प्रेमभंग ???? छे छे हे काही औरच......

सांजसखी's picture
सांजसखी in जनातलं, मनातलं
19 Apr 2010 - 10:33 am

प्रेमभंग हा शब्द कोणत्या शहाण्या माणसाने (गाढवाने) शोधला कोण जाणे???? जर प्रेम करणारे दोघंही खरे असतील तर त्यांचे प्रेम एवढेही दुबळे नसावे की त्याचा भंग व्हावा ??? हां....त्यांचे लग्न होणार नाही कदाचित????
आपल्या समाजात काही संदर्भ परस्परांना उगाचचं जोडलेले असतात... जसे दोन प्रेम करणा-यांचे लग्न झाले तरचं त्यांचे प्रेम यशस्वी झाले..... तरच ते खरे होते.... पण काही अडचणींंमुळे नाही होऊ शकले तर फार मोठे नुकसान वगैरे.... वगैरे...
हां ....नुकसान आहे हे खरे पण इतकेही नाही....
माझ्या मते लग्न म्हणजे दोन प्रेम करणा-यांना मिळालेली लीगल अथोरिटी होय ज्यामुळे त्यांची परस्परांवरील माया, ओढ समाजाच्या नजरेत खुपत नाही.....वस्तुत: या लीगल अथोरिटी शिवायही ते तितकेच जवळ असू शकतात परस्परांच्या.......केवळ शारीरीक भाग वगळता... आयुष्यात परस्परांची सुखं-दु:खं वाटून घेण्यासाठी एकत्र येणारी मनं यापेक्षा जास्त महात्वाची... असं माझं एकीय मत आहे....
काही सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक वा परीस्थितिजन्य कारणांमुळे अशी लीगल अथोरिटी (लग्न) मिळत नाही पण त्याने खरच त्यांचे नुकसान होते????
ते दुस-या कोणत्याही व्यक्तिबरोबर सुखात राहू शकतात??? प्रामाणिकपणे सांगायचे तर..... नाही.. ते कधीच शक्य नाही.... समझौता करून जगणं.,हे जगणचं नव्हे.... जगणं हे मोकळेपणाचं , स्वच्छंदी असावं...
अशा यशस्वितेप्रत न जाणा-या प्रेमामुळे दोन जीव काय गमावतात पेक्षा काय काय कमावतात याचा आढावा घेताना कोणीच आढळत नाही.... परस्परांत हवे ते बदल... एकामेकांच्या जपलेल्या आवडी-निवडी... एकामेकांच्या आठवणी.. सुखद बैचेनी.. गुंतलेले श्वास.... अडकलेला जीव... आणि खूप काही....
यात दोघांचेही समर्पण तितकेच असते खरं तर ...प्रेमभंगांच्या कारणात स्वत:ला दोषी ठरवणं निव्वळ मूर्खपणा!!!!
काही काळापुरती का होईना एकामेकाला दिलेली साथ !!! दु:खात घातलेली हळूवार हलकी फूंकर... सुखात उधळलेले क्षण... यांचे आयुष्यात काहीच मोल नसते का??....
माझ्या मते जीवन जगणे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हेच ते काय जगणं..... बाकी सारा येणा-या जाणा-या श्वासांचा कचरा... जो घेणं वा सोडणं आपल्या हातात नाहीये....मरेपर्यंत खरे प्रेमी मनाच्या कोणत्या ना कोणत्या
कोप-यात असा काही दिवा लावतात ज्याच्या प्रकाशातच कदाचित पुढचा काळ सुखाचा होईल अशी अपेक्षा ठेवत.....
मी आजही तुझ्यासाठी देवापाशी दिवा लावते आणि यापुढेही लावत राहीन....
न जाणे असे का होते पण नेहमीच आता दिवा शांत होईल म्हणून जिवाची तगमग करून मी त्यात तेल घालते आणि जोपर्यंत तो शांतपणे तेवत नाही तोवर श्वासांचीही उसंत नसते मला!!! या काळात ख्ररतरं काही क्षणात एवढ्या अडचणींना तोंड द्यावे लागते कसं सांगू तुला???? स्वयंपाकघरातून तेल आणेपर्यंत दिव्याला उसंत नसते ..पण एक नक्की आजवर नेहमीच मी त्याला शांत हॊण्यापासून लांब ठेवलं...वेळेत तेल घातले... पुन्हा जीवन दिले त्याला ... आणि नेहमीच देत राहीन.. उगाचचं जिंकल्यासारखं वाटत त्यानं...

असॊ... हा खोटा का होईना जिंकण्याचा आभास पुन्हा जगण्याचे बळ देतो... आणि त्या दिव्यातील दिव्य ज्योती तुला पण ते बळ नक्की देईल....त्यामुळे तू घाबरू नकोस....
तुला ज्या खोल खड्ड्यातून बाहेर काढलं ते पुन्हा तेथेच ढकलण्यासाठी नव्हे..... एवढी क्रूर नाही मी.....
तू खरा आहेस... हे जाणते मी... त्यामुळे स्वत:ला दोषी मानू नकोस.. त्या ऐवजी ज्या नवीन जाणिवा दिल्यास त्याची प्रौढी मिरवं.. मला जास्त आवडेल ते....
स्वत:ला परिस्थितीसमोर हतबल मानू नकोस.... कारण... अशा भावना फक्त खच्चीकरण करतात.... जगू देत नाहीत..सुखाने..
आणि मला ते आजिबात नकोय.. तुला सुखात पहाण्याची ईच्छा फक्त तूच पूर्ण करू शकतोस म्हणून...
आणि कोण जाणे ... उद्या परिस्थिती बदलेलही कदाचित.... नाही बदलली तरी हरकत नाही.. जे मिळालं त्यावर पुढील आयुष्य रेटण्याचं बळ आहे माझ्यात....तुझ्यात ते नाही हे माहिती आहे पण मी ते निर्माण करीन तुझ्यात....
फक्त एवढच सांगणं आहे... माझ्यासाठी.. फक्त माझ्यासाठी स्वत:च्या आयुष्यासाठी आशादायी दिवा कधीच मालवू देवू नकोस....एवढं करशील ना माझ्यासाठी....!!!!
तुझी जीवलग मैत्रीण../ स्वयंघोषित काळजीवाहू सरकार....
सांजसखी...

प्रेमकाव्यविचारअनुभव

प्रतिक्रिया

शुचि's picture

19 Apr 2010 - 11:28 am | शुचि

>> मी आजही तुझ्यासाठी देवापाशी दिवा लावते आणि यापुढेही लावत राहीन....
माझ्या मते जीवन जगणे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हेच ते काय जगणं..... बाकी सारा येणा-या जाणा-या श्वासांचा कचरा... >>

मला फार आवडला हा लेख
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

शुचि's picture

19 Apr 2010 - 11:47 am | शुचि

वाचनखुण साठवल्यागेलेली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

झंडुबाम's picture

19 Apr 2010 - 8:23 pm | झंडुबाम

परस्परांत हवे ते बदल... एकामेकांच्या जपलेल्या आवडी-निवडी... एकामेकांच्या आठवणी.. सुखद बैचेनी.. गुंतलेले श्वास.... अडकलेला जीव... आणि खूप काही....

शब्द संपले.......
झकास्स्स्स्स लेख.

इनोबा म्हणे's picture

19 Apr 2010 - 8:39 pm | इनोबा म्हणे

शब्द संपले.......
झकास्स्स्स्स लेख.

असेच म्हणतो

धमाल मुलगा's picture

19 Apr 2010 - 8:52 pm | धमाल मुलगा

क्या बात है!
सुंदरच लिहितेस तू. आवडलं. खूप आवडलं.

अ क्ष र शः वाक्यंवाक्य पटलं. लेख वाचतावाचता कुठेतरी स्वतःला कोण्या एका काळात घेऊन गेलो आपसुक..आणि .. आणि....अरे! हेच तर म्हणायचं होतं आपल्याला असं वाटुन गेलं.

लेख वाचायचा संपवुन शांत बसलो, डोळे मिटले, वाटलं कदाचित गदगदुन येईल..पण नाही, खरं तर आतला कोलाहल शांत झाला.. एक शांतता मनाभोवती वेढुन राहिली. :)

धन्यवाद सांजसखे, धन्यवाद.

मेघवेडा's picture

20 Apr 2010 - 2:24 am | मेघवेडा

धम्याशी बाडिस!

सुंदरच लिहितेस तू. खरंच धन्यवाद!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अन्या दातार's picture

20 Apr 2010 - 12:18 am | अन्या दातार

विवाह, लिव्ह इन वगैरे या सगळ्या तकलादु आणि निव्वळ फॉरमॅलिटी आहेत. समाजासाठी केलेली सोय म्हणून. मनाचे बंध महत्त्वाचे.

बघणार्‍यांना सिल्कचा शर्ट दिसतो; पण शेवटी वापरणार्‍यालाच आतलं अस्तर टोचत असतं.
-- इति वपु

बेसनलाडू's picture

20 Apr 2010 - 12:25 am | बेसनलाडू

विचार आवडले.
एक शंका - एकीय मत म्हणजे काय?
(शंकेखोर)बेसनलाडू

भाग्येश's picture

20 Apr 2010 - 12:01 pm | भाग्येश

अतिशय छान लिहिले आहे..
अगदी मनातले..
<<प्रेमभंग हा शब्द कोणत्या शहाण्या माणसाने (गाढवाने) शोधला कोण जाणे???? जर प्रेम करणारे दोघंही खरे असतील तर त्यांचे प्रेम एवढेही दुबळे नसावे की त्याचा भंग व्हावा ??? हां....त्यांचे लग्न होणार नाही कदाचित????>>
सहमत..

-भाग्येश
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ |
समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागमः |

Pain's picture

23 Apr 2010 - 10:08 am | Pain

आवरा !

विसोबा खेचर's picture

23 Apr 2010 - 2:52 pm | विसोबा खेचर

अशा यशस्वितेप्रत न जाणा-या प्रेमामुळे दोन जीव काय गमावतात पेक्षा काय काय कमावतात याचा आढावा घेताना कोणीच आढळत नाही.... परस्परांत हवे ते बदल... एकामेकांच्या जपलेल्या आवडी-निवडी... एकामेकांच्या आठवणी.. सुखद बैचेनी.. गुंतलेले श्वास.... अडकलेला जीव... आणि खूप काही....
यात दोघांचेही समर्पण तितकेच असते खरं तर ...

वा! सुंदर लेख..

तात्या.

अनिल हटेला's picture

23 Apr 2010 - 5:02 pm | अनिल हटेला

हम्म .....
जमेश.......:)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D