वेळ साधारण रात्री ७.३० वाजताची.... तिन्ही सांजेची.... लाईट गेली त्यामुळे डोक्यावर गरागरा फिरणारे पंखॆ अचानक बंद झाले.... म्हणून जीवाची काहिली थंड करण्यासाठी शांत निवांत अंगणात पहुडले... इतक्यात लक्ष्य आकाशात शांतपणे हसणा-या चंद्रकोरे कडे गेले.... नाजूक.. विवर्धमान... तेजस्वी... हसरी..सोबतच्या चांदण्याबरोबर सुखात हितगुज करणारी....चंद्रकोर माझ्याकडे मिस्किलपणे हसत असल्यासारखी वाटली... ती म्हणाली, " काय गं ?? अशी का तू अस्वस्थ??? माझ्याकडे पाहून आनंद नाही का होत तुला??" मला काय ऊत्तरावे हेच कळेना!!!! तिकडे दुर्लक्ष्य करत होतेच तोच माझे कान एफ.एम.वरच्या गाण्याकडे खेचले गेले.....
"ए खुदा मुझको बता तू रहता कहां क्या तेरा पता...
हम तो यहां पे मुसफ़िर हैं जो ढुंढे अपनी मंज़िल का पता॥"
दोनच ओळी खूप खोलवर घुसल्या मनात... वाटलं... खरच काय हवे आहे म्हणून हा सारा व्याप चाललायं..?
एकानंतर दुसरी.. मगं तिसरी.. अशी कधीच न संपणारी हव्यासांची श्रुंखला हिच हवी आहे का ?? की न
दिसणा-या 'मंज़िल'च्या शोधात आशेने मार्गक्रमण करत रहाणं म्हणजे का जीवन??? नाही सांगता येत खरचं ... असॊ..
गेल्या काही दिवसांत मनात झालेली विचारांची घुसळण, आयुष्याकडे पहाण्याचा दॄष्टिकोन.. अनुभवांचे वाढणारे गाठोडं... हे सारे काही झरकन डोळ्यासमोरून गेलं.. त्याचे प्रयोजन न जाणण्यासाठी होतं की काही सुचवायचं होतं या चलचित्रफितिंना?? विचार केला खोलवर जाऊन तेव्हा विचारांचा गुंता झाला... हलकेच एक धागा घेतला आणि गुंता सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला...तसं सुतावरून स्वर्गाला जाण्याची अंमळ मराठी प्रवॄत्ती माझ्यातही ठासून भरलीये!!!
क्षणाक्षणानं व्यतीत होत जाणारं जीवन सतत काहीतरी देत रहातं आपल्याला फक्त ते जाणीवपूर्वक स्विकारायचं असतं .... खूप शाश्वत सत्य, शाश्वत आनंद , आणि शाश्वत दु:खांची सुध्दा ओळख होते या काळात!! पण या सा-या गोष्टी इतक्या पाठोपाठ चालू रहातात की त्याची लाईन ओफ सेपरेशन फारच पुसट असते.... ती ज्याला दिसली तो जिंकला.. जगला... शिकला.. आणि सतत पुढच गेला...
माझ्या बाबतीत काहितरी खास घडून गेले होते या दिवसांत.. जगाची नव्यानं ओळख होत होती ... प्रत्येक पावलांवर सोबत होती.. नव्यानेच ओळख झालेल्या स्वत:ची.. ही ओळख करून देणार्ह्याचे खरोखर शतश: धन्यवाद... नव्हे अनेक जन्मांचे ॠणच म्हणेन मी !! जे काही असेल ते असेल पण जे काही होतं ते सारं दैवी... अनन्यसाधारण...
याचा कालावधी फार नव्हता हे माहिती होतं मनाला पण तरीही जो काळ हातात होता तो १०० टक्के जगण्याची धडपड मनाने केली याचीही साक्षीदार मीच होते....
इतक्यात लख्ख प्रकाश झाला.. लाईट आली अन विचारांचा गुंता शेवटी अधिकच गुंतत गेला.. तो आठवत हसत बसले.....
की गुंता सोडवायला बसले कि होते की अजूनच वाढवायला??? :)
प्रतिक्रिया
19 Apr 2010 - 11:07 am | आनंदयात्री
हा हा हा !!
तुमचे हे छोटेखानी लेखन फार सुरेख झालेय. आणी शांतपणे हसणारा चंद्र तर खासच !!
19 Apr 2010 - 11:55 am | अमोल केळकर
असेच म्हणतो
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
19 Apr 2010 - 6:49 pm | शुचि
>> क्षणाक्षणानं व्यतीत होत जाणारं जीवन सतत काहीतरी देत रहातं आपल्याला फक्त ते जाणीवपूर्वक स्विकारायचं असतं >> मस्त!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.
20 Apr 2010 - 1:03 am | प्राजु
मस्त!!
गुंता केलाही छान आहे आणि सोडवलाही छान आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
20 Apr 2010 - 2:08 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू