शोलेची आग

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
16 Apr 2010 - 1:00 am

मिपावर सध्या चित्रपटांविषयी - आवडत्या, नावडत्या, कमी प्रसिध्द, टुकार, भंगार आणि अजून काय काय, बराच काथ्याकूट चालू आहे. त्या चित्रपटांच्या यादीत एक ''शोले''चे नाव वाचले आणि विस्मृतीत गेलेली एक जुनी आठवण ताजी झाली. छोटीशीच पण निरागस!

शोले चित्रपट येऊन गेल्यावर बर्‍याच वर्षांनी मी व माझ्या धाकट्या बहिणीने तो पिंपरीच्या एका चित्रपटगृहात ''मॅटिनी''ला पाहिला. तेव्हा आमचे घर त्या चित्रपटगृहाच्या अगदी समोर होते. त्यामुळे मी व बहिण आईसोबत अगदी आयत्या वेळेस तिकिट काढून गेलो चित्रपट पहायला! [तेव्हाही तो हाऊसफुल्ल व्हायचा कधी कधी!] बहिणीचे वय होते सात वर्षे आणि माझे दहा वर्षे! आमचा सर्व चित्रपट पाहून झाला, चित्रपटगृहातले दिवे लागले, प्रेक्षक बाहेर पडू लागले. आम्हीही जायला उठलो. पाहिले तर धाकटी बहिण मुसमुसून रडत होती. तिला विचारल्यावर ती काही उत्तरही देईना! वाटले, हिला काही दुखले-खुपले तर नाही ना, बरे वाटत नाही का.... काय झाले काहीच कळेना!

कसेबसे तिला चित्रपटगृहाच्या बाहेरच्या आवारापर्यंत आणले. पण तिथे मात्र तिने जोरात भोकाडच पसरला. मी व आई हतबुध्द! लोकांच्या कुतुहलाच्या नजरांची जागा नंतर काळजीने घेतली. तिथला रखवालदार ओळखीचा होता. तो विचारू लागला, ''बेबीको क्या हो गया? सब ठीक है ना? पानी लाऊ क्या?'' त्याने बिचार्‍याने पाणीही आणले. पण आमच्या बहिणाबाईंना पाणीही नको होते. तिचा हंबरडा काही केल्या आटोपायचे चिन्ह दिसत नव्हते. आंजारून -गोंजारून झाले, जरबेने विचारून झाले, जवळ घेऊन झाले, सर्व शक्य उपाय चालू होते!
बहिणीने तर जमिनीवर लोळणच घ्यायची शिल्लक ठेवली होती!!!

दहा-पंधरा मिनिटे हे नाटक चालू होते. मग मात्र आईचा संयम सुटला. तिने तिच्या खास ठेवणीतल्या करड्या आवाजात बहिणीला विचारले, ''आता काय झाले ते सांगतेस की नाही का देऊ एक फटका?''
ही मात्रा मात्र बरोब्बर लागू पडली.
बहिणीचा टाहो एकदम तार सप्तकातून मध्य, तिथून मंद्र सप्तकावर आला... अश्रू वाळले होते त्यांच्या जागी नवे अश्रू येणे बंद झाले. हंबरड्याची जागा हुंदक्यांनी व मुसमुसण्याने घेतली. तिचा तो ओसरलेला आवेग पाहून आईलाही जरा धीर आला. मग मोठ्या प्रेमाने तिने बहिणीच्या डोक्यावरून हात फिरवून तिला पुन्हा विचारलं, ''काय झालं माझ्या राजाला, सांगशील का आता तरी?''

बहिणीने डबडबलेल्या डोळ्यांनी, आईच्या पदरात तोंड खुपसून स्फुंदत उत्तर दिलं..... ''आई, अमिताभ बच्चन मेलाssssssssss!!!!!''

क्षण-दोन क्षण आईच्या डोक्यात काहीच प्रकाश पडेना! मग तिला उलगडले.... शोलेमध्ये अमिताभ शेवटी मरताना दाखवला आहे! बहिणीचा अमिताभ अतिशय लाडका होता तेव्हा! आणि तिला चित्रपटाचे कथानक इतके सत्य वाटत होते की अमिताभ खरोखर मेला आणि तो आता आपल्याला पुन्हा कध्धी कध्धी दिसणार नाही म्हणून तिला अगदी भडभडून व भरभरून रडायला येत होते!!!!!!!

तिच्या त्या निरागसपणापुढे आणि समजेच्या अभावापुढे आई पार शरणागत झाली! बहिणीला काही केल्या चित्रपटातील गोष्टी खोट्या असतात, त्यातील कलाकार असे चित्रपटात दाखवले म्हणजे खरेखुरे मरत नाहीत हे पटायला जाम तयार नव्हते. दादापुता करून तिला घरी घेऊन आल्यावरही तिचे डोळे वारंवार अमिताभच्या आठवणीने (!!) भरून वाहात होते. आम्हाला मात्र आता हसू दाबणे अवघड जात होते.

शेवटी दुसर्‍या दिवशी आम्ही पुन्हा शोले बघितला. त्यात अमिताभला जिवंत पाहून तिला एकदाचे हायसे वाटले! ह्या खेपेस तो मेला तेव्हा ती एवढी रडली नाही!
तिच्या बालमनाला समजेल पण ते दुखावले जाणार नाही अशा रीतीने तिला समजावता समजावता घरच्यांच्या नाकी नऊ आले! पण मग हळूहळू तिला उमजू लागले की चित्रपटातील कथानक सत्य नसते, मारामारी - ढिश्शुम् ढिश्शुम् वगैरे सगळे खोटे असते.... पुढे आम्ही अनेक मारधाड चित्रपट खदाखदा हसत पाहिले. पण शोलेचा तो अनुभव अविस्मरणीय होता!!

आजही कधी कधी आम्ही तिला शोलेची आठवण काढून चिडवतो! :-)

-- अरुंधती

समाजजीवनमानचित्रपटअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

16 Apr 2010 - 1:17 am | इनोबा म्हणे

''आई, अमिताभ बच्चन मेलाssssssssss!!!!!''
=))

लिमिटेड माज!

विकास's picture

16 Apr 2010 - 1:42 am | विकास

छान निरागस आठवण आहे. :-) शोले हा आजही आवडता चित्रपट आहे. (फक्त त्यातील गब्बरला मारलेला चित्रपट जेंव्हा येथे पाहीला तेंव्हा जरा आवाक झालो!)

मला आता आश्चर्य वाटते की आपण किती लहान असताना आई-वडलांबरोबर कसले चित्रपट पहायचो! (त्यात मी ही आलो). आता मुलीला चित्रपट दाखवायची वेळ येते तेंव्हा शंभरदा विचार करतो, आणि जे विचार चित्रपट पहाताना आपण केले नाहीत ते संभर विचार, सध्याची पिढी करू शकते असे वाटते.

बाकी या वरून पुलंनी सांगितलेल्या प्रसंगाची आठवण झाली. त्यांच्या आजीला घेऊन ते संत तुकाराम पाहून चित्रपटगृहाच्या बाहेर पडत असताना ती नातवाला म्हणाली, "हे लोकं कशाला आत जात आहेत? त्यांना सांग, तुकाराम गेले स्वर्गाला, तुम्हाला उशीर झाला म्हणून." :)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

संदीप चित्रे's picture

16 Apr 2010 - 2:45 am | संदीप चित्रे

'विषय संपला' म्हणण्याइतका आवडता सिनेमा !
आपण लहानपणीही बिनधास्त मारामारीचे वगैरे सिनेमा बघायचो ह्याबाबतीत विकासशी सहमत.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

अरुंधती's picture

16 Apr 2010 - 3:50 pm | अरुंधती

विकास, आपण सध्याच्या छोट्या मुलांच्या करमणुकीबाबत बाबत खरंच खूप दक्ष झालो आहोत, त्यांनी काय बघावे, काय बघू नये, काय वाचावे, काय वाचू नये इ.इ........व्हायलाच हवे म्हणा! आजूबाजूला माहिती ओकणारे टीव्ही, कॉम्प्युटर रूपी राक्षस (!) बसले आहेत. पूर्वी माहितीचा एवढा स्फोटही नव्हता हो! करमणूक म्हणजे (घरी असला तर) टी.व्ही., रेडियो, उद्यान, जत्रा, सर्कस, जादू प्रयोग फार तर फार.... आणि घरचे लोक मारधाड चित्रपटांना बिनधास्त घेऊन जायचे पोरांना.... मात्र मी सुरुवातीला अनेक वर्षे मारामारीचा सीन सुरु झाला की कानात बोटे घालून, डोळे गच्च मिटून सीटखाली लपायचा प्रयत्न करत असे ही गोष्ट वेगळी! ;-) तेव्हा ''हम किसी से कम नही'', ''अब्दुल्ला'' आणि ''थोडीसी बेवफाई'' नामक चित्रपटातला बराचसा काळ माझ्या आसनासमोरील चित्रपटगृहाच्या जमिनीवर बसून घरच्यांना ''आता संपली मारामारी/ संपला सीन?'' असे विचारत घालवल्याचं आठवतंय.... :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शुचि's picture

16 Apr 2010 - 2:17 am | शुचि

छान रंगवलीयेस ग इवलीशी आठवण :) ...... कसं ग अरुंधती रंगवता येतं तुला? :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

अरुंधती's picture

16 Apr 2010 - 3:52 pm | अरुंधती

शुचि, लहानपणापासून एवढी गोष्टीची पुस्तकं वाचली त्याचाच परिणाम असणार!! दुसरं काय?!!! ;-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

टारझन's picture

16 Apr 2010 - 2:18 am | टारझन

हा हा हा ... खुप च छाण किस्सा आहे. खुप खुप हसु आले :)

बाय द वे .. पिंपरी च्या का ? कोणत्या थेटरात पाहिलात मुव्ही ? अशोक ? अजुन एक थेटर आहे ... नाव नाही आठवत ... आणि तिसरं थेटर म्हणजे डिलक्स .. तिथे शोले सारखे मुव्हीच नाही लागायचे पण .. :)

- टारुंधती

अरुंधती's picture

16 Apr 2010 - 2:40 am | अरुंधती

टारझनराव

त्या थ्येटराचं नाव होतं ''विशाल'', तेव्हा नुकतंच झालेलं ते.... कोरं कोरं होतं... आमच्या अपार्टमेंटच्या इमारतीसारखंच... आणि त्याच्यासमोर अक्षय कॉम्प्लेक्स नावाचा बर्‍याच इमारतींचा अपार्टमेंट कॉम्प्लेक्स होता.... बरेच सिंधी, पंजाबी लोक्स राहायचे.... तिथे आमचे काही काळ [महिने] वास्तव्य होते!:-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

टारझन's picture

16 Apr 2010 - 2:49 am | टारझन

हा बरोबर ... "विशाल" च... साला .. "रोड" नावाचा फालतु सिनेमा पाहिला होता मी तिकडे काही वर्षांपुर्वी .. शोले म्हणजे जुणा जमाना .. आता लै फालतु लोकं यायची तिथे .. आत गेलं की साला सगळा गुठख्या शिग्रेटींचा वास :) आता बरंय .. ई-स्क्वेयर ने घेतल्यामुळे पुन्हा स्टँडर्ड पब्लिक येतंय :)

बरेच सिंधी, पंजाबी लोक्स राहायचे....

हो हो .. हो तर :) पिंपरी म्हणजे सिंधी च सिंधी ... आम्ही त्यांना रगडा पॅटिस म्हणतो.. :)

-(कधी काळी सिंधी पोरीवर लाईन मारणारा) टार्‍या पिंप्रिकर

प्रमोद्_पुणे's picture

16 Apr 2010 - 12:28 pm | प्रमोद्_पुणे

आठवण मजेदार आहे.. लहानपणी जवळ जवळ सगळे सिनेमे विशाल थेटरातच पाहिले त्यामुळे ही आठवण आणखी जवळची वाटली.. आता विशाल मल्टीप्लेक्स झाले आहे.

अनिल हटेला's picture

16 Apr 2010 - 11:26 pm | अनिल हटेला

आठवण मजेदार आहे.. लहानपणी जवळ जवळ सगळे सिनेमे विशाल थेटरातच पाहिले त्यामुळे ही आठवण आणखी जवळची वाटली..
------------>अगदी सहमत .....:)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D

अरुंधती's picture

16 Apr 2010 - 2:54 am | अरुंधती

तिथे कोपर्‍यावर एक इराण्याचे व एक महाराष्ट्र का अशाच नावाचे हाटेल होते ते आहे का हो अजून? आणि मिलनसार बेकरी.... तिचे टोस्ट लाजवाब! बकाऊल्फ दिसायची बाल्कनीतून आणि खाली पाहिले तर दलदल.... जलपर्णी व डुकरे..... अहाहा! ;-) पिंपरीच्या मार्केटात गेलं की सगळे सिंधी, पंजाबी.... केसांना कलप लावलेल्या, मेंदीच्या केसांच्या पंजाबी सूट घातलेल्या अशक्य जाड बाया, मोहरीच्या तेलाचा वास येणारे सरदारजी आणि ओशट सिंधी.... शिवाय चांदभाईपण बरेच असायचे! आता काय कसं बदललंय चित्र, कल्पना नाही!! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

16 Apr 2010 - 2:56 am | संदीप चित्रे

जुने दिवस आठवले एकदम !
बकाऊल्फमधे अखंड दोन महिने काम केलं आणि नंतर नोकरी बदलली.

चिन्मना's picture

16 Apr 2010 - 6:15 am | चिन्मना

आज बकाऊ वुल्फची आठवण यायचा दिवस दिसतोय माझा. माझी पहिली नोकरी बकाऊ वुल्फमध्येच! मिपावर आजच पहिल्या पगारावरचा लेख आणि प्रतिक्रिया वाचताना आठवण झाली आणि आता इथेही उल्लेख!

मला आठवतंय ट्रेनी इंजिनिअर म्हणून बकाऊ वुल्फ मध्ये लागल्यानंतर पुण्याहून पिंपरीला जायचे म्हणून कंपनीच्या बसबद्दल विचारले. तेव्हा मला आणि माझ्या मित्रांना सांगण्यात आले की असल्या सुविधा ट्रेनीज् ना मिळत नसतात. (मुकाट्याने) लोकलने या :T सुरुवातीला शेजारच्या हिंदुस्थान अँटेबायोटिक्स् च्या वासाने डोके भणभणून जाई. महिन्याभरात त्या वासाची सवय झाली असावी कारण नंतर त्रास झाला नाही.

_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

टारझन's picture

16 Apr 2010 - 3:09 am | टारझन

ते हाटिल न बेकरीचं एवढं किलेर ठाऊक नाही ... पण पिंपरी म्हणजे पुर्ण गजबजुन गेली आहे..... शिंधी - पंजाबी बायकांच्या वजनाला काही लिमीट नसतं हे खरंच म्हणा =)) पण काही काही सिंधी पोरी दिसतात मात्र अफलातुन बरंका :) आणि त्या अजुन स्कुल मधल्याच असतात ह्यावर कोणाचा विश्वास पण बसणार नाही . ...
बाकी दलदली इलाका गेला .. सगळीकडे बिल्डिंगीच बिल्डींगी :) वास कायम आहे .. आणि पुलाखाली गेलात की ३० रुपै किलो बडे का .. =)) हे असले धपले च्या धपले टांगलेले असतात. बाकी चांदभाई ही आहेत आणि भिमभाऊ ही आहेत :) पिंपरी ने सगळ्यांना सामावुन घेतले आहे.

प्रचेतस's picture

16 Apr 2010 - 9:10 am | प्रचेतस

ते इराण्याचे हॉटेल म्हणजे रॉक्सी व शेजारचे हॉटेल महाराष्ट्र ती दोन्ही हाटेलं अजूनही जोरात सुरु आहेत.
बाकी विशाल ची आठवण म्हणजे ते जेव्हा सुरु झाले तेव्हा तिथे पहिला चित्रपट लागला होता तो म्हणजे अमिताभचा 'महान'. तो बघायला आम्ही गेलो होतो. अर्थात आम्ही तेव्हा खूपच लहान असल्याने आता काही तो चित्रपट आठवत नाही कारण तो अजूनपर्यंत परत पाहण्याचा काही योग आला नाही.
तिकडची मिलनसार बेकरी १२/१३ वर्षांपूर्वीच खराळवाडी येथे महामार्गावर स्थलांतरीत झाली आहे.

---------
(पिंपरीकर) वल्ली

पांथस्थ's picture

16 Apr 2010 - 12:16 pm | पांथस्थ

विशाल थिएटर नंतर नंतर एकदम टुकार झाले होते...पण डि.वाय. पाटिलला असतांना दांड्या मारुन जायला ते एकदम सोयीस्कर होते :)

ह्या धाग्या आणी प्रतिक्रियांमुळे जुने दिवस आठवले! मन:पुर्वक धन्यवाद!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

अरुंधती's picture

16 Apr 2010 - 1:43 pm | अरुंधती

वल्ली व टारझन, धन्यवाद, मला माहित असलेल्या पिंपरीची सध्याची खबरबात दिल्याबद्दल! रॉक्सी आणि न्यू महाराष्ट्र रिफ्रेशमेन्ट हाऊस..... आठवलं!!!! :-) आमचे ईमर्जन्सीच्या वेळचे अन्नदाते होते ते! चिन्मनानी सांगितला तसा तो सँडविक कंपनीचा स्टॉप ओलांडल्यावर येणारा (कु)वासही आठवला.... बकाऊल्फच्या भिंतीला लागून अनेक नेपाळी लोक स्वेटर, शाली विकायचे....एवढ्या बुरख्यातल्या स्त्रियाही मी तिथेच पहिल्यांदा पाहिल्या. तिथे फार दिवस राहिलो नाही, पण भोंग्यांच्या तालावर चालणारे तिथले जनजीवन, एक वेगळीच संस्कृती, जगण्याची धडपड मात्र आठवणीत कोरली गेली! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

चतुरंग's picture

16 Apr 2010 - 3:39 am | चतुरंग

'शोले, मी एकदाच संपूर्ण पाहिला आहे. मला आता संपूर्ण आठवत नाहीये.
मी शाळेत असताना आमच्या वर्गातल्या पोरांना संपूर्ण शोलेचे डायलॉग्ज पाठ होते! अगदी तोंडपाठ.
म्हणजे कसे? तर सरळ सुरुवातीपासूनच नाही तर अधला मधला कुठलाही प्रसंग सांगा तिथून पुढे गाडी सुरु एकदम बिनचूक! ;)
(एकदा प्रयोगशाळेत बसल्या बसल्या पोरांचे डायलॉगबाजी सुरु झाली. सर आले ते ऐकत उभे होते. थोड्या वेळाने आमचे लक्ष गेले. सर मिस्किलपणाने म्हणतात कसे "अरे बाळांनो ह्याच्या १% जरी लक्ष शाळेत दिलेत ना तरी एकदम सगळे पहिलेच याल रे!" ;) )

चतुरंग

चिन्मना's picture

16 Apr 2010 - 6:30 am | चिन्मना

शोलेच्या डायलॉग्ज् ची कॅसेट आमच्याकडे होती (अजूनही आहे) आणि मलाही जवळ जवळ सगळे डायलॉग्ज् पाठ होते. ते ऐकताना सगळे प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहतात. डोळे बंद करूनही शोले अनुभवता येतो तो असा!

पूर्वी रोहिणी हट्टंगडी संपादिका असलेलं चंदेरी नावाचं साप्ताहिक (का पाक्षिक?) होतं. त्यात राजू भारतन् चे लेख असत. एका लेखात त्यांनी शोलेबद्दल लिहिलं होतं - ८ कडक रसायनांमुळे शोलेचं मिश्रण इतकं जबरदस्त झालं होतं. ती ८ कडक रसायनं म्हणजे - सलीम-जावेद, रमेश सिप्पी, पंचमदा, संजीवकुमार, अमजद खान, अमिताभ, धर्मेंद्र, आणि हेमा मालिनी ! I couldn't agree more !.
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

चिंतातुर जंतू's picture

16 Apr 2010 - 9:58 am | चिंतातुर जंतू

८ कडक रसायनांमुळे शोलेचं मिश्रण इतकं जबरदस्त झालं होतं. ती ८ कडक रसायनं म्हणजे - सलीम-जावेद, रमेश सिप्पी, पंचमदा, संजीवकुमार, अमजद खान, अमिताभ, धर्मेंद्र, आणि हेमा मालिनी !

शोलेचा मूळ मसाला हा अमेरिकन 'वेस्टर्न'वरून उचललेला होता. नक्कल चांगली होती, पण ती नक्कल होती हे खरंच.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

संदीप चित्रे's picture

16 Apr 2010 - 6:56 pm | संदीप चित्रे

मूळ जपानी सिनेमाची नक्कल होती ;)

अधिक माहिती (ज्यांना नसेल त्यांच्यासाठी): 'शोले'ची कल्पना ज्या सिनेमांवरून उचलली आहे ते अमेरिकन सिनेमा म्हणजे 'मॅग्निफिसंट सेव्हन' आणि 'बच कॅसिडी अ‍ॅन्ड सनडान्स किड' !
(ह्यापैकी 'मॅग्निफिसंट सेव्हन' हा सिनेमा मूळ जपानी सिनेमा 'सेव्हन सामुराई' ह्यावरून घेतला आहे)

चिंतातुर जंतू's picture

16 Apr 2010 - 10:33 pm | चिंतातुर जंतू

(ह्यापैकी 'मॅग्निफिसंट सेव्हन' हा सिनेमा मूळ जपानी सिनेमा 'सेव्हन सामुराई' ह्यावरून घेतला आहे)

अगदी बरोबर. अकिरा कुरोसावाचा 'सेव्हन सामुराई' हा जपानी चित्रपट आमच्या मते 'वेस्टर्न' चित्रपटांचा सर्वोत्कॄष्ट नमुना आहे! त्याशिवाय कुरोसावाचे 'सांजुरो', 'योजिंबो' अन 'हिडन फॉर्ट्रेस' हेही उत्कृष्ट 'वेस्टर्न' म्हणून पाहाण्यासारखे आहेत. यापैकी 'योजिंबो'वरून नंतर 'फिस्टफुल ऑफ डॉलर्स' हा अमेरिकन चित्रपट बेतला होता. त्यात क्लिंट इस्टवूड होता.

जाताजाता: आपल्या़कडे 'मुंगडा' या हेलनच्या दिलखेचक गाण्यासाठी गाजलेला तो हिंदी चित्रपट कोणता? तो कुरोसावाच्या 'हाय अ‍ॅंड लो' या चित्रपटावरून बेतला होता.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

शेखर's picture

16 Apr 2010 - 10:42 pm | शेखर

>> आपल्या़कडे 'मुंगडा' या हेलनच्या दिलखेचक गाण्यासाठी गाजलेला तो हिंदी चित्रपट कोणता?
विनोद खन्नाचा 'इन्कार'

अस्मी's picture

16 Apr 2010 - 10:14 am | अस्मी

अगदी...आमच्याकडे शोलेची कॅसेट होती...त्यामुळे कमीतकमी ५०-६० वेळा तरी पाहिला असेल...डायलॉग्ज् पाठ असणं आलंच न ओघाने ;)

बाकी लेख एकदम मस्त :)

- अस्मिता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

चित्रगुप्त's picture

16 Apr 2010 - 5:15 am | चित्रगुप्त

अगदी र्‍हदयस्पर्शी आठवण सांगितलीय....
विषय कोणताही असो, तुम्ही सुंदरच लिहिता ताई....
म्हणजे सिनेमाचा लहान मुलांच्या मनावर जबर परिणाम होतो असे दिसते....

आम्ही अजूनही शोले बघितलेला नाही.....सिनेमे वघण्याच्या वयात दासबोधाची पारायणे केली.....शिवाय जे जे काही प्रसिद्ध, ते ते आम्हास त्याज्य, हेही एक कारण होते......
मात्र अलिकडे राजू श्रीवास्तव ने केलेले शोले चे विडंबन बघून शोले बघावा कि काय, असे वाटते....
अलिकडे पिंपरीला प्रथमच गेलेलो असताना सहज फिरताना अचानकच विशाल टॉकीज समोर पोचलो,तिथे नुक्ताच "अवतार" लागला होता, खरेतर तो थ्री डी बघायचा होता, पण म्हटंलं चला बघूया काय प्रकार आहे, म्हणून गेलो....गंमत म्हणजे पब्लिक मधील काहींनी चक्क पोलिसवाल्या शिट्या आणलेल्या होत्या, हिरो हिरॉईन जरा नुस्ते जवळ जरी आले, तरी शिट्या सुरु.... शेवटल्या लढाईच्या वेळी पब्लिकने टाळ्या, शिट्या, ओरडाओरडीचा कहर केला....असे फार वर्षांनी अनुभवायला मिळाले....लै मजा आला...

पक्या's picture

16 Apr 2010 - 7:32 am | पक्या

शोले बघितला नाही अजून? काय सांगताय -
शोले सारखा सिनेमा पुन्हा होणे नाही. आज इतकी वर्ष झाली तरी शोलेची जादू कायम आहे. काय डायलॉग्ज, काय गाणी, काय अभिनय्..सगळंच जबरदस्त.

अरुंधती ताई , छान रंगवलाय प्रसंग , मजा आली वाचताना.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

नितिन थत्ते's picture

16 Apr 2010 - 12:06 pm | नितिन थत्ते

>>तिथे नुक्ताच "अवतार" लागला होता, खरेतर तो थ्री डी बघायचा होता

कोन्ता अवतार हो? आम्ही राजेस खण्णा आणि सबाणा आझमीचा एक अवतार पाहिला होता. तो काय थ्री डी नवता ब्बॉ.

नितिन थत्ते

टुकुल's picture

16 Apr 2010 - 12:22 pm | टुकुल

मस्त आठवण,, बाकी तुमची लिहिण्याची स्टाईल एकदम झक्कास. अजुन लिहित रहा.

--टुकुल

दिपक's picture

16 Apr 2010 - 12:34 pm | दिपक

अरुंधतीताई खरच छान आठवण आहे. असेच लिहित रहा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Apr 2010 - 3:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अमिताभ बच्चन मेला ... =)) =))

ललिता पवारांनी त्यांची आठवण सांगितली होती. त्यांना लहानपणी चित्रपट या प्रकारांची भीती वाटायची. कारण तिथे माणसं 'कापतात' आणि रक्तही येत नाही. कॅमेर्‍याच्या फिल्मची रुंदी लिमिटेड असते हे कळायला बरीच वर्ष लागली असं त्या म्हणाल्या होत्या.

अदिती

डॉ.प्रसाद दाढे's picture

16 Apr 2010 - 3:42 pm | डॉ.प्रसाद दाढे

शोले म्हणजे एक पर्वच आहे असं म्हणायला हरकत नाही. शोले म्हणजे मस्त चितळ्यांच्या मलईदार चक्क्याचं श्रीखंड, त्यावर बदाम- पिस्त्याची पखरण, केशराच्या चार काड्या अन चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा ! इतकं सगळं जमून आलं आहे.
पहिली दाद घेऊन जाणारं टायटल संगीत, जबरदस्त पटकथा, अचूक पात्र निवड, पर्फेक्ट वेग, अविस्मरणीय संगीत ('मेहबूबा मेहबूबा' हा एका स्वतंत्र लेखाचाच विषय आहे.. ), ठाव घेणारं पार्श्वसंगीत, संजीवकुमारचा तो 'कायर नहिं हैं हम..' मधला अंगावर काटा आणणारा विलक्षण आवाज.. किती लिहू अन किती नाही.. मी कमीत कमी वीसवेळा तरी पाहिला असेलच..परत बघीन.
वेळ मिळाल्यावर आणखीन लिहिन..

रेवती's picture

16 Apr 2010 - 6:27 pm | रेवती

शोले चित्रपट आल्यानंतर तो २५ वर्षांनी पहायला मिळाला. अधेमधे तो थेट्रात यायचा पण तश्या वस्तीत किंवा असे काहीसे कारण असायचे न जायला. कॉलेज संपतासंपता एका मैत्रिणीच्या घरी व्हिएचेस बघायला तिनं बोलावलं होतं मग पाच दिवस थोडाथोडा तिच्याकडे जाऊन बघितला. बरोबरच्या मैत्रिणींनी एकसंधपणा नसल्याने चित्रपट न आवडल्याची तक्रार केली .;) मी भित्री असल्याने जे काही तुटक पाहणं झालं ते बरं झालं असं वाटलं. सिनेमा आवडला किंवा नाही असं काहीच सांगता येणार नाही मला.

रेवती

मराठे's picture

16 Apr 2010 - 7:20 pm | मराठे

शोलेची ऑडिओ कॅसेट होती माझ्याकडे .. आणि ती ऐकून ऐकून सगळे डायलॉगच नाही तर पार्श्वसंगीत सुद्धा.. त्याचबरोबर बकर्‍यांचे, घोड्यांच्या टापांचे,आगगाडीचे, बंदुकीच्या गोळ्याचे आवाजसुद्धा पाठ झाले होते आणि अजुन थोडेफार आठवताहेत. (हीच पद्धत वापरून एकदा कॉलेजच्या नोट्स कॅसेटमधे फितवून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.. अर्थात फसला. कुठे शोले आणि कुठे इकॉनॉमिक्स) इतकं होउन पण सिनेमा अजुन पाहिलाच नव्हता. तो पाहिला काही वर्षांनी. पण घरी विडिओवर, छोट्या पडद्यावर.. मग एकदा कॉलेज मधे असताना मेट्रोला "शोले" लागल्याचं एका मित्राने सांगितलं मग त्यालाच बरोबर घेउन बघायला गेलो.. (पाहून परत येत असताना माझं पाकिट मारलं होतं गाडीत .. त्यामुळे हे सगळं जास्त लक्षात आहे).

टारझन's picture

16 Apr 2010 - 7:28 pm | टारझन

तुम्हारा नाम क्या है मराठे ? :)

बाकी त्यो संभा त्या खडकावर उन-पाऊस-वारा कश्शा कश्शाचा प्रभाव न पडु देता तैनात होता .. आणी फक्त "जी पचास हजार" इतकंच बोलायचा =)) वर ना किचान होतं ना कमोड ...
बाकी शोले ची आम्ही ज्या लेव्हल पर्यंत चिरफाड केली तितकी आम्ही दुसर्‍या पिक्चर्स ची करु शकलो नाही , :)

- टोले

स्वाती२'s picture

16 Apr 2010 - 7:26 pm | स्वाती२

गमतीदार आठवण.

स्वाती२'s picture

16 Apr 2010 - 7:31 pm | स्वाती२

गमतीदार आठवण.

प्रियाली's picture

16 Apr 2010 - 7:38 pm | प्रियाली

आमच्या घरात चित्रपट सुरु झाला की कन्यारत्नाचा प्रश्न असतो -

"या सिनेमात कोण कोण मरणार?"

व्हिलन मरत असेल तर सिनेमा बघितला जातो.
हिरो मरत असेल तर सिनेमा बघितला जात नाही.

शोलेची डिव्हिडी घरात शेवटपर्यंत बघायची परवानगी नाही. हेमामालिनी काचांवर नाचून तिच्या पायांतून रक्त येण्यापूर्वीच चित्रपट बंद करावा लागतो.

अरुंधती's picture

16 Apr 2010 - 8:40 pm | अरुंधती

हा हा हा.... प्रियाली.... तुझी लेक हुशार आहे! तिने आधीच नियम ठरवून टाकलेत :)......... काश, हमें भी यह अकल होती.... कितीतरी टुकार किंवा शोकांत पिक्चर्स पाहाण्यापासून स्वतःला वाचवता आले असते!!! ;-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/