आपण काय खातो ...

अडाणि's picture
अडाणि in जनातलं, मनातलं
17 May 2010 - 6:50 am

खाणे आणि त्याचे आपल्यावर होणारे परीणाम हा मोठा विस्तृत विषय आहे. ह्या अनुषंगाने लेख लिहायचे बरेच दिवस मनात होते पण जमून येत नव्हते. नुकताच मिपा वर आलेला शिल्पा चा लेख आणि त्यातील प्रतिक्रिया वाचून शेवटी लिहायला सुरूवात केली...

आपण खातो ते अन्न , त्याचा आपल्या शरीरावर, मनावर होणारा परीणाम आणि मुख्य म्हणजे अन्नप्रक्रीयेच्या ओद्योगीकरणामुळे होणारे परीणाम ह्यावर बरेच संशोधन झालेले आहे. ह्या (आणि अजून बर्याच) विषयातील तज्ञ डॉ. पीटर सींगर हे आहेत. जन्माने ऑस्ट्रेलीयन असलेले पीटर हे ख्यातनाम तत्वज्ञानी (नैतीकतावादी) सध्या प्रीन्सटन विद्यापीठात प्रोफेसर आहेत. त्यांनी जीम मॅसॉन या सहयोग्या बरोबर लिहिलेले "द वे वुइ ईट : व्ह्याय अवर फूड चॉईसेस मॅटर" हे पुस्त़ वर्शभरा पूर्वी माझ्या वाचनात आले. (मराठीत : The Way We Eat : Why Our Food Choices Matter)

सध्या पुस्तक हाताशी नाहिये, पण आठवलं त्या प्रमाणे माहिती द्यायचा प्रयत्न .....

पीटर आणि जीम द्वयीने चार - पाच वर्शे अथकपणे प्रयत्न करून, ठिक-ठिकाणी फिरून माहिती गोळा करून , संपुर्ण विदा सहित हे पुस्तक तयार केले आहे. त्यात त्यांनी आपण जे अन्न खातो ते कसे तयार होते, तयार प्रोसेसड फूड कसे बनते ह्याचे संपूर्ण वर्णन केले आहे. पुस्तकातील बराचसा विदा अमेरिकेत गोळा केलेला आहे, त्या मुळे तो काही ठिकाणी भारताला / भारतीयांना लागू पडणार नाही परंतू त्यातील निष्कर्श जरूर लागू पडतील / उपयोगी येतील.

१) आपण काय खातो :
पीटर ह्यांनीं ३ कुटुंब निवडली आणि त्यांच्या खाण्या पिण्याचा, जिवन शैलीचा अभ्यास केला. त्यात ते कुटुंब कुठले अन्न घेते, कुठुन घेते, त्यांचा महिन्या चा खर्च किती होतो वैगेरे बर्‍याच अंगाचा विचार केलाय.
एक कुटुंब सर्वात स्वस्त जिथे मिळेल (पक्षी वॉल-मार्ट) तीथुन खरेदी करते. त्यातही मांस, जंक फूड वर जास्त भर कारण मुलांना तेच आवडते. अर्थात खरेदीला मुले पण जोडीला त्या मुळे त्यांना जे दिसते, चांगले वाटते त्या साठी हट्ट पण आलाच. कुटुंबातील मुलांना वारंवार दवाखान्यात न्ह्यायला लागत असते हे विषेश.

दुसरे कुटुंब हे जास्त जागरूक. त्यांचा कल नैसर्गिक आणि पौष्टीक खाण्याकडे. त्यातही ट्रेडर जो , व्होल फुड्स ह्या ठिकाणि खरेदी करणारे आणि जास्त प्रमाणात मांस खाणारे. त्यांचा असे खाण्यामागील उद्देश उलगडून दाखवला आहे. ह्या कुटुंबाचा मांस खाण्याचा मुख्य उद्देश की शरीराला आवश्याक ते प्रोटीन्स मिळावेत. (जे डॉ. पीटर सांगतात की आजकाल व्हिटॅमीन्स्च्या सारख्या गोळ्यातून पण मिळू शकते.) नैसर्गीक खाण्याची ईछ्छा असली तरीही वेगवेगळ्या लेबल्स मधून (सर्टीफाइड ऑर्ग्यानीक, सर्टीफाइड ह्युमन , फ्री रेंज ..) होणारी फसवणूक इथे दाखवली आहे.

तिसरे कुटूंब हे पुर्णपणे व्हेगन आहे (जे कुठल्याही प्रकारचे प्राण्यांपासून बनलेले अन्न खात नाहीत - त्यात गायीचे दुध, अंडी, मांस सर्व आले) ह्या कुटूबाच्या अभ्यासावरून , त्यातील व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणितून, ते सर्व जण पुर्णपणे निरोगी असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. कुटुंबातील टिन-एजर मुलगी शाळेतील फुटबॉल टिमची कप्तान आहे!

तात्पर्य : पीटर ह्यांनी बरेच मुद्दे सांगीतले आहेत, त्यात महत्वाचे म्हणजे - तुम्हाला अन्न स्वस्त मिळाले असे वाटले तरी त्याचे दूरगामी परीणाम होत असतात आणि त्याची अप्रत्यक्ष किंमत बरीच जास्त असते.
आपण जे मांस , मछ्ची खातो, त्याचा अप्रत्यक्षपणे आपल्या शरीरावर , मनावर परीणाम होत असतो (मला सध्या पुर्ण विदा अथवा उदाहरण आठवत नाहीये, पण ह्या बाबत पुस्तकात नेमकी माहिती आहे असे आठवते.)

२) प्रोसेसड फूड कसे बनते :
मांस (ज्यात चिकन, बीफ, पोर्क आणि फिश आले) कसे बनते ह्याचे फार विदारक चित्र डॉ. पीटर ह्यांनी मांडले आहे. मांसाचे हे वेग वेगळे प्रकार जरी वाटत असले तरी त्यांचा प्रक्रिया व्यवसाय एकत्र गुंफलेले आहेत. बीफ करताना , गायी / बैल हे पटापट वाढावे म्हणून त्यांना अनेक हार्मोनल इंजेक्षन देणे हि तर नित्याचीच बाब झाली आहे. अँटि-बायोटीक्स्चा मारा, स्वस्त असते म्हणून जनावरांना कडब्या ऐवजी कॉर्न (मका) खायला द्यायचा आणि त्याचा पचनावर परीणाम होतो म्हणून अजून वेगळि औषधे द्यायची हा प्रकार सर्रास चालतो. हे सर्व केमिकल्स असले बीफ खाल्यावर आपल्या शरीरात येते आणि त्याचे वेगवेगळे आजार होतात.

खालील परीच्छेद मुद्दाम अदृश्य केलेला आहे, हळव्या मनाच्या लोकांनी वाचू नये.

कोंबड्या वाढवताना सुद्धा बरेच अमानुश प्रकार चालतात. छोट्या खुराड्यात भरपूर कोंबड्या टाकणे , त्यांना पंख फडफडायलाही जागा नसणे ह्या दुय्यम गोष्ठी आहेत. पाच - सहा आठवड्याने कोंबड्यांचे मांस निबर होउ लागते त्यामुळे त्यांचे खाणे बंद करतात. अत्यंत अश्या उपासमारीमुळे कोंबड्या हिंसत्मक होतात, एकमेकांची पिसे ओरबाडून काढतात, काही त्यात मरतात पण. नंतर एक-दोन आठवड्याने त्यांचे खाणे परत सुरू करतात. ह्या प्रकाराने कोंबड्याचे एकूण वजन पण भराभर वाढते आणि त्या बाजारात लवकर विकता येतात.

सर्वात गलिछ्च प्रकार म्हणजे कोंबड्याच्या फार्म मधील कोंबड्यांची विष्ठा ! ही उच्च किमतीला विकली जाते, कारण त्यात भरपूर प्रोटिन्स असतात आणि तिचा वापर मत्स्यतळ्यात होतो. माश्यांना योग्य प्रकारचे खाद्य देण्यापेक्षा कोंबड्यांची विष्ठा आणि हॉटेलातले उष्टे पडलेले अन्न असे टाकले जाते. ह्यामधे अपायकारक जीव-जंतू पसरायचा खूप मोठा धोका असूनही त्याकडे काणाडोळा केला जातो.

दुध !!! अतिशय सहजपणे आपण वापरतो... पण दुध बनवण्याची प्रक्रिया अतिशय अमानवी आहे. गाय साधारणपणे व्यायल्यावर तीन ते चार महिने दुध देते. व्यायल्यावर जर पिल्लू गाय झाली असेल तर तिची रवानगी लगेच दुसर्या विभागात करतात - जेथे त्या पिल्लाला लवकरात लवकर वाढवून "दुध देण्यायोग्य" कसे करता येईल हे बघतात. हे तरी ठिक वाटेल असा प्रकार बछडा झाला तर करतात. बछड्याचा असल्या फार्म वर काहीच उपयोग नसतो. गायी गाभण करायला खास वाढवलेले बैल असतात. त्यामुळे जनमल्या जनमल्या त्या बछड्याला मरायला सोडून देतात. बर्‍याच वेळा त्याची आई तेथेच शेजारी उभी असते. साधारण आठवडा भरात त्या बछड्याचा जीव जातो, मग त्याचे मांस "कोवळे मांस" म्हणून विकतात आणि मांस नसलेले भाग इतरत्र खाद्य म्हणून. एखादी गाय जर आजारी पडली / घायाळ झाली तर ईलाज करयच्या खर्चाऐवजी तीला मरयला सोडून देतात.
त्याबरोबरच, जास्तीत जास्त उत्पादन करण्याच्या वॄत्तीमुळे गायींना पाठोपाठ गाभण करतात , त्यात त्यांच्या प्रकॄतीची काळजी वैगेरे शुल्लक बाबतीत कोणी काळजी करत नाहीत. गाय दुध देईना झाली की तिचे काय होत असेल हे आपल्या लक्षात आलेच असेल.

३) अन्न प्रक्रियेतील ओद्दोगीकरणाचे (दुशः) परीमाण :
अन्न प्रक्रियेच्या अनेक दुषःपरीमाणं पैकी एक म्हणजे पर्यावरणाचा र्‍हास. अमर्याद मछ्ची पकडल्याने काही प्रदेशांचा अगदी कायापालट झाला आहे (चांगल्या अर्थाने नव्हे, हेवेसानल). ज्यासमुद्राच्य्या भागात जाळी नुसती फिरवली की ढीगभर मासे मिळत, तिथे आता मछ्ची चा मागमुसही राहिलेला नाही. गायी आणि बैलाचे मोठ मोठाले पांजर्पोळ काढल्याने शेकडो मैल परीसरात माणसाला जगणे मुश्कील झाले आहे. अश्या प्रदेशात मुलांना घराबाहेर खेळणे सुधा परवडत नाही कारण हवेतील मिथेन चा दर्प, इतर जंतु संसर्ग ह्याने तब्येतीवर परिणाम होतो. (कॅलीफोर्नीयात, हायवे-५ वर ह्याचा अनुभव बर्‍याच जणांनी घेतला असेल - तरीही ह्या प्रश्नाची सर्वात जास्त व्याप्ती मिड-वेस्ट आहे)

दुसरा प्रभाव म्हणजे अन्नाच्या ठोक (पक्षी: मास) उत्पादनामुळे दळणवळणाची वाढलेली गरज. अमेरीकेत दरवर्षी हजारो टन तांदुळ बांगलादेशातून जहाजाने येतो - त्यात कितीतरी इंधन वापरले जाते , त्यामुळे तो तांदुळ स्वस्त पडला तरी त्याचे दूरगामी दुषपरीणाम जास्त आहेत. असाच प्रकारे ऑस्ट्रेलिया , न्युझीलंड येथुन दररोज विमानाने ताजी फळे आयात केली जातात. ह्यामुळे आपण ताजी फळे खाल्ली तरीहि पर्यावरणाचे अपरीमित नुकसान होत असते हे आपल्या लक्षात येत नाहि.

हे पुस्तक वाचून पुर्णपणे व्हेगन झालेले काही लोक माझ्या पाहणीत आहेत, ईतका त्याचा खोल प्रभाव आहे. शाकाहारी खावे का मांसाहारी खावे ह्या पेक्षा जे काही प्रोसेसड फूड बनते, ते कसे बनते हे समजल्याने लोकांचे परिवर्तन झाले आहे.

जाता जाता : ह्या विषयावर संबधीत आणि मॅक-डी वर प्रेम असण्यार्‍या लहान मुलांना जरूर दाखवावी अशी चित्रफीत - सुपर साईझ मी हुलुवर बघावी.

~
अडाणि.
(लेख थोडा विस्कळीत आहे कारण पुस्तक समोर नसल्याने सर्व माहिती आठवणीतून लिहिली आहे , चु. भु. दे. घे.)

धोरणसमाजजीवनमानलेखआस्वाद

प्रतिक्रिया

सहज's picture

17 May 2010 - 6:57 am | सहज

फूड इन्क हा माहीतीपट जरुर पहा.

महत्वाचा विषय, छान लेख.

(खादाड) सहज

शिल्पा ब's picture

17 May 2010 - 9:38 pm | शिल्पा ब

मी हल्लीच पहिला....भयानक वास्तव दाखविले आहे...म्हणूच मी आता कसलीच कोंबडी किंवा इतर काही खात नाही...बर्गर च्या ऐवजी subway sandwich परवडते....खोट वाटेल पण मी Mcdonald मध्ये कधीच गेलेले नाही...

आम्ही कधीकधी बाहेर खातो...आता तेसुद्धा शाकाहारीच आणि फळे वगैरे सुद्धा शक्यतो स्थानिक मिळत असतील तर तेच घेतो...आजूबाजूला कोणी home garden बनवत असेल तर त्यांच्याडून विकत घ्यावे...ते विकण्यासाठी ठेवत नसतात पण विनंती करून पहावी....शक्य असेल तर स्वतःच्या परसात herb लावता येतील...tomato , herbs , beans अश्या भाज्या लावता येतात...कुन्डीतसुद्धा लावता येतात...थोडी मेहनत लागते पण विशेष काही नाही...प्रयत्न करावा...(मी करते...)

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शुचि's picture

17 May 2010 - 7:08 am | शुचि

लेखाने विचारास प्रवृत्त केले. मी नक्की वाचेन, विचार करेन, योग्य ते बदल जीवन्पद्धतीत घडवून आणेन. लेख फार आवडला. शतशः धन्यवाद. =D>
मुख्य म्हणजे ते पुस्तक मिळवून वाचेन.
वाचनखूण साठवली आहे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

स्पंदना's picture

17 May 2010 - 8:13 am | स्पंदना

"सुपर साइझ मी" पाहुन माझ्या मुलान्नी अ‍ॅट लिस्ट मॅक डोनाल्ड सोडल.
बहुतेक सार अन्न आम्ही घरी बनवुन खातो. मुल झाल्यावर जेन्व्हा करीयर की घर असा प्रश्न आम्हा दोघन्पुढे आला ,तेन्व्हा आपण नुसत कमवुन काय करायच? त्या पेक्षा मी घरी राहुन घराला घर पण द्यायच अस ठरल गेल.
आज अवस्था अशी आहे की एक दिवस बाहेर खाल्ल की दुसर्या दिवशी मुल स्व तः होउन घरी बनवाय ला मदत करतात.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

नितिन थत्ते's picture

17 May 2010 - 9:31 am | नितिन थत्ते

आपल्याला ज्ञात असलेल्या तंत्राचा नैसर्गिक रीत्या होणार्‍या उत्पादनापेक्षा जास्त उत्पादनासाठी वापर म्हणजेच औद्योगीकरण.

अन्नप्रक्रियेच्या औद्योगीकरणाची पहिली सुरुवात १०-१५ हजार वर्षांपूर्वी मानवाने शेती करायला सुरुवात केली तेव्हा झाली. आजची स्थिती हे त्याचे अधिकाधिक पुढचे रूप आहे.

की मानवाने त्याहीपूर्वी पशुपालन सुरू केले तेव्हा सुरूवात झाली असे म्हणावे?

पांढर्‍या ठशात लिहिलेला काही मजकूर औद्योगिक क्रांतीनंतरचा नसून त्याहीपूर्वीचा आहे. ठेचणे ही क्रिया फार पूर्वीपासून (गोवंशाला देव मानणार्‍या भारतात देखील) बैलांच्या बाबतीत केली जाते. त्या काळी बैलाचा शेतीच्या कामास उपयोग होत होता म्हणून त्यास जिवंत ठेवले जाई.

अलिकडेच वाचलेल्या बातमीत तर याच्या पुढची पातळी गाठली गेली आहे. आणि हे गोवंशरक्षणासंबंधी आस्था असलेल्या पक्षाच्या राज्यात झाले आहे.

नितिन थत्ते

भारद्वाज's picture

17 May 2010 - 2:19 pm | भारद्वाज

सुपर साईझ भारतात ओपन होत नाहीये.

शैलेन्द्र's picture

17 May 2010 - 3:05 pm | शैलेन्द्र

चांगला लेख... जनावरांवरील हे सगळे अत्याचार बघुन खरच वाईट वाटत, पण तुम्ही कधी शेतकर्‍यांशी बोललाय का?

जसं रासायनीक पोषण प्राण्यांच्या बाबतीत पुरवलं जातं तसच झाडांच्या बाबतीतही केलं जात, किंबहुना संपुर्ण अन्नप्रक्रीया उद्योग हा रसायनांच्या अती-वापरावर आधारीत आहे.

पण मग यात दोष कुणाचा? ह्या उद्योगातील लोकांचा कि त्या गोष्टींची मागणी करणार्‍या आपला? की लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढवणार्‍या आपल्या पुर्वजांचा?

अरुंधती's picture

17 May 2010 - 3:10 pm | अरुंधती

ह्या पुस्तकाच्या इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या एका इंग्रजी परीक्षणातील पुस्तकाच्या गोषवार्‍यातील हे पाच मुद्दे मला आवडले व पटले :

Five Principles for Making Conscientious Food Choices

1. Transparency: We have the right to know how our food is produced.
2. Fairness: Producing food should not impose costs on others.
3. Humanity: Inflicting unnecessary suffering on animals is wrong.
4. Social Responsibility: Workers are entitled to decent wages and working conditions.
5. Needs: Preserving life and health justifies more than other desires.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्वाती२'s picture

17 May 2010 - 5:24 pm | स्वाती२

चांगला लेख! पुस्तक मिळवून नक्की वाचेन.

आळश्यांचा राजा's picture

17 May 2010 - 10:01 pm | आळश्यांचा राजा

`माझा साक्षात्कारी ह्रदयरोग' मध्ये अभय बंगांनी खाणे या विषयावर फार छान विवेचन केले आहे. स्वतः अनुभवून मग लिहील्याने ते व्यवस्थित पटते.

कोणत्या पुस्तकात काय लिहिले आहे, त्यापेक्षा आपला अनुभव काय आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. एखाद्याला आपण काय खातो याची पर्वा नसेल तर विषयच संपला. पण जर आपल्या खाण्यात काही चुकत असावं अशी शंका असेल, तर मला वाटतं की बदल जरूर करून बघावेत. शरीर आपलं आहे, आयुष्य आपलं आहे.

चांगला विषय. (विस्कळीत असला तरीही) लेख आवडला.

आळश्यांचा राजा

मदनबाण's picture

17 May 2010 - 11:22 pm | मदनबाण

छान लेख...
प्राण्यांवर होणारे अत्याचार तर वाचणे कठीण आहे !!!
पंजाब मधे हरित क्रांती मोठ्या प्रमाणात झाली पण त्याचे दुष्परिणाम भयावह आहेत...
http://www.hardnewsmedia.com/2006/11/648
http://sanhati.com/excerpted/2276/
http://thelangarhall.com/punjab/leaving-punjab-on-the-cancer-train/
http://wiseeats.wordpress.com/tag/green-revolution/
http://indiatoday.intoday.in/site/Story/92889/Punjab's+killing+fields.html
हिंदुस्थानात रासायनिक खतांचा आणि औषध फवारणीचा प्रभाव इतका वाढला आहे की आपण निर्यात केलेली द्राक्ष सुद्धा कोणी जगात खायला तयार नाही अशी परिस्थीती उद्भवली आहे...कोट्यावधी किंमतीची द्राक्ष कोणी खरेदी नाही केली तर शेतकरी आत्महत्या करतील !!! दुसरा कुठला पर्यांय आहे का त्यांच्याकडे ?
http://economictimes.indiatimes.com/news/economy/foreign-trade/Indian-gr...
http://www.commodityonline.com/news/Europe-rejects-grapes-worth-Rs-273-f...
http://www.financialexpress.com/news/europe-uturn-births-indias-toxic-gr...

मदनबाण.....

"Life is an art of drawing without an eraser."
John Gardner

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 12:02 am | शिल्पा ब

चांगल्या links आहेत...सगळ्या नाही वाचल्या पण वाचेन...नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे pesticide वापरण्यापेक्षा जुन्या पद्धतीचे खत वापरावे...उदा. गांडूळ खत ...कचऱ्याचे वेगवेगळा करून स्वयंपाकघरातील कचर्यापासून चांगले खत बनते... मुंबईत एक कंपनी हॉटेलातील किचनमधून फेकल्या जाणाऱ्या कचर्यापासून खत बनवते...कंपनीच नाव विसरले.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

टारझन's picture

18 May 2010 - 12:11 am | टारझन

सोनखत म्हणुन अजुन एक सुंदर प्रकार आहे ;) त्याबद्दल कोणास ठाऊक आहे काय ? :)

पंगा's picture

18 May 2010 - 9:22 am | पंगा

'शेणखत' ऐकला होता. बोले तो 'गोमय'...

'सोनखत' बोले तो? :?

- पंडित गागाभट्ट

प्रकाश घाटपांडे's picture

18 May 2010 - 9:16 am | प्रकाश घाटपांडे

केळीला सोनखत म्हणजे उत्तम. सोनखतासाठी सोपा मार्ग म्हणजे 'झाड्या'ला केळीत जायचं.
घरी सुरवातीला गोखाडीत जायचो. पण नंतर मागे एक लाकडी केबीनचे खोके २.५" * ८ चा एक चर (खड्डा)खांडुन त्यावर ठेवले होते. शौच्याला झाल्यावर त्यावर कोरडी माती टाकायची. एक खड्डा भरुन झाला कि दुसरा. तिसर्‍या वेळी पहिल्याची काळीशार माती झलेली असायची हेच ते सोनखत.
११० कोटींचे सोनखत किती होईल?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

पंगा's picture

18 May 2010 - 9:21 am | पंगा

...लिखेंगे, जनाब?

दिलचस्प रहेगी| =))

('आपण काय खातो'शी याचा संबंध नक्कीच आहे. ;))

- पंडित गागाभट्ट

पंगा's picture

18 May 2010 - 12:19 am | पंगा

नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे pesticide वापरण्यापेक्षा जुन्या पद्धतीचे खत वापरावे...उदा. गांडूळ खत

पेस्टिसाइड़चा आणि खतचा त'अल्लुक समझला नाही.

- पंडित गागाभट्ट

Pain's picture

18 May 2010 - 2:48 am | Pain

पेस्टिसाइड़चा आणि खतचा त'अल्लुक समझला नाही.

त्यांचा काहीही संबंध नाही. वाक्यरचना चुकली आहे.

रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरण्यापेक्षा सेन्द्रीय खते आणि कीटकनाशके वापरावी असे म्हणायचे असेल.

आम्ही आमच्या शेतीला गांडुळ खत आणि कीटकनाशक म्हणुन मिरचीचे पाणी वापरले होते.

पंगा's picture

18 May 2010 - 2:52 am | पंगा

त्यांचा काहीही संबंध नाही. वाक्यरचना चुकली आहे.

धन्यवाद. (कन्फ़र्मेशनसाठी.)

- पंडित गागाभट्ट

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 3:40 am | शिल्पा ब

आमची वाक्यरचना चुकली आहे तर बरोबर कोणती आहे...आणि आम्हाला काय म्हणयचे हे तुम्ही स्पष्ट केले तर बरे होईल...नाही का?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

18 May 2010 - 4:01 am | पंगा

... 'पेस्टिसाइड'ला 'खत' म्हणतात का? :?

- पंडित गागाभट्ट

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 4:02 am | शिल्पा ब

काय मूर्ख माणूस आहे ?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

18 May 2010 - 4:11 am | पंगा

नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे pesticide वापरण्यापेक्षा जुन्या पद्धतीचे खत वापरावे...उदा. गांडूळ खत

तुम्हीच बोललात! आता पेस्टिसाइडऐवजी खत वापरून कसे चालेल? म्हणून विचारले, की पेस्टिसाइडला मराठीत खत म्हणायला लागले काय हल्ली, म्हणून. काय म्हटले, आम्हालाच ठीक माहीत नसेल म्हणून...

- पंडित गागाभट्ट

नितिन थत्ते's picture

18 May 2010 - 8:23 am | नितिन थत्ते

>>कीटकनाशक म्हणुन मिरचीचे पाणी वापरले होते.

हॅहॅ. आमच्याकडे मिरचीच्याच झाडाला कीड लागली आहे. :(

नितिन थत्ते

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 2:28 am | शिल्पा ब

मराठी कळत नाही तर इथे येऊ नका...आणि ह्यां फ्या करून फालतू शंका काढू नका...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

18 May 2010 - 3:21 am | पंगा

http://www.misalpav.com/node/12354#comment-195713

वाक्यरचना चुकली आहे.

धन्यवाद.

- पंडित गागाभट्ट

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 3:26 am | शिल्पा ब

L) ....आमच्या मराठी लोकात चर्चा होत असते...लोकांना माहिती कळावी म्हणून...तुमच्या फालतू आणि भांडण करायच्या हेतूने केलेल्या comments बंद करा...हा जर माझ्यावरचा हल्ला असेल तर मराठीतल्या म्हणीप्रमाणे मर्द असशील तर समोर ये.....माझ्या प्रत्येक commnet वर तुझा हिंदी घाणेरडेपणा चालू आहे...माझ्या प्रत्येक धाग्यात सुद्धा...उगाच अंत बघू नको...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

18 May 2010 - 3:34 am | पंगा

तुमची वाक्यरचना चुकली आहे. मराठीतली.

कल्जि घेने. (लीजिए हम ने भी अच्छी मराठी में लिख के दिखा दिया... =)))

(और भी दिखा दें? यह लीजिए: मोकलाया दाहि दिशा... आइंदा ऐसी ही अच्छी, इस्टैंडर्ड़ मराठी में लिखने की कोशिश करेंगे...)

(मराठीत असेच लिहितात ना?)

धन्यवाद.

- पंडित गागाभट्ट

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 3:35 am | शिल्पा ब

वाक्यरचना बरोबरच आहे...तुझ्या कोणत्या त्या कोतवालाला कळली नाही....आणि तुझ्या फाटक्या भाषेला आम्ही किमत देत नाही...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

18 May 2010 - 3:43 am | पंगा

वाक्यरचना बरोबरच आहे...तुझ्या कोणत्या त्या कोतवालाला कळली नाही....

वरती http://www.misalpav.com/node/12354#comment-195713 या प्रतिसादात त्या साहेबांनीच सांगितले की चुकली आहे म्हणून. आता आम्हाला काय माहिती? ते साहेब मराठीच आहेत ना?

आणि तुझ्या फाटक्या भाषेला आम्ही किमत देत नाही...

छी छी... एका भारतीयाने एका भारतीय भाषेबद्दल असे बोलावे... काय हे! :(

कल्जि घेने.

(बाकी मराठी माणसाला मात्र मराठीला फाट्यावर मारायला मोकलाया दाहि दिशा आहेत... ==) सही बोले तो मराठीला फाट्यावर मारण्यात मराठी माणसाचा हात कोणीपण धरणार नाही... भय्यासुद्धा! :D)

चालू द्या! जय महाराष्ट्र, जय मराठी!!!

- पंडित गागाभट्ट

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 3:52 am | शिल्पा ब

ते साहेब आणि आम्ही काय ते बघून घेऊ...मराठी आणि मराठी माणूस आमचेच आहेत आणि त्यांना फाट्यावर मारायचे का नाही ते आमचे आम्ही बघून घेऊ...
तुला कोणी वचवच करायला सांगितली?...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

18 May 2010 - 3:55 am | पंगा

मराठी आणि मराठी माणूस आमचेच आहेत आणि त्यांना फाट्यावर मारायचे का नाही ते आमचे आम्ही बघून घेऊ...

एकदम सही! 'एकमेकां फाट्यावर मारू, अवघे धरू सुपंथ', हँय? =))

- पंडित गागाभट्ट

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 4:01 am | शिल्पा ब

तुमच्याकडे जर असे काही होत नाही तर तुम्ही भैय्ये महाराष्ट्रात म्हणजे मराठी मुलकात कशाला येता? तुमची एकमेकांचे मुके घ्या आणि तिकडेच खपा....आणि एवढे एकमेकांना फाट्यावर मारून शेवटी तू आमच्याच site वर आलास...आणि आम्ही सुपंथच धरलेला आहे...तूच घाण करतोयस...
...आणि हिंदीशी आम्हाला काही देणे घेणे नाही...फाटकी असो कि फटेली....

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

18 May 2010 - 4:06 am | पंगा

...आणि हिंदीशी आम्हाला काही देणे घेणे नाही...फाटकी असो कि फटेली....

सही! आमची भाषा आम्ही फाडू, दुसर्‍या भाषेशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. पक्का मराठी बाणा! =))

- पंडित गागाभट्ट

पंगा's picture

18 May 2010 - 6:13 am | पंगा

तुम्ही भैय्ये महाराष्ट्रात म्हणजे मराठी मुलकात कशाला येता? तुमची एकमेकांचे मुके घ्या आणि तिकडेच खपा....

काय असते ना, ते मराठी लोक असतात ना, ते एकमेकांचे मुके घेत महाराष्ट्रात खपण्याऐवजी अमेरिकेत, अगदी क्यालिफोर्नियात कडमडतात ना, तसेच भय्ये मराठी मुलखात येतात. (मराठी 'मुलूख', हिंदी 'मुल्क'.) नोटांसाठी! आता काही हिरव्या नोटा देशी पाठवतात, काही रंगीबेरंगी नोटा उत्तरप्रदेशी पाठवतात, एवढाच फरक.

जाऊ द्या, नाही समजले तर सोडून द्या.

- पंडित गागाभट्ट

पंगा's picture

18 May 2010 - 3:46 am | पंगा

हा जर माझ्यावरचा हल्ला असेल तर मराठीतल्या म्हणीप्रमाणे मर्द असशील तर समोर ये.....

अरे नाही नाही... भला मौसी जी से कौन पंगा लेगा? :O

- पंडित गागाभट्ट

अंतर्गत कारवाई करता येईल काय? (|:

वेताळ

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 10:01 am | शिल्पा ब

कशाला?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

Pain's picture

18 May 2010 - 2:54 am | Pain

छान माहितीपुर्ण लेख. काही शंका / मुद्दे उपस्थित झाले ते असे:

१) ह्या कुटुंबाचा मांस खाण्याचा मुख्य उद्देश की शरीराला आवश्याक ते प्रोटीन्स मिळावेत. (जे डॉ. पीटर सांगतात की आजकाल व्हिटॅमीन्स्च्या सारख्या गोळ्यातून पण मिळू शकते.
ते philosophy चे doctor आहेत का वैद्यकीय? कारण आहारतज्ञांच्या मताप्रमाणे गोळ्यांपेक्षा अन्नातून आलेले प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स शरीरात सहजगत्या शोषले जातात. त्यामुळे अपघातग्रस्त किंवा व्रूद्ध* नागरिक वगळता बाकिच्यांनी ते फळे, भाज्या यातूनच मिळवायला हवे.

२) नैसर्गीक खाण्याची ईछ्छा असली तरीही वेगवेगळ्या लेबल्स मधून (सर्टीफाइड ऑर्ग्यानीक, सर्टीफाइड ह्युमन , फ्री रेंज ..) होणारी फसवणूक
तर मग खरोखर नैसर्गिक ( म्हणजे organic/ सेन्द्रीय) पद्धतीने बनवलेले अन्नपदार्थ विकणारे ब्रँन्ड्स कोणते ?

३)३ कुटुंबांच्या तुलनेमध्ये फक्त आहार हाच बदलणारा घटक असावा. तिसर्या* कुटुंबातील मुलगी खेळात अग्रेसर आहे. व्यायाम/ खेळ हे सुद्धा आरोग्यावर मोठा परिणाम घडवून आणतात. तुलना केलेले सर्व लोक व्यायाम करणारे/ न करणारे असावेत, म्हणजे अचूक निष्कर्ष मिळतिल.

४) एक कुटुंब सर्वात स्वस्त जिथे मिळेल (पक्षी वॉल-मार्ट) तीथुन खरेदी करते. त्यातही मांस, जंक फूड वर जास्त भर कारण मुलांना तेच आवडते
wal-mart / costco मधून फळे, भाज्या, दूध खरेदी करणेसुद्धा चांगले नाही का ?

५) तरीही ह्या प्रश्नाची सर्वात जास्त व्याप्ती मिड-वेस्ट आहे
मिड-वेस्टमध्ये कुठे ?

जाणकारांनी क्रुपया* माहिती द्यावी

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 3:18 am | शिल्पा ब

प्रश्न क्र २ चे उत्तर फूड इंक बघितल्यावर कळेल..

आहारतज्ञांच्या मताप्रमाणे गोळ्यांपेक्षा अन्नातून आलेले प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स शरीरात सहजगत्या शोषले जातात. त्यामुळे अपघातग्रस्त किंवा व्रूद्ध* नागरिक वगळता बाकिच्यांनी ते फळे, भाज्या यातूनच मिळवायला हवे. .....हे बरोबर आहे...

costco मध्ये फळं चांगली मिळतात, बऱ्याचदा कॅली आणि mexico , chile मधील असतात...
...बाकी walmart मधील फळ भाज्याबद्दल फारशी माहिती नाही...त्यांचा बहुतेक माल चीन मधून आलेला असतो..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

१) प्रोटीन्स -
काही वर्षे पुर्वी पर्यंत असे प्रोटीन्स गोळी रूपात सहज तयार करता येत नसे. कॉड लीवेर ऑइल च्या गोळ्या असतात पण त्या साठीही मोठ्या प्रंमाणात माश्यांची कत्तल होत असे. लेखकाने असे नमूद केले आहे की आता अश्या गोळ्या ईतर प्रकाराने बनवता येतात, जेणेकरून मत्स्यहत्या होणार नाही.

२) लेबल्स -
सर्व साधारण पणे ट्रेडर ज्यो, व्होल फुड्स मधे सैन्द्रीय प्रक्रियेने बनवलेले अन्न मिळेल.

३) कुटुंब - माझ्या आठवणीत पुर्ण डीटेल्स नाहियेत, प्ण लेखक द्वयीने बर्याच खोलवर अभ्यास करून निष्कर्श मांडले आहेत. (पुस्तक अवश्य वाचावे - अमेरीकेत पब्लिक वाचनालयात मिळेल)

४) वॉल-मार्ट -
मधे सगळेच खराब असे नाही, परंतु स्वस्त करण्यासाठी बर्‍याचदा कॉम्प्रोमाईझ केला जातो. तरीही काही ठिकाणि वॉल-मार्टने लोकल फळं-भाज्या पुरवायचे चालु केले आहे (त्यात वाहतुकिचा खर्च वाचवायचे गणित आहेच...)

५) मिड-वेस्ट
अंधूक आठवते को मिसीसिपी, टेनेसी, कान्सास ह्या ठिकाणी कत्तलखाने भरपूर प्रमाणात आहेत - मुख्या शहरात दिसणार नाहित , पण ह्या राज्यात प्रमाण जास्त आहे.

-
अफाट जगातील एक अडाणि.

भाग्यश्री's picture

18 May 2010 - 1:57 am | भाग्यश्री

छान लेख आहे. दुध न घेता राहणे अशक्य असल्याने व्हेगन होणे अशक्य.
पण तुम्ही म्हणता तो आय-५ वरचा पांजरपोळाचा अनुभव घेतलाय! अतिशय वाईट अनुभव! तो वास, ती माईल्सच्या माईल्स पसरलेली गाय-बैल जनावरं! :(

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 2:24 am | शिल्पा ब

हो न...माझी लेक रडायला लागली..."नाकाला लागलं" म्हणून... :)) आतमधली जनावरं दिसत होती...सगळीकडे घाण दिसत होती...त्यातच जनावरं बसली होती...गचाळ वाटलं सगळं

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मदनबाण's picture

18 May 2010 - 2:36 am | मदनबाण

petaindia यांचा हा रिपोर्ट वाचला होता तेव्हा फार त्रास झाला होता...
http://action.petaindia.com/ea-campaign/clientcampaign.do?ea.client.id=1...

मदनबाण.....

“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 2:56 am | शिल्पा ब

अतिशय भयानक video आहे...भारतात हे असे काही होत असेल यावर विश्वासच नव्हता X( :& ..मी ओर्कुट वरील communities मध्ये हा video टाकला आहे...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मदनबाण's picture

18 May 2010 - 3:05 am | मदनबाण

हाच का हो आपला देश... गोमाता म्हणणारा ? गायीत देव पाहणारी हीच आपली संस्कृती ? ज्या गायीचे आपण आजन्म दुध पितो तिची ही अवस्था !!! माणुस आधी रानटी अवस्थेत होता नंतर उत्क्रांत झाला आणि आता परत रानटीपणाकडे चालला आहे... :(

मदनबाण.....

“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger

भारद्वाज's picture

18 May 2010 - 11:31 am | भारद्वाज

हा विडीओ अर्धा पाहीला :(....पुढे पाहण्याचं धारिष्ट्य झालं नाही. :SS

काळजीपूर्वक/डोळसपणे खावे : +१

"सुपरसाइझ मी", "फूड इन्क" बघण्यासारखे चित्रपट : +१

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 3:55 am | शिल्पा ब

ह्या धाग्यालासुद्धा वेगळेच वळण देणे चालेले आहे...विषय सोडून उगाचच वेगळ्याच प्रतिक्रिया....ह्या पंग्याला कोणी गप्प नाही बसवले तर सगळेच धागे असे त्याच्या घाणीने भरतील

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

18 May 2010 - 6:10 am | पंगा

­­..­­.­ देऊ नका, आम्ही "प्रतुत्तर" (जय मराठी! =))) देत नाही. मामला खतम!

- पंडित गागाभट्ट