सचिनचं ट्विटर वरून कर्करोगपीडीत मुलांना मदतीचं आवाहन

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
17 May 2010 - 9:43 am

पहिल्याच आवाहनानंतर सचिनच्या आवाहनास प्रतिसाद देऊन त्याच्या चाहत्यांनी ६७ लाख रुपये जमा केले आहेत. Indiacancer.org या पूर्वी टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणार्‍या आणि सध्या मुंबईच्या लीलावती हॉस्पिटल मध्ये असलेल्या डॉ. जगन्नाथ यांनी चालवलेल्या संस्थळाच्या माध्यमातून ही मदत जमा होत आहे. २५ हजार रुपयांपर्यंत देणगी देणार्‍यांना सचिनच्या स्वाक्षरीची एक भेटवस्तू मिळेल, तर त्याहून आधिक रक्कम देऊ शकणार्‍या दात्यांना सचिन बरोबर येत्या २७ मे रोजी 'चॅरिटी डिनर विथ सचिन' ही आणखी एक निधी संकलनाची योजना सचिनने आखली आहे. पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य आहे. दरवर्षी संस्थेला दहा लाख रुपयांची देणगी देण्यात येणार आहे, ज्यातून वीस कॅन्सरग्रस्त मुलांच्या औषधोपचाराचा खर्च उचलला जाणार आहे.

सचिनचं आतापर्यंतचं गाजावाजा न करता स्वतःही आर्थिक मदत करणं या आवाहनाच्या जोडीने चालूच असेल असं वाटतं.

IPL T20 साठी १५ हजारापर्यंत रुपयांची तिकिटे काढण्याची लोकांची तयारी होती, या चांगल्या कामासाठीही लोक पुढे सरसावतील असं मानायला हरकत नसावी.

- बहुगुणी

समाजक्रीडाप्रकटन

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

17 May 2010 - 9:54 am | नितिन थत्ते

नाही पटलं/आवडलं.

एक कोटीच रुपये जमवायचे होते तर ते बहुधा सचिनला स्वतःच एकरकमी देता आले असते.

इथे लोकांकडूनच पैसे गोळा होतायत आणि नाव मात्र सचिनचं होतंय.

नितिन थत्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 May 2010 - 10:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सचिनने स्वतः किती पैसे दिले आहेत हे त्याने सांगितलंही नसेल. कदाचित त्याने स्वतःच एक कोटीच्या काही पट आधी दिले असतील. एकूण सचिनचा या बाबतीतला इतिहास पहाता, तो स्वतः या गोष्टीची वाच्यता करणार नाही.

अदिती

मेघवेडा's picture

17 May 2010 - 11:22 am | मेघवेडा

अदितीशी सहमत. वर बहुगुणी यांनीदेखील ही गोष्ट नमूद केलीच आहे. आणि त्याचं कसलं नाव यात? इतकं मूर्ख असतं का हो पब्लिक? बाकी नायल्याशीही सहमत!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

Nile's picture

17 May 2010 - 10:28 am | Nile

इथे लोकांकडूनच पैसे गोळा होतायत आणि नाव मात्र सचिनचं होतंय.

स्वतः त्याने किती पैसे दिले वगैरे माहित नाही. पण सेलेब्रीटी लोकांच्या आवाहनाला प्रतिसाद चांगला मिळतो इतकं साधं सोपं गणित आहे. त्यात सचिनचं नाव होतय नसुन, सचिनंच्या नावाचा फायदा होतोय असं आहे.
सचिन द्वेषाचा(पुर्वग्रहदुषित) हा चष्मा तर नाही ना थत्ते काका? :)

-Nile

राजेश घासकडवी's picture

17 May 2010 - 2:45 pm | राजेश घासकडवी

फक्त एक कोटी हा आकडा लहान वाटतो खरा. बीसीसीआयचा टॅक्स यापेक्षा कितीतरी पटींनी मोठा असेल... सचिनचं सहकार्य मिळवूनही इतकेच पैसे गोळा होणं यातून आयोजक कुठेतरी कमी पडले असं वाटतं.

पण यात सचिनचा अंतस्थ हेतू असेल असं वाटत नाही.

मी ऋचा's picture

17 May 2010 - 5:33 pm | मी ऋचा

१ कोटीच काय सचिन १०० कोटीही देउ शकतो आणि त्याने दिलेही असतील. त्याला पब्लिसिटी करायची खरच इतकी वखवख असेल? मला नाही वाटत. :?

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

ट्वीटर सारख्या सोशल नेट्वर्किंग संस्थळाचा प्रथम पदार्पणातच त्याचा (स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा fan-base वाढवण्यासाठी नव्हे तर) समाजासाठी वापर करण्याचं तारतम्य सचिनने दाखवावं याचं (याच ट्वीटर चा गेल्या महिन्याभरातच केला गेलेला इतर वापर पहाता) आधिक कौतूक वाटलं. म्हणून विशेष नोंद घ्यावीशी वाटली.

पाषाणभेद's picture

18 May 2010 - 12:37 am | पाषाणभेद

हं, खरंय. सचिन नावाची माणसं अशीच निगर्वी, निस्वार्थी असतात.
माझं मात्र ट्विटरवर अकांउंट नाहीए. चालू करावं म्हणतो.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

विकास's picture

18 May 2010 - 12:47 am | विकास

आर्थिक दृष्ट्या प्रथितयशाहूनही यशस्वी लोकांना स्वतः केलेले दान, हे केवळ विनय म्हणूनच नाही तर एक सावधानता म्हणून देखील झाकल्या मुठीप्रमाणे ठेवायला लागते. नाहीतर अनेक ज्ञात-अज्ञात कॅन्सर पेशंटना पैसे देत बसावे लागेल. (एका म्हणीप्रमाणे, अशाने कुबेर देखील भिकारी होईल!).

वर आलेला "फक्त एक कोटीच का" हा मुद्दा वरकरणी मान्य आहे. पण त्यात दान करणार्‍या व्यक्ती नक्की कोण अपेक्षित आहेत हे पहाणे महत्वाचे आहे. शिवाय हा पहीलाच प्रयत्न असल्याने, मोठे लक्ष्य ठेवण्यापेक्षा, जे शक्य होईल असे लक्ष्य ठेवण्यात आले असावे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अस्मी's picture

28 May 2010 - 11:16 am | अस्मी

त्याच्या चाहत्यांनी सगळे मिळून १२५ लाख रुपये जमवले :)

आणि आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नवीन वास्तुच्या कोनशिला समारंभ सचिनच्या हस्ते होणार आहे....त्याने दीनानाथला १ कोटी रुपयांची देणगी दिली :) आणि काहीही गाजावाजा न करता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

- अस्मिता

जे.पी.मॉर्गन's picture

28 May 2010 - 11:33 am | जे.पी.मॉर्गन

त्यात हर्षानी म्हटलं की कालच्या समारंभात सचिन अगदी भारावून बोलत होता... हसून निमंत्रितांबरोबर (ज्यांनी सचिनच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देणगी दिली होती) फोटो काढत होता, त्यांच्यासाठी सह्या करत होता. प्रत्येक टेबलवर जाऊन वैयक्तिक चौकशी करत होता. हर्षा म्हणतो "Imagine Sachin coming to your table to say "Thanks for coming"".

जे पी

अस्मी's picture

28 May 2010 - 12:23 pm | अस्मी

"Imagine Sachin coming to your table to say "Thanks for coming"".

सही...काय experience आहे/असेल ना...
खूप भारी :) <:P ;;)

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता