ग. प्र. प्रधान यांना श्रद्धांजली

कालिन्दि मुधोळ्कर's picture
कालिन्दि मुधोळ्कर in जनातलं, मनातलं
31 May 2010 - 2:47 pm

प्रधान मास्तरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

'मृत्यूनंतर कोणतेही स्मारक उभारू नये, माझ्या बद्दल पेम वाटणाऱ्यांनी एक झाड लावावे आणि किमान पाच वषेर् तरी जगेल, अशी व्यवस्था करावी. माझ्याबद्दल आपुलकी वाटणाऱ्या संस्थांनी पाच झाडे लावावीत.."

लिंक ईथे उघडेल.

संस्कृतीसमाजविचारसद्भावना

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

31 May 2010 - 3:50 pm | बिपिन कार्यकर्ते

श्रद्धांजली

बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते's picture

31 May 2010 - 3:51 pm | नितिन थत्ते

आदरांजली.

नितिन थत्ते

प्रकाश घाटपांडे's picture

31 May 2010 - 4:56 pm | प्रकाश घाटपांडे

देहदान केले ही सगळ्यात महत्वाची बाब. शेवटपर्यंत बुद्धी तल्लख राहिली प्रधान मास्तरांची. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ईश्वराची गरज त्यांनी मान्य केली होती. साधनाच्या दिवाळी अंकात त्यांनी एकदा यावर लेखही लिहिला होता. प्रधान मास्तर तर्क कर्कश कधिच नव्हते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 May 2010 - 4:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

श्रद्धांजली. कालिंदीताई, तुम्ही प्रधानमास्तरांबद्दल एखादा लेख लिहाल का? आमच्या पिढीला त्यांच्या नावापुढे काहीच माहित नाही.

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

31 May 2010 - 7:39 pm | बिपिन कार्यकर्ते

कालिंदि, तुम्ही लिहा.

मला साने गुरूजी आणि त्यांची धडपडणारी मुले इत्यादींबद्दल अजून जाणून घ्यायचे आहे.

बिपिन कार्यकर्ते

अनिवासि's picture

31 May 2010 - 5:12 pm | अनिवासि

आयुष्यात ज्या अनेक मोठ्या व्यक्ति भेटल्या त्यातले प्रधान सर एक!
वयाच्या १०-१२ व्या वर्षी सेवा दलात ज्या अनेकान्चे सन्स्कार झाले त्त्यातले एक. त्यान्च्या सदाशीव पेठेतल्या घरात अनेक वेळा गेलो होतो.
नन्तर परदेशात राहीला गेलो. ५०-५५ वर्षानी परत त्यान्च्या घरी जाण्याचा योग आला. सर एक english मासिक वाचत बसले होते. लहान मुलाच्या उत्साहाने त्यानी त्यातला एक नवीन शास्त्रिय लेख दाखवला आणि समजावुन सन्गितला. खरे मास्तर! नाव वगेरे सान्गितल्यावर ओळखले- नन्तर घरी पण आले.
खरे ऋषितुल्य व्यक्तिमत्व. I was so priviledged to have kown him!
ह्या महिन्यात बागेत झाड लाविन - परदेशात सरान्चि क्रतज्ञापुर्वक आठवण!

धमाल मुलगा's picture

31 May 2010 - 5:47 pm | धमाल मुलगा

चांगली आठवण सांगितलीत!
अशा थोरांच्या सहवासाचं, त्यांच्या विचारांच्या संस्काराचं संचित मिळणं मोठी नशीबाची गोष्ट.

प्रधानमास्तरांना श्रध्दांजली.

त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा किंवा बघण्याचा योग दुर्दैवाने आला नाही पण त्यांच्याबद्दल वाचत ऐकत मात्र आजवर आलो.

प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. अशोक केळकर ह्यांच्या बाबतीतली मास्तरांची एक आठवण ऐकली होती -
अशोक केळकर हे फर्ग्युसन कॉलेजला शिकत असताना प्रधान मास्तरांचे विद्यार्थी होते. मास्तर शिकवत असताना सर्व विद्यर्थी टिपणे काढत असत अफाट वाचनामुळे बरीचशी पुस्तके वाचून झालेली असल्याने बर्‍याचदा अशोक केळकर नुसते बसून ऐकत असत.
"ज्या दिवशी अशोक टिपणे घेतो तो माझा आनंदाचा दिवस असतो कारण त्या दिवशी मी काहीतरी नवीन शिकवल्याचे समाधान मिळत असे!" असे मास्तर म्हणत..

चतुरंग

मस्त कलंदर's picture

31 May 2010 - 6:01 pm | मस्त कलंदर

माझीही श्रद्धांजली...
अदिती म्हणते तसे माहितगार लोकांनी त्यांच्याविषयी अधिक लिहावे.. तरच त्यांच्याबद्दल आमच्या सारख्या लोकांना काही माहिती मिळेल.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

स्वाती२'s picture

31 May 2010 - 7:22 pm | स्वाती२

प्रधान मास्तरांना श्रद्धांजली.

सुनील's picture

31 May 2010 - 7:34 pm | सुनील

आदरांजली.

एखादा चांगला लेख जाणकारांकडून यावा ही अपेक्षा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विनायक पाचलग's picture

31 May 2010 - 7:58 pm | विनायक पाचलग

त्यांच्याबद्द्ल मलाही काही माहित नाही
पण त्यांच्याबद्द्ल ज्याना खुप माहिती आहे अशा माहितगार लोकांशी मात्र माझा संबंध आहे
त्यांच्याकडून इथे माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करीन

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

घाटावरचे भट's picture

31 May 2010 - 8:04 pm | घाटावरचे भट

मीसुद्धा एकदा कॉलेजात पहिल्या वर्षाला असताना गॅदरिंगचं निमंत्रण द्यायला त्यांच्याकडे गेलो होतो. कोणतीही ओळख नसताना माझ्याशी आणि सोबत असलेल्या मित्राशी १०-१५ मिनिटे खूप छान बोलले. मला तपशील आठवत नाही पण 'तरुणांची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे' याबद्दल सांगत होते.

प्रधान सरांना श्रद्धांजली.

इन्द्र्राज पवार's picture

31 May 2010 - 9:36 pm | इन्द्र्राज पवार

अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा रस्ता हा नेहमीच प्रकाशमय असतो असे नाही, तर तो ज्ञान उपासकाला आव्हानात्मक देखील असू शकतो. या प्रवासात आपणाला काही श्रध्दास्थाने भेटतात... ज्यांच्या आयुष्याचा आलेख पाहिला की खात्री पटते, "होय सर्वार्थाने हा खरा दीपस्तंभ आहे.... जो आपणाला निबिड अरण्यात सापडलो तर दिशा दाखविण्यास न बोलाविता पुढे येईल. काळाच्या ओघात, निसर्गनियमानुसार "अम्ही जातो अमुच्या गावा...." म्हणत दिक्कालापलिकडे निघून जातात आणि उरतो तो त्यांचा आदर्श ! प्रधानसर या व्याख्येला पुरेपूर उतरतात हे त्यांना प्रत्य्क्ष जाणणारे तर म्हणतातच, पण ते ज्यावेळी शब्दरूपाने आमच्यासमोर आले त्यावेळी खरोखरी हेवा वाटला तो त्यांच्या विद्यार्थ्यांचा !! किती नशीबवान असतील त्यांच्या हाताखाली ज्यांनी ज्यांनी शिक्षण घेतले ते सर्वजण !

साने गुरूजी नंतर "साधना" चा रथ चालविण्यामागे एकदोन व्यक्तींचा हात कधीच नव्हता, त्यामुळे साधनेला मराठी मनामध्ये जे स्थान मिळाले आहे त्यामध्ये जे कोणी "अनेक" आहेत त्यात प्रधान सरांचे नाव प्रामुख्याने येते...! "साधना" आणि "सर" हे नाते सरांच्या अखेरच्या श्वासापर्यंत राहीले.

श्री.ग. प्र. प्रधान सरांना माझी विनम्र श्रद्धांजली !!!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

सुखदा राव's picture

1 Jun 2010 - 12:26 am | सुखदा राव

सर १ दा आमच्या घरी आले होते. मी तिसरी-चौथीत असेन त्यावेळी. त्यान्ची १ कविता होती आम्हाला मराठीच्या अभ्यासक्रमात. ती त्यान्नी स्वता मला शिकवली होती. माझ्या दुर्दैवाने आपल्याला कोण शिकवतय हे मला तेन्व्हा कळल नाही. पण १ आठवत, घरात त्याना भेटायला म्हणुन जवळ जवळ ४०-५० जण आलेले होते, पण सर मला ती चवथीची कविता शिकवत असताना सर्व मोठ-मोठी मन्डळी विलक्षण शान्तपणे ऐकत होतीत.
सराना आदरान्जली.

विकास's picture

1 Jun 2010 - 3:54 am | विकास

ज्या काही आदरणीय व्यक्ती केवळ नावानेच माहीत होत्य/आहेत त्यातील ग.प्र. होते. त्यांना विनम्र आदरांजली. वर काहींनी स्वतःच्या आठवणी/अनुभव सांगितल्या आहेत. तसेच अजून वाचायला मिळाले तर उत्तम होईल.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मिसळभोक्ता's picture

1 Jun 2010 - 8:34 am | मिसळभोक्ता

खूप मोठा माणूस.

(अर्थात, देव नाही, माणूसच. देव असता तर मेला कसा असता ?)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

कालिंदि,
'प्रधान सर - असे शिक्षक होणे नाही' असे ऐकून आहोत. त्यांच्या बद्धल एक लेख जरूर वाचायला आवडेल.
~ वाहीदा