कथा: सत्संग गुंतवणूक

वसंत वडाळकर_मालेगांव's picture
वसंत वडाळकर_मालेगांव in जनातलं, मनातलं
19 Apr 2010 - 7:23 am

संध्याकाळचे ५:३० झाले होते.

महाराज अद्याप आले नव्हते.

सत्संगी बाबांची वाट बघत होते.

तोच रोल्स-राईस मधून बाबांचे आगमन झाले. सर्व सत्संगी उठून उभे राहिलेत. महाराज आसनस्थ झाले. महाराजांनी हाताने खुणावून सर्वांना बसावयास सांगीतले. सत्संग सुरू होण्यापूर्वी नामस्मरण करण्यात आले.

श्रीराम जय राम जयजय राम!

सर्व सत्संगी नामस्मरणात एकरूप झाले. त्यानंतर सत्संग सुरु झाला.

महाराज सांगू लागले-

"ह्या अनंत कोटी ब्रम्हांडात एका चैतन्याव्यतिरिक्त काही नाही. चैतन्य हेच आपले स्वरुप आहे. चैतन्य स्वरुप आपल्या मध्येच आहे. त्यामुळेच आपले चलन वलन चालू राहाते. शरिरात चैतन्य नसेल तर शरीर जड बनते. हालचाल बंद पदते. चैतन्य म्हणजेच ईश्वर. ईश्वराचे दुसरे रुप. म्हणजे सजीव प्राणी. त्यात वनचर, जलचर तसेच मनुष्य हा प्राणीही आलाच. मनुष्यप्राणी हा विचारवंत असल्याने चैतन्यरुपी ईश्वराला जाणतो, ओळखतो. मनुष्यप्राण्याने पैशांची हाव धरु नये. पैसा हा मनुष्याकरता असतो. मनुष्य पैशांकरता नाही. पैसा हा चांगल्या कामाकरता खर्च करावा. "

तोच एक ऑस्टीन गाडी येवून थांबली. त्या गाडीमधून एक रुबाबदार व्यक्ती उतरते. सत्संग चालू असतांना ती व्यक्ती महाराजांना साष्टांग दंडवत घालते. महाराजांच्या पायाशी ती व्यक्ती ५०००० रु दक्षिणा ठेवते. महाराज "सुखी भव!" असा आशीर्वाद देतात. ५०० च्या कोर्‍या करकरीत १०० नोटांचे बंडल. महाराज त्या बंडलांकडे तिरप्या नजरेने बघतात आणि सत्संग चालू राहातो. सत्संग संपतो. ती व्यक्ती निघून जाते.

१५ दिवसांनंतर-

एक ऑस्टीन गाडी येवून थांबते. तीच व्यक्ती पुन्हा महाराजांना भेटायला येते. महाराजांना साष्टांग दंडवत घालते. महाराजांना पुन्हा ५०००० रु दक्षिणा देते. महाराज त्या व्यक्तीला आशीर्वाद देतात "धनवान हो! सुखी हो!"

त्या व्यक्तीला महाराज विचारतात, "आपण कोण? कोठे रहाता? धंदा काय"

ती व्यक्ती स्वतःचा परिचय करुन देते, " मी लंडनला स्थायिक असून सध्या मुंबईच्या सेंटॉर हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. माझा धंदा आहे, न्यूयॉर्क शेअर मार्केट. शेअर मार्केट मधून रोज २ -४ लाख रुपये कमावतो. इथल्या मार्केटचा अभ्यास करावयास आलो. आपली किर्ती ऐकून दर्शनास आलो. "

महाराज म्हणतात, "मला सुद्धा २ कोटी गुंतवायचे आहेत."

"महाराज, सध्या मार्केट तेज आहे. मार्केटमध्ये मंदी येईल तेव्हा तुम्ही पैसा गुंतवा. "

"तुम्ही मला सहकार्य कराल काय?"

"हो. नक्कीच"

१५ दिवसांनंतर-

त्या व्यक्तीचा महाराजांना फोन येतो.

"मार्केटला सध्या मंदी आहे. अमुक कंपनीचे शेअर्स घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या माणसाला पैसे घेवून पाठवा."

"तुम्हीच या अन पैसे घेवून जा. आणि माझ्या नावाने गुंतवा."

दुसर्‍या दिवशी-

पुन्हा ऑस्टीन गाडी येवून थांबते. ती व्यक्ती पुन्हा महाराजांना भेटायला येते. महाराजांना साष्टांग दंडवत घालते. ५०००० रु पुन्हा दक्षिणा देते.

"मुनीमजी, दोन कोटी रुपये यांना द्या"

मुनीमजी तिजोरीतून पैसे काढतात. पैसे १.५० कोटीच असतात.

"सध्या एवढेच घेवून जा. मुनीमजी, बाकीचे नंतर घेवून जा. ५० लाख रुपये."

ती व्यक्ती १.५ कोटी घेवून जाते.

१५ दिवसांनंतर-

महाराज सेंटॉर होटेलमध्ये फोन करतात.

सेंटॉरचा मॅनेजर सांगतो, "ते तर १५ दिवसांपूर्वीच लंडनला निघून गेलेत."

त्या व्यक्तीचा तपास लागत नाही. सत्संग सांगूनं जमवलेला पैसा महाठक घेवून गेला.

५०००० रु तीन वेळा दक्षिणा म्हणून १,५०००० रु दिले आणि १.५ कोटी घेवीन गेला.

दोन कोटींमधील ५० लाख मुनीमजींनी वाचविले.

म्हणून महाराजांनी मुनीमजींना ५ लाख बक्षीस दिले.

सत्संग गुंतवणूक पूरी झाली.

कथामतबातमीमाध्यमवेधअनुभवसमीक्षा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Apr 2010 - 10:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा ... मस्त रंगवली आहेत कथा!

अदिती

बाकी कथा एकदम झ्याक आहे. ;)

वेताळ

कुंदन's picture

19 Apr 2010 - 11:30 am | कुंदन

नाही मुंबईत नाही , बहुधा मुंबईच्या एखाद्या उपनगरात राहात असावेत.

इनोबा म्हणे's picture

19 Apr 2010 - 10:31 am | इनोबा म्हणे

'मन्या सज्जना!' चित्रपटात असाच एक सीन आहे. जाम आवडल्यामुळे लक्षात राहिला.

मेघवेडा's picture

19 Apr 2010 - 12:56 pm | मेघवेडा

बरोब्बर!! सुरूवातीचाच सीन आहे!! पण हा सीन वगळता बाकी चित्रपट पाहवला नाही.. अगदी मक्या असूनसुद्धा!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

इनोबा म्हणे's picture

19 Apr 2010 - 1:11 pm | इनोबा म्हणे

मलासुद्धा नाही पाहवला.
या सीनमध्ये मक्या अगदीच गबाळा दिसत होता राव. ते सुट-बिट मक्याचं काम नै. साधा सुधाच बरा वाटतो.

मेघवेडा's picture

19 Apr 2010 - 1:20 pm | मेघवेडा

हो चायला.. ते सुटाबुटात जरा विचित्रच वाटतंय त्ये!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

प्रमोद देव's picture

19 Apr 2010 - 10:50 am | प्रमोद देव

ढापलेली दिसतेय चक्क.

रामदास's picture

19 Apr 2010 - 11:01 am | रामदास

गोष्ट ओळखीची वाटते आहे खरी.

कुंदन's picture

19 Apr 2010 - 12:23 pm | कुंदन

कदाचित तो सेंटॉर निवासी "ऑस्टिन" ( की हमर ) धारी महाठकही ओळखीचा असेल. ;-)

पांथस्थ's picture

19 Apr 2010 - 3:27 pm | पांथस्थ

हि कथा विस्तृत स्वरुपात मी कुठेतरी वाचली आहे. आत्ता आठवत नाहि.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

प्रशु's picture

20 Apr 2010 - 1:20 am | प्रशु

मस्त.. मस्त.. मस्त.. मस्त..

प्रकाश घाटपांडे's picture

20 Apr 2010 - 8:53 am | प्रकाश घाटपांडे

यकदम भारी कथा हाय!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

चिरोटा's picture

20 Apr 2010 - 10:53 am | चिरोटा

सत्संगवाला चांगलाच गंडला.ठकास महाठक. महाराजांकडे रोल्स रॉईस आहे तेव्हा झालेले नुकसान मनाला लावून घ्यायची गरज नाही.!!
बाकी हे जुहुचेच सेंटॉरना? कारण पार्ल्याचे सेंटॉर केव्हाच बंद झालय.!
भेंडी
P = NP

श्रीराजे's picture

20 Apr 2010 - 4:23 pm | श्रीराजे

लइ भारी कथा हाय

मन१'s picture

16 Jul 2012 - 9:09 pm | मन१

ही २०१० मध्ये पब्लिश झालेली कथा दिसतिये?
इथे मिपावरच दोन्-चार आठवद्याखाली २०१२मध्ये हीच कथा वेगळ्या नावानं दिसली...
काय भानगड असावी बुवा?

चित्रगुप्त's picture

17 Jul 2012 - 10:59 am | चित्रगुप्त

अश्याच कथेवरील धागा काही काळापूर्वी वाचलेला आठवतोय.
त्यात एका प्रतिसादात आसारामबापू यांचा उल्लेख होता....

आप्पा's picture

17 Jul 2012 - 11:03 am | आप्पा

हि घटना आसाराम बापुचीच आहे.

ही कथा 'मारिच' नावाच्या श्री. संतोष शिंत्रे यांनी लिहीलेल्या मूळ कथेवरून ढापलेली आहे.
हीच कथा येथेही वाचता येईल.
गुलाबी सिर : द पिंक हेडेड डक या कथासंग्रहात ती प्रकाशित झालेली आहे.
तेच तेच किती वेळा सांगावे आता? कदाचित ही ढापाढापीच त्या मूळ कथेच्या सामर्थ्याची झलक असावी.