यात, अफगाणिस्तानमधील आपले आतापर्यतचे प्रयत्न सोडता, इतर सर्वत्र आपण नगण्य ठरलेलो आहोत. कुठेही आपली मुद्रा उमटलेली दिसत नाही, आपला दबदबा नाही, तेव्हा ह्या असल्या राजनितीचे कौतुक काय करायचे?

प्रदीप-जी,
तुमच्या अभ्यासू प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार. तुमचे प्रतिसाद-वैयक्तिकरीत्या मला पाठविलेले व इथे दिलेले-नेहमीच विचारप्रवर्तक असतात.
परराष्ट्रनीतीला उपमा द्यायची तर काँट्रॅक्ट ब्रीजची देता येईल. आपल्याला जी पाने आली आहेत त्यावर खेळाडूचे नियंत्रण नसते, पण हातातल्या पत्त्यांचा जास्तीत जास्त फायदेशीर उपयोग कसा करायचा हे त्या खेळातले रहस्य आहे व परदेशनीतीतही असेच खेळले पाहिजे. पाकिस्तानच्या वाट्याला जी पाने आली त्यांचा ते राष्ट्र छान उपयोग करून खेळत आहे असे मला वाटते. या उलट आपण म्हटल्याप्रमाणे तत्वांच्या व निष्ठेच्या मागे लागून आपण देशहित डोळ्याआड केले आहे असे वाटत नाहीं कां?
तटस्थगटाचे आपले पं नेहरू (इजिप्तच्या नासर व युगोस्लाव्हियाबरोबरच्या मार्शल टीटो यांच्यासह) अध्वर्यू होते. "दोन्ही बाजूने मदत मिळेल" या स्वप्नात आपण कित्येक वर्षें काढली. पण हमखास मदत कुणाकडूनही मिळाली नाहीं व हाती धुपाटणेच आले. चीनच्या ६२सालच्या युद्धाबद्दलचे रशियाचे एक वक्तव्य माझ्या मनावर कोरलेले आहे. त्यांनी त्या युद्धाचे वर्णन चिनी 'भाऊ' व भारतीय 'मित्र' यांच्यातील युद्ध असेच केले होते.
अमेरिकेने आपल्याला कां मदत करावी? असे आपण काय केले आहे कीं त्यांनी आपल्याकडे एक खात्रीलायक मित्र म्हणून पहावे? प्रदीप-जींनी म्हटल्याप्रमाणे मोठी लोकशाही वगैरे वर्णने नेत्यांना लागतील तेंव्हा तोडावर फेकायला चांगली असतात. पण अमेरिकेला हमखास 'हो' म्हणणारे लष्करशहाच आवडतात, अगदी द. कोरिया, तैवान, द. व्हिएतनाम, फिलिपाइन्स, इंडोनेशिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, इराण, सद्दाम हुसेन (हो, सद्दामसुद्धा), जॉर्डन, लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रें.....ही यादी न संपणारी आहे. उलट इराणमध्ये लोकशाही (लूटपुटीची आहे कीं खरी आहे कुणास ठाऊक?) आल्यापासून त्यांच्यामधून विस्तव जात नाहीं. अपवाद फक्त इस्रायल, जपान, इंग्लंड व कॅनडा-प. युरोपमधील राष्ट्रांचा. तिथेही इटलीत 'लाल' लोक सत्तेवर आल्यावर अमेरिकेची मनस्थिती द्विधा झाली होती, फ्रान्सच्या लोकशाहीशी पटत नाहीं वगैरे.
त्यामानाने त्यांच्या 'द्रोणाचार्यां'ना (drones) मुक्त मैदान देणारे पाकिस्तान त्यांना जवळचे वाटले तर त्यात नवल ते काय?
आपल्याला पत्ते वाईट आले असतील, पण त्यासह चांगले खेळणे यालाच परराष्ट्रनीती म्हणतात, नाहीं कां?
आपल्या देशाची जी सर्वांगीण प्रगती झाली आहे ती आपल्या राजकीय नेत्यांमुळे झाली नसून ते इतके वाईट असूनही झाली आहे व त्याचे कारण भारतीय माणसांचा क्रियाशीलपणा (creativity) हेच आहे. आपल्या माणसांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर दूर-दूरच्या देशांत आपले झेंडे रोवले आहेत यात शंका नाहीं.
असो. फार लांबले.
प्रदीप-जींच्या प्रत्येक वाक्याचा अभ्यास करायला हवा आपल्या कृष्णासाहेबांनी.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)

टारझन's picture

6 Jul 2010 - 10:45 pm | टारझन

पाकिस्तान ह्या देशाविषयी विषयी,पाकिस्तान्यांविषयी आणि पाकिस्तान वर लिहीणार्‍यां विषयी मला प्रचंड तिटकारा आहे :)

-(पाकद्वेष्टा) सुधर्णार णाय्रे

प्रभो's picture

6 Jul 2010 - 10:45 pm | प्रभो

पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार...

चिरोटा's picture

6 Jul 2010 - 11:03 pm | चिरोटा

ह्या सगळ्याचे मूळ काश्मीर आहे का? काश्मीरविषयी अमेरिका/इतर देश पण काही बोलत नाहीत. बांग्लादेशच्या निर्मितीत भारताचा पुढाकार होता.त्याचा ही राग तेथील राज्यकर्त्याच्या मनात असणारच्.भारताची भिती दाखवून पाक राज्यकर्ते राजकारण खेळतात. हे सर्व मुद्दे असताना पाकिस्तान वैर संपवून मैत्रीचा हात पुढे करण्याची शक्यता धूसर वाटते.त्यांचे अंतर्गत प्रश्न तर आणखी भन्नाट आहेत.
P = NP

विंजिनेर's picture

7 Jul 2010 - 9:31 am | विंजिनेर

ह्या सगळ्याचे मूळ काश्मीर आहे का?

काश्मिर हे निमित्त आहे. काश्मिर नसेल तेव्हा इतर दहशत वादी मार्गाने भारतची जखम चिघळत ठेवायची हे मूळ ध्येय.

मुंबईत, लोकसभेवर झालेले हल्ले - बाँबस्फोट इ.चा काश्मिरशी संबंध नाही. किंबहुना, काश्मिर्-"प्रश्ना" ला पूर्ण पिळून काही हाती लागत नाही तेव्हाच पाकिस्तानी राज्यकर्ते इतर मार्गांकडे वळले आहेत.

माझी Nuclear Deception ही मालिका 'ई-सकाळ'वर मालिकेच्या रूपाने प्रसिद्ध होत आहे त्यात मी खालील प्रतिसाद लिहिला होता:
भारताची प्रगती एका लोकशाही असलेल्या राष्ट्रांत दृष्ट लागावी आणि अभिमानास्पद अशीच आहे. आपल्याला स्वतःला कमी लेखण्याचे कांहींच कारण नाहीं. पण "दो कौडीके लोग" आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात आणि अमेरिकेसारखे भोळे सांब 'विठोबा' त्यात उल्लू बनतात व आपल्यालाही उल्लू बनवितात याचे नक्कीच वाईट वाटते, नाहीं कां? आज सगळ्यात अयशस्वी राष्ट्रांच्या यादीत (http://tinyurl.com/26lfpa5) सोमालिया पहिला, अफगाणिस्तान सहावा, पाकिस्तान दहावा, चीन ६३वा,भारत ७९वा, व नॉर्वे १७७ (उत्तम) अशी गुणवत्तेची यादी आहे! जय हो!
त्याला सकाळच्या एका अमेरिकास्थित वाचकाने दिलेला व 'विंजनेर' यांच्या प्रतिसादाशी मिळता-जुळता प्रतिसाद भेंडीबाजार यांचा प्रश्न बर्‍यापैकी cover करत आहे म्हणून देत आहे:
काळेसाहेब, लाखातले बोललात. ब्रिटिशांनी आपल्याला कंगाल करून सोडले. आत्मविश्वासाचा खातमा केला. फाळणी करून कायमची डोकेदुखी मागे लावली. पण भारतात लोकशाही रुजली आणि साठ वर्षात आपण जी प्रगती केली ती अमेरिकेला शंभर वर्षात करता आली नव्हती स्वातंत्र्यानंतर. कधी वाटते कि अखंड हिंदुस्तान झाला असता तर लोकशाही रुजली असती का? पाकिस्तानात जसे होत आहे तसेच झाले असतेही. हे पुस्तक वाचले आणि वाटले कि हि कीड वेगळा देश होऊन आपोआपच दूर झाली आहे ते बरेच आहे. काही प्रश्न कधीच सुटणार नाहीत आपल्या हयातीत. उद्हार्णार्थ काश्मीर प्रश्न, इस्रायेल-पालेस्तैन प्रश्न, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न. ह्या बाबत कोणी कितीही हात पाय आपटले तरी ते तसेच राहणार. हे गृहीत धरून आपण आपली प्रगती करत आहोत. पाकिस्तान सारखे देश आपले हित कशात आहे याची परवा न करता भारतद्वेष, धर्मांधता आणि भ्रष्टाचार हाच धर्म मानून वाटचाल करत आहेत. य्ह्या गोष्टींपलीकडे काही विधायक गोष्टी असतात हेच त्यांना माहित नाही. पाकिस्तानची भरभराट होणे पुढील १०० वर्षात शक्य नाही.
अशी आहे परिस्थिती!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)

वात्रट's picture

7 Jul 2010 - 8:01 pm | वात्रट

प्रतिसादातिल बात १००% सच्ची...

कापूसकोन्ड्या's picture

8 Jul 2010 - 12:10 pm | कापूसकोन्ड्या

१) तुम्हाला पाकिस्तान चा डॉन (Dawn) हा पेपर वाचायला मिळ्तो का? विशेषतः रविवार ची आवृत्ती. इथे (सौदी) मध्ये तो मिळतो. मी इतर भारतीय
पेपर्स ची तुलना केली तर मला डॉन कित्येक बाबतीत सरस वाटला.
२) दिनांक तेरा जून चा डॉन पहा.इमेज नावाची पुरवणी. पान क्रं.१० शिर्षक आहे 'Whiplash' लेखक आहेत, नदीम पराचा कॉलमचे नांव (Smokers Corner)
लिंक मिळाली तर पाठ्वितो.
३) खालील लिंक्स

मी 'डॉन'ची नेटवरील आवृत्ती जवळ-जवळ दररोज वाचतो व 'टाईम'चा तर मी वर्गणीदार आहे. पण डॉनमधील प्रत्येक पान वाचणे अशक्यच आहे. मी साधारणपणे पहिले पान व 'वाचकांचा पत्रव्यवहार' (गाडीत बसल्या-बसल्या हँडफोनवरील नेटवर) वाचतो. (खरं तर 'फसवणुकी'चे काम हाती घेतल्यावर माझे इतर वाचन व लिखाण जवळ-जवळ बंदच झाले आहे. जकार्तातले भारतीय मित्रही 'जकार्ता पोस्ट'मधे माझी पत्रे हल्ली का येत नाहींत अशी विचारणा करू लागले आहेत.)
कांहीं मनोरंजक व माहितीपूर्ण वाटल्यास त्यावर लिखाणही करतो. डॉनमध्ये आतापर्यंत माझी सहा पत्रें प्रकाशित झालेली आहेत. पण क्वचितच. पाकिस्तानवर टीका असलेली तर नाहींच छापली जात! पण छापल्या गेलेल्या पत्रांना बर्‍याचदा पाकिस्तानी वाचकांकडून प्रतिसादही-व तोही समर्थनार्थ-आल्याची कांहीं उदाहरणे आहेत.
आपण पाठविलेले लेख/दुवे वाचून झाल्यावर माझी मतें कळवेन. पण तुमचे लेख व वाचन पहाता त्या "कापूसकांड्याच्या गोष्टी" नाहीं वाटत.
इतका अभ्यासपूर्ण वाटणार्‍या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
टाईममधला लेखही माझा वाचायचा राहिला असे वाटते (किंवा आग्नेय आशियाच्या आवृत्तीत तो आलाच नसावा?). पण आता नक्कीच वाचेन.
पुन्हा एकदा धन्यवाद.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)

दोनदा पोस्ट केला गेला म्हणून एक काढला आहे.

कापूसकोन्ड्या's picture

8 Jul 2010 - 12:39 pm | कापूसकोन्ड्या

कापूसकोन्ड्या's picture

8 Jul 2010 - 1:00 pm | कापूसकोन्ड्या

सागर's picture

8 Jul 2010 - 1:27 pm | सागर

सध्याचे वादळ हे पण बघा

जोएअल स्टेन चा लेख

http://www.time.com/time/magazine/article/0,9171,1999416,00.html#ixzz0se...

जोएअल स्टेन चा ब्लॉग : http://isteve.blogspot.com/2010/06/my-own-private-india.html

सागर-जी,
टाईमचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)

अविनाशकुलकर्णी's picture

8 Jul 2010 - 10:04 pm | अविनाशकुलकर्णी

ज्या देशाच्या ७५% लोकांचे दर डोई उत्पन्न २० रुपये आहे..त्यांना ह्या कौतुकाचे काय

अविनाशकुलकर्णी's picture

8 Jul 2010 - 10:14 pm | अविनाशकुलकर्णी

.

'डॉन'मधील हे खालील दोन दुवे वाचनीय आहेत.
1. http://tinyurl.com/346tkka
2. http://tinyurl.com/39qj73p
सुधीर काळे
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)